Author: admin

  • Bedi Hanuman Mandir

    बेडी हनुमान मंदिर…..

    जगन्नाथ पुरी…..

    पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे नाव ऐकले की रहस्यांनी भरलेल्या मंदिराचे चित्र डोळ्यासमोर येते. या मंदिरातील अपूर्ण लाकडी मूर्तींचा विषय असो किंवा मंदिराच्या वरून कोणतेही विमान किंवा पक्षी नसणे असो.

    या सर्व गोष्टी आश्चर्यकारक आहेत. केवळ हे मंदिरच नाही तर त्याच्या आजूबाजूला अशी काही रहस्ये आहेत ज्याबद्दल जाणून घेऊन लोक आश्चर्यचकित होतात. यापैकी एक म्हणजे हनुमानजींचे रहस्य. स्वतः परमेश्वराने आपल्या परम भक्ताला समुद्रकिनारी साखळीने बांधले आहे.

    देव जेव्हा पृथ्वीवर अवतरतो तेव्हा सर्व देवता-पुरुष-गंधर्वांना देवाचे दर्शन घ्यायचे असते. भगवान जगन्नाथजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतानाही असेच झाले, तेव्हा जवळून वाहणारा सागरची पण देवाला पाहण्याची इच्छा झाली.

    पौराणिक कथेनुसार, महासागराने देवाच्या दर्शनासाठी अनेक वेळा मंदिरात प्रवेश केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. सागरने हे दृष्टता सलग तीन वेळा केली.

    जेव्हा समुद्राने मंदिरात अनेक वेळा प्रवेश केला आणि नुकसान केले तेव्हा भक्तांनी भगवान जगन्नाथ यांना मदतीसाठी आवाहन केले. कारण समुद्र असल्याने भाविकांना देवाचे दर्शन होणे शक्य नव्हते. भगवान जगन्नाथांनी मग हनुमानजींना समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केले. पवनसुतांनी सागरही बांधला. यामुळेच पुरीचा समुद्र नेहमीच शांत असतो.

    पण नंतर त्यांनीही हुशारी दाखवली.

    समुद्राला बांधल्यानंतर हनुमानजींनी रात्रंदिवस तेथे पहारा ठेवला. मग एके दिवशी सागरने हुशारी दाखवून हनुमानजींच्या भक्तीला आव्हान दिले. ते म्हणाले की, तू कसा देवाचा भक्त आहेस जो कधीच दर्शनाला जात नाही. भगवान जगन्नाथाच्या अनोख्या सौंदर्याचे कौतुक करावेसे वाटत नाही. तेव्हा हनुमानजींनाही वाटले की,खूप दिवस झाले आजच देवाला भेटूया….?

    सागराचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराच्या दर्शनसाठी ऐकून हनुमानजी जगन्नाथांच्या दर्शन जाऊ लागले. मग हे बघून सागरही त्यांच्या मागे जाऊ लागला.

    अशाप्रकारे पवनसुत जेव्हा कधी मंदिरात जायचे तेव्हा सागरही त्याच्या मागे येत असे. अशा प्रकारे मंदिराचे पुन्हा नुकसान होऊ लागले. तेव्हा हनुमानाच्या या सवयीमुळे व्यथित होऊन जगन्नाथजींनी त्याला सोन्याच्या बेड्या घातल्या. जगन्नाथपुरीमध्ये समुद्र किनारी बेडी हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे जिथे त्यांना देवाने बांधले होते.

    बेडी हनुमान मंदिर ही भक्त आणि परमेश्वर यांच्यातील अनोख्या नात्याची कथा आहे. जगन्नाथ स्वामींचे दर्शन घेणारा प्रत्येक भक्त बेडी हनुमानाच्या दर्शनाला नक्कीच जातो.

    याचे कारण असेही सांगितले जाते की, जे भक्त जगन्नाथ स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या मंदिरात येतात तेव्हा हनुमानजी भक्तांच्या डोळ्यांत पवनसुत परमेश्वराला पाहतात.

    मंदिरात हनुमानजींचा चेहरा काहीसा वाकडा आणि डोळे मोठे आहेत. असे म्हणतात की जेव्हा देव त्यांना बांधून येथून निघून गेले तेव्हा ते देव जिथून गेला त्याच दिशेने पाहत राहिले. शांत ठिकाणी बांधलेले हे मंदिर मनालाही अपार शांती देते.

    जय जगन्नाथ……

    सनातन

  • निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका

    निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका

    3 मे ला अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्र ही खरेदीला आले होते.
    ते माझ्या कुंभार मित्राला म्हणाले “मडकं दे”._

    तो पटकन त्यांच्याकडे बघून म्हणाला “या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका”

    खरेतर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले, “मग काय
    म्हणतात याला?”.

    “स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला केळी
    स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला करा म्हणतात”.

    माझ्या मराठी शब्दकोषात दोन शब्द वाढले.

    मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्तते नुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते अशी माहिती
    झाली.

    पाण्याचा … माठ
    अंत्यसंस्काराला…मडकं
    नवरात्रात … घट
    वाजविण्यासाठी…घटम्
    संक्रांतीला… सुगडं
    दहिहंडीला… हंडी
    दही लावायला… गाडगं
    लक्ष्मीपूजनाचे… बोळकं
    लग्न विधीत… अविघ्न कलश
    आणि
    अक्षय्य तृतीयेला…केळी व करा

    खरंच आपली मराठी भाषा समृद्धश्रीमंत आहेच.

    मला मंगल प्रसंगी हातात धरतात त्याला करा म्हणतात
    हे माहिती होते पण अक्षय तृतीयेला केळी व करा
    म्हणतात माहिती नव्हते, तुम्हाला माहीत होते का ?

    मला माहित नसलेली माहिती, एका मित्राने मला पाठवली आणि मी आपल्यासमोर मांडली 🙏🏻🙏🏻

  • Benefits of tree puja

    🚩 श्री स्वामी समर्थ🚩

    $ कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फळ मिळतात

    $ तुळस – ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते, लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही. त्या घरात नेहमी सुख समृद्धी बनलेली असते.

    $ पिंपळ – हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आले आहे. याची पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते, तसेच विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते.

    $ कडू लिंबं – याची पूजा केल्याने पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारांपासून मुक्ती मिळते. घरात सुख शांती कायम राहते.

    $ वडाचे झाड – याला वडाचे झाड किंवा बरगद देखील म्हणतात. याची पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहतं आणि संतानं संबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते. हे फारच पवित्र झाड आहे.

    $ बेलाचे झाड – या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते. याची पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग लवकर येतात तसेच अकाल मृत्यूपासून रक्षा होते.

    $ आवळा – या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणार्‍यांना धन संबंधी अडचण कधीच येत आहे. त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळत.

    $ अशोक – या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहत. एखाद्या विशेष इच्छेसाठी देखील याची पूजा केली जाते.

    $ केळीचे वृक्ष – ज्या लोकांच्या पत्रिकेत गुरु संबंधित दोष असतील तर, त्यांनी या झाडाची पूजा केली तर त्यांना नक्कीच फायदा मिळतो. याची पूजा केल्याने विवाहाचे योग लवकर जुळून येतात.

    $ शमी – या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळते व कोर्ट केसमध्ये यश मिळतात. दसर्‍याच्या दिवशी या झाडाची खास पूजा केली जाते.

    $ लाल चंदन – सूर्याशी निगडित गृह दोष दूर करण्यासाठी लाल चंदनच्या झाडाची पूजा विधिवत केली पाहिजे. असे केल्याने प्रमोशन होण्याचे योग बनतात.

    $ वरील सर्व आध्यत्मिक महीतीत अजिबात बदल न करता आहे तशी शेअर करावी ह्या छोट्याशा स्वामीसेवेने आत्मीक समाधान आणी मानसिक आनंद मिळतो.

  • विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत

    विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते जगातले पहीले शास्त्रज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज…

    सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो).

    माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.

    उदय-अस्ताचे प्रमाणे |
    जैसे न चालता सूर्याचे चालणे |
    तैसे नैष्कर्म्यत्व जाणे |
    कर्मींचि असता ||

    सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध आहे.

    मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात,

    शुक्र-शोणिताचा सांधा |
    मिळता पाचांचा बांधा |
    वायुतत्व दशधा |
    एकचि झाले ||

    शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत.

    सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षांतील आहे. परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदती-शिवाय शोणित पेशींचा उल्लेख केला आहे. इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते.

    पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला आहे.

    माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले.

    पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा |
    तरी हा भूगोलचि काखे सुवावा |
    तैसा विस्तारू माझा पाहावा |
    तरी जाणावे माते ||

    भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. आणि पृथ्वी गोल असल्याचे निःसंदिग्ध सांगताना परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.

    पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे.

    परंतु माऊली ज्ञानोबाराय ७२५ वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.

    तया उदकाचेनि आवेशे |
    प्रगटले तेज लखलखीत दिसे |
    मग तया विजेमाजी असे | सलील कायी ||

    सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो. ती पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी,

    मी सूर्याचेनि वेषे |
    तपे तै हे शोषे |
    पाठी इंद्र होवोनि वर्षे |
    मग पुढती भरे ||

    विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.

    या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रम्हांडे आहेत म्हणून भगवान अनंतकोटी ब्रहांडनायक ठरतात. परंतु माऊलीं ज्ञानोबारायांनी ७२५ वर्षापूर्वीच सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे अस्तित्व सांगतात,

    ना तरी भौमा नाम मंगळ |
    रोहिणीते म्हणती जळ |
    तैसा सुखप्रवाद बरळ |
    विषयांचा ||

    किंवा

    जिये मंगळाचिये अंकुरी |
    सवेचि अमंगळाची पडे पारी |
    किंवा
    ग्रहांमध्ये इंगळ |
    तयाते म्हणति मंगळ |

    इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्र:
    परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे |
    किंवा
    स्वाती नक्षत्र:
    स्वातीचेनि पाणिये |
    होती जरी मोतिये |
    तरी अंगी सुंदराचिये |
    का शोभति तिये ||

    कॅमेरा आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते

    जेथ हे संसारचित्र उमटे |
    तो मनरूप पटु फाटे |
    जैसे सरोवर आटे |
    मग प्रतिमा नाही ||

    अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.

    या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल.
    विज्ञानयुगात दिशाभुल झालेल्या युवक-युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्या-या संत वाड़मयाच्या सहवासात यावे.
    || जय जय रामकृष्ण हरी ||
    Whatsapp. वरून साभार

  • Different things about Chatrapati Shivaji Maharaj

    छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच राजकिय गोष्टी सांगितल्या जातात….!
    1.अफजलखानाचा कोथळा
    2.शाईस्तेखानाची बोटे
    3.आग्राहून सुटका


    पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात….!


    1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज “सामाजिक क्रांती” करणारे होते…!
    2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे “लोकपालक” राजे होते…!
    3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे “उत्तम प्रशासक” होते…!
    4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे “पर्यावरण रक्षक” होते…!
    5.समुद्र प्रवास करण्यास धर्म शास्त्रात बंदी होती. तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे “स्व-धर्मचिकित्सक” होते …!

    1. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून ” अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे चिकीत्सक राजे”
    2. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! “जलतज्ञ” राजे छत्रपती शिवराय!!
    3. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे १०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, “उत्तम अभियंते राजे”
    4. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!
    5. परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे “मातृभक्त, नारीरक्षक” छत्रपती शिवराय

    खऱ्या अर्थाने ते “लोकराजे” होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती…..!

  • Tips to live 100 years

    १०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र

    १) वात २) पित्त ३) कफ
    वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
    आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे ?

    त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा, जादु होईल

    १) *सकाळी लवकर उठावे म्हणजे *ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० या वेळेत उठावे.*

    २) दात घासण्याआधी *कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे *१- ३* ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)

    ३) पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातिर्विधी करुन घ्यावा.

    ४) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
    दंत रोग दूर राहतात

    ५) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरु नये.

    ६) सकाळी ७.३० ते ९.३० च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
    जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.

    ७) जेवणाच्या अगोदर *४५ *मिनीट आणि *जेवणानंतर *१ * तासाने पाणी प्यावे.* जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.

    ८) सकाळी फळांचा ज्युस प्या दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या आणि झोपताना देशी गाईचे दूध, देशी गाईचे तूप व हळद टाकुन प्या.
    ९) नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून, गड़बडीने पाणी पिऊ नये.
    ( शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

    १०) नेहमी जेवण केल्यावर १० ते १५ मिनीटे वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीटे झोपावे) घ्यावी. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर ३ तास झोपू नयेशतपावली करावी.

    ११) ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये. ॲल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय.

    १२) भोजन करतांना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या, पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.

    १३) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत, आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले, पोटावर झोपु नये.

    १४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
    *लाकडी घाण्याचे तेलच वापरा. * (रिफाईन्ड तेल/ डबल रिफाईन्ड विष आहे)*

    १५) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा. (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)

    १६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.

    १७) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

    १८) कमीत कमी ६ ते ७ तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.

    १९) दररोज एक तास प्राणायाम, १५ मिनीट योगासने, व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे.

    २०) प्राणायाम मात्र नियमित करणेच चांगले.

    २१) रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा. तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी, कोबी यांचा वापर करावा.

    २२) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे, उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील.

    २३) भारतीय रस म्हणजे उसाचा रस, कोकम सरबत,आवळा रस, लिंबू सरबत, फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत.

    २४) भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो पांढराच असावा.

    २५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
    लघवीला आली की थांबवू नये, बसूनच लघवी करावी, अश्रू बाहेर येवू द्यावेत, * रडायला आले तर ऱडावेच, हसायला आले की भरपुर हसावे, जांभई आली की द्यावीच, शिंक आली की बिनधास्त द्यावी , अपानवायू आला की तसाच बाहेर येऊ द्यावा,

  • Find my phone

    चोरीला गेलेला फोन आता झटक्यात करता येणार ट्रॅक, कसं ते जाणून घ्या…..

    चोरीला गेलेला फोन आता झटक्यात करता येणार ट्रॅक, कसं ते जाणून घ्या

    अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुम्हाला तुमचा फोन हरवल्यावर त्याला शोधण्यात मदत करतील.

    मुंबई : स्मार्टफोन ही एक अशी गोष्ट आहे जी, आजकाल सगळ्याच लोकांकडे आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच लोकांकडे फोन आहे. परंतु बऱ्याचदा लोकांच्या हातातून फोन विसरल्याच्या किंवा हरवल्याच्या घटना घडतातय असं तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरच्यांसोबत घडलं असावं. परंतु तुम्हाला माहितीय? सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये अशी टूल्स असतात, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन सुरक्षित ठेऊ शकता. यासोबतच याच्या मदतीने स्मार्टफोन्सही सहज ट्रॅक करता येतात. चला अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुम्हाला तुमचा फोन हरवल्यावर त्याला शोधण्यात मदत करतील.

    प्रथम काय करावे…..?

    प्रथम आपण आपल्या फोन नंबरवर कॉल करणे आवश्यक आहे. तुमचा फोन कदाचित हरवला नसेल, पण तुम्ही तो कुठेतरी सोडला असेल. अशा परिस्थितीत, आपण इतर कोणत्याही नंबरवरून फोनवर कॉल करून ते सहजपणे शोधू शकता. जर एखाद्या व्यक्तीच्या हातात तुमचा फोन आला तर तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकतो.

    समजा तुम्ही स्मार्टफोनवर कॉल केला आहे आणि तो बंद आहे. अशा स्थितीत तुम्ही प्रथम फोन लॉक करावा. तसे, तो Android स्मार्टफोन असो किंवा आयफोन, दोन्ही मूलभूत सुरक्षा वैशिष्ट्यांसह येतात. याशिवाय, तुम्ही तुमचा फोन इतर मार्गांनीही लॉक करू शकता जेणेकरून इतर कोणीही तुमचा डेटा ऍक्सेस करू शकणार नाही.
    यासाठी, आयफोन वापरकर्त्यांना प्रथम दुसऱ्या डिव्हाइसवर लॉग इन करावे लागेल आणि फोनवर लॉस्ट मोड सक्रिय करावा लागेल. तसेच तुम्ही Find My iPhone पर्याय वापरू शकता.
    दुसरीकडे, तुम्ही Android वापरकर्ता असल्यास, तुम्ही Android डिव्हाइस व्यवस्थापक वापरू शकता. त्याच्या मदतीने तुम्ही Find My Device पर्याय वापरू शकता. तसेच याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनमधील डेटा देखील हटवू शकता.

    जर तुमच्या फोनमध्ये GPS चालू असेल, तर Find My Device हा पर्याय तुम्हाला मदत करू शकतो. अँड्रॉइड डिव्‍हाइसमध्‍ये, तुम्‍हाला अंगभूत लोकेशन ट्रॅकिंग सेवा मिळते, ज्याच्‍या मदतीने तुम्ही तुमचा फोन ट्रॅक करू शकता. परंतु जर तुमच्या डिव्हाइसचा GPS बंद असेल, तर हा पर्याय तुम्हाला मदत करू शकणार नाही.

    Find My कसे वापरावे….?

    प्रथम तुम्हाला iPhone वर जाऊन Settings > [your name] > Find My वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमच्या ऍपल आयडीने साइन इन करावे लागेल.
    साइन-इन केल्यानंतर, तुम्हाला Find My iPhone वर टॅप करून ते सक्षम करावे लागेल.
    Find My Network च्या मदतीने फोनमध्ये नेटवर्क नसले तरीही तुम्ही तुमचे डिव्हाइस शोधू शकाल.

    Find My Network ऑन केल्याने, फोन बंद केल्यानंतरही वापरकर्ता 24 तासांसाठी त्याच्या डिव्हाइसचे स्थान ट्रॅक करू शकतो. तुमच्याकडे दुसरे Apple डिव्हाइस नसल्यास, तुम्ही iCloud.com वापरून तुमचे डिव्हाइस शोधू शकता.

    Android वापरकर्ते काय करु शकतात…..?

    Google वापरकर्त्यांना प्रथम android.com/find वर ​जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या Google खात्याने साइन इन करावे लागेल.
    यानंतर, वापरकर्त्यांना स्क्रीनच्या शीर्षस्थानी सापडलेल्या लॉस्ट फोनच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
    तुमच्या फोनवर एक सूचना पाठवली जाईल, त्यानंतर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर फोनचे लोकेशन पाहू शकाल.

    याच्या मदतीने तुम्ही फोनचा डेटा सहजपणे डिलीट करू शकता. वापरकर्ते फोनवरून iCloud आणि Google खात्याचा सर्व डेटा हटवू शकतात. मात्र, हे केल्यानंतर तुम्ही तुमचा फोन पुन्हा ट्रॅक करू शकणार नाही. त्यामुळे ते करताना आधी विचार करा.

  • Good Signals

    हे शुभ संकेत लक्षात घ्या ..

    अनेक लोकांसोबत असे घडते की, कपडे घालताना खिशातून पैसे पडतात.
    तसं पाहायला गेलं तर ही सामान्य घटना आहे.
    परंतु ज्योतिषच्या शकुन-अपशकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते.

    शकुन शास्त्र ज्योतिषमधील एक सहायक ग्रंथ मानला जातो.
    आजही कुठे न कुठेे या गोष्टींचे अस्तित्व आहे. या

    असेच काही संकेत आज आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.

    १)खिशातून नाणे खाली पडणे :
    कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे. तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते, यासाठी तयार राहावे.

    २)घरातील नारळ आपोआप तडकणे :

    घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असली आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की, घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे. तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही.

    ३)घरामध्ये आपोआप तुळस उगवणे :

    तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा. घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे.

    ४)आपोआप दुर्वा उगवणे :

    घरातील बागेमध्ये दुर्वा (श्रीगणेशाला अर्पण करण्यात येणारे एक गवत) उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत.

    ५)घरामध्ये मध पडणे :

    घरामध्ये मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पसरल्यास समजावे की, घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्हएनर्जी राहिलेली नाही. घरामध्ये एखादे मंगलकार्य होऊ शकते.”

    काही घटनांबाबत शुभ संकेत,

    घटनांचा आणि मनुष्याचा आपसात फार जवळचा संबंध असतो. हे वेळे अनुसार व्यक्ती सोबत घडत असते. यापैकी अनेक घटना जीवनामध्ये सुख घेऊन येतात तर अनेक घटना समस्यांची चाहूल करून देतात. आपण बहुतेक वेळा आपल्या आयुष्यात होणाऱ्या घटनांना सामान्य पणे घेतो आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. यापैकी अनेक घटना आपल्याला भविष्यात घटणाऱ्या गोष्टींचा संकेत देत असतात.

    आजच्या या पोस्ट मध्ये अश्या काही परिस्थिती बद्दल म्हणजेच घटनांबद्दल काय संकेत असतात हे आपण जाणून घेऊ. या घटना भविष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टीचे संकेत मानले जातात.

    या घटना आपल्या समोर कोणत्याही रूपाने समोर येऊ शकतात पण वेळीच यांना ओळखणे महत्वाचे आहे. या घटना आपल्यासाठी कधी शुभ असतात तर कधी अशुभ असतात. या घटना आपल्या जीवनाला प्रभावित करतात.

    तर चला जाणून घेऊ चांगल्या भविष्याचे किंवा चांगला काळ सुरु होण्याचे ईश्वर आपल्याला काय संकेत देतो.

    १) चिमणीचे घरात घरटे बनवणे

    चिमणी ने आपल्याला घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानले जाते. असे मानले जाते कि जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे आपले पिल्ले जन्माला घालते तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे. या संकेता नंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात आहोत आणि घरा पासून संकटे दूर राहतात. त्यामुळे चिमणीचे आपल्या घरा मध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो.

    २)सकाळच्या वेळी मांजरीचे पिल्ले दिसणे

    सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही खुशखबर मिळाली तर आपला पूर्ण दिवस आनंदात जातो तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीचे पिल्ले नजरेस पडली तर हे त्याच्या आणि कुटुंबासाठी हा शुभ संकेत आहे. जर आपल्या सोबत असे घडले तर असे समजावे कि आपला चांगला काळ लवकरच सुरु होणार आहे.

    ३) मुंग्याचे समूहात दिसणेमुंग्या एवढी मेहनत कदाचित कोणीही करत नसेल. त्याच सोबत मुंग्या एकतेचे प्रतीक देखील मानले जाते त्यांना अनेक वेळा समूहाने एका लाईन मध्ये चालताना आपण पाहिले असेल. जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्याचा समूह दिसला तर हे आपल्यासाठी शुभ काळाचे संकेत आहेत. या संकेताचा अर्थ आपल्या आयुष्यात लवकरच खुशखबर येणार आहे आणि यश मिळण्यासोबतच धनप्राप्ती देखील होणार आहे.


    इतर काही शुभ संकेत

    एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट पटकन आपल्या समोर येऊन निघून जाते. आपलं त्या वस्तूकडे फारसं लक्षही नसतं. पण बऱ्याचदा या वस्तू समोर दिसल्यामुळे येत्या काही काळात काहीतरी चांगलं घडणार असतं. त्याचे ते संकेत असतात. आता हा मानण्यातला भाग असला तरी पूर्वजांनी जे लिहून ठेवलंय त्यानुसार काही वस्तू, काही गोष्टी दिसल्या तर त्या शुभ मानल्या गेल्या आहेत. त्यांचाच हा परामर्श…

    १) रस्त्यात पांढरी गाय दिसणं शुभ मानलं जातं. हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिलेला आहे. गाय आर्थिक सुदृढीकरणाचं प्रतीक आहे. त्यामुळे कोठेही सफेद गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचं दर्शन झाल्याचं समजलं जातं.

    २) सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजेच श्रीफळाचं दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे ते संकेत असतात. कारण नारळाला हिंदुस्थानच्या सामाजिक परंपरेत शुभ मानलं जातं.

    ३) प्रवास करतानाही काही शुभ संकेत असतात. पण ते आपल्या लक्षात येत नाहीत. कधी प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो.

    ४) सोनेरी साप दिसणंही चांगलं असतं म्हणे. रात्री झोपतांना जर पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर तो एक शुभ संकेत असल्याचं मानायला काहीच हरकत नाही. काहीजणांना याचा चांगला अनुभव आलाय.

    ५) हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला कुणालाही आवडेल. पण हाच निसर्ग जर स्वप्नात दिसला, म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरीही तेशुभ मानलं जातं. त्यातूनही हा हिरवेगारपणा जर पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहूनही शुभ मानलं गेलं आहे.

  • जीभ . . . .

    कधी विचार केला होता का जीभ (टंग) तुमच्या शरीरात इतके वेगवेगळे काम (फंक्शन) करते कशी

    1) ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ !

    2) एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ !

    3) सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ ! तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ !

    4) प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ, भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !

    5) सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकुन मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !

    6) बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे “काम” करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ ! काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा “नामानिराळा” राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !

    7) दाताशी युती करत तथदध, ओठाशी युती करत पफबभ, दंत मूलाशी युती करत चछजझ, टाळुशी युती करत टठडढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !

    8) पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणुकाही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ !

    9) ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !

    10) ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !

    11) आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यानी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !

    *अशी हि जीभ..👅.. “ओम जीभये नमः