विष्णुसहस्त्रनामाचे महत्त्व

विष्णुसहस्त्रनामाचे महत्त्व खास आपल्यासाठी, जाणून घ्या विष्णुसहस्त्रनामाचे महिमान.

विष्णुसहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे दूर पळतात.

१)दर बुधवारी ४वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले, तर आपल्या सर्व पितराना सद्गति मिळते.

२)नियमित रोज १२वेळा विष्णुसहस्रनाम ६ महिने म्हटले, तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते. इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच भुक्ति व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात.

३) १५,००० वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले, तर एक विष्णुयाग केल्याचे फळ मिळते असे पू. श्रीडोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे.

४)एकादशीच्या रात्री १२ वाजता स्नान करून विष्णुपुढे (राम/ बालाजी/पांडुरंग/ कृष्ण, फक्त नृसिंह नको) तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णुसहस्रनामाचे १२ पाठ १२ एकादशीना केले, तर साक्षात भगवंताचे दर्शन होते.

५)४०दिवसांच्या रोज १२ वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात.

६)सहस्र तुलसीपत्रानी सहस्रनामानी अर्चन अथवा हवन केले, तर अतिशय उत्तम अनुभव येतात.

७)बालकृषणाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णुसहस्रनाम म्हणवून घेतले, तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते, ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली, तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते.

८)वास्तु दोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत, याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच.

९)बाहेरच्या त्रास असेल, संतती मतिमंद-गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ- संध्याकाळ श्रीविष्णुसहस्रनामाचे पाठ ऐकवावेत.

१०)घरामधे कोणी व्याधिग्रस्त असेल, तर विष्णुसहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते.

११)श्रीविष्णु मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो, त्याचे सर्व अहित नाहीसे होते, त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो.

१२)विष्णुसहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे, त्याच्या ऐवजी विष्णुसहस्रनामाच्या आधी व शेवटी ३ वेळा ॐ नम: शिवाय आणि ३ वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा.

१२)श्रीविष्णुसहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की, जो या स्तोत्राचे पठन करेल, त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे.

१३)पिंपळाच्या पारावर बसून विष्णुचे ध्यान करीत जो विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो, त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळू हळू नष्ट होतात.

१४)शिवालयात, तुलसीवनात बसून जो रोज विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो, त्याला कोट्यवधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे.

१५)श्रीविष्णु यांच्या अच्युत, अनंत, गोविंद या तीन नावानी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो.

१६)आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर, तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाउल ठेवण्या आधी मनातल्या मनात ४ वेळा नारायण, नारायण, नारायण नारायण असे नाम घ्यावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top