पेपरटाक्या
बिना रंगाची गंजलेली सायकलचे ब्रेक दाबून खर-खर आवाज करीत सायकल थांबवून स्टॅन्ड लावत लावत एक युवक म्हणाला, “है ना भैया! ये लो” भिंतीवरुनच पेपर त्या माणसाला देत म्हणाला. “ठीक है रुक जरा पैसे लेके आता हुं”, अस म्हणून लुंगीवाला माणूस घरात गेला. तितक्यात माॅर्निंग वाॅकला गेलेले गजभिये सर पेपरवाल्याजवळ येऊन थांबले व नॅपकीनने घाम पुसत …