Author: admin

  • शिव पूजेतील वर्ज गोष्टी

    शिव पूजेतील वर्ज गोष्टी

    शिव पूजेतील वर्ज गोष्टी

    🚩 भगवान शिव हे आदि आणि अनंत आहेत, जे संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक कणाकणात वसलेले आहेत.

    🚩 भोलेनाथ आपल्या सद्भक्तांवर नेहमीच प्रसन्न असतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा शीघ्रतेने पूर्ण करतात.

    🚩 भगवान शिव जलाभिषेकाने प्रसन्न होतात, परंतु शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे भोलेनाथ लवकरच क्रोधित होतात.

    🚩 या गोष्टी इतर देव -देवतांच्या पूजेत वापरल्या जातात. पण भोलेनाथच्या पूजेत त्यांचा वापर वर्ज आहेत.

    🚩 शिवपूजेमध्ये या गोष्टींचा वापर केल्याने, व्यक्ती पुण्याच्या ऐवजी पापाचा भागीदार बनतो आणि भगवान शंकराचा क्रोध सहन करावा लागू शकतो.

    🔱 १. घरात दोन शिवलिंगांची स्थापना करू नये. असे केल्याने घरात दारिद्र्य आणि दुर्भाग्य येते. यामुळे घरातील सर्व सदस्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

    🔱 २. भोलेनाथला नेहमी पितळ, कांस्य किंवा अष्टधातूची भांडी किंवा लोटा यांतून पाणी अर्पण करावे, लोखंड किंवा स्टीलची भांडी नव्हे.

    🔱 ३. सर्व देवकार्यात तुळशीचा वापर केला जातो, परंतु भोलेनाथवर तुळशी अर्पण करणे वर्जित आहे. काही लोक अज्ञानामुळे ते शिवपूजेमध्ये तुळशीचा वापर करतात. ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होत नाही.

    🔱 ४. शिव पूजेमध्ये बेलाच्या पानांचे विशेष महत्व आहे. तूटलेली , फाटलेली बिल्वदले भगवान शिव यांना अर्पण करू नये. असे केल्याने उपासनेचा विपरीत परिणाम प्राप्त होतो. जेव्हा जेव्हा बिल्वाची पाने भगवान शिव यांना अर्पण केली जातात, तेव्हा ती नीट तपासून पाहिल्यानंतर आणि धुल्यानंतर त्यांचा वापर करावा. जेणेकरून भोलेनाथांचे आशीर्वाद कायम राहील.

    🔱 ५. देवपूजेच्या सर्व विधींमध्ये शंख वापरला जातो, परंतु शिवलिंगावर शंखाने पाणी अर्पण करू नये. शिव पुराणानुसार भगवान शिवाने शंखचूर या राक्षसाचा वध केला होता. म्हणून शंकराला शंख हा पूजेमध्ये निषिद्ध आहे.

    🔱 ६. कुमकुम / कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे, तर भगवान शिव हे वैरागी आहेत, त्यामुळे शिवाला कुंकू वाहत नाहीत.

    🔱 ७. शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे, आणि महिला सौंदर्य प्रसाधनांमध्ये हळदीचा वापर केला जातो. म्हणून भगवान शिव यांना हळदी अर्पण केली जात नाही.

    🔱 ८. भोलेनाथला लाल फुले अर्पण केली जात नाहीत. याशिवाय केतकी आणि केवडा फुले अर्पण करण्यासही मनाई आहे. भगवान शंकराला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण केल्याने ते लवकरच प्रसन्न होतात.

    🔱 ९. खंडित झालेल्या / तुटलेल्या अक्षदा भगवान शिव यांना अर्पण करू नयेत. खंडित / तुटलेला तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध आहे म्हणून भोलेनाथला अर्पण

  • पाच शिवलिंगांचे दुर्मिळ स्थळ

    श्री क्षेत्र दोधेश्वर

    दोधेश्वरचे सर्वात पुरातन आणि मुळ शिवलिंग मंदिर दक्षिणेकडिल टेकडीवरच्या दोन मंदिरांपैकी पश्चिमेकडील मुळेश्वर मंदिर आहे.या मुळाला पुर्वेस वेल आली ते टेकडीवरचे दुसरे मंदिर वेलेश्वर, वेलीला फुल आले ते स्नानकुंडाच्या पश्चिमेचे गुप्त फुलेश्वर हे तिसरे, फुल गुप्त होवून म्हणजे त्याचे रुपांतर फळात होवून चौथे मंदीर स्नानकुंडाच्या पुर्वेचे ते फळेश्वर, आणि फळाचा दुग्धरस ते दुग्धेश्वर तथा दोधेश्वर हे पाचवे मंदिर. या नैसर्गिक रचनेच्या ५ शिवलिंगांचे हे दुर्मिळ तिर्थक्षेत्र नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील व सटाणा शहरापासुन उत्तरेस अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावरील निसर्गरम्य अशा दोधेश्वरच्या देव भुमीतील.

    पायापासुन कळसापर्यंत फक्त आठ अखंड दगडांमध्ये बांधलेले सर्वात पुरातन छोटेशे मुळेश्वर मंदीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील असल्याचे मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या वेळी मिळालेल्या तांम्रपट आणि मंदिराच्या भग्नावस्थेवरुन लक्षात आले. मुळेश्वर शिवलिंग मंदिराच्या जिर्णोद्धाराचीही अतिशय रोचक आख्यायिका आहे.

    सटाणा नगरपरीषदेचे सेवक स्वर्गिय दत्तात्रेय उखाजी कापडणीस ज्यांना सर्वजन प्रेमाने मामा म्हणायचे. या शिवभक्तास सन १९७९ च्या महाशिवरात्रीला दोधेश्वर जकात नाक्यावर रात्रपाळीस कार्यरत असतांना काम संपल्यावर त्यांनी खुर्चीतच बसून ॐ नमःशिवायचा जप सुरु केला आणि ते ध्यानस्त झाले या ध्यानातच त्यांना शुभ्र पांढऱ्या रंगाच्या गाईने दृष्टांत देतांना डोंगरावरील जिर्ण मंदिराजवळ नेले व ढासळलेल्या या मंदिरास पाहुन गाय रडु लागली .. आणि ध्यान भंगले… दत्तु मामांनी जकात नाक्यावर रात्रपाळीस सोबत असलेले त्यांचे सवंगडी स्वर्गिय दादाजी राघो सोनवणे यांना हे सर्व सांगितले आणि या दोघांनी ठरविले की, सकाळी दोधेश्वर गाठायचे. गरिबीच्या परिस्थितीमुळे हे दोघेही एकाच सायकलीवर दोधेश्वरला पोहचले आणि डोंगर माथ्यावर जावुन पहातात तर काय आश्चर्य त्या डोंगरावर ते ढासळलेले मंदिर या जिर्ण मंदिरा भोवती काटेरी झुडपे, वारुळ आलेले आणि मंदिराबाहेर मुंडके तुटलेला नंदी आणि या मंदिराजवळ खरेच ध्यानात दृष्टांत देणारी शुभ्र पांढऱ्या रंगाची गाय उभी आणि तिच्या डोळ्यातुन अश्रु पडत होते. हे दोघेही आश्चर्य चकित झाले त्यांनी या जिर्ण मंदिरास व त्या गाईस नमस्कार केला आणि भारावलेल्या अवस्थेत डोंगर उतरुन ही गाय कोणाची आहे म्हणुन याला त्याला विचारु लागले, त्या वेळी तेथे डोंगर पायथ्याशी फक्त आधिवासींची वस्ती होती. बरीच विचारपुस करूनही पाढऱ्या रंगाची गाय माझी आहे. असे म्हणणार कोणीही भेटले नाही. त्यामुळे हे दोघेही पुन्हा डोंगर चढुन वरती आले तर ती शुभ्र पांढरी गाय तेथे नव्हती. यांनी भरपुर शोध घेतला परंतु ती गाय पुन्हा भेटली नाही. त्यामुळे हे पुन्हा वस्तीत आले पुन्हा शोधा शोध केली परंतु या गायीबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. मात्र या चर्चेत एका म्हाताऱ्या आजीबाईने यांना सांगितले कि हे फार जागृत देवस्थान असुन माझी आजीसासु रोज सांयकाळी या डोंगरावरील पडलेल्या मुळेश्वर मंदिरात दिवा लावण्यासाठी जात होती आणि तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तिने हि जबाबदारी मला दिली आहे. त्यामुळे मी सुद्धा रोज या पडलेल्या मंदिरात दिवा लावायला जाते, परंतु एक दिवशी मला थोडा जास्तच उशीर झाला होता, त्या दिवशी मी दिवा लावायला मंदिराजवळ गेली असता, आपल्या पायाच्या पोटरीपेक्षाही जाड आणि खूप लांब अशा नागोबाने शिवलिंगाभोवती विळखा घालून त्याचा फना शिवलिंगावरती धरलेल्या अवस्थेत पाहिल्यामुळे मी खूप घाबरले आणि कसाबसा नमस्कार करुन तेथून पळुन आले. तेव्हा पासुन दिवस मावळण्याआधीच तेथे दिवा लावुन येते आजीबाईची ही माहिती व ध्यानातील दृष्टांत आणि प्रत्यक्ष घडलेला गाईचा प्रसंग यावरुन दतुमामांची खात्री झाली की हा दैवी संकेत आहे आणि त्यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करायचा निश्चय केला. परंतु परीस्थिती अतिशय गरीबीची होती. यावर मार्ग काढण्यासाठी दत्तुमामांचे सवंगडी स्वर्गिय दादाजी राघो सोनवणे, स्वर्गिय मोहन परदेशी, मिस्त्री स्वर्गिय नरहर नामदेव मोरे, पेंटर स्वर्गिय शांताराम बापु वाघ, श्री. प्रताप फकीरा सोनवणे आणि त्यावेळेच्या सटाणा नगरपरीषदेच्या सर्व सेवकांच्या श्रमदानातुन आणि वर्गणी गोळा करुन मंदिर जिर्णोद्धार करण्याचे निश्चित केले.

    ढासळलेल्या मंदिराचे एक एक अवशेष काढुन बाजुला ठेवतांना लक्षात आले की दगडी शिवलिंगावर कसलातरी प्रहार झालेला होता प्रथमदर्शनी मंदिराचाच दगड पडुन हा प्रहार झाल्याचे वाटले परंतु मंदिराबाहेर असलेल्या दगडी नंदीचेही मुंडके तुटलेले होते तसेच मंदिराच्या मागे थोड्या अंतरावर गणपतीच्या दगडी मुर्तीचा तुटलेला एक भाग आणि मंदिराचा समोरच्या भागात मोकळ्या जागेवर दुसरा भाग आढळला या कृतीचा अर्थ लावतांना सर्वानांच असे वाटले की, या मंदिरावर पुर्वी कधीतरी आक्रमण करुन मंदिर उध्दवस्त करण्याचा प्रयत्न झालेला असावा.

    उत्तखणनाच्या शेवटच्या टप्प्यात शिवलिंगाच्या खाली तळहातापेक्षाही लहान आकाराच्या ताम्रपटावर मोडी भाषेत मुळेश्वर शिवलिंग मंदिर – साल १६५७ असा उल्लेख कोरलेला आढळल्याने हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात देखिल असावे हे पक्के झाले. कारण मुर्तीभग्न कृती महाराजांना त्रास देण्याच्या हेतुने त्यावेळेच्या इतर सत्ताधिशांनी केल्याचा इतिहास आपणा सर्वांना माहित आहेच. तसेच या शिवलिंगात आणि शाळूंका यामध्ये सन १८०५ असा उल्लेख असलेले चांदीचे नाणे अडकले होते, हे नाणे त्या वेळी कोणीतरी शिवलिंगास अर्पण केलेले असावे.

    श्रमदानातुन जिर्णोध्दाराचे कार्य सुरु झाले, डोक्यावर हंडा घेवून डोंगर पायथ्यापासुन पाणी डोंगरावर घेवून जाणे, सर्व बांधकाम साहित्य देखिल डोक्यावरुनच वरती घेणे, अशा कष्टातुन जिर्णोध्दाराचे काम सुरु राहीले. या सर्वांचे कष्ट पाहून त्यावेळेचे दोधेश्वरचे महंत लोटयाबाबा स्वत: पिण्याच्या पाण्याची बादली भरुन रोज डोंगरावर घेऊन येत आणि या जिर्णोध्दाराच्या कार्यास प्रोत्साहन देत होते.

    या मंदिराचा यापुढे जेव्हा केव्हा जिर्णोध्दार होईल त्यावेळी याचा इतिहास सर्वांना कळावा या सदहेतुने या जिर्णोध्दाराचा थोडक्यात इतिहास आणि या कष्टकऱ्यांची नावे एका नवीन ताम्रपटावर कोरुन उत्तखननात मिळालेले छोटेशे ताम्रपट्ट आणि चांदीचे नाणे व नवीन ताम्रपट्टासह शिवलिंगाच्या खाली खोल खड्ड्यात ठेऊन, त्यानंतर शिवलिंगाची विधीवत पुजा करुन, अन्नदान करुन दृष्टांत झाल्यापासुन बरोबर एक वर्षांने हा जिर्णोध्दार दिनांक १४ फेब्रुवारी १९८० रोजी महाशिवरात्रीला स्वर्गिय दत्तुमामा आणि त्या वेळेच्या सटाणा नगर परीषदेच्या सेवकांनी पुर्ण केला… त्याच शिवरात्रीला रात्रभर मंदिरात ॐ नमः शिवाय मंत्रजप करण्यासाठी स्वर्गिय दत्तात्रेय उखाजी कापडणीस, स्वर्गिय दादाजी राघो सोनवणे, स्वर्गिय नरहर नामदेव मोरे, श्री. प्रताप फकीरा सोनवणे या चारही शिवभक्तांनी मंदिराच्या गाभाऱ्यात चारही कोपऱ्यांना बसुन जप सुरु केला मध्यरात्री दिव्याच्या उजेडात त्या म्हाताऱ्या आजीबाईने वर्णन केलेला नागदेवता मंदिराच्या दारात येऊन फना काढुन बसलेला आढळला. मंदिराला छोट्या दरवाजा व्यतिरीक्त दुसरा कोणताही मार्ग नसल्याने स्वर्गिय दत्तूमामांनी हात जोडून नागदेवतास नमस्कार करुन बम.. बम.. भोलेनाथ असा जोरात गजर केल्याने हा नागदेवता मंदिराच्या आत येण्याऐवजी आल्या मार्गाने निघून गेला.

    या जिर्णोध्दार केलेल्या मंदिरात रोज सायंकाळी दिवा लावण्यासाठी त्या म्हातार्‍या आजीबाई आपल्या नातसुनेसह जात असे आणि जमेल तसे स्वर्गिय दतुमामा देखिल मंदिरात दिवा लावण्यासाठी जात असत.

    स्वर्गिय दत्तूमामा जिवंतपणीच त्यांच्या सवंगड्यांना व कुटुंबियांना शेवटची इच्छा सांगायचे की, त्यांच्या मृत्युनंतर त्यांची रक्षा मुळेश्वर मंदिराच्या डोंगर परीसरात विसर्जित करावी. वयाच्या ८१ व्या वर्षी स्वर्गिय दतुमामा शेवटचे ५८ दिवस अन्नपाण्यावाचुन जिवंत होते, कधीही कोणालाही त्रास न देता आयुष्यभर देवदेव करणारे घरातुन निघतांना एका हातात किड्यामुंग्यांकरीता साखर दुसर्‍या हातात चिमण्या पाखरांकरीता धान्य घेवून रस्त्याच्या कडेला टाकत जाणारे, घरी येतांना विकतचा चारा घेऊन रस्त्यावरील गाईगुरांना टाकत येणारे, भिकाऱ्यास घरात बसवुन जेवू घालणारे, अंगातील सदरा गरजुला देऊन कोपरीवर घरी येणारे, असे हे दतुमामा तरीही मुक्तीचा मार्ग इतका खडतर कसा ? कुटुंबियांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच जणूकाही दारात आलेल्या ऋषींना विचारणा केली असता, त्यांचा जिव भक्तीत अडकला असल्याचे ऋषींनी सांगितल्यावर मूळेश्वर शिवलिंग मंदिराचा जिर्णोध्दार त्यांनी केल्याचे ऋषींना सांगितले असता त्या ऋषींनी सांगितले की ज्या शिवलिंग मंदिराचा जिर्णोध्दार केला आहे त्या मंदिरात त्यांना आता जाता येणे शक्य नसले तरीही त्यांच्या वतीने त्यांच्या मुलांनी दिवा लावून त्यांची भक्ती शिवचरणी अर्पण करावी असे सांगितले. त्याप्रमाणे मुळेश्वर शिवलिंग मंदिरात ज्या वेळेस त्यांच्या मुलाने दिवा लावला त्याच्या दुसऱ्याच दिवशी बरोबर त्याच वेळेस स्वर्गिय दत्तुमामांची अमर आत्मज्योत देहत्यागून स्वर्गात शिवचरणी समर्पित झाली.

    मनोभावे व्यक्त केलेली इच्छा पुर्ण करणार्‍या, मनःशांती देणाऱ्या, जागृत शिवलिंगाचा परीसर आणि एकाच वेळी अनेक विवाहविधी पार पडू शकतात असे सभामंडप, धर्मशाळा, अतिथी गृह बांधण्यात आलेले असल्याने येथे वर्षभर भक्तांची ये जा सुरु असते .परंतु महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवार या दिवशी विशेष गर्दी असते त्यामुळे तेथे जाण्यासाठी सटाणा येथुन एस.टी बसेस आणि खाजगी वाहनांची देखिल सोय आहे.

    एकाच ठिकाणी असलेल्या
    मुळेश्वर…वेलेश्वर…फुलेश्वर…फळेश्वर…दोधेश्वर…
    या पाचही शिवलिंगांच्या दोधेश्वर या देवभुमीस
    त्रिवार वंदन ….! 🚩

    संकलन आणि शब्दांकन

    हिरालाल दत्तात्रेय कापडणीस,
    जनसंपर्क अधिकारी,
    सटाणा नगरपरीषद, सटाणा.
    दुरभाष- ९९२१५९ ३०२०

  • First Olympic Gold Medal for India by Neeraj Chopra after 12 years

    First Olympic Gold Medal for India by Neeraj Chopra after 12 years

    नीरज चोप्राने भारताला मिळवून दिले सुवर्णपदक

    Neeraj chopra wins gold medal

    India have now got first gold medal in Olympic games in the form of Neeraj Chopra in Bhalafek

    Neeraj Chopra VSM is an Indian track and field athlete and a Junior Commissioned Officer in Indian Army who competes in the javelin throw. Neeraj Chopra hurled the javelin at 88.07m to break his own national record.

    Before 12 years in 2008 India has got gold medal to Abhinav Bindra in Shooting

    The gold medal in the men’s 10m air rifle at Beijing 2008 was the crowning glory in Abhinav Bindra’s stellar sporting career, which includes a World Championship gold and multiple medals at the Commonwealth Games and the Asian Games.

    Let’s celebrate the moment

    Olympic medal today is of India

  • Benefits and rules for atharvashirsha

    Rules of chanting atharvshirsh

    अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

    अथर्वशीर्ष : थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे.

    अथर्वशीर्षाचे तीन प्रमुख भाग

    3 main part of Atharvshirsh


    १. शांतीमंत्र
    सुरुवातीला ॐ भद्रं कर्णेभिः आणि स्वस्तिनः इंद्रा….. हे मंत्र आणि शेवटी सह नाववतु ।…… हे मंत्र

    २. ध्यानविधी
    ॐ नमस्ते गणपतये येथपासून ते वरदमूर्तये नमः येथपर्यंतचे दहा मंत्र

    ३. फलश्रुती
    एतदथर्वशीर्ष योऽधीते इत्यादी चार मंत्रअथर्वशीर्ष म्हणणे

    अथर्वशीर्ष म्हणणे

    Rules for Atharvshirsh

    हे स्तोत्र म्हणतांना पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे.

    १. उच्चार अगदी स्पष्ट असावेत.

    २. स्तोत्र अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.

    ३. स्तोत्रपठण तदर्थभावपूर्वक = तत् + अर्थ + भावपूर्वक, म्हणजे त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्त आणि भगवच्छक्तीयुक्त झाला पाहिजे.

    ४. जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे स्तोत्र म्हणावयाचे असते तेव्हा वरदमूर्तये नमः । येथपर्यंतच म्हणावे. त्याच्या पुढे जी फलश्रुती आहे ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी. त्याप्रमाणेच शांतीमंत्र प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदा म्हणावा.

    ५. या स्तोत्राच्या एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.

    ६. स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे.

    ७. पाटावर न बसता त्याऐवजी धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.

    ८. पाठ म्हणून पूर्ण होईपर्यंत मांडी पालटावी लागणार नाही, अशी सोपी साधी मांडी घालावी.

    ९. दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.

    १०. पाठीला बाक येईल, असे न बसता ताठ बसावे.

    ११. पाठ म्हणण्यापूर्वी आई, वडील आणि आपले गुरु यांना नमस्कार करावा.

    १२. पाठाला प्रारंभ करण्यापूर्वी जमल्यास गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल वहावे. पूजा करता न आल्यास निदान गणपतीचे ध्यान एक मिनिटभर करावे, नमस्कार करावा आणि मग पाठास प्रारंभ करावा.

    १३. उच्चारात चुका होऊ नयेत म्हणून स्तोत्र बरोबर कसे म्हणावे, ते चांगल्या स्पष्ट आवाजातील audio ऐकून शिकण्याचा प्रयत्न करावा.

    १४. स्तोत्र म्हणतांना गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ॐ कडे पाहून म्हणावे, म्हणजे लवकर एकाग्रता होते.अथर्वशीर्ष म्हणण्याचे लाभ

    अथर्वशीर्ष म्हणण्याचे लाभ

    Benifits of Atharvshirsh

    १. स्तोत्रात फलश्रुती दिलेली असते. आत्मज्ञानसंपन्न ऋषीमुनींना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असल्याने आणि फलश्रुतीमागे त्यांचा संकल्प असल्याने, स्तोत्र पठण करणार्‍याला ते फळ फलश्रुतीमुळे मिळते.

    २. स्तोत्र पठण करणार्‍याच्या भोवती कवच (संरक्षक आवरण) निर्माण करण्याची शक्ती स्तोत्रात आहे; म्हणून अथर्वशीर्षाच्या पठणाने वाईट शक्तीच्या त्रासापासून रक्षण होते.

    शुभं भवतू

  • गृहिणी

    या कवितेचे कवी कोण आहेत माहित नाही परंतु फारच छान कविता आहे
    👌👌👇
    गृहिणी आहे हे सांगतांना
    अजिबात लाजायचं नाही
    ” घर सांभाळणं ” हे काम
    वाटतं तेवढं सोप्पं नाही

    ती घर सांभाळते म्हणून
    बाकीचे relax असतात
    आपापल्या क्षेत्रामध्ये
    उत्कृष्ट काम करू शकतात

    घराघरातली प्रसन्न गृहिणी
    पायाचा दगड असते
    घराण्याची सुंदर इमारत
    तिच्यामुळेच उभी असते

    घर सांभाळणाऱ्या गृहिणीला
    कधीही कमी लेखू नये
    नौकरी करत नाही म्हणून
    कोणीच तिला टोकू नये

    तिच्या कष्टाचं मोल लावल्यास
    पगार देऊ शकणार का ?
    इतके काबाड कष्ट आपण
    कधी करू शकणार का ?

    नौकरी करणाऱ्या स्त्रियांचं
    निश्चितच कौतुक आहे
    पण समजू नका गृहिणी मध्ये
    काहीतरी कमी आहे

    खरं सांगा गृहिणी सारखी
    कोणती व्यक्ती उदार असते
    घरातल्या सर्वांसाठी
    जी फुकटात राबत असते

    दर महिण्याला पगार मिळतो
    म्हणून आपण नौकरी करतो
    चोवीस तास राबणाऱ्या
    गृहिणीला काय देतो ?

    गृहिणीला पॅकेज देण्याची
    तुमची माझी श्रीमंती नाही
    डॉक्टर , इंजिनियर , बँकर पेक्षा
    तिचा हुद्दा कमी नाही

    मानधन नाही , सुट्टी नाही
    तरीही हसमुख असते ” ती “
    घराचं घरपण टिकून असतं
    जोपर्यंत असते ” ती “

    गृहिणी आहे हे सांगतांना
    मान खाली घालू नका
    बाकीच्यांनी तिच्या समोर
    मुळीच चरचर बोलू नका

    म्हणून म्हणतो गृहिणीचा
    आदर आपण केला पाहिजे
    अन्नपूर्णा , लक्ष्मीला
    पहिला मान दिला पाहिजे

  • Indian Team wins Medal

    Indian Team wins Medal

    Olympic Updates…

    We feel proud for this precious moment for hockey team.

    I hockey men’s team we win medal after 41 years and created another record bu our great team.

    We win Bronze Medal today.

    Another proud moment is : our hockey team captain has dedicated this medal to covid wariors.

    Feeling so proud

    #victory #hockey #india #olympic #proud #medal

  • देवमाणूस देवाघरी

    देवमाणूस देवाघरी


    सद्गुरु मंगलनाथ महाराज (चित्रकूट-कर्वी) यांचे शिष्य कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील :

    ▪️कामिका एकादशी दिनी आज सायंकाळी 5.31 वाजता घेतला अखेरचा श्वास..
    ▪️ घरापुढील शेतातच सायंकाळी 7:30 वाजता अंत्यसंस्कार..
    ‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री!

    श्री क्षेत्र शेगाव:
    माणसातला ‘देव’ कुठे असतो?.. याचा पत्ता होता- शिवशंकरभाऊ पाटील. ‘कर्मयोग’ काय असतो, याचे ठिकाण होते- शिवशंकरभाऊ पाटील. ‘सेवाभाव’ काय असतो, याचे प्रतिक होते- शिवशंकरभाऊ अन्
    व्यवस्थापन काय असते? याचे प्रत्यंतर होते- शिवशंकरभाऊ पाटील!

    नावात ‘शिव’ अन् ‘शंकर’ म्हणजे ‘त्रिनेत्र’च नाहीतर, यत्र-तत्र-सर्वत्र असे सर्वव्यापी ‘नेत्र’ म्हणजे पारखी नजर अन् सेवात्मक ‘दृष्टी’ ज्यांच्याकडे होती, की ज्यामुळे श्रीसंत गजानन महाराज संस्थान शेगावमध्ये भक्तीमय ‘सृष्टी’ फुलली..
    असे हजारो सेवाधारी निर्माण करणारे, शिवशंकरभाऊ पाटील!!

    भगवान श्रीकृष्णाने धनुर्धर अर्जुनाला कुरुक्षेत्रावर ‘कर्मयोग’ सांगितला, पण ‘सेवा परमो: धर्म’ ही धारणा ठेवून जे ‘कर्मयोगी’ ठरले..
    ते शिवशंकरभाऊ पाटील!!

    श्रीगजानन विजय ग्रंथाचे २१ अध्याय आहेत, त्यातल्या एक सेवाध्याय ठरावा.. अशा सेवायुगाची सांगता, अर्थातच ‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री झाली..
    संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या जाण्याने.

    मंदीरं महाराष्ट्रात, देशात अन् जगात असंख्य आहेत.. पण ती मंदीरं तिथल्या ‘देवामुळं’ ओळखली जातात, पण एकमेव शेगावचे असे मंदीर, की जे श्रीसंत गजानन महाराजांमुळे तर ओळखले जातेच.. पण निष्काम-निस्वार्थ सेवाकार्यासाठी ते मंदीर ओळखल्या जाते, ते शिवशंकरभाऊ पाटील यांच्यासारख्या देवमाणसांमुळे. म्हणूनच कुठल्याही देवापुढे माथा न टेकविणाऱ्या शरद पवारांचा माथा शिवशंकरभाऊंच्या चरणांवर आदरानं नतमस्तक होतो. माणसातल्या देवमाणसाची ‘दिव्यत्वाची प्रचिती’ तिथेच करकमल जुळल्यावर येते!

    कोण होते शिवशंकरभाऊ?
    एक साधा अन् तेवढाच सरळ माणूस. धोतर-कुर्ता अन् टोपी परिधान करणारे सामान्य व्यक्ती. जे काही करतो आहे, ते ‘श्री’ कृपेने.. त्यामुळे उभ्या आयुष्यात ‘पद्मश्री’ व ‘पद्मविभुषण’सारखे अनेक पुरस्कार या माणसाने हात जोडून विनम्रपणे नाकारले.. व आकार देत राहीला फक्त हा माणूस, संस्थानच्या सेवाभावी प्रकल्पांना.. मज पामराशी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी.. या तुकोबारायांच्या जाणीवेतून!

    शिवशंकर सुखदेव पाटील,
    शेगावी १२ एप्रिल १९४० मध्ये खटला असणाऱ्या पाटलाच्या कुटुंबात जन्मले. शिक्षण अर्थातच जेमतेम. फार मोठा परिवार, पुढे लग्न करुन संसाराला लागले. २ मुले व ४ मुली यासह सुना, नातवंडे व जावई असं विस्तारलेलं कुटुंब. शेती-बाडी, गुरं-ढोरं.. असा बाडबिस्तारा सांभाळता सांभाळता हा माणूस श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या सेवाकार्याकडे वळला. ३१ ऑगस्ट १९६२ रोजी त्यांच्या संस्थानच्या विश्वस्त पदी नेमणूक झाली. १९६९ ते १९९० पर्यंत ते संस्थानचे अध्यक्ष होते, १९८१ ते १९९० पर्यंत व्यवस्थापकीय विश्वस्त व अध्यक्ष अशा दोन्ही पदांवर ते कार्यरत होते. तर सध्या ते व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून काम पाहत होते. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व शेगावचे नगराध्यक्षही राहून गेले.

    सेवात्याग व समर्पणाचे धनी असलेले शिवशंकरभाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून श्री संत गजानन महाराज संस्थानचे सेवाकार्य अविरत सुरु राहीले. एकूण ४२ प्रकल्प त्यांच्या प्रेरणेने उभे राहीले. भक्तांच्या सेवेसह आदिवासींच्या सेवेपासून तर अन्नदान तसेच कपडेदान, वैद्यकीय सेवा, मोफत औषधोपचार, शिक्षण, पर्यावरण व अध्यात्मीक सेवेच्या माध्यमातून नवा आदर्श घडवत असतांना शिवशंकरभाऊंच्या कल्पकतेतून जे ‘आनंद सागर’ साकारले होते, तो पर्यटनाचा विलोभनीय भक्तीमय प्रयोगच!

    श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या माध्यमातून मंदीर व्यवस्थापनाचा उत्तम नमुना म्हणून गणना होते. वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी संस्थानच्या सेवायज्ञात स्वत:ला झोकून दिले होते, तेंव्हापासून त्यांनी हे व्रत अखंडपणे चालविले. श्रध्दा, विश्वास अन् भक्ती या त्रिसुत्रीच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी कार्य करतांना भक्तांच्या निवासाची अल्पदरात केलेली व्यवस्था ही आगळी-वेगळी ठरली. टाळकरी, माळकरी व वारकरी हे संस्थानचे स्तंभ असून येथील जवळपास ३६००च्यावर सेवाधारी हे बिनपगारी अन् फुल अधिकारी, याचे उत्तम उदाहरण आहे. संस्थानने स्वतंत्र असा सेवाधारी विभाग स्थापन केला असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या सुख-दु:खात संस्थान हे सदैव मायेचा हात देत असते. यामुळेच अनेक सेवाधारी वेटींगवर कायम असतात. इथल्या सेवाधाऱ्यांचा सेवाभाव हा संशोधनात्मक अभ्यासाचा स्वतंत्र विषय असून, त्यावर अनेक माध्यमांनी विविध माध्यमातून टाकल्याचा प्रकाश, हा उल्लेखनीय ठरतो. म्हणूनच इथल्या सेवाधाऱ्यांचा सेवायज्ञ हा सर्वत्र चर्चेचा व कुतूहलाचा विषय._
    सेवाधाऱ्यांच्या मुखात कायम एकच शब्द असतो, माऊली..!

    श्री संत गजानन महाराज शेगावच्या भक्तीमय शाखा या पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी व ओमकारेश्वर येथेही आहेत. २ हजार मानसेवी, ३ हजार स्वयंसेवक व तेवढ्याच सेवाधारी युवकांची प्रतिक्षा यादी असते. कोरोना काळापुर्वी दररोज ५० हजार भाविकांना प्रसाद वाटपाची व्यवस्था भक्तनिवासातील ३ हजार खोल्या, वैद्यकीय लोकोत्तर सेवाकार्य, अभियांत्रिकी महाविद्यालय, हजारो वारकरी दिड्यांना भजनी साहित्याचे वाटप.. हे सर्वत्र सुरु असते. कोरोना काळात ज्यावेळी मंदीरं सुरु झाले होते, त्यावेळी दर्शनाची व्यवस्था कोरोना नियमांचे पालन करुन कशी असावी? हा आदर्श इतर मंदीरांना जो घालून देण्यात आला, त्यामागे प्रेरणा शिवशंकरभाऊंचीच. ‘पैसा साचू देवू नका, पैशाला स्पर्श करु नका अन् पैसा कुणाकडे मागू नका..’ हे संत गजानन महाराजांनी संस्थान स्थापन करतांना सांगितलेलं तत्व, शिवशंकरभाऊ पाटील यांनी उभ्या हयातीत जपलं. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘सामना’तून त्यांच्यावर स्तृतीसुमनांचा वर्षाव करुन गेले तर शरद पवारांनी शिवशंकर भाऊंपुढे नतमस्तक होण्याची इच्छा जाहीरपणे प्रकट केली होती. परंतु भाऊंचे मस्तक सदैव ‘श्री’चरणी झुकलेले राहीले अन् त्यांनी ‘श्री’च्या सेवेतच घेतला अंतिम श्वास..
    देवमाणूस देवाघरी गेला,
    अन् झाली ‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री!:

    भाऊंनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव संस्थानात आपली सेवा मंदिरात फरशी बसवण्यापासून सुरु करून त्याच संस्थेच्या व्यवस्थापक बनल्यानंतर भाउंनी मागे वळून बघितलं नाही.

    ज्यावेळी भाउंनी संस्थेच्या कामाची सूत्रं घेतली तेव्हा संस्थेची उलाढाल अवघी ४५ लाख रुपयांची होती. आज शेगाव संस्थानाची वार्षिक उलाढाल १४० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

    पण मंदिराला बिझनेस न बनवता भाऊंनी ज्या तऱ्हेने शेगाव संस्थांनाचं उदाहरण उभं केलं आहे त्याला तोड नाही. हिशोबातला काटेकोरपणा, पारदर्शकता, निस्वार्थी सेवा आणि सगळ्यात महत्वाची असणारी स्वच्छता ह्याला आपल्या सोबत प्रत्येक सेवेकरी आणि तोच भाव इकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात निर्माण करताना भाउंनी एक आदर्श उदाहरण प्रत्येकासमोर ठेवलं आहे.

    शेगाव संस्थानाला जागतिक नकाशावर नेण्यामागे तपश्चर्या आहे ती एका योगीची. तो योगी म्हणजेच शिवशंकर भाऊ पाटील. कोणतंही मंदिर म्हंटल की त्यात श्रद्धाभाव येतो.

    भाविक श्रद्धेने त्या शक्तीपुढे नमन करतात पण सेवाभाव जागृत करायला लागते ती वृत्ती. ती निर्माण करण्याचं श्रेय शिवशंकर भाऊ पाटील ह्याचं आहे.

    आज ११,००० पेक्षा जास्ती सेवेकरी प्रतीक्षा रांगेत उभे आहेत. सेवा ज्यात कोणतंही मानधन दिलं जात नाही तर सेवा संपल्यावर एक प्रसादाचा नारळ घेऊन सेवेकरी आपल्या पुढच्या मार्गाला प्रस्थान करतो. १७,००० पेक्षा जास्त सेवेकरी आज शेगाव संस्थानात अश्या प्रकारे निस्वार्थी सेवा देतात.

    हा निस्वार्थी भाव प्रत्येक सेवा देणाऱ्याच्या मनात उत्पन केल्यामुळेच आज शेगाव हे देवस्थान केवळ भारतात नव्हे तर जगभरात आपलं वेगळेपण टिकवून आहे.

    शेगाव देवस्थान प्रसिद्ध आहे ते सोन्या चांदीने मढवलेल्या मुर्त्यांनी नव्हे तर इथल्या स्वच्छतेमुळे. संस्थानाच्या अखिरात्यात येणाऱ्या प्रत्येक ठिकाणची स्वच्छता ही सगळ्यांच्या नजरेत भरते.

    श्री गजानन मंदिर असो वा भक्तनिवास, आनंदसागर सारखा ६५० एकर इतक्या प्रचंड जागेत वसलेला प्रकल्प असो वा महारष्ट्रातील सर्वोत्तम असणारं अभियांत्रिकी कॉलेज ह्या सगळ्याच ठिकाणी कागदाचा एक कपटा आणि झाडावरून गळलेलं पान मिळणं मुश्कील इतकी कमालीची स्वच्छता राखली जाते.

    संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असणारे जगातील अग्रगण्य बँक असणाऱ्या सिटीबँकेचे अध्यक्ष विक्रम पंडित हे भाऊंचं काम पाहून इतके थक्क झाले की त्यांनी शेगाव संस्थानाला एक दोन नाही तर तब्बल ७०० कोटी रुपये दिले.

    पण भाऊंनी ते नम्रपणे नाकारले. भाऊंनी हिशोब केला फक्त ७० कोटी रुपयांची गरज होती. तेवढेच घेऊन तब्बल ६३० कोटी रुपये शेगाव संस्थानाने सिटीबँकेला परत केले. घेतलेल्या त्या ७० कोटी रुपयांची ही सिटीबँकेला परतफेड केली.

  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

    23 जुलै 1856 साली रत्नागिरी शहरात जन्मलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक जहालमतवादी स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि पक्के पत्रकार आणि अभ्यासू लेखक होते.
    त्यांना लोकांनी लोकमान्य ही उपाधी दिली आहे ती त्यांच्या प्रेमापोटी आणि विश्वासापोटी.
    लोकमान्य हे शाळकरी जीवनापासून परखड विचारांचे आणि स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात, “मी शेंगा खाल्या नाही मी टरफले उचलणार नाही” जे त्यांचे शाळेतले वाक्य खूपच प्रसिद्ध आहे ते त्याचच उदाहरण होय.


    एका मध्यमवयीन कुटुंबातील लोकमान्य यांचे मूळ गाव तसे दापोली तालुक्यातील चिखलगाव, परंतु वडिलांना कामामुळे रत्नागिरीस यावे लागले आणि म्हणून सर्व लोकमान्य टिळकांना रत्नागिरीचे म्हणून ओळखतात.

    शैक्षणिक वाटचाल


    लोकमान्य टिळक आणि आगरकर यांची घनिष्ठ मैत्री होती त्यांनी विष्णु शास्त्री चिपळूणकरांना सोबत घेऊन त्याकाळी म्हणजे 1880 साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कुलची स्थापना केली, पुढे 1884 केळकर, दांडेकर, भांडारकर आदी मंडळींना एकत्र आणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुहुर्तमेढ रोवून त्या अंतर्गत 1885 साली आज पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.


    असे हे थोर टिळक स्वतः गणित व संस्कृत हे विषय आवडीने आई उत्तम शिकवित असत.
    टिळक व आगरकर यांनी मिळून केसरी व मराठा हे दोन नियतकालिके सुरू केली.


    केसरी मराठीत आणि मराठा हे इंग्रजीत छापल्या जात होते.
    टिळकांचे अग्रलेख हा केसरीचा खरा आत्मा होता, पुण्यात प्लेगच्या साथीच्या वेळी फवारणी वरून ब्रिटिश सरकारने फवारणीच्या नावांखाली घरातील सामान बाहेर फेकून नासधूस केली तेव्हा  “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय” असा निखारा पेटवणारा अग्रलेख टिळकांनी लिहिला जो आजही सर्वांच्या लक्ष्यात आहे.


    नंतर काही कारणाने आगरकर आणि टिळकांचे काही मुद्यांवर वाद झाले.
    टिळकांनी लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लोकांनी एकत्र येण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली जी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खूप प्रभावशाली ठरली.
    या लढ्यात त्यांना ब्रिटिशांनी 6 वर्षे मंडालेच्या तुरुंगात कारावास दिला ते येरवाड्यात सुद्धा कारावासात होते.
    टिळकांनी लेखक म्हणून गीता रहस्य, ओरायन सारखे छान ग्रंथब सुद्धा लिहिले.


    प्लेगच्या साथीत त्यांनी आपला पुत्र, चुलतभाउ आणि भाच्याला गमावले होते.


    असे हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 1920 साली 1 ऑगस्ट रोजी या जगाचा निरोप घेऊन इहलोकी गेले त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना ही शब्दरूपी आदरांजली…

    लोकमान्य टिळक
  • आवाज नेहमी शांत असावा

    आवाज नेहमी शांत असावा

    शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरात वास्तव्य करतो.

    असे भगवान श्री. दत्तगुरु सांगतात.

    “चढलेला मोठा आवाज”… आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढल्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा. घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे. वडील खूप ओरडले म्हणून मुलाने आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृष्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो. शुभ लहरींचे ही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशिर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. २५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो..! त्यामुळे शांत रहा व दत्त महाराजांचा कृपा अशिर्वाद प्राप्त करा श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त

  • श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन

    ❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄
    🔸श्रीगुरुपौर्णिमा.🔸
    ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज.

    श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन – २

    आशीर्वाद. गेले सात दिवस चाललेला उत्सव पाहताना मला असे खरे वाटते की आता तुम्हांला सांगायचे राहिलेच नाही काही ! ज्याची आपण पूजा‍अर्चा करतो, त्याचा हेतू लक्षात घेऊनच, त्याचे म्हणणे आपल्याला पटले आहे म्हणूनच, आपण त्याची पूजा‍अर्चा करतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या आज जेवढ्या म्हणून अडचणी असतील, ज्या परिस्थितीत तुम्ही गुंतून गेला असाल, ती परिस्थिती कायम ठेवूनसुद्धा, तिच्यात बिघाड न करता, कसे वागावे हेच मी शिकविले – आणि तुम्ही ते आचरणात आणता असा माझा समज आहे, बरे का ! आपल्याला प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट खरी आहे. मनुष्य जन्माला येतो तोच पराधीनतेत येतो, आणि जातो तोही पराधीनतेतच, हे आपण पाहतो. मग, मनुष्य पराधीन असताना, आपण आपली वृत्ती कशी करावी की ज्याने परमात्मा आपलासा करून घेता येईल ?

    ज्या गोष्टीची आपल्याला अत्यंत आवड असते तेच आपण भगवंताजवळ मागणार; आणि अत्यंत आवड जर कोणती असेल, तर ज्यात माझा घात आहे तीच आवड मला निर्माण होते आहे, हे आपण पाहतो. म्हणून, मला सांगायचे असेल तर एकच; मी भगवंताजवळ काही मागण्यापेक्षा, “भगवंता, तू दाता आहेस, तू सर्व उचित करणारा आहेस, योग्य तेच करणारा आहेस, तेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्यापेक्षा, परमात्मा, तुला योग्य वाटेल ते तू दे, ” असे म्हणणे जरूर आहे. “ज्यात माझे कल्याण असेल तेच तू करशील यात शंका नाही; मग मी काहीतरी मागून माझ्याच पायावर मी धोंडा पाडून घेण्यापेक्षा, परमात्मा, तू देशील त्यात मी समाधान मानीन,” ही हमी आज आपण भगवंताला देऊ या. मागणारा मनुष्य आपली योग्यता बघून मागत असतो. एखाद भिकारी आला तर ‘तुमचे घर माझ्या नावे करुन द्या’ असे कधी म्हणायचा नाही; तो म्हणेल , ‘मला चार पैसे द्या. एकवेळचे अन्न द्या.’ हे जसे तो आपली किंमत पाहून मागतो, तसे दाता कितीही मोठा असला तरी आपली किंमत पाहूनच आपण मागणार ! अहो, तो दाता भगवंत म्हणजे कसा, वस्तूशिवाय समाधान देणारा आहे ! म्हणून, “भगवंता तुला आवडेल ते मला दे; मी जसे व्हावे असे तुला वाटत असेल तेच मला दे, ” हेच मागणे जरूर आहे.

    जगामधे आपण पाहिले तर दोन प्रकारचे भक्त आहेत. एक भक्त तुमच्या-आमच्यासारखा आहे; तो म्हणतो. “भगवंता तू माझा कधी होशील ? तू माझा होऊन रहा, म्हणजे मला कशाची ददात नाही पडायची. ” म्हणजे खोटा खटला केला तरी निकाल माझ्यासारखा लागेल म्हणतो ! दुसरा भक्त आहे तो म्हणतो, “भगवंता, आता माझं उरलं नाही काही. आता मी तुझा होऊन राहीन.” यातला फरक तुम्हाला कळतो आहे. ‘तू माझा हो’ म्हणत असताना, ‘मी आहे तसाच कायम राहीन, जे जे मला हवं आहे ते ते तू पुरव !’ असे म्हणतो; आणि दुसरा म्हणतो, ‘रामा, आता तुझ्याशिवाय मला काही नको, आता मी तुझाच होणार !’ आपले मन आपल्याला काय सांगते ? आपण कोणत्या भक्तांपैकी आहो ? आपण पहिल्या भक्तांपैकी असाल तर आपल्याला वर जाणे जरूर आहे. “आतापर्यंत परमात्म्या, मी मागितलेले तू पुरवलेस. आता माझे मागणेही थांबत नाही, तुझे देणेही थांबत नाही. मग वासनेच्या पोटीच माझा शेवट होणार असे दिसते ! तर आता, परमात्म्या, एकच गोष्ट कर – आता मागण्याची बुद्धी मला देऊ नकोस. ‘

    परमात्म्यासारखा दयाळू कोण आहे ? लहान पोर आईच्या मांडीवर असताना आईने चमच्यातून काहीही आणले तरी आऽ करून पिते, असे आपण भगवंताजवळ राहिले पाहिजे खास ! त्या मुलाला खात्रीच असते; आपल्याला मारण्यासाठी आई हे आपल्याला काहीतरी देते आहे अशी शंकासुद्धा त्याला कधी येत नाही ना ? तसे, मी म्हणेन, परमात्म्याने ज्या अवस्थेत आपल्याला ठेवले आहे त्या अवस्थेतच समाधान बाळगणे तुमचे-आमचे खरोखर काम आहे.

    पण व्यवहाराची संगत तर सुटली नाही, आणि भगवंत तर हवा, या अवस्थेत आपण काही करणे जरूर असेल तर, व्यवहारात प्रयत्‍न करावा, अगदी आटोकाटीने करावा, पण ‘फळ मात्र, भगवंता, तुझ्या इच्छेने काय मिळायचे ते मिळू दे,’ असे म्हणून त्यात समाधान मानायचा अभ्यास करावा. तरच तुम्हाला साधेल, नाहीतर नाही साधणार काही; आणि हे जो करील त्याच्या मागे परमात्मा उभा राहील.

    मनुष्याचे जीवन अती क्षणभंगुर आहे. आपण पाहतो ना ? किती मोठमोठे होऊन गेले, राम-कृष्णादि अवतार झाले, मोठमोठे सत्पुरुष होऊन गेले; कोणत्या ना कोणत्या निमित्ताने का होईना, पण आज ते दिसेनासे झाले, एवढी गोष्ट खरी आहे. पण अशा सत्पुरुषांनी आपल्या बरोबरीचे असे काही मागे ठेवले आहे की ते त्यांच्या बरोबरीने काम करील. देहात असताना ते जे काम करीत तेवढेच काम त्यांची सत्ता करील, एवढी शक्ति त्यामध्ये आहे. ते गेले तरी त्यांची सत्ताच काम करते, त्याचप्रमाणे परमात्मा गेला तरी त्याने आपल्याला वरदान देऊन ठेवले आहे; आणि ते जो जतन करील त्याला मी पावन करीन, त्याचा मी होऊन राहीन, असे वचन देऊन ठेवले आहे. त्याने सांगितले, “तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू एक कर. अती दक्षतेने प्रपंच कर, प्रयत्‍नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे औषध सांगतो ते घे.” आणि ते औषध जर कोणते असेल तर ते भगवंताचे नाम आहे. त्या नामात राहण्याचा खरोखर तुम्ही अभ्यास करा.

    इतक्या अट्टाहासाने मी सांगतो आहे – आणि तुम्ही लोक नाम घेत नसाल अशी शंकासुद्धा मला कधी येत नाही, कारण तुम्ही नाम घेत नसता तर इथे येण्याची बुद्धी तुम्हाला झाली नसती; पण तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा – नामाशिवाय जगणे नाही खरे. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. एकदा तरी भगवंताचे नाम घ्या. नाम घेत असताना एक दिवस एक नाम असे भयंकर येईल की भगवंत थरारून जाईल, आणि मी सांगतो, तुम्ही असाल तिथे तो उभा राहील खास ! ‘कुठे माझा तो आहे’ असे त्याला वाटेल. मी सांगतो हे काहीतरी सांगतो आहे असे समजू नका, बरे का ! त्या नामावर विश्वास ठेवून तुम्ही वागा. नामावरची निष्ठा कशी काम करते हे ज्याचे त्यालाच कळेल. तेव्हा, तुम्हाला एकच सांगणे आहे, ही जी पूजा तुम्ही करता, तुम्हाला सांगितलेले आचरणात आणाल तेव्हाच ही पूजा घेतली असे समजा. आणि हे जर कराल ना, तर परमात्मा हात दिल्याशिवाय कधी राहायचा नाही. परमात्म्याला तुम्ही-आम्ही दुःखी रहावे असे कधी वाटत नाही. म्हणून परमात्म्याचे होण्यासाठी एकच त्याच्याजवळ मागू. ‘तुझ्या नामात प्रेम दे’ एवढेच मागू. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्यामागे परमात्मा उभा राहील हे अगदी सत्य, सत्य त्रिवाचा सांगतो बरे का ! आणि इतके जर केलेत तर पौर्णिमा केल्याचे श्रेय तुम्हाला परमात्मा देईल. आता एकच करा, थोडे तरी नाम घेतल्याशिवाय राहू नका. त्याला मोठी क्रिया आणि विधी असतो असे काही नाही बरे का ! आवडीने, प्रेमाने, भगवंताचे नाव घ्या;

    ॥ जानकीजीवनस्मरण जयजयराम ॥
    ❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄