Author: admin

  • Always true

    🚩🚩🦚🦚🚩🚩
    🌹🌹विधान🌹🌹

    भगवान विष्णु गरुड़ पर बैठ कर कैलाश पर्वत पर गए। द्वार पर गरुड़ को छोड़ कर खुद शिव से मिलने अंदर चले गए। तब कैलाश की अपूर्व प्राकृतिक शोभा को देख कर गरुड़ मंत्रमुग्ध थे कि तभी उनकी नजर एक खूबसूरत छोटी सी चिड़िया पर पड़ी। चिड़िया कुछ इतनी सुंदर थी कि गरुड़ के सारे विचार उसकी तरफ आकर्षित होने लगे।

    उसी समय कैलाश पर यम देव पधारे और अंदर जाने से पहले उन्होंने उस छोटे से पक्षी को आश्चर्य की द्रष्टि से देखा। गरुड़ समझ गए उस चिड़िया का अंत निकट है और यमदेव कैलाश से निकलते ही उसे अपने साथ यमलोक ले जाएँगे।

    गरूड़ को दया आ गई। इतनी छोटी और सुंदर चिड़िया को मरता हुआ नहीं देख सकते थे। उसे अपने पंजों में दबाया और कैलाश से हजारो कोश दूर एक जंगल में एक चट्टान के ऊपर छोड़ दिया, और खुद बापिस कैलाश पर आ गया।

    आखिर जब यम बाहर आए तो गरुड़ ने पूछ ही लिया कि उन्होंने उस चिड़िया को इतनी आश्चर्य भरी नजर से क्यों देखा था। यम देव बोले “गरुड़ जब मैंने उस चिड़िया को देखा तो मुझे ज्ञात हुआ कि वो चिड़िया कुछ ही पल बाद यहाँ से हजारों कोस दूर एक नाग द्वारा खा ली जाएगी। मैं सोच रहा था कि वो इतनी जलदी इतनी दूर कैसे जाएगी, पर अब जब वो यहाँ नहीं है तो निश्चित ही वो मर चुकी होगी।”

    गरुड़ समझ गये “मृत्यु टाले नहीं टलती चाहे कितनी
    भी चतुराई की जाए।”

    इस लिए कृष्ण कहते है।

    करता तू वह है ….. जो तू चाहता है
    परन्तु होता वह है …..जो में चाहता हूँ
    कर तू वह …..जो में चाहता हूँ
    फिर होगा वो …..जो तू चाहेगा ।

    जीवन के 6 सत्य:-

    1. कोई फर्क नहीं पड़ता कि आप कितने खूबसूरत हैं ?
      ● क्योंकि..लँगूर और गोरिल्ला भी अपनी ओर लोगों का ध्यान आकर्षित कर लेते हैं..
    2. कोई फर्क नहीं पड़ता कि आपका शरीर कितना विशाल और मज़बूत है ?
      ● क्योंकि…श्मशान तक आप अपने आपको नहीं ले जा सकते….
    3. आप कितने भी लम्बे क्यों न हों , मगर आने वाले कल को आप नहीं देख सकते….
    4. कोई फर्क नहीं पड़ता कि , आपकी त्वचा कितनी गोरी और चमकदार है
      ● क्योंकि…अँधेरे में रोशनी की जरूरत पड़ती ही है…

    5 . कोई फर्क नहीं पड़ता कि ” आप ” नहीं हँसेंगे तो सभ्य कहलायेंगे ?
    ● क्यूंकि …” आप ” पर हंसने के लिए दुनिया खड़ी है ?

    1. कोई फर्क नहीं पड़ता कि ,आप कितने अमीर हैं ? और दर्जनों गाड़ियाँ आपके पास हैं ?
      ● क्योंकि…घर के बाथरूम तक आपको चल के ही जाना पड़ेगा…

    इसलिए संभल के चलिए …
    ज़िन्दगी का सफर छोटा है,
    इसे हँसते हँसते जियें.!!

    🙏🏼जय जय श्री राधे🙏🏽

  • Time most

    गेले द्यायचे राहून…..
    (असं आपलं होऊ द्यायचं नसेल तर….)

    सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, “भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?” तो म्हणाला,”पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन.” “मग काय करणार?” हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,”मग काय, निवांतपणे जगेन.” यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का निवांत जगत नाहीस?
    यातुन सिकंदरला काय कळलं माहीत नाही; पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगुन जाते.आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय ती पुढे कधीतरी निवांत जगू, या भाबड्या आशेवर.
    बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं, याचं भानही रहात नाही.
    कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहुन सुंदर असणारच हे आपण विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या प्रक्रुतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं; अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो. म्हणून केवळ एकटं पुढे रहाण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बऱ्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते, करायच्या राहुन गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात.
    इतर धावतायेत म्हणून आपणही धावणं ठीक नाही. जगणं हे राईसप्लेटसारखं असावं, त्यात कसं साऱ्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचंही काहीसं असंच आहे, ते सर्वसमावेशक, चौफेर असेल, तर ते सुखकर ठरते. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटुन जाऊ देऊ नका, ते क्षण तेव्हाचे तेव्हाच जगून घ्या, लुटून घ्या.
    स्टीव्ह जॉब्स म्हणतात, हरवलेल्या वस्तु गवसतील; पण वेळ नाही. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर “निरोगी कसं जगावं” हे पुस्तक वाचुन काय उपयोग ?

    सुनील इनामदार

  • True Rich person

    🤔🤔जगातला सर्वात श्रीमंत माणुस…!!!🤔🤔

    जगातल्या सर्वात श्रीमंत बिल् गेट्सना कोणीतरी विचारलं,” ह्या जगात तुमच्यापेक्षा कोण श्रीमंत आहे का…?
    बिल् गेट्स म्हणाले, ” हो एक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.
    समोरच्या व्यक्तीनं विचारलं,” कोण…!!!

    बिल् गेट्स म्हणाले,
    ” एकेकाळी मी प्रसिद्ध किंवा श्रीमंत नसताना, मी एकदा न्यूयॉर्क एअरपोर्टवर असताना सकाळी मला एक न्युजपेपर घ्यावासा वाटला म्हणून खिशात हात घातला तर खिशात एकही डाॅलर नसल्याचं जाणवलं सबब मी तो खरेदी करण्याचा विचार सोडुन दिला…!
    व माझ्याकडं पैसे नसल्याचं सांगितलं.
    समोरच्या त्या पेपर विकणा-या मुलानं माझ्याकडं बघुन तो न्युजपेपर फुकट देण्याचं ठरवलं…!!!

    तीन महिन्यानंतर योगायोगानं मी त्याच एअरपोर्टवर उतरलो असता मला पुन्हा न्युजपेपर घेण्याचा मोह झाला परंतु त्याही वेळी माझ्याकडे पैसे नसल्याने मी मोह आवरला.
    पण यावेळीही त्याच मुलानं परत मला न्युजपेपर ऑफर केला…!
    पण मी नम्रपणे नकार दिला, व सांगितलं मी नाही घेऊ शकत…!!!

    यावर त्या मुलानं सांगितलं की तुम्ही हा न्यूज पेपर घ्या कारण हा मी तुम्हाला माझ्या फायद्याच्या पैश्यातुन देत आहे, त्यानंतर मी तो घेतला…!!!

    १९ वर्षानंतर मी जेव्हा जगातला श्रीमंत माणुस झाल्यानंतर मला त्या पेपर विकणा-या मुलाची आठवण झाली…
    मी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, तब्बल दीड महिन्याच्या तपासांती मला तो सापडला..!

    मी त्याला विचारले,” तु मला ओळखतोस का ?
    तो म्हणाला,” हो तुम्ही बिल् गेट्स आहात…!
    मी म्हटलं, तुला आठवतंय का कि कधीकाळी तु मला न्यूजपेपर फ्री दिले होतेस…!
    तो म्हणाला, “ हो…दोनदा…!”
    मी म्हणालो, ” मला त्याची किंमत अदा करायची आहे. तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग…!
    मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो…!!!

    यावर तो नम्रपणे म्हणाला, ” सर पण तुम्हाला असं वाटत नाही का कि तुम्ही ती किंमत देऊ शकणार नाही…!”
    मी विचारले,” का…???

    तो मुलगा म्हणाला, ” मी जेव्हा तुम्हाला मदत केली तेव्हा मी गरीब होतो आणि आणि तुम्हाला माझ्या होणा-या फायद्यातुन करत होतो तर तुम्ही मला मदत अशावेळी करत आहात जेव्हा तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात…! म्हणुन तुम्ही तुमच्या मदतीची तुलना माझ्या मदतीबरोबर करु शकत नाही…!!!

    बिल गेट्सच्या नजरेत तो मुलगा जगातला सर्वात श्रीमंत माणसाहुन श्रीमंत आहे कारण कोणाची मदत करण्यासाठी त्यानं स्वतः श्रीमंत होण्याची वाट नव्हती बघितली…!!!

    श्रीमंती पैश्यांची नसते तर मनाची असते कारण कोणाची मदत करण्यासाठी श्रीमंत मन असणं देखील आवश्यक आहे…!!👍👍

  • साला मी अडाणी होतो

    साला मी अडाणी होतो
    तेच बर होत… ☺️

    साला मी अडाणी होतो तेच बर होत…
    साधा सर्दी खोकला झाला की
    आलं, तुळस काढा घ्यायचो,
    पोट दुखल की ओवा चावत जायचो
    ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो
    ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट,
    ना हॉस्पिटल च्या एडमिशन मध्ये अडकत होतो…
    निरोगी आयुष्य जगत होतो..
    साला मी अडाणी होतो
    तेच बर होत… ☺️

    राम राम ला राम राम,
    सलाम वालेकुम ला, वाले कुम अस सलाम
    आणि जय भीम ला जय भीम नेच प्रेमाने उत्तर देत होतो
    ना धर्म कळत होता
    ना जात कळत होती
    माणूस म्हणून जगत होतो…
    साला मी अडाणी होतो
    तेच बर होत… ☺️

    सकाळी न्याहारीला दूध भाकरी, दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो,
    हेल्थी ब्रेकफास्ट चा मेनू
    लंच चा चोचलेपणा आणि
    डिनर च्या सोफेस्टिकेटेड उपासमारी पेक्षा दिवस भर भरपेट चरत होतो…
    साला मी अडाणी होतो
    तेच बर होत… ☺️

    शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो
    रामायणात रंगून जात होतो, चित्रहार सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो,
    ना वेबसिरीज ची आतुरता,
    ना सासबहु चा लफडा ,
    ना बातम्यांचा फालतू ताण सहन करत होतो…
    खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो…
    साला मी अडाणी होतो
    तेच बर होत… ☺️

    सण असो की जत्रा सुट्टी मिळेल तेव्हा वेळ मस्त कुटुंबासोबत घालवत होतो,
    चार मित्रांमध्ये मिसळत होतो, लोकांमधी उठत बसत होतो…
    ना टार्गेट ची चिंता होती,
    ना प्रमोशमन चे टेन्शन होत,
    ना पगार वाढ ची हाव होती,
    तणावमुक्त जीवन जगत होतो…
    साला मी अडाणी होतो
    तेच बर होत… ☺️

    गावातले वाद गावात मिटवत होते
    झाली भांडण तरी रात्री मंदिरात एकत्र येत होतो,
    सकाळी पुन्हा एकत्र फिरत कामाला लागत होतो..
    ना पोलीस केस ची भीती,
    ना मानहानी चा दावा, ना कोर्टाच्या चकरा मारत होतो.
    खरोखर सलोखा जपत होतो.
    साला मी अडाणी होतो
    तेच बर होत… ☺️

    कुटुंबाला प्रेमाने पत्र लिहीत होतो, पत्राची वाट बघत होतो,
    पत्राच्या प्रत्येक ओळीत प्रेमाचा ओलावा अनुभवत होतो…
    ना मोबाईलवर कोरडी बोलणी,
    ना फॉरवर्ड म्यासेज,
    ना ऑनलाइन ची निरर्थक चॅटिंग उगाच चा फक्त दिखावा करत नव्हतो
    साला मी अडाणी होतो
    तेच बर होत… ☺️

    मातीच्या घरात रहात होतो, सारवलेल्या अंगणात बागडत होतो,
    ऐसपैस अर्धा एकरभर जागेत सुखात सगळे नांदत होतो…
    ना एक बिएचके मध्ये कोंबलो होतो,
    ना बाल्कनी साठी भांडत होतो , ना मास्टर बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेत होतो…
    मस्त मोकळ्या हवेत ढगाखाली मोकळा श्वास घेत होतो…
    साला मी अडाणी होतो
    तेच बर होत… ☺️

    अडाणी असताना सुशिक्षीतात जाऊन त्यांचे आयुष्य जगावे अशी स्वप्न पाहत होतो ,
    त्या साठी मेहनत करत होतो,
    आणि जेव्हा सुशिक्षित झालो,
    त्या भपकेबाजीत घुसू लागलो, ढोंगी ते जग बघू लागलो,
    आणि मग परत वाटू लागलं.
    साला मी अडाणी होतो
    तेच बर होत… ☺️🙏🏻.

  • दिवाळी का साजरी केली जाते

    दिवाळी का साजरी केली जाते

    खर हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण येतोय दीपावली, ज्याला आपण मराठी मधे दिवाळी म्हणतो ।

    परंतु 30% लोकांनाच माहित आहे की दिवाळी हा सण का साजरा केला जातो . बाकी 70% तर फक्त लहानपणापासून असे समजतात की फक्त दिवे लावणे , फराळ , आणि फटाके फोड़णे ,लक्ष्मी पूजन करणे, बस हीच आहे दिवाळी असो काही हरकत नाही ।

    आज मी तुम्हाला या पोस्ट मधे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की दिवाळी का साजरी केली जाते आणि दिवाळीला प्रभु श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा का केली जाते.
    नीट वाचा 👍

    दिवाळी हा हिंदुंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी भगवान श्री राम, बंधू श्री लक्ष्मण आणि माँ सीता यांच्या सोबत 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर आयोध्येत परत आले होते.
    आयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभु श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि आयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत तेव्हा पूर्ण आयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी आयोध्या सजवली होती.

    जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत केला त्याच्या बरोबर 21 दिवसांनी श्रीराम हे आयोध्येमध्ये पोहोचले होते तेव्हा पासून दिवाळी हा सण साजरा केला जातो ।
    म्हणजे लाखो वर्षापासूनची ही परम्परा अजूनसुद्धा हिन्दू बांधव साजरी करतात.

    दिवाळी 5 दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे ।
    चला तुम्हाला या 5 दिवसाचं महत्त्व सांगतो 👍

    1:- पहिला दिवस आहे धनत्रयोदशी. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत समुद्रमंथन केलं होतं तेव्हा समुद्रामधून 14 रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या कॅलेंडरनुसार पितृपक्षाच्या 13 दिवसानंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रामधून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले.
    भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली.
    त्या दिवसापासून या दिवसाला धनतेरस , धनत्रयोदशी असे नाव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो.

    2:- दिवाळी चा दूसरा दिवस आहे नरकचतुर्दशी👍

    एके काळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता , त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फ़क्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो.
    पुढच्या जन्मात भूमि देवी ने सत्यभामा च्या रुपात अवतार घेतला , सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झाले. त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला.
    तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरक चतुर्दशी या नावाने ओळखलं जातं.

    3:- दिवाळीचा तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजा 👍

    देव आणि असुर हे जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माँ लक्ष्मी प्रकट झाली होती ।
    तेव्हा पासुन त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश , सुख ,आणि संपत्तीसाठी माँ लक्ष्मी यांची पूजा होते।

    दिवाळीच्या दिवशी माँ लक्ष्मी यांच्या सोबत श्री गणेश यांची सुद्धा पूजा होते ।
    पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माँ पार्वती चे 2 पुत्र होते ।

    लक्ष्मीने पार्वती जवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही. मग गणपतीची काळजी ती कशी घेईल. याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईन तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईन.
    म्हणून तेव्हापासून
    जिथे लक्ष्मीची पूजा होते तिथे गणपतीची सुद्धा पूजा होते ।

    खर तर दिवाळीच्या दिवशी श्री राम आयोध्येमध्ये आले होते परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा होते ।
    पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णु हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णु चा अवतारच आहे ।
    त्यामुळे भगवान श्रीराम यांची पूजा केली जात नाही

    4:-मित्रानो अश्विन अमवस्ये ला लक्ष्मी पूजन झलयस नंतर बलि प्रतिपदा हा दिवस दीवाली पाडवा म्हणून साजरा होतो ।
    साडे तिन मुहूर्तान पाईकी एक हा दिवस आतिशय शुभ मानला जातो ।
    अक्षय तृतीय , गुढी पाडवा , विजय दशमी हे पूर्ण मुहूर्त असून ,दिवाळी पाडवा हे अर्ध मुहूर्त आहे या दिवशी सोन खरदी , सुवासिनी कढुन पति ला ओवाळ ले जाते ।
    असे खुप काही महत्त्व आहेत
    व्यापारी लोकांचे नवीन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते

    हिशोबाच्या नवीन वह्या ज्याला खतावणी म्हणतात त्यांचे पूजन करून नवीन सुरुवात केली जाते
    कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो

    5:- दिवाळीचा चौथा दिवस आहे गोवर्धन पूजा 👍
    रामायणानुसार जेव्हा श्री राम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा सगळे वानर हे आपल्या आपल्या शक्तिनुसार दगड जमा करत होते तेव्हा हनुमानजीनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता ।
    परंतु ते यायच्या आधीच सेतूचं काम झाल होतं.
    सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं.
    श्रीराम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील ।
    आणि हनुमानाला सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेऊन ये.
    पुढच्या जन्मात जेव्हा भगवानांनी कृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातल्या लोकांना गोवर्धनाची पूजा करण्यास सांगितली.
    याला नाराज होऊन इंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केलं. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला.
    तेव्हापासून गोवर्धन पूजा केली जाते ।

    6:- पाचवा दिवस आहे भाऊबीज 👍
    या दिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले ।
    त्यांच्या बहिणी कडून झालेला आदरसत्कार पाहून ते खुप प्रसन्न झाले ।
    तेव्हा यमराजाने हे वरदान दिलं की या दिवशी जो भाऊ तिच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ति मिळेल आणि मोक्ष मिळेल तेव्हापासुन हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.
    त्या दिवशी सगळ्या बहिणी त्याच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात

    तर मित्रानो हे 6 दिवास दिवळीचे अपल्या साठी खुप महत्वाचे आहे ।
    अपन कट्टर हिन्दू आहेत अपल्या ला या गोष्टी 100% माहिती असायला हवी ।

    भविष्यात सेक्युलर अथवा गैर हिंदुनि ” दिवाळी का साजरी केलि जाते विचारल्यास तुम्हाला या गोष्टी तोंड पाठ पाहीजे ।

  • करवा चौथ व्रत कथा


    व्रत कथा १
    प्राचीन काळी करवा नावाची एक महिला तिच्या पतीसोबत एका गावात राहत होती. एक दिवस तिचा नवरा नदीत आंघोळ करायला गेला. मगरीने त्याचा पाय नदीत पकडला आणि आत नेण्यास सुरुवात केली. मग पतीने आपल्या सुरक्षेसाठी पत्नी कर्वाला बोलावले. पतीचे रक्षण करण्यासाठी त्याच्या पत्नीने पळून जाऊन मगरीला धाग्याने बांधले. धाग्याचे एक टोक पकडत ती पतीसह यमराजकडे नेली. कर्वाने मोठ्या हिमतीने यमराजांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
    करवाचे धाडस पाहून यमराजाने तिच्या पतीला परत केले. यासह, कर्व्याला सुख आणि समृद्धीचे वरदान देण्यात आले आणि ते म्हणाले की, ‘या दिवशी उपवास करून ज्या स्त्रीने कर्वाचे स्मरण केले त्या सौभाग्याचे रक्षण करीन. तेव्हापासून करवा चौथचे व्रत ठेवण्याची परंपरा चालू आहे.
    करवा चौथ व्रताची कथा २

    कोणे एके काळी एका नवविवाहित महिलेने आपल्या माहेरी असताना हे व्रत केले.ती सुस्वरूप अशी युवती होती.तिने कठोरपणे आपला उपवास पालन केला. तिच्या तपाने तिला दीर्घायुष्य मिळाले. भावांनी जवळच्या डोंगरावर अग्नी प्रज्वलित केला आणि तिला सांगितले की चंद्र उगवला आहे. व्रताची समाप्ती करताना चंद्राचे दर्शन घेण्यासाठी ती तिथे गेली पण तिला लक्षात आले की भावांनी आपल्याला फसविले आहे.तिचे व्रत मोडल्याने तिच्या पतीच्या निधनाची बातमी तिला समजली.ती बातमी कळताच ती आपल्या पतीच्या घरी निघाली.वाटेत तिला शिव पार्वती भेटले आणि त्यांनी तिला असे का घडले असावे हे कथन केले.पार्वतीने तिला आपल्या करंगळीच्या टोकातून थोडे रक्त दिले आणि आपल्या पतीच्या मुखावर शिंपडण्यास सांगितले.भविष्यकाळात तिने अगदी कठोरपणे हे व्रत पाळण्याचा सल्लाही देवीने तिला दिला. सासरी पोहोचल्यावर तिने पार्वतीने दिलेले रक्त पतीच्या मुखावर शिंपडले आणि तो पुनरूज्जीवित झाला.त्यानंतर या महिलेने निष्ठेने करवा चौथ व्रत पालन केले आणि तिला सुख समृृद्धी प्राप्त झाली अशी या व्रतामागील आख्यायिका आहे.

    संकलन :- सतीश अलोणी @

  • हक्काचा कोपरा

    सून फोनवर आईशी बोलत होती, “आई मी काय सांगू, आजकाल शिळ्या कढीला पण उत आलाय! सासरेबुवा निवृत्त झाल्यापासून, दोघेही गार्डनमध्ये एखाद्या फिल्मी जोडप्यासारखे दिवसभर झोपाळ्यावर बसलेले असतात. आपल्या पिकल्या केसांकडे बघून तरी वागायचं त्यांनी! अजूनही स्वतःला पंचवीशीतलेच समजतात.

    तेवढ्यात उदास मनाने सासूबाई स्वयंपाकघरात शिरल्या. त्यांनी हे सर्व ऐकले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी शांतपणे चहा बनवला आणि सुनेलाही तिच्या खोलीत जाऊन दिला. नवऱ्यासाठी चहा घेऊन जाताना सुनेने पाहिलं अन पुन्हा तोंड वेडंवाकडं केलं. पण त्यांनी तिच्याकडे दुर्लक्षच केलं.

    पती निवृत्त झाल्यापासून हा आता त्यांचा रोजचाच दिनक्रम झाला होता. त्यांच्या इच्छेनुसार ती रोज चांगले चांगले कपडे घालून गार्डनमध्येच आपला बराचसा वेळ घालवायची. आयुष्यभर त्यांनी फक्त मुलासाठीच खस्ता खाल्ल्या होत्या. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी, ते दोघेही एकत्र वेळ घालवायचे.

    अन्नपूर्णा भवन… दोन मजली बंगलेवजा घर अशोक आणि प्रभा यांचे आजीवन स्वप्न होते. घराच्या समोर असलेल्या बागेत प्रभाबाईंनी बेल, जास्वंदी, चाफा, मोगरा अशी कितीतरी फुलझाडे लावली होती. एका छोट्या टाकीत छानशी कमळेही फुलली होती. हिवाळ्यात त्या तेथे भाज्यांचीही लागवड करत. स्वयंपाकघरासाठी लागणारी ताजी कोथिंबीर, पुदिना, मेथी तिथलीच असायची!

    पण इतकी वर्षे कामाच्या गडबडीत अशोकजींना त्या जागेचा कधीच आनंद घेता आला नाही. पण आता मात्र त्यांचा सगळा मोकळा वेळ तिथेच जात असे. खरं तर त्या जागेत एक छानसं टुमदार घर दोघांसाठी बनवायचं म्हणून ती अतिरिक्त जागा त्यांनी घेतली होती. पण आता ते शक्य नव्हतं. प्रभाबाईंना तिथे एक झोपला हवा होता तो त्यांनी आणला. आता त्यांचा बराचसा वेळ त्या झोपाळ्यावर गप्पा मारण्यातच जायचा.

    आता पती-पत्नी दोघांनाही आरामाचे क्षण जगायचे होते. त्यांच्या घरात सर्व आवश्यक सोयीसुविधाही होत्या, तरीही सूनेला त्यांचं हे दिवसभर झोपाळ्यावर बसणं खटकायचं. अगोदर दिवसभर तिच्यासोबत असलेल्या सासूबाई आता त्यांच्या पतीला थोडा अधिक वेळ देऊ लागल्या होत्या.

    त्यांना टोमणे मारायची एकही संधी ती सोडत नसे. एकदा त्यांना त्या जागेतून हटवण्यासाठी तिने एक युक्ती केली.

    “आपण मोठी कार का खरेदी करत नाही … नवीन”

    “कल्पना चांगली आहे, पण ठेवायची कुठे? आपल्याकडे फक्त एकच गॅरेज आहे.” नवीन थोड्या चिंतेच्या स्वरात म्हणाला.

    “जागा का नाही, ती बाग आहे ना! जिथे आजकाल दोन लव्हबर्ड्स बसतात!”

    “तू जरा जास्तच बोलतेस!” म्हणत नविनने तिला फटकारले खरे, पण त्यानेही याबाबटुत बाबांशी बोलायचे ठरवले होते.

    दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो वडिलांकडे गेला आणि म्हणाला, “बाबा! मला आणि सोनमला मोठी कार घ्यायची आहे.”

    “पण बेटा, मोठी गाडी आधीच घरात आहे, मग तू ती ठेवणार कुठे?”

    “या बागेतच नवं गॅरेज बांधायचा विचार करतोय मी!. सोनम काही बघणार नाही आणि आई तरी अजून किती दिवस काळजी घेईल? त्यापेक्षा ही झाडे तोडणे चांगले होईल.”

    प्रभाबाईंच्या छातीत ते ऐकून धस्स झालं! रागावर नियंत्रण ठेवत बाबा म्हणाले, “मला तुझ्या आईशी बोलावं लागेल, मला थोडा वेळ दे.”

    “काय पप्पा … आईला काय विचारायचे .. या जागेचा काय उपयोग?”, नवीन जरा चिडूनच म्हणाला. “तुम्ही दोघेही दिवसभर कुठलाही विचार न करता, चार लोकांचा विचार न करता इथे बसता. आता सोनम सुद्धा घरात आहे, लहान मुलंही आहेत. पण तुम्ही मात्र दोघेही दिवसभर झोपाळ्यावर डुलता.”

    आतून सोनमची बडबड चालूच होती.

    नवीन आणि सोनमने त्या संध्याकाळी बाहेरून जेवण मागवले. पण ते जेवण काही केल्या या दोघांच्याही घशाखाली उतरले नाही. इच्छाच नव्हती कसली. दोघेही रात्रभर जागेचं होते!

    पण सकाळी त्याबद्दल विचार करताना, बाबांच्या ओठांवर एक स्मित उमटले. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच चहा बनवला. पण खूप निराश झालेल्या प्रभाताई त्या दिवशी झाडांना पाणी देण्यासाठी बाहेर पडल्या नाहीत, किंवा कोणाशीही बोलल्या नाहीत.

    दिवसभर सर्वकाही सामान्य होते, पण संध्याकाळी, ‘घर भाड्याने देणे आहे’ असा बोर्ड घराबाहेर लटकलेला पाहून नवीनने गोंधळलेल्या आवाजात बाबांना विचारले, “पप्पा, घर मोठे आहे हे मान्य, पण हे काय”?

    “पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफमधले मिस्टर गुप्ते सेवानिवृत्त होत आहेत, ते या घरात राहतील”, त्यांनी शांतपणे उत्तर दिले.

    “पण कुठे?”

    “तुमच्या भागात”, अशोकजींनी साध्या आवाजात उत्तर दिले.

    “आणि आम्ही?”

    “तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम तर मी तुम्हाला बनवलेच आहे. दोन तीन महिन्यांत तुम्ही दुसरा फ्लॅट पाहा किंवा कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जा, जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल!

    आम्ही दोघेही आमच्या वयाच्या लोकांमध्ये राहू. तुमच्या आईचं संपूर्ण आयुष्य तुम्हा सर्वांची काळजी घेण्यात गेले. आता तुमच्याकडून शहाणपणाचे धडे शिकणे एवढंच बाकी होतं.”

    “बाबा, मला असे म्हणायचे नव्हते,” नवीन हात जोडत म्हणाला.

    “नाही बेटा, तुझ्या पिढीने आम्हालाही व्यावहारिक होण्याचा धडा दिला आहे. जर आम्ही दोघे तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंदीत होऊ शकतो तर मग तुम्हाला आमच्यापासून त्रास का होतो? हे घर तुझ्या आईने बांधले आहे, हे झाड, ही फुले तुमच्यासाठी भोगलेल्या अनंत कष्टांचे साक्षीदार आहेत, म्हणून मी कोणालाही तिचा हक्काचा कोपरा हिसकावण्याचा अधिकार देणार नाही.”

    “बाबा, तुम्ही गंभीर झालात”, नवीनचा आवाज आता हळवा झाला होता.

    “नाही बेटा … तुझ्या आईने आजवर खूप त्याग करून, खूप दुःख सहन करून मला पाठिंबा दिला. आज तिच्या कृपेने माझ्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. म्हणूनच फक्त हा कोपराच नाही, संपूर्ण घर तिचे ऋणी आहे. तुमच्यापेक्षा तिचा या घरावर अधिक हक्क आहे.

    आमची मुलं असल्याचा फायदा जरूर घ्या. पण जर देव मंदिरात जोडीने शोभून दिसतात तर आईवडील का दिसू नये?

  • सप्तशतीचा पाठ

    देवी सप्तशतीचा पाठ वैदिक ब्राह्मणांकडुनच का करवुन घ्यायचा असतो? काही वर्षांपुर्वी मी गणेशपुरीच्या नित्यानंद स्वामी ( म्हसकर गुरुजी ) यांना माझी जन्मपत्रिका दाखवायला गेले होते. त्यावेळी मी नुकतीच वैद्य झाले होते. व्यावहारिक जगात हात,पाय मारणे चालु होते. बरीचशी त्रस्तच होते. स्वामींनी माझी पत्रिका बघितली आणि माझ्याकडे रोखुन म्हटले, ' वर्षाचे १२ चंडीपाठ करुन घेणार का? ' तेव्हा मला अध्यात्माची सुतराम ओळख नव्हती. ज्योतिषही शिकलेले नव्हते. मी विचार केला,असेल काहीतरी स्तोत्र वगैरे! धडकुन म्हटले,'हो,करेन की!' त्यांनी म्हटले,जास्त शहाणपणा करु नकोस. चंडीपाठ फक्त वेदग्रंथी ब्राह्मण करतात. ते करतील.तु फक्त त्यांना शिधा आणि दक्षिणा दे.' मला हायसंच वाटलं. चला,तेवढंच तर करायचं आहे ना! आपल्याला तर काही मेहनत नाही. करुन टाकु. मी त्यांना 'हो ' म्हणुन घरी आले. त्यानंतर 'घी देखा लेकिन बडगा नहीं देखा।' अशी माझी अवस्था झाली. २ महिने तर मला असे ब्राह्मणच कुठे सापडेना. तोपर्यंत वेदग्रंथी ब्राह्मण हा ही एक प्रकार असतो,हे मला तेव्हा कळले. सुदैवाने मला असे ब्राह्मण सापडले. आत्ता माझीही उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. काय असतं काय या ब्राह्मणांत?,असा प्रश्न माझ्या मनात उमटला होताच. असो,नमनालाच घडाभर तेल टाकलेय. वर्षाचे माझे १२ चंडीपाठ झाले आणि माझी समस्याही सुटली. वेदग्रंथी ब्राह्मण हे गुरुकूल पद्धतीने शिकतात. त्यांना परान्न वर्ज्य असते. कोणाकडे गेले तर दुध,केळी असा आहार घेतील. त्याव्यतिरिक्त काहीही नाही. ह्यांची वाणी खणखणीत असते. सतत ऋचा म्हणुन जिभेला धार आलेली असते. सगळी स्तोत्रे ह्यांना तोंडपाठ असतात. दुस-यांकडे गेले की हे सोवळ्यातच रहाणार. त्यांचे आसनही ते घेवुन येतात.( माझ्या गुरुंजींनी त्यांचे आसन आणले होते.) त्र्यंबकेश्वरला वेदग्रंथी ब्राह्मण पाहीले.काशी,बनारस,गया इथेही असे ब्राह्मण आहेत.

    माझी अध्यात्माशी ओळख याच चंडीपाठाने झाली. तोपर्यंत एकाही धार्मिक ग्रंथाचे पारायणही मी कधी केले नव्हते. असं काय आहे,या चंडीपाठात,की जे मी म्हणु शकत नाही? हा प्रश्न मनात ठेवुन मी नंतर बरेच वाचन केले. सुदैवाने ब-याच प्रश्नांची उत्तरे सापडत गेली.

    देवी सप्तशती हा वैदिक ग्रंथ आहे. यात देवी कवच,अर्गला स्तोत्र,कुंजिका स्तोत्र यांबरोबरच देवी स्तुतीचे ७०० श्लोक आहेत. संपुर्ण संस्कृत भाषेतील हा ग्रंथ वाचण्यासाठी काही नियम आहेत. हे नियम बरेच कडक आहेत. ते वाचुन तुम्हीच ठरवा,आपण सप्तशती पाठ करु शकतो की नाही!

    • भाषाशास्राची उत्तम जाण हवी.यातले श्लोक स्पष्ट शब्दोच्चारांसह खणखणीत आवाजात म्हटले पाहिजेत. कुठेही चुक होता कामा नये. उदा. म् हा उच्चार ब-याच वेळा औष्ठ्य असतो,तर तालव्यही असतो. कुठला उच्चार कुठे उच्चारायचा,याची माहिती तुम्हाला हवी. काही श्लोक संधीविग्रह करुन म्हटले तर समजतात,पण ते तसेच फोड न करता म्हणायचे असतात. ते जमलं पाहिजे.
    • संपुर्ण ग्रंथवाचनाला दोन तास लागतात. एकदा वाचनाला बसल्यावर मध्ये उठता येत नाही. तशी तयारी करुनच बसावे लागते.
    • दर्भासन,कुशासन असे आसन लागते. दर्भ,कुश हे गवत प्रकारातील वनस्पती आहे. ग्रंथवाचनाने जी ऊष्णता निर्माण होते,तिचा निचरा ह्या आसनाने होतो. मला ही आसने परत कुठे बघायलाही मिळाली नाहीत. लोक लाकडी पाट वापरतात,पण ती दुधाची तहान ताकावर,याप्रमाणे असते.
    • आचरण सत्वशील असावे. शारीरिक काय,मानसिक ब्रह्मचर्यही पाळावे. यासाठी आहारही खुप सत्वशील ठेवावा लागतो. परान्न घेता येत नाही. यात हाॅटेलचे जेवण तर आलेच,शेजा-यांनी दिलेलेही चालत नाही.
    • वाणी सुस्वर,खणखणीत होण्यासाठी ठराविक स्तोत्रे,ऋचा या कायम पठणात ठेवाव्या लागतात.
    • उगीचच चिडचिड करणे,लाचखोरी,दुस-यालाही काम होण्यासाठी आमिषाची गळ घालणे हे प्रकार टाळावेत.

    ग्रंथवाचन करताना न शिवलेले वस्र घालावे. पुरुष धोतर तर बायका साडी वापरु शकतात. नव्हे,तेच वापरावे. याव्यतिरिक्त कपडे नकोत. हे नियम देवी सप्तशती पाठालाच नाहीत,तर कोणत्याही धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी आवश्यक आहेत. हे नियम पाळल्यानंतरच ग्रंथ वाचनाचे पुर्ण लाभ मिळतात.

    • वैद्य.वर्षा लाड.
  • Mahatma Gandhi Jayanti E test

    महात्मा गांधी जयंती प्रश्नमंजुषा २०२१ 🧾🧾🎯🎯
    महात्मा गांधी जयंती निमित्त सर्वांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व LLC Aurangabad तर्फे हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
    या वर्षीची महात्मा गांधी जयंती डिजिटल माध्यमातून साजरा करण्यासाठी LLC Aurangabad च्या वतीने सर्वांसाठी एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा (eTest) आयोजित करीत आहोत.
    eTest देण्याकरिता https://www.help.mkclmantra.com/quiz या लिंकला भेट द्या.
    eTest दिल्यानंतर आपणास एक आकर्षक प्रमाणपत्र ही प्राप्त होईल,
    ही eTest जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना याचा लाभ होईल.