Author: admin

  • Lalit 2022 Live Event

    *श्री बालाजी मंदिर उत्सव – लळीत  सोहळा live*
    आपल्यासाठी खास सुविधा उपलब्ध करत आहोत.
    *दिनांक 9 जून ला सकाळी 10 पासून सुरू*
    कृपया लाभ घ्या आणि सर्वांना सांगा
    https://infosrushti.com/undangaonbalaji

  • कपाळावर गंध लावण्याचे फायदे व महत्व

    अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया.

    धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे;

    वाचा गंध लावण्याचे फायदे!

    अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, ‘तू कपाळावर ही विभूती का लावतोस?’  त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंधा म्हणाला, ‘माझी आई मला सांगते म्हणून!’

    मित्रांनो, सोळा वर्षीय प्रज्ञानंधाच्या जागी आपण असतो, तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे.  त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा! मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

    ‘देह देवाचे मंदिर’ असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील, तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देहमंदिराचे स्तंभ आहेत.

    या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे, म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठीदेखील वेळ नसतो, त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी.

    गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे, गंध लावताना अंगुलीस्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात.

    गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे, गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर, आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही, आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सीसीटीव्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदयसिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत, हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याप्रमाणे `माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’ ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते. 

    गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृतीरक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही, तर स्वत:च्या अस्तित्वाची स्वत:ला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदूधर्माने आणि आर्यसंस्कृतीने तिलकविधीला धर्मात स्थान दिले आहे.

    पूर्वीपासून स्त्री-पुरुष कपाळावर गंध लावीत असत़ त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु, गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणेदेखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही, तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इ. विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे, यासाठीदेखील गंध लावले जाते. 

    तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इ. सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणाही सुवासिनीने हळद-कुंकाची लावलेली दोन बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजयतिलक म्हटले जात असे. त्यालादेखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय, तर पालीवर प्राणी, नवीन वस्तू, नवीन वास्तू यांनादेखील गंध लावून पूजन केले जाते. 

    अशा रितीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंत:पुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे

    माहिती संग्रहीत व संकलित
    साभार व्हाॅट्सॲप व सोशल मिडीया

  • Why Shri Shani Dev have Black color?

    शनीची मूर्ती काळी कां असते ?

    स्मशानात चितेवर महर्षी दधीचिंच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पतिवियोगानं वेडीपिशी झाली होती. दुःखावेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली. अशा प्रकारे महर्षी दधिची यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनंही देवांच्या लढाईत आपलं बलिदान दिलं. इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुकेसाठी आकांत मांडला. खायला कांहीच न दिसल्यानं त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली. त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला. झाडाची ढोली हेच त्याचं घर झालं. हळू हळू ते बालक मोठं होऊ लागलं. झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं.
    एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना पिंपळवृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला. नारदाला आश्चर्य वाटले. त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याचेकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली –
    नारद- हे बालका, तू कोण आहेस?
    बालक- मलाही ते माहित नाही. मला तेच जाणून घ्यायचं आहे.
    नारद- तुझे आईवडील कोण आहेत?
    बालक- मला तेही माहित नाही. मलाही तेच जाणून घ्यायचं आहे
    तेव्हा नारदानं ध्यान लावलं आणि नारदाला जे कळलं त्यामुळे नारदांना महदाश्चर्य वाटलं. ते म्हणाले, “हे बालका, तू महादानी अशा महर्षी दधिचीचा पुत्र आहेस. तुझ्या पित्याच्या अस्थींच्या साहाय्यानंच देवांनी वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या साह्येकरूनच देवांना असुरांवर विजय मिळविणं शक्य झालं. तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघं एकतीस वर्षांचं होतं.
    बालक- माझ्या पित्याच्या अकाल मृत्युचं कारण काय होतं ?
    नारद- तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरु होती.
    बालक- माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं?
    नारद- शनिदेवाची महादशा.
    एव्हढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिप्पलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली.
    नारद निघून गेल्यानंतर बालक पिप्पलादनं नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं.ब्रह्मदेवानं पिप्पलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा पिप्पलादनं ‘मी ज्याच्याकडे पाहीन ते त्याच क्षणी भस्म होऊन जावं’ असा वर मागितला. ब्रह्मादेवानं “तथास्तु” म्हणून पिप्पलादाला तसा वर दिला. हा वर मिळाल्याबरोबर पिप्पलादनं सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं. त्याबरोबर शनिदेव प्रगट झाले. शनिदेव समोर येताच पिप्पलादनं आपली नजर त्यांच्यावर रोखली. त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्यांचं शरीर जळू लागलं. हे पाहून समस्त ब्रह्माण्ड हादरलं. सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिप्पलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं. प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागू लागले. शेवटी स्वयं ब्रह्म्यानं पिप्पलादाला त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली. पण पिप्पलादनं ती विनंती धुडकावून लावली. शेवटी ब्रह्मदेवानं पिप्पलादाला एका ऐवजी दोन वरदान देण्याचं कबूल केलं. मग मात्र पिप्पलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली. पिप्पलादनं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले –
    1- जन्मानंतर पहिली पाच वर्षे कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही.
    2- माझ्यासारख्य अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे. म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही.
    “तथास्तु” म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले. तेव्हा पिप्पलादनं आगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायांवर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापामुक केलं. ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पाहिल्यासारखं चालता येईना. म्हणून तेव्हापासूनच शनि “शनै:चरति य: शनैश्चर:” अर्थात जो हळू हळू चालतो त्याला शनैश्वर म्हटल्या जाते. आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी ठिक्कर पडली. .
    शनीची मूर्ती काळी कां आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा कां केली जाते याचं रहस्य वरील कथेत दडलेलं आहे. पुढे पिप्पलादनं प्रश्नोपनिषदाची रचना केली. आजही हे उपनिषद ज्ञानाचं कधीही न संपणारं भांडार म्हणवल्या जातं.
    ——————-

  • Shri Balaji Mandir Undangaon in News
  • Shree Balaji Undangaon Palkhi Sohala 2022

    श्री. बालाजी महाराज उंडणगांव यांच्या पालखी मिरवणूक सोहळा

    Live Video Link : https://fb.watch/dcOXcgO9vz/

  • Benefits of jaggery and nuts

    रोज मुठभर फुटाणे आणि गूळ खा ! चला तर मग जाणून घेऊ याचे फायदे …..

    गुळाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये ‘आयरन’ मुबलक प्रमाणात असते . गुळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते.तसेच हे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते.

    एवढेच नाही तर गुळामध्ये सोडियम, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात आढळतात.त्यामुळे गूळ आणि फुटाणे खाणे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील घाण साफ होते.

    मधुमेहाच्या समस्या, तसेच पोटाशी संबंधित समस्या इ. दूर करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. फुटाण्यामध्ये कार्बोहायड्रेट,प्रोटिन्स, आयरन, कॅल्शियम आणि अनेक प्रकारची विटामिन आढळतात. त्याच्या नियमित सेवनाने रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते, जे आपले शरीरास अनेक रोगांपासून वाचवते. फुटण्याचे सेवन केल्याने मन तीक्ष्ण होते. पण जर फुटाणे आणि गूळ खाल्ल्यास त्याची ताकद अनेक पटींनी वाढते. ज्यामुळे ते आपल्यासाठी आणखी फायदेशीर ठरते.

    चला तर जाणून घेऊया फुटाणे आणि गूळ खाण्याचे फायदे :-

    1. चेहऱ्यावर चमक येते :-

    गूळ आणि हरभरा त्वचा सुधारते कारण त्यात झिंक मुबलक प्रमाणात असते . पुरुषांनी रोज याचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत होते आणि ते पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसूही लागते .

    2. हे स्नायूंसाठी फायदेशीरआहे :-

    गूळ आणि हरभऱ्यामध्ये प्रोटिन्स मुबलक प्रमाणात असतात , ज्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. स्नायू(मसल्स) बनवणाऱ्या लोकांसाठी दररोज गूळ आणि हरभरा खाणे फायदेशीर आहे.

    3. लठ्ठपणा कमी करते :-

    गूळ आणि हरभरा एकत्र खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिज्मचे प्रमाण वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, बरेच लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात, तसेच त्या लोकांना गूळ आणि हरभरा खाणे आवश्यक आहे.

    4. बद्धकोष्ठता दूर करते :-

    कमकुवत पचनशक्तीमुळे, बद्धकोष्ठता आणि एसिडिटीची समस्या असते, अशा परिस्थितीत हरभरा आणि गूळ खाणे फायदेशीर असते कारण त्यात फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचनशक्ती व्यवस्थित ठेवते.

    5. मन तीक्ष्ण करते :-

    गूळ आणि हरभरा एकत्र खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत होते ,कारण त्यात व्हिटॅमिन-बी मुबलक प्रमाणात असते जे स्मरणशक्तीला पॉसिटीव्ह चालना देते.

    6. दात मजबूत करते :-

    गूळ आणि हरभऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात फॉस्फरस असते , जे दातांसाठी खूप फायदेशीर आहे. गूळ आणि हरभरा एकत्र खाल्ल्याने दात मजबूत होतात आणि दातांशी संबंधित समस्या दूर राहतात.

    7. हृदयासाठी फायदेशीर :-

    ज्या लोकांना हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या आहे. गूळ आणि हरभरा यांचे सेवन त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम असते जे हृदयविकाराचा धोका येण्यास टाळते.

    8. हाडांसाठी फायदेशीर :-

    संधिवात आणि शरीरातील थकवा यासारख्या समस्यांवर दररोज गूळ आणि हरभरा खाणे खूप फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॅमिन आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. जे थकवा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.