द्रौपदीचा श्रीकृष्ण

हिरव्या गार रानमाळावर द्रौपदी तीचे मुल व तीचे पती रोज नेमाने कामाला जात असत, स्वतःचे नसेल तरी लोकांच्या शेतावर काम करून कसे बसे हे कुटुंब पोट भरायचं. अशातच एक दिवस तिच्या पतीला शेतात काम करताना विशारी अळीने दंष केला, एकाएकींच तब्येत जास्त झाल्याने तात्काळ मोठ्या दवाखान्यात हलवाव लागले, जवळ फक्त चारशे रूपये. सोबतीला सासरच कुणीही नव्हते. तीथ फक्त तीचा मोठा भाऊ श्रीकृष्णाच्या रुपात खंबीरपणे उभा राहिला, त्या दोघांना तर काय करावं काहीच सुचेनासे झाले, त्यातच डॉक्टरांनी त्यांच्या पायचे तात्काळ ऑपरेशन सांगितले., हे ऐकताच भाऊजींनी ऑपरेशनला नकार दिला,पण पायाच्या वेदना असह्य होत होत्या.शेवटी दादाने दोघांनाही धीर दिला.

दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन झाले.

द्रौपदी कडे तर कसलाही आर्थिक सपोर्ट नव्हता, व दादाचीही परिस्थिती जेमतेमच. दहा हजार पगार, बाबांच्या भिक्षुकी वर घर चालत, तरी दोन बहीनी, त्यांचे शिक्षण, बाबांना बीपी, शुगर, आईला बीपी, तसेच छोट्या बहीनीला लहानपणी मेंदूत ताप गेल्यापासून तिचा चालू असलेला दवाखाना तीचे औषधोपचार सर्व संभाळून आता परत द्रौपदी च्या या कठीण प्रसंगात दवाखान्याचा सर्व खर्च दादानेच पाहीला, अशातच एका ऑपरेशननी पाय बरा झाला नाही, चार वेळा ऑपरेशन करावे लागले, सर्व मिळुन अडीच लाखांच्या वर खर्च आला ह्या वेळी द्रौपदी व तीच्या पतीला काहीच सुचेनासे व्हायचं,कुठुन आणणार इतका पैसा व दादा पन कुठून आणणार, या विचाराने ती दोघे चिंताग्रस्त असायची, मात्र याच वेळी त्यांना धीर देत काहीही झाले तरी मी भाऊजीन त्यांच्या पायावर ऊभे करणार, हे दादाचं वाक्य ऐकून द्रौपदीला धीर आला, दादाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, होईल तेवढ्या सर्व ठिकाणाहून उसने पैसे आनले.

भाऊजींना परत त्यांच्या पायावर उभे केले.


आजच्या कठोर जगात जीथं पैशावरुन ईस्टेटीवरुन भावा बहीनीत वाद होत असतांना फक्त आणि फक्त कर्तव्य, जबाबदारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझेपणा, या श्रीकृष्ण नीतीने बहीनीच्या कठीण क्षणात तिच्या पाठिशी तीचा भाऊ खंबीरपणे उभा राहतो ,आभाळापेक्षाही मोठ मन असलेल्या ह्या भावासारखा ही द्रौपदी परमेश्वराला एकच मागते की माझ्या दादाला सदैव सुखी ठेव ,त्याला सर्व सुख लाभु दे.
जेव्हा आपण आपले दुःख विसरून दुसर्याला हसवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा परमेश्वर आपोआपच आपल्या मुखावरही स्मित खुलवतो, दादाची हीच शिकवन द्रौपदी व तीच्या पतीला जगण्याचे नवे धैर्य देत आहे

1 thought on “द्रौपदीचा श्रीकृष्ण”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top