Author: admin

  • दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष!

    🌹वसुबारस ते भाऊबीज, जाणून घ्या दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष!🌹

    हिंदू धर्मात दर दिवशी काही ना काही सण, उत्सव असतात. काहीच नसेल तर सोमवार महादेवाचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार विठोबाचा असे म्हणत दिनविशेष देऊन ठेवले आहेत. म्हणजेच काय तर आयुष्य उत्सवासारखे साजरे करा, हेच आपल्या पूर्वसूरींचे आपल्याला सांगणे आहे. अशात दिवाळी ही सणांची राणी! सगळ्या सणांमध्ये तिच्या आगमनाची उत्सुकता वेगळीच असते. कारण पाच दिवस उत्सवाचा आणि उत्साहाचा माहोल असतो. यंदा कोणत्या दिवशी कोणते सण येणार आहेत, ते जाणून घेऊ.

    वसुबारस :
    कार्तिक कृष्ण द्वादशीचा दिवस गोवत्स द्वादशी म्हणून साजरा केला जातो. त्यालाच आपण वसुबारस असेही म्हणतो. २१ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटांनी द्वादशी सुरू होणार आहे. त्यादिवशी गोमातेची आणि वासराची पूजा करण्याचा मुहूर्त सायंकाळी ५.२९ ते रात्री ८. ७ मीनिटांपर्यंत असणार आहे.

    धनत्रयोदशी :
    २३ ऑक्टोबर शनिवारी धनत्रयोदशी आहे. त्या दिवशी सायंकाळी ६ वाजून ३ मीनिटांनी त्रयोदशीची तिथी सुरू होणार आहे. अकाली मृत्यू येऊ नये, म्हणून या दिवशी सायंकाळी घराबाहेर म्हणजे पूर्वीच्या प्रथेनुसार परसाकडे दीवा लावला जात असे. हा दीवा यमाला दान केला जात असे, म्हणून त्या विधीला यमदीपदान असे म्हणतात. या दिवशी धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त सायंकाळी ६.२८ मीनिटांनी सुरू होऊन ७. १५ मीनिटांपर्यंत असणार आहे.

    नरक चतुर्दशी :
    दिवाळीचा तिसरा दिवस, कार्तिक कृष्ण चतुर्दशी. मात्र इंग्रजी कॅलेंडरनुसार अनेकदा चतुर्दशी आणि अमावस्या तिथी एकत्र येते. त्यामुळे नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी केले जाते. यंदाही दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्या आहेत. परंतु त्यांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.२८ मीनिटांनी चतुर्दशी तिथी सुरू होणार आहे. हा दिवस नरक चतुर्दशीचा म्हणजेच अभ्यंग स्नानाचा, पहिल्या अंघोळीचा असणार आहे. नरकासूराचे प्रतीक म्हणून याच दिवशी पहाटे अंघोळ झाल्यावर कारिंटे पायाने फोडण्याचा आपल्याकडे प्रघात आहे.

    लक्ष्मीपूजन :
    लक्ष्मीपूजन देखील २४ ऑक्टोबर रोजी असणार आहे.या दिवशी सोमवती अमावस्यादेखील आली आहे. ही तिथी सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार असून लक्ष्मी पूजेची वेळ सायंकाळी ६. वाजून ८ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असणार आहे. यंदा लक्ष्मी पूजेबरोबर महादेवाची पूजा करणे शुभ ठरेल.

    गोवर्धन पूजा :
    दिवाळीचा चौथा दिवस गोवर्धन पूजेसाठी तसेच अन्नकूट यासाठी राखीव ठेवलेला असतो. यंदा भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी अन्नकुट असल्याचे दिनदर्शिकेत सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णांनी गोकुळावर आलेले नैसर्गिक संकट परतावून लावण्यासाठी आणि गोकुळवासियांचा अतिवृष्टीपासून बचाव करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. निसर्ग हाच आपला देव आहे, त्याची राखण करा, पूजन करा, सन्मान करा, हा संदेश भगवंतांनी आपल्या आचरणातून दिला होता. हे स्मरणात ठेवण्यासाठी दिवाळीच्या चौथ्या दिवशी गोवर्धनाची प्रतीकात्मक पूजा केली जाते. किंवा कृष्णाला दूध-सारखरेचा नैवेद्य दाखवला जातो आणि निसर्गाशी नाते जोडावे, म्हणून या दिवशी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, गोमातापूजन केले जाते. गोरगरीबांना अन्न,धान्य,शिधा दिला जातो.

    भाऊबीज :
    दिवाळीचा शेवटचा पण महत्त्वाचा दिवस भाऊबीजेचा. यंदा २६ ऑक्टोबर रोजी बुधवारी भाऊबीज आली आहे. त्यालाच यम द्वितीया असेही म्हणतात. ते यासाठी कारण, भाऊबीजेच्या दिवशी यमाची बहीण यमी हिने आपल्या भावाकडे समस्त भावांच्या प्राणांचे दान मागून घेतले होते. परंतु, हे दान सृष्टीनियमाविरूद्ध असल्याचे यमाने सांगितले. बहिणीचे मन मोडू नये, म्हणून यमराजाने भाऊबीजेच्या दिवशी शक्यतो भावा-बहिणीची ताटातूट होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. तेव्हापासून या सणाला यम द्वितीया असे देखील म्हटले जाऊ लागले. भाऊबीजेचा शुभमुहूर्त दुपारी १ वाजून ४३ मीनिटांनी सुरू होणार आहे.🌹 विश्वास गुरुजी🌹

  • श्री स्वामी समर्थ दिपावली सेवा संच

    श्री स्वामी समर्थ दिपावली सेवा संच

    🛑दिपावली सेवा संच विषयी माहिती व वेळा🛑

    आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाची आचारसंहिता आपल्या सेवेकऱ्यांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलीं विविध सेवा आपणाकडून करून घेत आहेत. दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे. जर परमपुज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे खालील नियमांचे पालन करुन दिपावलीत सेवा केली, तर गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपादृष्टीमुळे आपणा सर्वांच्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा होईल.

    🛑 दिपावलीची सेवा करावयाचा कालावधी 🛑

    👉प्रारंभ- सोमवार दि. 17 ऑक्टोबर 2022 कालाष्टमी)

    👉समाप्त- सोमवार , दि. 24 ऑक्टोबर 2022 अमावस्या)

    🛑या नऊ दिवसात दररोज करावयाची सेवा🛑

    🌺घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म व लक्ष्मी पद्म रांगोळी काढावी व प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गाईचे व लक्ष्मीचे पावले काढून रांगोळीवर हळद-कुंकू वाहावे.

    🌺दररोज देवांसमोर गायीचा शुद्ध तुपाचा दिवा व धूप लावावा व घरात गोमूत्र शिंपडावे.

    🌺 अभिषेक – अष्टमी ते अमावस्येच्या दरम्यान कुलदेवतेच्या टाकावर १ किंवा १६ वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक घ्यावा.तसेच स्वामी महाराजांच्या मूर्तीवर १ किंवा १६ वेळा श्रीसूक्त/पुरुष सूक्त अभिषेक करावा व मूर्तींना अत्तर लावावे मूर्ती नसल्यास फोटोला अत्तर लावा.

    🌺 कुंकू मार्चन – दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी कुंकू मार्चन करावे. कुलदेवतेचा टाक ताम्हानात ठेवून त्यावर पाच बोटांनी १०८ वेळा मंत्र म्हणून कुंकू वहावे व व तेच कुंकू कपाळी लावावे.

    🌺 भारीत रक्षा – अष्टमी पासून ते अमावस्या पर्यंत रोज सायंकाळी हातात यज्ञाची विभूती व पिवळ्या मोहरी हातात घेऊन त्यावर कालभैरवाष्टक ११ वेळा, वल्गा सुक्त – १ किंवा ११ वेळा, श्री स्वामी समर्थ मंत्र १ माळ म्हणावे. भारीत रक्षा घराच्या चौफेर टाकावी यामुळे घराचे वर्षभर संरक्षण होते.

    🌺 कमळगठ्ठा मणींची सेवा- अष्टमी पासून ते अमावस्या पर्यंत या ८ दिवसात कमळगट्टाचे दररोज २ मणी हातात घेऊन
    षोडशी मंत्र-१६ वेळा, श्री स्वामी समर्थ मंत्र-१ माळ, कमलात्मक मंत्र-१ माळ
    हि सर्व सेवा करावी व ते मणी एका डबीत बाजूला ठेवावेत. अशी १६ मण्यांची रोज दोन याप्रमाणे ८ दिवसात सेवा पुर्ण करावी.

    🌺 यज्ञहवन –
    शेवटी अमावस्येच्या दिवशी नेहमीप्रमाणे दोन मणींची सेवा झाल्यानंतर घरात एखाद्या लोखंडी पाटिवर यज्ञकुंड पेटवावे. त्यात अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र ११ वेळा, गायत्री मंत्र २४ वेळा, नवार्णव मंत्र १६ वेळा या सर्व मंत्रानी गायीच्या तुपाने “स्वाहा” म्हणून स्वाहाकार करावा.
    तोपर्यंत डबीतील 16 कमळ गठ्ठयांचे मणी गाईच्या तुपात भिजत ठेवावेत.

    वरील मंत्रांच्या स्वाहाकारा नंतर पुन्हा कमलात्मक मंत्र १६ वेळा म्हणून कमळगठ्ठयाचा प्रत्येकी १ मणी अग्नीवर “स्वाहा” म्हणून टाकावा.
    या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थिरता मानसिक शांती उन्नती होते.

    टीप : माझ्या कडे सदर संच उपलब्ध केल्या जाईल

    श्री स्वामी समर्थ

  • श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों ?

    जानिए श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों कराया जाता है ?

    श्राद्ध कर्म विधि – हिन्दू धर्म में पितरों की आत्मिक शांति के लिए श्राद्ध करने का रिवाज है।जब यह श्राद कार्य पूरे विधि से किया जाता है, तभी पितृ की आत्मा शांत होती है. श्राद्ध कर्म विधि में कौवे को खाना परोसा जाता है।

    श्राद्ध कर्म विधि अनुसार कौवे को थाली में खाना परोसा जाता है लेकिन यह भोजन किस उद्देश्य से परोसा जाता है, यह बात बहुत कम लोग जानते है। आइये जानते है श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों परोसते है।

    पुराणों व ग्रंथो में कौवे को एक विशेष पक्षी के रूप में बताया गया है।

    प्राचीन ग्रंथो और महाकाव्यों में इस कौवे से जुड़ी कई रोचक कथाएँ और मान्यताएं भी लिखी हुई है. पुराणों में भी कौवों का बहुत महत्व बताया गया है. पुराणों के अनुसार कौवों की मौत कभी बिमारी से या वृद्ध होकर नहीं होती है. कौवे की मौत हमेशा आकस्मिक ही होती है और जब एक कौआ मरता है, तो उस दिन उस कौवे के साथी खाना नहीं खाते है।

    कौवे की खासियत है कि वह कभी भी अकेले भोजन नहीं करते है. वह हमेशा अपने साथी के संग मिल बांटकर ही भोजन करता है।

    इस पक्षी का श्राद्ध कर्म विधि में भी विशेष महत्व होता है. श्राद्ध में घर में बने सारे भोजन और पकवान निकाल कर एक थाली में रखकर इस कौवे को परोसे जाते है।

    मान्यतानुसार यह पक्षी यमराज का दूत होता है, जो श्राद्ध में आकर अन्न की थाली देखकर यम लोक जाकर हमारे पितृ को श्राद में परोसे गए भोजन की मात्रा और खाने की वस्तु को देखकर हमारे जीवन की आर्थिक स्थिति और सम्पन्नता को बतलाता है।

    जिसको जानकार पितृ को संतुष्टि होती है और उनकी आत्मा को शान्ति मिलती है।

    अपने वंशज के खानपान देखकर पितृ को वर्तमान पीढ़ी के सुखी जीवन का आभास होता है. जिसको सुनकर पितृ संतुष्ट और खुश होते है. इसलिए श्राद्ध कर्म विधि में कौवें भोजन दिया जाता है।

    कौए को अतिथि-आगमन का सूचक और पितरों का आश्रम स्थल माना जाता है। पुराणों की एक कथा के अनुसार इस पक्षी ने अमृत का स्वाद चख लिया था इसलिए मान्यता के अनुसार इस पक्षी की कभी स्वाभाविक मृत्यु नहीं होती। कोई बीमारी एवं वृद्धावस्था से भी इसकी मौत नहीं होती है।

    इसकी मृत्यु आकस्मिक रूप से ही होती है। जिस दिन किसी कौए की मृत्यु हो जाती है उस दिन उसका कोई साथी भोजन नहीं करता है। कौआ अकेले में भी भोजन कभी नहीं खाता, वह किसी साथी के साथ ही मिल-बांटकर भोजन ग्रहण करता है।

    *कौए की योग्यता कौआ लगभग २० इंच लंबा, गहरे काले रंग का पक्षी है जिसके नर और मादा एक ही जैसे होते हैं। कौआ बगैर थके मीलों उड़ सकता है। कौए को भविष्य में घटने वाली घटनाओं का पहले से ही आभास हो जाताहै।

    *पितरों का आश्रय स्थल श्राद्ध पक्ष में कौओं का बहुत महत्व माना गया है। इस पक्ष में कौओं को भोजन कराना अर्थात अपने पितरों को भोजन कराना माना गया है। शास्त्रों के अनुसार कोई भी क्षमतावान आत्मा कौए के शरीर में स्थित होकर विचरण कर सकती है।

    Importance

    *कौए को भोजन कराने का लाभ भादौ महीने के १६ दिन कौआ हर घर की छत का मेहमान बनता है। ये १६ दिन श्राद्ध पक्ष के दिन माने जाते हैं।

    कौए एवं पीपल को पितृ प्रतीक माना जाता है। इन दिनों कौए को खाना खिलाकर एवं पीपल को पानी पिलाकर पितरों को तृप्त किया जाता है।

    विष्णु पुराण में श्राद्ध पक्ष में भक्ति और विनम्रता से यथाशक्ति भोजन कराने की बात कही गई है। कौए को पितरों का प्रतीक मानकर श्राद्ध पक्ष के १६ दिनों तक भोजन कराया जाता है।

    माना जाता है कि कौए के रूप में हमारे पूर्वज ही भोजन करते हैं। कौए को भोजन कराने से सभी तरह का पितृ और कालसर्प दोष दूर हो जाता है।

  • नवरात्र : काय करावे – काय नाही

    नवरात्र मध्ये नऊ दिवस देवीची उपासना करावी नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्याचे धर्मशास्त्रात कुठेही नमूद नाही आणि तो मार्केटिंक कंपन्यांनी आणलेला बीभत्सपणा आहे ते खालीलप्रमाणे…

    नवरात्र आणि देवीची उपासना

    १) ४ वेद ४ उपवेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे आणि उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती आणि दुर्गा उपासनेचे ग्रंथ, असे जवळपास ६० स्मृतिग्रंथ यांत कुठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करा, असे दिलेले नाही. धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करा (स्वच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम) असे दिले आहे. तुमच्यापाशी जे अलंकार असतील ते घाला. मॅचिंग हवेच असे नाही. मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरून हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बीभत्सपणा आला आहे.

    आता याची पुढची आवृत्ती म्हणजे ‘नवरात्रीत ९ रंगांच्या साड्या किंवा ड्रेस घाला’, अशी विज्ञापने झळकू लागली आहेत.

    नवरात्र यांचा लाभ उठवत ड्रेस विक्रेते अन् व्यावसायिक यांनी गल्ला भरण्यासाठी ९ रंगांच्या ड्रेस ची संकल्पना विज्ञापनांमधून मांडली आहे. ९ रंगांच्या साड्या किंवा ड्रेस घालणे उपासनेच्या दृष्टीने निरर्थक आहे.

    २) इव्हेंट मँनेजमेंट कंपन्यांची लुडबूड!

    प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे. महाराष्ट्रात घटस्थापना ही प्रधान असते. त्याचसमवेत अखंड नंदादीप, काही जणांकडे त्रिकाळ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी कुमारिका पूजन आणि भोजन, तसेच माळा बांधणे, अशा पद्धतीने नवरात्र होते. ललिता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होमहवन, सरस्वती आवाहन-पूजन, असेही धार्मिक विधी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत असतात. कर्नाटकात दसरा मोठा असतो, कच्छ, सौराष्ट्र, गुजरात या प्रांतात देवीच्या प्रतिमेचे पूजन करून रात्री जागरण, गरबा, तसेच होमहवन वगैरे पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. बंगालमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. इव्हेंट मँनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात, सरमिसळ करतात आणि नवीनच पद्धती निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो, शास्त्रीय आधार नसतो आणि त्यात देवीची उपासना हा सर्वांत मुख्य भागच नसतो.

    ३) नवरात्र हा मातृशक्तीचा उत्सव आहे, हे न कळल्यास पुढील पिढीचे धर्मांतर होईल!

    प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट्य असते, परंपरा असतात. त्या जपल्याच पाहिजेत अन्यथा काही वर्षांनी आपली मुले, नातवंडे नवरात्र याचा अर्थ डिजे लावून गरबा, दांडिया खेळणे एवढाच घेतील. नवरात्र हा मातृशक्तीचा उत्सव आहे, हे त्यांना कळणारच नाही. मी हिंदु आहे, माझे आचार-विचार, संस्कृती, माझ्या धार्मिक परंपरा याचा त्यांना एकदा विसर पडला की, गळ्यात क्रॉस घाला किंवा सुंता करा, काहीच फरक पडणार नाही. नेमकी हीच नस या इव्हेंट आणि मार्केटिंग आस्थापनांनी जाणली आहे. यात काही झाले, तरी लाभ परधर्मीयांचाच आहे.

    एखादी गरीब भगिनी हे सध्याचे हाय फाय नवरात्र जमणार नाही म्हणून ती देवीपूजन करणार नाही, म्हणजे हळूहळू ती नास्तिक होईल. श्रीमंती आणि धर्मशिक्षणाचा अभाव अन् मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या डिजे आणि गरबा-दांडियाला नवरात्र समजतील, कारण त्यांना नवरात्र म्हणजे देवीची उपासना हे ठाऊकच नसणार. यांचेही धर्मांतर करणे सोपे जाईल. थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल आणि याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदु समाजच कारणीभूत आहे.

    ४) डे संस्कृती लादणार्‍या कंपन्या (आस्थापने) आणि त्यांच्या आहारी गेलेली तरुण पिढी!

    काही वर्षांपूर्वी डे संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा गिफ्ट वस्तूंच्या कंपन्या आणि ग्रिटिंग कार्ड (शुभेच्छापत्रे) करणार्‍या कंपन्या आपल्या देशात आल्या, तेव्हापासून हे डेचे खूळ डोक्यात शिरले. या दिवसांत कोट्यवधींची उलाढाल या कंपन्या करत आहेत. आज अशी अवस्था आहे की, मुलांना श्रीगणेश चतुर्थी, गोकुळाष्टमी कधी आहे, हे सांगावे लागते, तर डे मात्र ते लक्षात ठेवतात. गोकुळाष्टमी ही राजकीय पुढारी मंडळींच्या कृपेने अशीच डिजेमय आणि मद्यमय झाली. किमान आईचा नवरात्र उत्सव (नवरात्रोत्सव) असा होता कामा नये, असे वाटते.

    ५) नवरात्र काळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांतील देवीची उपासना करावी!

    चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारून त्यांचा उत्पात शमन करून जगदंबेने जी विश्रांती घेतली तो काळ म्हणजे हा नवरात्र आहे. या युद्धाचा शीण घालवण्याकरता देवीने नृत्य केले, असा उल्लेख पुराणात आहे. (आपण युद्ध करतच नाही केवळ नाचतो.) या काळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांतील देवीची सेवा करणे, आपल्या परंपरेनुसार नंदादीप, माळ बांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडून सरस्वतीदेवीची उपासना ही विद्या आणि बुद्धी यांकरिता करून घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरिता महालक्ष्मीची उपासना करावी आणि शत्रूसंहार सामर्थ्यप्राप्तीकरिता महाकालीची उपासना करावी.

    ६) नट्यांसारखे नाचण्यापेक्षा तरुण मुलींनी पराक्रमी होण्यासाठी प्रयत्न करावेत!

    मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिळवून उत्तम मार्गाने धन जोडणे आणि छेडछाड करणार्‍या गुंडांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे, याकरिता नवरात्र मध्ये देवीचे माहात्म्य अन् पराक्रम वाचावेत ही आज काळाची आवश्यकता आहे. नट्यांसारखे नाचण्यापेक्षा महाकालीसारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तुरची चेन्नमा, जिजाबाईं यांच्यासारखा पराक्रम दाखवण्याची ही वेळ आहे आणि आवश्यकताही त्याचीच आहे. नाचणारे खूप झाले आहेत; पण पराक्रमी मात्र अल्प होत आहेत.

    ७) मुलामुलींना धोक्यांची जाणीव करून देणे हे कर्तव्य!

    या दांडिया आणि नवरात्र व गरब्याच्या काळात संततीनियमन साधनांची विक्री दुप्पट होते आणि नंतर शालेय अन् महाविद्यालयीन तरूणींच्या गर्भपाताचे प्रमाणही वाढत आहे. लव्ह जिहाद याच काळात फोफावतो आहे. तेव्हा आपल्या मुलामुलींना या धोक्यांची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे. तेव्हा या मार्केटिंग आणि इव्हेंट फंड्यांना बळी न पडता सात्त्विकरित्या, आनंदाने, आपल्या परिस्थितीनुरूप जगदंबेची सेवा करा आणि देवीची कृपा संपादन करा, ही विनंती.

    यापुढे शुभेच्छा देताना तरी सर्व हिंदूनी असे म्हणा, नवरात्र दस-याच्या, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
    हिंदू धर्मियांनी आपल्या परंपरा आणि आपल्या देवीची उपासना करणे हे परम कर्तव्य आहे🙏
    संस्कृती जतन करणे आवश्यक आहे नाहीतर संस्कृतीचा नाश होईल🙏

    🙏🚩 जय हिंदुराष्ट्र🚩🙏

  • कामाचा (कर्म) हिशोब कोण ठेवतो?

    आपण केलेल्या सर्व कामाचा (कर्म) हिशोब कोण ठेवतो?

    जरूर वाचा 🙏 हिशोब

    अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला, रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रुग्णालयाचे मालक असलेल्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर, लगेचच ते स्वत: आय.सी.यू. मध्ये त्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी गेले. दोन-तीन तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी कर्मचार्‍यांना सांगितले की, “या रुग्णाला कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची व्यवस्थित काळजी घ्यावी.” तसेच त्याच्याकडून उपचाराचे व औषधाचे सुद्धा पैसे घेऊ नयेत, अशा ही सूचना त्यांनी दिल्या.

    सुमारे 15 दिवस तो रुग्ण त्या हॉस्पिटलमध्ये होता. जेव्हां तो बरा झाला आणि त्याला हॉस्पिटलमधून सोडण्याचा दिवस आला, तेव्हां त्या पेशंटचे सर्व रिपोर्ट्स व सुमारे अडीच लाख रुपयांचे बिल त्या डॉक्टरांना देण्यात आले जे त्या हाॅस्पिटलचे मालक होते.

    डॉक्टरांनी हिशोब ठेवणार्‍या साहेबांना बोलावून सांगितलं.. “या व्यक्तीकडून एक ही पैसा घेऊ नका. आणि असं करा, तुम्ही त्या रुग्णाला माझ्या खोलीत घेऊन या.” त्या माणसाला व्हील चेयरवर डॉक्टरांच्या खोलीत नेण्यात आले.

    डॉक्टरांनी पेशंटला विचारले- “भाऊ! आपण मला ओळखलंत का?” पेशंट म्हणाला, “मला असं वाटतं मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. पण आठवत नाही!”

    डॉक्टर म्हणाले… “तुम्हाला आठवतं का, की चार वर्षांपूर्वी तुम्ही सूर्यास्ताच्या सुमारास, शहरापासून दूर अशा एका जंगलात एक गाडी दुरुस्त केली होतीत? त्या दिवशी मी माझ्या कुटुंबासोबत सहली वरुन परतत असताना, अचानकपणे गाडीतून धूर येऊ लागला आणि गाडी बंद पडली. आम्ही गाडी बाजूला घेवून, ती सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी सुरू झाली नाही. हळू हळू अंधार होऊ लागला होता. आजूबाजूला निर्जन जंगल होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहर्यावर भिती आणि काळजीच्या रेषा उमटल्या होत्या. प्रत्येकजण देवाकडे, काहीतरी मदत मिळावी, यासाठी प्रार्थना करत होते.

    काही वेळातच चमत्कार घडला. तुम्ही बाईकवरून येताना आम्हांला दिसलात. आम्ही सर्वांनी, दयेच्या भावनेने हात वर केले आणि तुम्हाला थांबण्याचा इशारा केला. तुम्ही बाईक उभी केलीत व आमच्या त्रासाचे कारण विचारलेत. गाडीचे बोनेट उघडून तुम्ही काही तपासणी केलीत आणि काही क्षणातच गाडी सुरू झाली. आमच्या सर्वांचा जीव भांड्यात पडला आणि आमच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली. आम्हाला वाटले, की देवानीच तुम्हाला आमच्या मदतीसाठी पाठविले असावे, कारण त्या निर्जन जंगलात रात्र घालवावी लागणार, ह्या विचारानेच आमच्या अंगावर भितीने शहारे येत होते. तेव्हा तुम्ही मला सांगितले होते, की तुम्ही एक गॅरेज चालवता. मी तुमचे आभार मानले आणि म्हणालो, की पैसे असूनही अशा कठीण प्रसंगी मदत मिळत नाही. अशा कठीण परिस्थितीत तुम्ही आम्हाला केलेल्या मदतीला तोड नाही, ती अमूल्य आहे. पण तरीही मी तुम्हाला विचारतो की ”मी तुम्हाला किती पैसे देऊ?”

    त्यावेळी तुम्ही माझ्यासमोर हात जोडून जे शब्द उच्चारलेत, ते शब्द माझ्या आयुष्याची प्रेरणा बनले आहेत. तुम्ही म्हणालात की, “माझा नियम आणि तत्व हे आहे, की मी संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीच्या बदल्यात कधीही काहीही घेत नाही. माझा देव माझ्या ह्या कर्माचा हिशोब ठेवत आहे.” त्या दिवशी मला जाणवले, की आर्थिक परिस्थिती सामान्य असलेली व्यक्ती, जर असे उच्च विचार आणि अशा मूल्यांचे दृढनिश्चयाने अनुसरण करू शकते, तर मी का नाही? आणि ह्याच संकल्पाचा मी ही माझ्या आयुष्यात पाठपुरावा करत आहे. चार वर्ष झाली आहेत, माझ्या अपेक्षेपेक्षाही मला जास्त मिळत आहे आणि कधीच काहीही कमी पडलेले नाही.
    हे रुग्णालय माझे आहे. तुम्ही येथे माझे पाहुणे आहात आणि तुमच्या नियमानुसार मी तुमच्याकडून काहीही घेऊ शकत नाही.”

    अशा प्रेरणादायी व्यक्तीची सेवा करण्याची संधी मला मिळाली, ही देवाचीच कृपा आहे. तुमच्या देवाने तुमच्या चांगल्या कर्मांचा हिशोब ठेवला आणि आज तो हिशेब चुकता झाला. माझा देव ही माझ्या कर्मांचा हिशोब ठेवेल आणि जेव्हा जेव्हा मला त्याची आवश्यकता असेल, तेव्हा त्याची परतफेड त्यातूनच होईल.” डॉक्टर त्या रुग्णाला म्हणाले.

    “तुम्ही निर्धास्त मनाने घरी जा आणि जेव्हा कधी अडचण आली, तर तेव्हा तुम्ही संकोच न बाळगता माझ्याकडे येऊ शकता.” त्या खोलीमधून बाहेर पडताना, त्या व्यक्तीने खोलीत ठेवलेल्या परमेश्वराच्या फोटो समोर हात जोडले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व हृदय प्रेमाने भरून आले.

    आपण केलेली कर्मे आपल्याकडे परत येतात आणि ती ही व्याजासह. हाच सृष्टीचा नियम आहे.

    फक्त धन दौलत संप्पत्ती कमवल्याने वेळ प्रसंगी कामे येईल हा गैर समज आहे

    कर्म चांगले असले की ते
    वेळ प्रसंगी कामी येतात .

    चागंले कर्म हे अदृश्य डीपाझीट असते .

    पण ह्या साठी आपण चांगले कर्म करायला हवे …….
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • मुळ स्वरूपात सप्तश्रुंगी माता

    मुळ स्वरूपात सप्तश्रुंगी माता

    !! जय सप्तशृंगी माते की !!
    जय…….
    दोन फुट शेंदुराचा लेप होता तो काढल्यानंतर मुळ स्वरूपात सप्तश्रुंगी माता.

    श्री सप्तश्रृंगी माता वणी
    श्री सप्तश्रृंगी माता वणी
  • रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाही

    रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाही
    दिवसभर बांधू शकतात राखी

    🙏🏻🙏🏻🍁🍁🍁🍁🍁🍁🙏🏻🙏🏻

    यावर्षी रक्षाबंधनाला भद्रा असल्याने रक्षाबंधन होऊ शकणार नाही अशी अफवा सोशल मीडियावर येते आहे. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा मकर राशीत आहे मकर राशीतील भद्रा स्वर्गात असते त्यामुळे रक्षाबंधनाला ती अशुभ नाही.
    अनादी काळापासून श्रावण शुद्ध पौर्णिमा या रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या रक्षणासाठी भावाला आणि ब्राह्मण वर्ग आपल्या यजमानाला रक्षासूत्र बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवीत असतो. ज्योतिष विज्ञाना नुसार भद्रा ही वेगवेगळ्या राशीनुसार तीन लोकात फिरत असते. भद्रा ज्यावेळी चंद्र कर्क सिंह कुंभ मीन राशीत असेल त्यावेळी पृथ्वीवर असते, त्यावेळी ती शुभ कार्याला बाधक किंवा अशुभ असते. त्यामुळे 11 तारखेला सकाळी दहा वाजून 39 मिनिटांनी पौर्णिमा लागते तेथून दुसऱ्या दिवशी 12 तारखेला सकाळी 7.05 मिनिटां पर्यंत रक्षाबंधन साजरे करता येणार आहे. त्यातील दुपारी 12:20 ते 3:20 आणि संध्याकाळी 4:50 6:20 हा कालावधी अधिक शुभ आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही सोशल मीडियाच्या पोस्टला घाबरून रक्षाबंधना विषयी गैरसमज ठेवू नये.

    भद्रा विचार
    स्वर्गे भद्रा शुभं कुर्यात् पाताले च धनागमम्।
    मृत्युलोके स्थिता भद्रा सर्वकार्यविनाशिनी ।

    1) कुंभ-मीन-कर्क-सिंह =मृत्युलोक भद्रा
    2)मेष-वृषभ-मिथुन-वृश्चिक =स्वर्गलोक
    3) कन्या-तुला-धनु-मकर =पाताललोक

    भद्रा ज्या लोकात असतात तिथे प्रभाव टाकतात.

    पौर्णिमेला श्रवण नक्षत्र असुन मकर रास आहे – भद्रा पातालात आहे ..मृत्युलोका सणावर परिणाम कसा होईल व रक्षाबंधनाचा भद्रासी कसा योग येईल …

    🙏🏻🙏🏻🙏🏻🍁🍁🍁🍁🙏🏻🙏🏻🙏🏻

    नमस्कार , चार दिवसापासून रक्षाबंधन या सणाबद्दल खूप उलट सुलट मेसेज सोशल मीडियावर येत आहेत , त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच नाही तर तज्ञ व्यक्तींच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण होत आहेत . वास्तविक आपले सणवार हे आनंदासाठी भक्तीसाठी साजरे केले जातात . परंतु आजकाल प्रत्येक सणाच्या वेळी काहीतरी वेगळे सांगून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रकार निदर्शनाला येत आहे . वास्तविक आपल्या धर्मशास्त्रात सर्व माहिती , सर्व ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने परंतु शास्त्रानुसारच दिलेली असते . आज तितके वाचन करणे , त्याचे मनन करणे व ग्रंथ उपलब्ध करणे सर्वांना शक्य होत नाही . परंतु एखादा व्यक्ती अशाच कोणताही वेगळा ग्रंथ प्रमाण मानून त्यानुसार धर्मनियम थोपवत आहेत . महानुभव पंथातील हत्ती व आंधळ्यांची गोष्ट सर्वांना माहिती आहे . हत्तीचे सोंड पाहिलेला आंधळा म्हणतो हत्ती झाडासारखा आहे , पोट पाहिलेला म्हणतो हत्ती नगाऱ्या सारखा आहे , कान पाहिलेला म्हणतो हत्ती सुपासारखा आहे . परंतु या सर्वांचा मिळून हत्ती होतो हे ते लक्षात घेत नाही . तसेच एखाद्या ग्रंथात काही वेगळा उल्लेख असेल तर त्या मागचे कारण किंवा अभ्यास आपल्याकडून होत नाही . इतके दिवस पिढ्यान पिढ्या आपण जे पंचांग वापरतो त्यामध्ये दिलेले मुहूर्त ग्राह्य मानले जात होते . परंतु या सोशल मीडियामध्ये मात्र प्रत्येक जण धर्म तज्ञ होऊन वेगवेगळे मेसेज प्रसारित करत आहेत . त्यामुळे वैचारिक गोंधळ माजून सणाबद्दल शंका कुशंका निर्माण होत आहेत . इतकेच नाही तर धर्मग्रंथ जे पूजनीय मानले जात होते त्याबद्दल सुद्धा शंका निर्माण होत आहेत . वास्तविक आपल्या शंकराचार्यांनी किंवा धर्मसभेने किंवा धर्म मार्तंडाणी याबद्दल निर्णय घेणे व शंका दूर करणे गरजेचे असते . परंतु ते सर्वजण मूक गिळून गप्प बसलेले आहेत व सर्वसामान्य व्यक्ती एकमेकांशी वाद करत आहेत . हे धर्म दृष्टीने अत्यंत चुकीचे होत आहे . आपण रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या प्रेमासाठी व आनंदासाठी साजरा करतो , तो काही फार मोठा विधी नाही किंवा यज्ञयाग नाही त्यामुळे फार बारकाईने त्याबद्दल विचार करणे चुकीचे आहे . रूढी परंपरा अशा आहेत की विप्र रक्षाबंधनापूर्वी आठ दिवस पासून घरोघरी जाऊन यजमानांना राखी बांधतात . रक्षाबंधनाच्या दिवशी जर राखी बांधली गेली नाही तर पुढे महिनाभर कधीही बहिणीकडे जाऊन राखी बांधतात . रक्षाबंधन हा सण आनंदाचा बहीण भावाचा प्रेमाचा आहे असे विचित्र मेसेज सोशल मीडियावर आल्यामुळे त्या सणाचा आनंद लोप पावतो . पंचांग कर्ते आपल्याला जो निर्णय देतात तो आपण आजपर्यंत पाळत आलेलो आहोत , कारण सर्व विचार करून पंचांगात मुहूर्त दिलेले असतात . त्यामुळे आपण खूप बारकाईने त्यावर विचार करण्याची गरज नाही असे माझे स्पष्ट मत आहे . सर्वांनी उद्या दुपारनंतर आनंदाने राखीपोर्णीमा साजरी करावी असे मला वाटते .

  • पेपरटाक्या

    पेपरटाक्या

    ओ भैया लोकमत समाचार पेपर है क्या?" चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला व फार मोठे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.

    बिना रंगाची गंजलेली सायकलचे ब्रेक दाबून खर-खर आवाज करीत सायकल थांबवून स्टॅन्ड लावत लावत एक युवक म्हणाला, “है ना भैया! ये लो” भिंतीवरुनच पेपर त्या माणसाला देत म्हणाला. “ठीक है रुक जरा पैसे लेके आता हुं”, अस म्हणून लुंगीवाला माणूस घरात गेला. तितक्यात माॅर्निंग वाॅकला गेलेले गजभिये सर पेपरवाल्याजवळ येऊन थांबले व नॅपकीनने घाम पुसत म्हणाले, ”अरे राम्या बरं झालं ईथंच भेटलास…दे बरं माझे पेपर.”
    ‘व्हय सर” तो पेपरवाला राम्या आदराने म्हणाला व सायकलीला बांधलेल्या गठ्ठ्यातून एक मराठी व एक ईंग्रजी पेपर काढून देऊ लागला.

    तो लुंगीवाला आला व त्याने 10 रु. ची नोट राम्याच्या हातात दिली. गजभिये सर लुंगीवाल्याला म्हणाले, “Good morning पाटील साहेब.” ”Good morning गजभिये सर.

    “काय आज हिंदी वृत्तपत्र ?” “हो सर, ते काल भारताने अंतराळात यान सोडलयं त्याच्या माहितीचा लेख आलाय लोकमत समाचार मध्ये.” लुंगी घातलेले पाटील साहेब गजभिये सरांच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले.

    राम्या खाकी पॅन्टच्या खिश्यात सुट्टे पैसे शोधत होता. तितक्यात म्हणाला, ”हा साहेब, ते ब्रम्होस व्हय. ते भारत आणि रशियाने पाठवलंय. भारताची नदी हायना ब्रम्हा आणि रशियाची नदी ओक्सावा त्यामुळं त्याला ब्रम्होस नाव दिलंय, आपल्याला सगळं म्हाहीत हाय.” खेडवळ भाषेत राम्या म्हणाला.

    गजभिये सर व पाटील साहेब आश्चर्याच्या प्रतिक्रीया देत म्हणाले, “अरे व्वा! हुशार आहेस तू.”

    पुढे गजभिये सर म्हणाले, ”UPSC ला पडणारा प्रश्न आहे हा. UPSC चा क्लास चालवतो की काय !” पाटील साहेब व गजभिये सर हसत हासत निघून गेले.

    तितक्यात राम्या म्हणाला, ” सर ह्या महीन्याच बिल राहलंय तुमचं.”

    गजभिये सर मागे न वळता म्हणाले, ”उद्या सकाळी दहाला क्लासवर येऊन जा देतो पैसे.”

    सायकलचा स्टॅन्ड काढला व राम्या निघाला पुढे आपल्या कामाला.

    दुस-या दिवशी सकाळी पेपर टाकून झाल्यावर 10 वाजता राम्याची सायकल गजभिये स्पर्धा-परीक्षा ॲकॅडमी असे लिहिलेल्या बोर्डसमोर येऊन थांबली.
    दुस-या मजल्या वरच्या बाल्कनीत बसलेल्या सरांकडे बघून राम्या म्हणाला, ”सर ते बिल..”

    काही न बोलताच गजभिये सरांनी हातवारे करुन त्याला वर येण्यास सांगितले.

    क्लासच्या ऑफीसची बेल वाजली. गजभिये सरांनी दरवाजा उघडला व मळलेला टी-शर्ट व खाकी गणवेशाची पॅन्ट, सावळा चेहरा व 15-16 वर्षाचा सडपातळ राम्या हातात बिल बुक व पेन घेऊन उभा होता.

    “ये आत, ये बस इथं, मी पैसे घेऊन येतो” राम्याच्या हातातले बिल बुक घेत सर म्हणाले व आत गेले.

    राम्या लाकडी खुर्चीवर uncomfortably बसून इकडे तिकडे पाहू लागला. समोरच्या लाकडी टेबलवर काही प्रश्नपत्रिका होत्या, त्यातली एक राम्याने उचलून पाहिली व पटकन बिलच्या मागे काहीतरी लिहू लागला. पाच मिनटांनी सर आले व पैसे देत म्हणाले, “काय लिहीत होतास रे ?”
    ”सर ते हे ऊत्तर बरोबर हायत का बघा ना ” राम्या म्हणाला. सरांनी पाहीले, त्यात 8 बुद्धीमत्तेचे प्रश्न सोडवले होते तेही अवघ्या 4 ते 5 मिनीटात. सर अचंबित झाले व म्हणाले, “अरे कसं सोडवलं तु हे ? आणि एवढ्या कमी वेळात ? UPSC ला हे प्रश्न सोडवायला 10 ते 12 मिनीट लागतात. कसं केलंस तु हे ? कुठे शिकलास.”

    त्यावर राम्या म्हणाला, ” सर मला दहावीत 92 टक्के हायत. बाप न्हाय मला. आय धुनी-भांडी करतेआणी म्या सकाळी पेपर टाकतो. नंतर एका reading room वर वाॅचमन हाय लोकांच्या चपली व गाड्यावर लक्ष ठेवतो. यवढं करुन दोन टायमच खायला भेटतं. सकाळी पेपर वाचून व नंतर reading वर लोकांनी टाकून दिलेल्या नोट्स, कागद, कधी कोणाकडं आय कार्ड नसलं तर त्याचं पुस्तक घेतो वाचायला थोडावेळ व मधी सोडतो गपचुप. मला बी अधिकारी व्हायचंय पण आय म्हणते पैसं न्हायतं शिकायला. ”त्याचे उत्तर ऐकून मात्र सर नि:शब्द झाले. काहीच बोलले नाहीत. त्याच्या हातात पैसे दिले व राम्या निघून गेला.

    दोन दिवसानी राम्या गजभिये सरांच्या क्लाससमोर सायकल लावून समोरच्या बिल्डींगमध्ये बिले गोळा करण्यासाठी गेला व 15-20 मिनीटांनी परत आला. सायकलीच्या ब्रेकला एक जड पिशवी होती. राम्याने ती उघडून बघितली त्यात गणवेश, काही पुस्तके, पैसे होते व तळाला एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, “ह्यात कॉलेजचा गणवेश आहे व पुस्तके आहेत जवळच्या जनता महाविद्यालयात Arts ला तुझा प्रवेश घेऊन ठेवलाय. सोमवार पासून कॉलेजला जायचं. अभ्यास करायचा. अधिकारी व्हायचंय ना तुला. वेळोवेळी तुला पुस्तके भेटतील. फक्त पेपर टाकणे चालू ठेवायचं. “खाली लिहिलं होतं,”मायबापांनी सगळ्या सुविधा पुरवलेला पण कधीच UPSC पास न झालेला अपयशी….”

    अशीच पुस्तके राम्याला भेटत राहिली. व 6 वर्षानंतर गजभिये सर एके दिवशी पहाटे मॉर्निंग वॉक वरुन परतले तेव्हा दारासमोर एक पिशवी होती. त्यात काही मेडल्स व प्रमाणपत्रे होती. तळाला एक चिठ्ठी होती त्यात लिहिलं होतं, “ज्याने एका पेपरटाक्याला IAS केलं तो अपयशी कसा ? तो तर जगातला सर्वात यशस्वी व श्रीमंत माणूस…..!!”

    आपल्याकडे दुस-याला देण्यासारखे असे खूप कांही असते, आपली दुस-याला मदत करण्याची ऐपत देखील असते…पण हवा असतो केवळ मनाचा मोठेपणा व देण्याची वृत्ती व तीही योग्य मनुष्य ओळखून. तो सुज्ञपणा व औदार्य आपल्या प्रत्येकामध्ये वाढीस लागो व वृद्धींगत होवो…आपल्या आजूबाजूला खूप राम्या आहेत…गरज आहेत ती गजभिये सरांची…

    लेखक अज्ञात
    ⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

      *ओ भैया लोकमत समाचार है क्या ?" चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला व फार मोठे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.