होलिकापुजन

होलिकापुजन- फाल्गुन शुक्ल पौर्णिमा हुताशनी II१५II होलिकापुजन करावे. याकरीता प्रदोषकाळ मुख्य आहे.


होलिकाप्रदीपनशास्रार्थ- होलिका प्रदिपन भद्रारहित पौर्णिमा-प्रदोषकाळी करावयाचे असते. भद्रारहित प्रदोषकालव्यापिनी पौर्णिमा मिळत नाही. अशा वेळी भद्रामुख सोडून होलिकाप्रदिपन करावे असे धर्मसिन्धूत सांगितलें आहे.


सायंकाळी होलिकापूजन करतांना प्रथम- आचमन I प्राणायाम II संकल्प- देशकालादि उच्चारुन ‘सहकुटुंबस्य मम ढूंढाराक्षसी प्रीत्यर्थ तत्पीडापरीहारार्थ होलिका पूजनमहं करिष्ये II सुकीं काष्ठें, गोवऱ्या याचा ढीग करुन अग्नीने पेटवावा त्यावर “असृक्पा भयसंत्रस्तं कृत्वा त्वं होलिबालिशै: II अतस्त्वं पूजायिष्यामि भूते भूतिप्रदाभव II” या पूजेच्या मंत्राने “श्रीहोलिकायनम: होलिकां आवाहयामी II असे होलिकादेवीचे आवाहन करावे. “होलिकायै नम:” या मंत्राने आसनादि षोडषोपचार पूजा करावी.

अग्नींला तीन प्रदक्षणा घालून आचाराप्रमाणे शंखध्वनी, गायन हास्यविनोद करावे.
राजाने वाद्याचा गजर करुन स्नान पुण्याहवाचन वगैरे करुन होळी प्रदिप्त करावी व दुध, तुप यांनी विझवावी. नारेळ, म्हाळुंगे याचा प्रसाद करावा. नंतर गायनवादन इत्यादि करमणूक करावी. व बीभत्स शब्दानी ढुंढादेवी तृप्त करावी.

याप्रमाणे पौर्णिमेचा रात्रभर उत्सव करुन दुसऱ्या दिवशी.. अभ्यंगस्नान करून नित्यकर्म आटोपल्यावर अरिष्टाच्या निशार्थ होळीच्या विभूतिला नमस्कांर करावा, म्हणजे सर्व अरिष्टांचा नाश होतो. नमस्कार मंत्र- “वंदितासि सुरेन्द्रेण ब्रम्हणा शंकरेण च I अतस्तां पांहि नो देवि भूते भूतिप्रदा भव II”


श्री गजानन गुरु गोविंदराव कुलकर्णी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top