महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा। निद्रा तृष्णा चैकवीरा कालरात्रिर्दुरत्यया॥
म्हणजेच भूक-तहान झोप या रूपातही तीच आहे एकविरा म्हणजे शौर्य कालरात्री म्हणजे महाकालाच्या रूपात जगाच्या प्रारंभी जेव्हा काहीही नव्हते तेव्हा विश्वनिर्मिती करण्याच्या इच्छेने जी शक्ती सर्वात आगोदर प्रकट झाली ती महालक्ष्मीच्या रुपात. सप्तशतीतील मूर्ती रहस्यात सुंदर वर्णन आलेले आहे याच महालक्ष्मीने तमोगुणातून महाकालीला प्रकट केलेले आणि सत्वगुणातून महासरस्वती अवतरली आणि नंतर या दोघींनी स्वतःच्या गुणांनी युक्त अशा स्त्रीपुरुषांच्या जोड्या निर्माण केल्या. त्यानुसार ब्रम्हा सरस्वती विष्णू लक्ष्मी शंकर पार्वती आणि त्यांचे कार्यही त्यांना नेमून दिले. या अनुसार सृजन म्हणजे निर्मिती ब्रह्मा-सरस्वती कडे, पालन-पोषण विष्णू लक्ष्मीकडे आणि संहार करण्याचे च कार्य शिवपार्वती कडे दिले. आपली समज अशी आहे की फक्त ब्रह्मा विष्णू महेश हे सृष्टीचक्र चालवतात तर तसे नसून सरस्वती लक्ष्मी गौरी या शक्ती रुपी देवतांच्या शिवाय सृष्टिचक्र चालू शकत नाही. आणि आजही स्त्री पुरुषाची ही जोडी कायम आहे. याचे मूळ ती आदिशक्तीची आहे ती गुणात प्रगटत असते म्हणून तिला श्री मूळपीठ म्हणतात..! अशा या त्रिगुणात्मक त्र्यंबकेश्वरी ला शिवा सारख्याच तृतीय नेत्र तिसरा डोळा आहे..!
आपण श्री सप्तशती ग्रंथाची ओळख करून घेत आहोत परंतु या अगोदर या जगदंबेची ज्ञात असं महात्म्य आपण जाणून घेत आहोत ऋग्वेदातील एका देवी सुक्तातही आदिशक्ती देवी म्हणते
अहमेव वातईष्ट प्रवाम्या रभमनिभुवनानी विश्वा परो दिवा पर एना पृथ्विव्यै तावती महिना संबभुवः
म्हणजे शक्तीदेवी म्हणते मी अत्यंत कार्यकारण भावनेने या सृष्टीची विश्वाची आणि निसर्गाचीही रचना निर्मिती आरंभलेली आहे. हे कार्य मी कुणाच्याही प्रेरणेने शिवाय करते. मी आपोआप वायु प्रमाणे एका वेळी एका किंवा अनेक ठिकाणी चालू शकते, वाहू शकते स्वतःच्या इच्छेने मी सतत कार्यमग्न असते. कार्यप्रवण असते मी पृथ्वी आणि आकाश या पेक्षा वेगळी असून माझ्याच शक्ती प्रेरणेने व सहज प्रवृत्तीमुळे मी भक्त प्रिय झालेली आहे. तर सप्तशतीतील अकराव्या अध्यायात या शक्ती देवी ची स्तुती करताना देव म्हणतात …
सृष्टी स्थिती विनाशानाम्, शक्तीभुते सनातनी!
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोस्तुते
अर्थात हे देवी तू या सृष्टीचे पालन आणि विनाश करणारी सनातन अशी शक्ती असून तू अतिप्राचीन आदिम आहेस. तुझ्या कृपाशीर्वादाने आम्हाला गुणसंपन्नता प्राप्त होते. तू सकल गुणांची निधी संपत्ती आहेस म्हणून हे नारायणी आम्ही तुला शरण आलो असून तुला आमचे वंदन असो. अशा या सृजन रुपी आदिशक्तीच्या नवरात्री संबंधात त्याची प्राचीनता कालानुरूप आधुनिकतेची माहिती आपण जाणून घेऊयात..! त्यासाठी प्राचीन काळातील दोन श्लोकातून आपण या जगदंबेची मातृ वत्सलता जाणून घेत आहोत
वात्सल्य करुणा हे या जगदंबेचे स्थाई भाव आहेत ज्यांच्या हृदय हे विराजमान होतात तो त्या मातेचा त्यांना कृपाप्रसाद किंवा देणगीच असते…अंबा म्हणजे माता आणि जगदंबा म्हणजे सर्व जगाची माता. अशी ही माता जेव्हा आपणास जन्म देते तेव्हा ते अपत्य शक्तिवान असावे व्हावे असं तिचा हेतू उद्देश असतो. आणि म्हणूनच नाना परीने ती माता,त्याला शक्तिसंपन्न करीत असते परंतु आज आम्ही जे भौतिक सुख उपभोगत आहोत त्यातून शक्तीच्या ऱ्हासच होत आहे ..! महर्षी व्यासांना त्याची चांगलीच कल्पना होती म्हणून मानव कल्याणासाठी त्यांनी आपल्या सर्व पुराणातून वेदातून प्रकटलेल्या शक्ती देवतेची उपासना म्हणजेच नवरात्रोत्सव आपणासाठी सांगितलेला दिसून येतो.. ही देवी जशी जन्मदात्री आहे तशीच ती विनाशकारी ही आहेच.. काळाला आपण टाळू शकत नाही काळ म्हणजे मृत्यू या मृत्यूपासून आपण स्वतःला वाचवू शकत नाही..! हे अंतीम सत्य आहे व जरी असले तरीही अशी ही काळ रात्री महा रात्री महामारी कारोनाच्या रूपाने आज अवतरली आहे ..प्रकटलेली आहे. याचा गांभीर्याने विचार होणे आता आवश्यकच आहे. आणि म्हणून कधी नव्हते ती आज तिची अध्यात्मिक आणि वैज्ञानिक साधनांनी उपासना करण्याची गरज सर्वांनाच निर्माण झालेली आहे..!
कारण आपण नेहमी ईश्वरी शक्तीच्या म्हणजेत निसर्गाच्या विरुद्ध वागत असतो आणि त्यामुळेच त्या शक्तीचा कोप आपल्यावर होतो आजची ही कोरूना नामक परिस्थिती ही त्याचाच दृश्य परिणाम आहे..!
क्रमशः
श्री गुरुमहाराज समर्थ…!
जय जगदंब
वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव
942221133