Author: admin

  • स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर….

    #एकसत्यघटना…. कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल….

    स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर….

    जगात आज अनेक अरबपति असतील पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मीळाला तो राॅकफेलर मुळे! प्रचंड श्रीमंत माणूस….. जगातील पहीला अरबपति!रात्रंदिवस एकच ध्येय फक्त पैसा. हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा याचे नातीगोती, मीत्र, सगेसोयरे फक्त पैसा 😌

    घटना अशी घडली 1893 साली वयाच्या 53 व्या वर्षी हा माणूस आजारी पडला… डोक्यावरचे सारे केस झडून गेले…. शरीर गळायला लागलं… तोंडात अन्न गीळेना थोडसं सुप पिऊन जगण्याची वेळ आली… त्याला झोपही लागत नव्हती ईतकच नाही तर त्याला हसता रडता देखील जमेना…. अमेरीकेतील सर्व नामवंत डाॅक्टरना दाखवून झाले पण उपयोग शुन्य..,.. डाॅक्टरनी शेवटी सांगितले आपण फक्त एक वर्षाचे मेहमान आहात…..

    त्याचवेळी स्वामी विवेकानंद शिकागो मध्ये होते.

    आणि राॅकफेलर च्या एका मीत्राने सहजच एक सल्ला दिला की हिंदुस्थानांतील एक सन्यासी ईथे आलाय आपण एकदा त्यांची भेट घ्यावी! राॅकफेलर सुरवातीला भडकला “असल्या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही, तो सन्यासी काय करणाराय? ” म्हणून त्याने टाळले. पण काय कुणास ठाऊक दोन दिवसांनी तो भेटीला निघाला.

    स्वामी विवेकानंद हाॅटेलच्या रुममध्ये काहीतरी लिखाण करण्यात व्यस्त होते… राॅकफेलर जाउन थांबले राॅकफेलरला अपेक्षा होती मी एवढा माणूस माझ्यासाठी मोठं आदरातिथ्य होईल पण विवेकानंदानी ढुंकूनही पाहिलं नाही! शेवटी राॅकफेलर म्हणाला मी उद्योजक राॅकफेलर….
    स्वामी म्हणाले, “बरं…मग”
    “मला पाहुन ईथला राष्ट्राध्यक्ष सुद्धा उभा राहतो”-ईति राॅकफेलर
    ” असं आपलं काम सांगा”स्वामी विवेकानंद
    शेवटी स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली.
    “तुम्ही मनाने फार बैचैन आहात” आणि मग त्याच्या जीवनातील अशा काही घटना सांगीतल्या की, ज्या त्याच्याशिवाय कुणाला माहिती नव्हत्या! तो ही परेशान झाला! एक तासांच्या चर्चेनंतर स्वामी विवेकानंदानी त्याना सांगीतलं की यावर एकच पर्याय आहे तुम्ही दानधर्म केला पाहिजे.

    राॅकफेलरवर स्वामींचा एवढा प्रभाव पढला की त्याने एक फाउंडेशन काढलं त्यातुनच पुढे मलेरिया, टीबी, यारख्या अनेक रोगावर औषध बनवून मुफ्त मध्ये ईलाज झाले तो जगातील सर्वात मोठा डोनर झाला…..
    पुढे??? आश्चर्य हे झाले ज्याला एक वर्षाची मुदत डॉ. नी सांगितली होती तो #राॅकफेलर 98 वर्षे जगला तोही आनंदात…

    आज जो जगातील सर्वात मोठा डोनर आहे बील गेट्स तो त्याच्या पुस्तकात लिहतो मला डोनेशन ची प्रेरणा राॅकफेलर फाउंडेशन मुळे मीळाली!

    मीत्रानो ही आहे एका हिंदू सन्याशाची व हिंदू तत्त्वज्ञानाची किमया आणि आम्ही मात्र आज त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतो, आपली ताकद ओळखा!
    आणि भौतिक सुखाच्या मागे लागुन पैसा हे सर्वस्व आहे हे समजु नका वेळ आली ना तो हि कामाचा नाही!
    आणि तीसरं द्यायला शिका…. द्याल तरच मीळत जाईल हेच हिंदू तत्त्वज्ञान आहे साठवाल तर सडायला सुरवात होईल!

    उमाकांत नामदेव माने
    माऊली प्रतिष्टाण उमरगा

  • Original or Duplicate

    थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो,
    “माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये.”


    जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !!
    राजा म्हणतो, “त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत.”
    तो माणूस म्हणतो, “नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे.”
    आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, “हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय”


    राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि “हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे”


    सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले?
    यावर हसून अंध म्हणतो, “सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही”


    टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !!


    : जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो “हिरा” समजावा..!

    !! अशा व्यक्तीशी मैत्री वाढवावी..!
    अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !!🙏🏻🚩

  • औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती

    🌹ऐतिहासिक औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती जपून ठेवा नंतर माहिती मिळता मिळत नाही हे लक्षात ठेवा 🌹

    शहराची एकुण ९ नावे –
    पैठणच्या सातवाहन, चालुक्य, विक्रमादित्याच्या काळात राजतडाग या महाकाय तलावाच्या काठावर वसलेले अश्मकपद, अश्शकपद या नावाने ओळखले जाणारे हे गाव यादवांच्या ताब्यात गेले तेव्हा कटक, कटकी या नावाने ओळखले जाऊ लागले. कटक म्हणजे गड. पूर्वी देवगिरी गडाच्या आधाराने पसरलेली यादवांची राजधानी छावणी भागापर्यंत होती आणि ती कटकी म्हणून ओळखली जात होती. मलिक अंबर आला तेव्हा त्याच्या उच्चारानुसार ती खडकी झाली. तो जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत मोघलांना दक्षिणेत पाय रोवताच आलेले नव्हते. एकदा मोघल फौजांनी हे शहर एवढे बेचिराख केले की ते तीन दिवस जळतच होते. आता पुन्हा हे शहर वसणार नाही अशा खात्रीने जहांगिरनामात करकी तीन दिवस जळत राहिल्याचा उल्लेख केलेला आहे. खडकीचा उल्लेख करकी असा केला कारण मोघलांच्या उच्चारात ख आणि ड उच्चारासाठी अक्षरच नाही. त्याऐवजी क आणि र वापरले जात. त्यानंतरही मलिक अंबरने पुन्हा हे खडकी शहर उभे केले. पण मलिक अंबर मरण पावल्यानंतर त्याच्या मुलाने फतेखानाने शहराचे नाव फतेहाबाद ठेवले. मलिक अंबर १६२४ साली मरण पावला. त्यानंतर औरंगजेबाने फतेखानाचा पराभव करीत खडकी जिंकले तेव्हा पहिल्यांदा शहाजहान याने औरंगजेबाला पत्र लिहिले. त्यात त्याने पहिल्यांदा या शहराचा उल्लेख औरंगजेबाने जिंकले या अर्थाने औरंगाबाद असा केलेला आहे असा संदर्भ यदुनाथ सरकार यांच्या ‘हिस्ट्री ऑफ औरंगाबाद’ या पुस्तकात आहे. प्रत्यक्ष औरंगजेब मात्र या शहराचा उल्लेख खुजिस्ता बुनियाद (श्रेष्ठतेचा पाया) असा करायचा. आज या शहराला लोकभावनेनुसार संभाजीनगर असे म्हटले जाते. अश्मकपद ते संभाजीनगर अशी या शहराची गेल्या हजार वर्षात तब्बल ९ वेळा नामांतरे झालेली आहेत.

    चार मकबरे : बीबी का मकबरा, रोजा पीर इस्माईल मकबरा, काला मकबरा, विद्यापीठ, कासीम बर्री मकबरा.

    पानचक्की : बाबाशहा मुसाफीर यांनी बांधलेले गुरुकुल.

    लेणी : एकूण ३ टप्प्यात १२ लेण्या आहेत.

    शहरात ४ किल्ले : मूळ शहर हे भुईकोट किल्लाच होते. त्याला १३ दरवाजे आहेत. किले अर्क, किले बायजीपुरा, किले बेगमपुरा.

    शहरातील महल : गुलशन महल, नौखंडा पॅलेस, सब्ज महल, किलेअर्कमधील मर्दाना आणि जनाना महल, रोशन आरा महल (हर्सुल), दमडी महल, बायजीमहल, सोनेरी महल.

    हवेल्या : चिमणाराजाची, राजा जयसिंगाची (छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेली), कुक्कुलाल हवेली.

    देवड्या : रामदास देवडी, दिवाण देवडी, लाल देवडी, बख्तावरमल देवडी, मन्सूर यारजंग देवडी, महाराजा किसनप्रसाद देवडी,

    चार सराय (धर्मशाळा) : जुनाखान सराय (जुनाबाजार), हर्सूल सराय (हर्सूल जेल), सराय महेबुबजान (फाजलपुरा), जोहराजान सराय (रंगारगल्ली)

    वाडे : काजीवाडा, काचीवाडा, भोई वाडा, कुंभारवाडा, हमाल वाडा, नाईकवाडा, कवटीचा वाडा, माळीवाडा, कसाब वाडा, मोची वाडा,

    वाडी : वैतागवाडी, शहानूरवाडी, गोकुळवाडी, नक्षत्रवाडी, जाधव वाडी, नागेश्वर वाडी,

    ५२ पुरे : कुतुबपुरा, रणमस्तपुरा, गोधडीपुरा, उस्मानपुरा, औरंगपुरा, बायजीपुरा, हत्तीसिंगपुरा, खारिकपुरा, पेन्शनपुरा, जयसिंगपुरा, बेगमपुरा, मालजीपुरा, कोतवालपुरा, कर्णपुरा, रोशनपुरा, कबाडीपुरा, जसवंतपुरा, नवाबपुरा, बहादुरपुरा, रशिदपुरा, गवळीपुरा, ढोरपुरा, मंजूरपुरा, फत्तेसिंगपुरा, महमुदपुरा, मुघलपुरा, फाजलपुरा, मोमीनपुरा, भावसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, रंभापुरा, खोकडपुरा, रेंगटीपुरा, भीमपुरा, शांतीपुरा, चेलीपुरा, रोहिदासपुरा, केशरसिंगपुरा, रसुलपुरा, कासमपुरा, पद्मपुरा, परसोजीपुरा, खेलोजीपुरा, वि’ोजीपुरा, किराडपुरा, सुलतानपुरा, कैकाडीपुरा, साखनपुरा, चौसरपुरा, शुभकर्णपुरा, लोधीपुरा (राजू मोतीराम पवार यांच्या खासगी संग्रहातून ही ५२ पुऱ्यांची नावे घेतली आहेत. प्रत्यक्षात आणखी नावे उपलब्ध आहेत)

    दरवाजे : भडकल, छोटा भडकल, खिजर (हाथी किंवा खुस्त्रो), खुनी (इक्बाल), खास (जालना), दिल्ली, काळा, नौबत (किलेअर्क), कटकट (इस्लाम), रोशन, जफर, पैठण, बारापुल्ला, मक्का (मकाई), कुंभारवाडा, महेमुद, रंगीन, मर्दाना (माबुल दाखला), चौगान, रंगीन, नूर (बुलंद), बेगम, खिडकी, चावल, लाल, मुघल, दगड, खिडकी, शहापुर, मीर आदिलअली, सलाम, मोहरमबारी, शाह, दारूदुकानदरवाजा, तलाबेकलाम, मादा, खादगार, इस्माईल, दौलत, दालमंडी, किला बेगमपुरा, किला बायजीपुरा,

    नहर : नहर ए अंबरी, नहर ए पळशी, नहर ए नसरुल्ला, नहर ए पानचक्की, नहर ए किराडपुरा, नहर ए गारखेडा, नहर ए कोटला, नहर ए बेगमपुरा (थत्ते नहर), नहर ए शाहअली, नहर ए चौसर, नहर ए शहानूर, नहर ए छावणी

    सहा चबुतरे : हाथी चबुतरा किलेअर्वâ, चांदणी चबुतरा हिलाल कॉलनी, काला चबुतरा क्रांती चौक, घोडेस्वारांचा चबुतरा आमखास मैदान, सिद्धिअली चबुतरा, हरदौल चबुतरा, चोट्टा चबुतरा.

    शहरातील उद्याने : (महम्मदी) हिमायत बाग, रोशनआरा बाग, अब्देअली बाग, लाला मन्साराम बाग, बाग शेर जंग, चौसर बाग, शतरंज बाग, आसेफ बाग, बसंत बाग, अंगुरी बाग, बरखी बेगम बाग, बाग ए संपत, खाला अम्मा का बाग, हरकारे का बाग, रहिम बाग, मोहम्मद मानखा बाग, अफलातून बाग, शिकार बाग, बागे जैबुन्निसा, रोजा बाग, राजा जयसिंग बाग, बेगम बाग, आजम बाग, अहेमद बाग, हिमायत बाग, सुपारी बाग, सिताफली बाग, अमरुद बाग, आटोळा बाग, जोहरी बाग.
    कार्यालये : अमीन कचेरी, सुभेदारी,

    टॉवर किंवा घड्याळे : शहागंज आणि गुलमंडी

    टेकड्या : जोबन टेकडी, हनुमान टेकडी, गोगापीर टेकडी, चमार टेकडी. मजनुहिल टेकडी

    चार गंज : शहागंज, सुलतान गंज, राम गंज, आजम गंज.

    बाजार : जुना बाजार, केळी बाजार, राजा बाजार, शहा बाजार, मुलमची बाजार, शाह बाजार, चुडी बाजार, कासारी बाजार

    मंडी : गुलमंडी, घासमंडी, सब्जीमंडी, लालमंडी, लक्कडमंडी

    कारंजे : मोती कारंजा, लोटा कारंजा,

    छत्र्या : छावणीतील छत्री, हर्सूलमधील छत्री, राजा जयसिंग छत्री

    चावड्या : किराणा चावडी, लक्ष्मण चावडी, जयसिंग चावडी, नाई की चावडी.

    तकीये : बडा, छोटा

    पुराणवस्तुसंग्रहालये : सोनेरी महल, मातोश्री पुरवार, छत्रपती शिवाजी पुराणवस्तू, विद्यापीठातील, बीबी का मकबऱ्यातील, पानचक्कीतील, देवगिरी किल्ल्यातील. (वैयक्तिक संग्रह : बाळासाहेब पाटील, पैठण, हिरुभाऊ जगताप, अब्दुल हई)
    (संग्रहित माहिती)

  • जग बदलले ?

    काय बदलले आहे ? असे विचारल्यावर नेहमी ऐकिवात येते की, जग बदलत आहे”, पण जरा विचार करा, नेमके काय बदलले आहे जगात…!!! कोणी काय सोडले?

    आजपर्यंत मिरचीने तिखटपणा नाही सोडला.., तर आंब्याने गोडपणा नाही सोडला…!!!

    वृक्षांच्या पानांनी हिरवेपणा नाही सोडला…., तर वृक्षांनी सावली देणे नाही सोडले…!!!

    सूर्याने तळपणे नाही सोडले.., तर चंद्राने शीतलता नाही सोडली…!!!

    फुलाने सुगंध नाही सोडला.., तर वा-याने वाहणे नाही सोडले…!!!

    नदीने आपला मार्ग नाही बदलला.., तर सागराने आपली मर्यादा नाही सोडली…!!!

    पक्षांनी विहार करणे नाही सोडले.., निसर्गाने कोमलता नाही सोडली.., ईश्वराने दयाळूपणा नाही सोडला…!!!

    मग नेमके बदलले आहे ते काय?, बदलला आहे तो फक्त माणूस.., माणसाने माणूसकी सोडली…!!!

    स्रुष्टी त्रेतायुगात अशीच होती. सत्त्ययुगात पण अशीच होती. द्वापार युगातही अशीच होती. आणि आता कलीयुगातही तशीच आहे…!!!

    बदलला आहे फक्त केवळ माणूस आणि त्याचे विचार, पण तो मात्र साऱ्या जगाला तो दोष देत असतो…!!!

    माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा…!!!

    आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की, आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ शकत नाही…!!!

    तसेच जग बदललेय म्हणून जगरहाटीला दोष देऊ नका, समाधानी रहा सर्वांचे आभार माना…!!!

    आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!

  • घरात गोमूत्र का शिंपडावे?

    घरात गोमूत्र का शिंपडावे?

    आपल्या हिंदू संस्कृतित गोमुत्राला महत्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पुजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमुत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी धारणा आहे.

    सगळ्या परंपरांच्या मागे मनोवेज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे. घर-परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे.

    जुन्या काळापासून गोमुत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानले आहे. गाईला माता असे संबांधले आहे. त्यामुळे गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सग़ळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पुजा केल्याने आपले पाप नष्ट होते, अशी धारणा आहे.

    काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल, घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत. वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे? गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात. अन्नातून युरिया, कीटकनाशके शरीरात जातात. पाणी आणि हवेतूनही दूषित घटक रीरात जातात. त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात. गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे.

    आता गोमुत्राचे फायदे लक्षाते घेतले पाहिजेत. यात घरातील वास्तूदोष मिटण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे. गोमुत्रामुळे वातावरणातील सुक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते. तर ज्या घरात गोमुत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देव-देवतांचे कृपादृष्टी प्राप्त होते, अशी समजूत आहे. गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही. *श्री स्वामी समर्थ*

  • गणपतीच्या पूजेत महत्त्वाची २१ पत्री

    गणपतीच्या पूजेत २१ पत्रीचा समावेश असतो. या पत्रींचे औषधी गुण आपण जाणून घेऊ .

    🙏🌹🦚पिपंळ

    याला ‘बोधीवृक्ष’ म्हणतात.

    याच्या पानांत औषधी गुणधर्म असतात म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना जेऊ घातले जाते. पिपंळाची लाख (राख) खडीसाखरेबरोबर दिल्यास चांगली झोप लागते.

    🙏🌹🦚जाई

    या वनस्पतीला जास्मीन देखील म्हणतात. ही वनस्पती शहरात मोठया प्रमाणात दिसते. तोंड आल्यावर जाईची पाने खातात, तसेच जुन्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो. ही वेल सुगंधी फुलांची आहे.

    🙏🌹🦚अर्जुन

    हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी पट्टयात हिला ओळखतात. या वृक्षाचा उल्लेख रामायणात देखील आढळतो. हृदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते. या वनस्पतीत कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.

    🙏🌹🦚रूई

    रुई या वनस्पतीला ‘मांदार’ म्हणूनही ओळखतात. ओसाड जागेत ही वनस्पती मोठया प्रमाणात दिसते. हिला पांढर्या, जांभळया रंगाची फुले येतात. हत्तीरोगावर हे फार उत्तम औषध आहे. तसेच कुष्ठरोगावर देखील त्याचे औषध प्रभावी ठरते. पांढरी रूई गणेशाला अधिक प्रिय असते.

    🙏🌹🦚मारवा

    ही सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या जखमा, भाजणे, किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर आलेल्या डागांसाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते. नवीन संशोधनात तर मारव्यापासून कर्करोगावर औषध तयार करण्यास यश आले आहे. ही वनस्पती घरात कुंडीतदेखील लावता येते.

    🙏🌹🦚कण्हेर

    कण्हेरीची पाने व मुळाचा साठा औषधी आहे. परस बागेतही हमखास दिसणारी वनस्पती एक विषारी झुडूप आहे. याच्या फुलांना सुगंध असतो. वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो.

    🙏🌹🦚देवदार

    हा महाकाय वृक्ष पश्चिम घाट, हिमालयात आढळतो. या वृक्षाचे लाकूड अतिशय मजबूत असते. कफ, पडसे, संधिवात यासाठी याचा रस फायदेशीर ठरतो. याची झाडे महाराष्ट्रात नाशिकजवळ पेठ, हरसूल भागात देखील दिसतात.

    🙏🌹🦚डोरली

    या रोपाला ‘काटे रिंगणी’ म्हणूनही ओळखतात. या वनस्पतीच्या पानवर देखील काटे असतात. त्वचारोग, पोटातील विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरते. आदिवासी भागात हे झुडूप मोठ्या प्रमाणात आढळते.

    🙏🌹🦚डाळिंब

    आपल्याकडे आरक्ता आणि गणेश अशा दोन जाती मोठयाप्रमाणात बघावयास मिळतात. देखणी फुले, काहीसे काटेरी झुडूप आहे. याचा उपयोग जंतावर गुणकारी आहे. काविळीसाठीही उपयोग केला जातो.

    🙏🌹🦚आघाडा

    ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी त्याचा वापर करतात. आघाडा मुखरोग व दंतरोगावर उत्तम औषध आहे. ही वनस्पती पडिक जागेत माळरानांवर बघावयास मिळते.

    🙏🌹🦚विष्णुकांता

    या वनस्पतीला आपल्याकडे ‘शंखपुष्पी’ म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. निळसर फुले येणारी ही वनस्पती जमिनीलगत उगविणारी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारावर औषध म्हणून केला जातो. नदीच्या बाजूला, डोंगर-टेकडया आदी ठिकाणी ही आपण बघू शकतो.

    🙏🌹🦚शमी

    शमीला सुप्त ‘अग्नीदेवता’ असेही म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी ठेवतात. हा वृक्ष कोरडया हवामानात वाढणारा आहे. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी ठरते.

    🙏🌹🦚दुर्वा

    ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. पांढरी (श्वेत) आणि निळा (नील) या दोन जाती आहेत. पांढ-या दुर्वा गणेशाला प्रिय असते. आपल्याकडे तिला ‘हरळ’ म्हणतात.

    नाकातून रक्त येणे, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दूर्वांचा रस अमृतासमान असतो. दूर्वा रस्त्याच्या बाजूला, बागेतही मिळतात.

    🙏🌹🦚तुळस

    ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना पळवून लावणारी तुळस जवळपास प्रत्येक घरात बघावयास मिळते. तुळशीत राम, कृष्ण असे दोन प्रकार असले तरी आणखी तीन चार इतर प्रकारही आहेत. कफ, दम, सर्दी, कीटक दंश तसेच कॅन्सर सारख्या रोगांवर तुळशीचा रस औषध उपयोगी पडतो.

    🙏🌹🦚धोतरा

    धोतर्याचा काळा, पांढरा, व राजधोतरा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचे औषध काढतात. वेदनाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ही वनस्पती पडिक जागेत उगविणारी विषारी वनस्पती आहे. काटेरी पांढर्या लांब नरसळ्यासारखे फूल दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते. या वनस्पतींची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला हमखास दिसतात.

    🙏🌹🦚बेलपत्र

    शंकराचे बेलपत्र सर्वांना परिचित आहे. या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो.

    🙏🌹🦚माका

    पावसाळयात आढळणारी ही वनस्पती डोंगर – टेकडयांवर नजर लावून तिचा शोध घ्यावा लागतो. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते.

    🙏🌹🦚मधुमालती

    मधुमालती ही वेल तशी शहरात बंगल्यांमध्ये सहज बघावयास मिळते. ही एक काष्ट वेल आहे. गुलाबी, पांढर्या, पिवळया रंगाची फुले व सदाहरित पाने हे त्याचे वैशिष्टय.

    फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.

    🙏🌹🦚बोर

    बोराच्या बियांचे चुर्ण चेहर्यांवर लावल्यास पुटकुळया जातात. मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे, तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो.

    🙏🌹🦚हादगा

    हादग्याला आपण ‘अगस्ती’ म्हणूनही ओळखतो. याच्या फुलांची भाजी छान लागतात. या फुलात अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे.

    🙏🌹🦚केवडा

    ही वनस्पती समुद्र किनार्यावर मोठया प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.

    संकलन :- अशोककाका कुलकर्णी
    🙏🌹🤝🌸☯🕉🛐🌸🤝🌹🙏

  • धार्मिक प्रश्नमंजुषा

    धार्मिक प्रश्नमंजुषा

    प्र.१.श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव काय होते?
    उत्तर – शारंग
    प्रश्न २. अर्जुनाच्या धनुष्याचे नाव काय आहे?
    उत्तर – गांडीव
    प्रश्न 3. शिव धनुष्याचे नाव काय होते?
    उत्तर – पिनाक
    Q.4. रामाचे नाव कोणत्या ऋषींनी ठेवले?
    उत्तर – वशिष्ठ
    Q.5. कृष्णाचे कुलपिता कोण होते?
    उत्तर – गर्गाचार्य


    प्र.६. कृष्णाचे शिक्षण गुरू कोण होते?
    उत्तर – महर्षि सांदीपनी
    प्र.७. संजयला दिव्य दृष्टी कोणी दिली होती?
    उत्तर – वेद व्यास
    प्र.८. शिखंडी राजाचा मुलगा कोण होता?
    उत्तर – द्रुपद
    प्र.९.अर्जुनाला गांडीव कोणी दिले?
    उत्तर – वरुण
    प्र.१०. अहिल्या कोणाची पत्नी होती?
    उत्तर – महर्षी गौतम ऋषी


    प्र.११. वेदव्यासाच्या वडिलांचे नाव काय होते?
    उत्तर – पराशर
    प्र.१२. पांडवांचे राज पुरोहित कोण होते?
    उत्तर – धौम्या
    प्र.१३. गुडाकेश कोणाचे नाव होते?
    उत्तर – अर्जुन
    प्र.१४. महाभारतात ऋषी किंदमने कोणाला शाप दिला होता?
    उत्तर – पांडू
    प्र.१५. महाभारतात गृहस्थ आश्रमाचे वर्णन कोणी कोणाला केले?
    उत्तर – शंकराने पार्वतीला.


    प्र.१६. महाभारतात किती श्लोक आहेत?
    उत्तर – एक लाख शत सहस्र.
    प्र.१७. शुकदेव कोणाचा पुत्र होता?
    उत्तर – वेद व्यास
    प्र.१८. शुकदेवाच्या पत्नीचे नाव काय होते?
    उत्तर – पिवेरी
    Q.19 शुकदेवाच्या आईचे नाव काय होते?
    उत्तर बाग
    प्र.२०. बलरामाच्या वडिलांचे नाव काय होते?
    उत्तर – वासुदेव


    प्र.२१. अहिल्याला कोणी शाप दिला?
    उत्तर- महर्षि गौतम.
    प्र.२२. देवांचा सेनापती कोण होता?
    उत्तर – कार्तिकेय
    प्र.२३. असुरांचे गुरु कोण होते?
    उत्तर – शुक्राचार्य
    प्र.२४. देवांचे गुरू कोण होते?
    उत्तर – बृहस्पति
    प्र.२५. पुत्रमोहासाठी कोण प्रसिद्ध होते?
    उत्तर – धृतराष्ट्


    प्र.२६. भीष्मांच्या आईचे नाव काय होते?
    उत्तर – गंगा
    प्र.२७. कर्णाचे गुरु कोण होते?
    उत्तर: परशुराम.
    प्र.२८. कृपाचार्य अश्वत्थामा कोण होते?
    उत्तर – मातुल
    प्र.29. नरकाला किती दरवाजे आहेत?
    उत्तर- तीन 1. वासना 2. क्रोध 3. मोह
    प्र.३०. योगी किती प्रकारचे असतात?


    उत्तर – आठ (1. कर्मयोगी 2. ज्ञानयोगी 3. ध्यान योगी 4. लययोगी 5. हठयोगी 6. राजा योगी 7. मंत्रयोगी 8. अनाष्टयोगी).
    प्र.३१ महाभारताचे युद्ध कोणत्या कालखंडात झाले?
    उत्तर – द्वापर युग.
    प्र.३२. धृतराष्ट्राला किती पुत्र होते?
    उत्तर- 101. मुलीचे नाव – दुशाला
    प्र.३३. बलरामाच्या पत्नीचे नाव काय होते?
    उत्तर – रेवती
    प्र.३४. इंद्राच्या पत्नीचे नाव काय होते?
    उत्तर – शची
    प्र.35. पांडव बंधूंमध्ये सर्वात मोठा कोण होता?
    उत्तरः युधिष्ठिर


    प्रश्न. 36. अर्जुनाला मारण्याचे वचन कोणी दिले होते?
    उत्तर – कर्ण
    प्र.३७. कुंतीचा मोठा मुलगा कोण होता?
    उत्तर – कर्ण
    प्र.३८. धृतराष्ट्राची कन्या दुशाला हिचा विवाह कोणासोबत झाला होता?
    उत्तर – जयद्रथ
    प्र.३९. योग किती आहेत?
    उत्तर- 27
    प्र.४०. सर किती वर्षे आहेत?
    उत्तर – ६०


    प्र.४१. ऋषी तर्पण कोणत्या दिशेला करावे?
    उत्तर – उत्तर दिशा
    Q.42. देव तर्पण कोणत्या दिशेला करावे?
    उत्तर – पूर्व दिशा
    प्र.43. पितृ तर्पण कोणत्या दिशेला करावे?
    उत्तर-दक्षिण दिशेने
    Q.44. रामाचे कुलगुरू कोण होते?
    उत्तर – वशिष्ठ
    प्र.४५. रामाला शस्त्रे शिकवणारे शिक्षक कोण होते?
    उत्तर – विश्वामित्र


    प्र.46. सीतेचा जन्म कधी झाला?
    उत्तर- वैशाख शुक्ल पक्ष नवमी तिथी पुष्य नक्षत्र
    प्र.४७. कोणत्या प्रकरणात गंगेच्या अवतरणाची कथा वर्णन केली आहे?
    उत्तर – बालकांड
    प्र.४८. रामायणात किती सर्ग आहेत?
    उत्तर- 500 कॅन्टोस


    प्र.49. गंगा दसरा कधी साजरा केला जातो?
    उत्तर – ज्येष्ठ शुक्ल पक्ष दशमी तिथी
    प्र.५०. रामाचा जन्म नक्षत्र कोणता होता?
    उत्तर – पुनर्वसन
    प्र.५१. रामाचे लग्न कधी झाले?
    उत्तर- मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी तिथी
    प्र.५२. रामाचा जन्म कधी झाला?
    उत्तर- चैत्र शुक्ल पक्ष नवमी तिथी
    प्रश्न. 53. सीतेचा जन्म कधी झाला?
    उत्तर – वैशाख शुक्ल पक्ष नवमी तिथी पुष्य नक्षत्र
    प्र.५४. जान्हवी कोणाचे नाव होते?
    उत्तर – गंगा
    Q.55 गंगा सप्तमी कधी साजरी केली जाते?
    उत्तर- वैशाख शुक्ल पक्ष सप्तमी


    प्र.५६. गंगा पृथ्वीवर कोणत्या तारखेला अवतरली?
    उत्तर- ज्येष्ठ शुक्ल पक्ष दशमी
    प्र.५७. रामायणात कोणता रस प्रचलित आहे?
    उत्तर – करुण रस
    प्र.५८. श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या युगात झाला?
    उत्तर – द्वापर युग
    प्र.५९. कृष्णाच्या भावाचे व बहिणीचे नाव काय होते?
    उत्तर – बलराम आणि सुभद्रा

  • आपल्याकडे दैविक शक्ती आरुढ झाली आहे हे कसे ओळखावे?

    आपल्याकडे दैविक शक्ती आरुढ झाली आहे हे कसे ओळखावे?

    जेव्हा आपण कोणतेही साधना, परायन, जप – तप कर तो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलयचक्र तयार होते यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात.

    आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे?

    या साठी हा लेख ….

    १) ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत ( ङावी – उजवीकडे न हलता सरळ रेषेत ) वाढत जात असेल तर समजून जावे कि दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरते आहे.

    २) ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल सुखद अनुभूती होत असेल तर समजावे कि दैविक शक्ती तूमच्या जवळपास आहे.

    ३) दररोज श्री स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी गेले असता व तेथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात.

    ४) शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, भय, चिंता ही नाहीशी होते व मनाला सुखद अनुभूती होते व मन पूर्णता हलके होते.

    ५) ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो ( एकांत म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण ) त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी समजून जावे कि देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अद्रुष्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा, स्वामी महाराजांचे ध्यान करते वेळी बकुळीच्या फुलांचा, शिवशंकर यांचे ध्यान करते वेळी पारजातकांच्या फुलांचा, भगवान विष्णु व त्यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येतो, देवीचे उपासना करताना मोगरा किंवा मालीच्या फुलांचा वास येतो.

    ६) शिंवलिंगावर पंचामृताने अभिषेक करते वेळी किंवा जल अर्पण करते वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा दैविक अनुभव आहे.

    ७) ज्या स्रीया घरामध्ये देवीचा घट ठेवतात व त्याची मनोभावनेने पुजा करतात त्या स्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या सुवासीन बाईचे दर्शन होते अन् ती त्या स्रीला योग्य तो मार्ग दाखवते.

    ८) जे दत्तगुरुंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे परायण करतात. ते जेव्हा रात्री डाव्याकुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात.यामध्ये काहींना स्वप्नामध्ये देवाची अनुभूती होते.

    ९) ज्यांना स्वप्नामध्ये ढोपरा पर्यत धोती, एका हातात कमंडलू, कपाळावर भस्म, पायात पादुका, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला वृद्ध व्यक्ती दिसला असेल त्याने समजून जावे कि तो देव आहे व तो तूम्हाला दर्शन देत आहे अथवा तूमच्या पुर्वजन्मी किंवा त्याहून आधीच्या जन्मी ते तूमचे गुरु असतील असे समजावे.

    १०) जे दुर्गा सप्तशती चे पठन करतात अथवा दर मंगळवारी सिद्धकुंजिका स्रोत वाचतात अशा देवी भक्तांना स्वप्नात हिरव्या साडी घातलेल्या स्रीया ( पण त्यांचे मुख दिसत नाही व शरीरही दिसत नाही म्हणजे सर्वत्र काळा रंग ज्यामध्ये हात – पाय दिसत नाही, कान – नाक – डोळे काहीच दिसत नाही म्हणजे तेथे असूनही अध्रुश्य अवस्थेत ) त्यांच्या गळ्यात मोठे चकाकते मंगळसुत्र, केसात अंबाडा त्यावर वेणी व कपाळावर लाल भस्म किंवा लाल कुंकवाचा गोलाकार लेप अशा नऊ ते दहा स्रीयांचे दर्शन होते.या स्रीया मोठ्या चौरंग्या सारख्या पाटावर बसलेल्या दिसतात. काहींच्या मते यांना देवींचे बया असेही म्हणतात.

    ११) ज्यांना स्वप्नामध्ये जून्या घरचे देव म्हणजेच मूळदेव दिसतात त्यांनी समजून जावे की तूम्हाला मूळदेव हाक देत आहे.

    १२) जे कुलदेवीची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्रीला कोणीतरी बाहेरुन तीची ओळखीची सुवासीन स्री तीला अचानक भेटावयास येते व चालता – बोलता अचानक तीच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या स्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे.

    १३) ज्या घरामध्ये मूळदेव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जानवतो तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते.अशा घरात दैवी तत्त्व मोठ्या प्रमाणात रुढ असते.

    १४) शिर्डी, गाणगापूर, नृसिह वाडी, अक्कलकोट, शेंगाव यांसारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अङचनी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो. काहींना याची अनुभूती असेलच.

    १५) घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास व ताप उतरत नसल्यास गाणगापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा ( हळद ), ज्योतीबाचा भंडारा ( लाल गुलाल ), काळूबाईचा अंगारा, महादेवाचे भस्म यापैकी काहीही आजारी माणसाच्या अंगाला हाता – पायाला लावले असता अंगातील ताप ( उष्णता ) शरीराबाहेर टाकली जाते व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो.त्यामूळे आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो.यामधून देवाचे खरे सत्त्व कळते.

    १६) आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात काही मंदिरात देवाच्या दोन भुवयांच्या वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डावा व उजवा असे दोन गोटे लावले जातात व देवासमोर विचारणा केली जाते जर का सकारात्मक असेल तर उजवा व नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो.काही ठिकाणी फुलांचाही वापर होतो.हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पहावयास मिळतो. या मध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते अनेकांना याचे चांगलेच अनुभव आले आहेत.

    १७) लहान बाळ ज्यावेळी हसत – खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे कि येथे दैवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते पण ती समजून घेणे त्याच्या विचाराच्या पलिकडची असते.

    १८) रस्तावरुन किंवा आडवाटे वरुन चालताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्हीही हातानी ढापून घेतो व नंतर हळूच डोळे उघङून पाहता तो लख्ख प्रकाश गायब झालेला दिसतो त्यावेळी आपण मनात विचार करतो हे काय असावे? हा सुद्धा दैवी अनुभूतीचाच प्रकार आहे.

    १९) जी व्यक्ती संकाटाच्या पेचात सापडली आहे व आज तरी आपले काम होईल का? किंवा अॉफिसमध्ये आज आपल्याला साहेबांची ओरड पडेल या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे कि नाही? अशा भयभीत झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजंती माळ धारण करुन कामासाठी घराबाहेर पडले असता त्यांच्या सर्व अङचणी शिथील होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होत जाते ही सुद्धा देवाचीच कृपा असते.

    २०) ज्या घरातली व्यक्ती आजारपणा मूळे हॉस्पिटलमध्ये ऐडमीट असेल तर त्यांच्या घरातल्यांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास ही उतरत नसेल किंवा रात्री त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगेल याची भीती सतवत असते व झोपही लागत नसते अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेऊन गार्हाने घातले असता काहींना याचा चांगला सकारात्मक अनुभवही आलेला आहे.

    देवाचे सत्त्व आजही या कलयुगात आहे.देव हा उघङ्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त
    मी आहे तूझ्या आजूबाजूलाच आहे “ याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तूम्हालाही अशा प्रकारे दैवी शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच.

    श्री गुरुदेव दत्त.
    🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • दिवा का लावावा. आणि कधी लावावा

    देवाजवळ दिवा का लावावा. आणि कधी लावावा…


    सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असते. दिवसाला एकूण ०८ प्रहर असतात यात दिवसाला ०४ व रात्रीचे ०४ चे प्रहर असे एकूण ०८ प्रहर असतात. यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो ०४ ते ०७ वाजे पर्यत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. संध्या मध्ये सुर्य अस्ताची वेळ आणि सुर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते. जी सध्या ६.४५ ते ७.३० आहे. दिनमानानुसार ती बदलत जाते जसे की उत्तरायणात सुर्यास्त ऊशीरा होतो तर दक्षिणायणात सुर्यास्त लवकर होतो त्यामूळे संध्या समय वरखाली होतो त्यामूळे दिनमानानुसार कातरवेळ बदलते.

    काही लोक सांगतात ७.३७ ला दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा दिवा हा ७.३७ लावतात परंतू पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती. गावात वरसकी पद्धती असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याची वरसकी असेल तो सुर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत. दिवा लावल्यावर घंटानाद होत असे. घंटानाद ऐकताच सर्व जण आपआपल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावत. त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मान-पाण होता, ग्रामदेवताची दिवाबत्ती लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे या मागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखणदारा सोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करते.

    कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रुप धारण करुन जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रुपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातारवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो.

    संध्याकाळी 6.30 नंतर केव्हाही दिवा लावावा, दिवा लावल्यावर घरातील सुवासींनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे. आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे.

    देवाजवळ आणि तुळशीजवळ
    दिवा लावून देव अन् दिवा यांना नमस्कार करावा !

    सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ, तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

    स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधीकालात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल. तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा. सूर्यास्तानंतरच्या संधीकालातही दिवा लावावा. (खरे तर देवाजवळ दिवा २४ घंटे तेवत असायला हवा.)

    ‘यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो’, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडेतेलाचा दिवा लावावा.

    देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते. देवतेच्या या कृपाकवचामुळे घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होण्यास साहाय्य होते.

    दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे.
    हे लक्षात आले कि मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल.


    दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर, वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते.
    यामुळे, जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात. आणि असे जीव हे अतिसुक्ष्म असल्याने शरिरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरिरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात.

    स्त्रियांच्या शरिरावरील रंध्रे ही पुरूषांच्या शरिरावरिल रंध्रांपेक्षा मोठी असतात. त्यामुळे स्त्रियांच्या शरिरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटील शरिररचनेनुसार, स्त्रियांना जास्त धोका असतो.
    त्यामुळेच सातच्या आत घरि असावे असे सांगण्यात आले आहे.

    वातावरणात सुक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा, सर्वत्र दिवे लावून मिळवता येते.
    म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाचीही कमतरता भरुन निघते.
    सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात. यावेळी प्रचण्ड डिस्टर्बन्स असतो. या काळात ऊर्जेची आवश्यकता असते.


    त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्रदर्शन होण्याआधी पर्यंत दिवे लावावेत.
    तसेच हे दिवे तेलाचे किंवा तुपाचेच असावेत.
    वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूंची वाढ ही, फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडले जाणार्या लहरींद्वारेच थोपवली जाते.
    इलेक्ट्रीकल दिव्यांद्वारे निघणार्या लहरींद्वारे थोपवली जाऊ शकत नाही.

    सायंकाळी संध्या करावी आणि देवाजवळ दिवा लावावा. याच वेळी अंगणात तुळशीजवळही दिवा लावावा. देवाजवळ लावलेला दिवा २४ घंटे तेवत असायला हवा. सायंकाळी दिव्याच्या वातीवर आलेली काजळी काढावी. सध्या बहुतेक जणांच्या घरात २४ घंटे दिवा तेवत ठेवलेला नसतो. त्यामुळे त्यांनी सायंकाळ झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावावा.

    तिन्हीसांजेला घरात अन् तुळशीजवळ दिवा लावल्याने
    घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होणे
    आणि त्या वेळी वातावरणातील वाईट शक्तींचा त्रास होऊ नये; म्हणून घरी थांबणे

    ‘तिन्हीसांजेला, म्हणजेच दिवेलागणीच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वातावरणातील वाईट शक्तींच्या संचाराम म्हणून शक्यतो दिवेलागणीच्या वेळेपूर्वी घरी यावे किंवा दिवेलागणीनंतर घरातून बाहेर पडू नये. बर्‍याचदा वाईट शक्तींची त्रास हा तिन्हीसांजेच्या वेळी सर्वांत जास्त प्रमाणात होते. अघोरी विद्येचे उपासक तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणार्‍या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात. म्हणून तिन्हीसांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात, हत्या (खून) होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात. या काळाला ‘कातरवेळ’ म्हणजेच ‘त्रासदायक किंवा विनाशाची वेळ’, असे म्हणतात.’

    तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायूमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते.

    वायूमंडलात कार्यरत असणार्‍या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय (भीती) निर्माण करतात.

    शुभं करोति का म्हणावी?

    तिन्हीसांजेच्या वेळी ‘शुभं करोति०’ म्हटल्यामुळे देहाभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते. तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने १२ घंटे सूक्ष्मातून कार्यरत रहातात.

    मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते. तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास साहाय्य होते.’

    दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात . दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशीर करावी . दिवस लहान होत गेला कि सकाळची पूजा उशीरा आणि सायंकाळची लवकर . या दोन विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टाईमिंग फिक्स ठेवा . आणि पूजा , दिवेलागण करा .

    आता लवकर दिवस मावळायला लागलाय भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो म्हणून दिवेलागण लवकर करावी . फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो. चैत्र वैशाखात तर सायंकाळी सात वाजता ही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवेलागण करावी .

    देव्हाऱ्यात व तुळशी जवळ पहाटे पासून(दुपारी वगैरे आपोआप विझला तरी हरकत नाही) रात्री ९ वाजेपर्यंत तेवत ठेवणे कारण,
    हिंदू धर्मानुसार रात्री ९ वाजता शेजारती झाल्यानंतर देव विश्राम करतात व तेंव्हा उजेड नसावा!

    दिवा सुर्योदया आधी आणि सुर्यास्ता नंतर लावावा….
    कारण ती प्रकाशाची पुजा आहे.. त्या प्रतीचा ऋणानुभाव आहे आणी प्रकाशाची पुजा म्हणजेच देवाची पुजा होय….

    🙏🙏🙏
    आंतरजालावरून प्राप्त

  • वेळ अमावास्या

    वेळ अमावास्या (किंवा वेळा अमावास्या, मराठी ग्रामीण भाषेत येळवस) हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद,लातूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे.

    मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो

    मार्गशीर्ष महिन्यात शुभदिवशी स्नान करून त्यानंतर शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे. शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध, फुले,धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे


    पूर्वी बैलगाडीमध्ये हे सर्व साहित्य भरून घरचा सगळा लवाजमा याच बैलगाडीत धडधड आदळत आपटत मस्त सफर करत शेताला जायचा. आता मात्र सवडीप्रमाणे मोटारसायकल, ऑटोचा वापर केला जातो.

    काहीजण डोक्यावर डालगे (मोठे टोपले) घेऊन शेतात जातात. या दिवशी आपल्या कामानिमित्त बाहेगावी असणारी माणसे वेळामावस्याला मात्र आपापल्या गावी आवर्जून सहकुटुंब येतात आणि आनंदाने हा उत्सव एकत्र साजरा करतात.

    शेतात आल्यानंतर एका झाडाखाली पाच पांडव मांडतात. त्यांना चुन्याने रंगवतात. त्यावर कडब्याच्या पाच पेंढ्या उभ्या करून एक सुंदर खोप (कोप) करतात. लाल शालीने ते बांधतातही. डालग्यातून साहित्य काढतात.

    पांडवासमोर हिरवे कापड ठेऊन लक्ष्मीची पूजाही मांडतात. नैवेद्य म्हणून भजी, वांग्याचे भरीत, ऊस, पेरू, बोरे, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबटभात, ज्वारी आणि बाजरीचे उंडे ठेवतात. कोणतीही आरती किंवा मंत्र न म्हणता पांडवाची पूजा करतात.

    शेवटी नारळ फोडून अगदी साध्या पद्धतीने पूजा संपवतात, हा नैवेद्य एका माठात भरतात.