Author: admin

  • अन्नावर कधी राग आपण काढला नाही ना? | Angry while eating ???

    म्हणून अन्नावर कधी राग काढू नये

    🌸 ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो.

    नंतर घराण्याला उतरती कळा लागते

    Don’t make angry someone while taking food

    make your dinner or lunch in happy mood

    अशी चूक तुम्ही कधी करू नका…

    भारतीय अन्न

    🌸 घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो.

    Don’t tell any issues to Main person of the family at the time of Lunch / Dinner

    🌸 गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार ? एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते. त्यासाठी असे प्रकार करू नका.

    🌸 मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो.

    लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात.

    यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहुती दिली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी.

    संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो.

    व्यक्ती महत्वाची

    🌸 अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात.

    त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे (अन्न) करू नये.

    मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात.

    हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. ‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते.

    ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची अध्यात्मिक शक्तीही वाढते.

  • जगणं कोणासाठी ?

    जगणं कोणासाठी ? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि कृतज्ञ रहा…

    हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.
    या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं, इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे,
    आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.


    जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.
    आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.

    ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे hiआहे त्याला अजूनही नोकरी नाही.
    कृतज्ञ रहा.

    ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही.
    कृतज्ञ रहा.

    तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.
    कृतज्ञ रहा.

    ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचेजीवन विसंवादात आहे.
    कृतज्ञ रहा.

    तुम्ही हॉस्पिटलमध्‍ये वापरलेला बेड, तुम्‍ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.
    कृतज्ञ रहा.

    ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.
    कृतज्ञ रहा.

    कृतज्ञ रहा कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त
    “ईश्वरी कृपा” आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे.

    म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा.
    पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.

    वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, “आत्मविश्वास”

                जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी, समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोणी आपले वाईट चितले तरीही त्या व्यक्तीचे तुम्ही वाईट चिंतु नका. आपल्या चांगल्या कामात मग्न राहायला शिका. दुसऱ्याचे अजिबात वाईट चिंतु नका. दुसऱ्याच्या दुखाकडे न, हसता, त्यांच्याकडे मायेची फूकंर घाला. जीवनात. सकारात्मक दुष्टीकोण बाळगा.

    ✍️✍️💕✍️✍️🎯
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    कर्म तसे फळ👍🏻

  • कुठे जप केल्यावर किती लाभ होतो | Benefit of Chanting | जपाचे स्थान महात्म्य

    कुठे जप केल्यावर किती लाभ होतो!

    १. निज स्थानावर केलेला जप सामान्य लाभ देतो.
    २. गोशाळेत केला गेलेला जप १०० पट लाभ देतो.
    ३. वनात केला गेलेला जप १००० पट लाभ देतो.
    ४. पर्वतावर केला गेलेला जप १०००० पट लाभ देतो.
    ५. नदीवर केला गेलेला जप १००००० पट लाभ देतो.
    ६. मंदिरात जेथे देवताची प्राण प्रतिष्ठा विधिवत झालेली असते तेथे केला गेलेला जप करोडो पट लाभ देतो.
    ७. प्राण- प्रतिष्ठित शिवलिंग ,एक लिंगा जवळ केला गेलेला जप अनंत पट लाभ देतो.
    ८. जगदंब मातेजवळ किंवा शक्ति पीठात केला गेलेला जप शीघ्रातिशीघ्र लाभ देतो .
    ९. आपल्या गुरुदेवा जवळ बसून केलेला जप अनंत कोटी लाभ देतो.
    १०. केळाचे झाड, बेल ,वड ,बिल्व वृक्ष याच्या खाली बसून केलेला जप लगेच लाभ देतो…
    जपमाळ कोठली केव्हा वापराल ?

    1 .रक्तचंदन माळ
    सर्व देवतांच्या मंत्र जपासाठी उपयुक्त.

    2 कमळगठ्ठा माळ
    श्री महालक्ष्मीच्या उच्च सेवेसाठी या माळेचा उपयोग करतात. इतर वेळी ही माळ श्रीयंत्रावर ठेवल्याने कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होते.

    3 .रुद्राक्ष माळ
    ही माळ धारण केल्यास सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होते तसेच या माळेवर जप केल्याने अधिक पटीने फळ मिळते. हृदयविकाराच्या व्यक्तीने ही माळ गळ्यात धारण केल्यास नक्कीच फायदा होतो.

    4 .स्फटीक माळ
    शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही माळ धारण करतात तसेच विशिष्ट विद्याप्राप्ती मंत्र जपासाठी विद्यार्थी ह्या माळेचा वापर करु शकतात.

    5 .तुळशी माळ व वैजयंती माळ
    भगवान श्री विष्णूंचे सर्व प्रकारचे मंत्र तसेच श्रीलक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करण्याकरीता या माळेचा उपयोग करतात.

    6 .गोमुखी
    माळेवर मंत्र जप करतांना ती माळ इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून गोमुखीचा वापर करावा.

    जपाची माळ गळ्यात धारण करु नये व गळ्यातील माळ जपासाठी वापरू नये.

    (संदर्भ – श्रीगुरुचरित्र)

  • माझ्या सोबतच असे का…..?

    प्रत्येकाला असे वाटते की, माझ्या सोबतच असे का…..?

    “आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.” कृष्ण कर्णाला म्हणाला.

    कर्ण कृष्णाला विचारतो, “माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, यात माझी काय चूक होती?

    मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो. परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला, की ती विद्या मी विसरून जाईल. कारण मी क्षत्रिय नव्हतो.

    एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.
    द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला. कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्या साठीच सांगितले.
    मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले. तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?

    कृष्णाने उत्तर दिले…
    “कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला. जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता.

    रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

    तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.
    मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो, तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

    ना कोणती सेना,ना शिक्षण. मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे,असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे. तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही. सांदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी १६ वर्षाचा होतो.

    मला माझ्या सर्व समाज बांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्या साठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले. जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल, फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

    एक गोष्ट लक्षात घे कर्णा…
    प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत. आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही.

    दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

    परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते.

    कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या, कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला, कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले, तरीही त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.

    तक्रारी थांबव कर्णा…

    म्हणून तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा, स्वाध्यायी व्हा. भगवतांचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा.

    चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद…!

    डॉ. सुनील इनामदार, संग्रहक, ९८२३०३४४३४.

  • हनुमान चालीसा कधी लिहिली गेली | Origin & history of Hanuman Chalisa

    हनुमान चालीसा हनुमान चालीसा कधी लिहिली गेली लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या
    कदाचित काही लोकांनाच हे माहित असेल?

    सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात.
    पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल.

    गोष्ट इ.स. १६०० ची आहे हा काळ अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता.

    एकदा तुलसीदास जी मथुरेला जात होते, रात्री होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला, लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत.

    हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली.
    सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे?

    तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की, त्यानी रामचरितमानसचा अनुवाद केला आहे. हे रामभक्त तुलसीदास जी आहेत.मीही त्यांना पाहून आलो आहे, त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे.

    अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे, असे सांगितले.

    सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि त्यानी तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित रहा.

    हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की, मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे, माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध?
    त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.

    हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला.

    बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला.
    पण अकबराला ते मान्य नव्हते
    आणि तुळशीदासांना साखळदंडांनी बांधून आणण्याची त्याने आज्ञा केली.

    तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की तुम्ही करिष्माई व्यक्ती आहात, थोडा करिष्मा दाखवा आणि सुटका करा.

    तुलसीदासजी म्हणाले-
    मी फक्त भगवान श्री रामचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही करिष्मा दाखवू शकेल.

    हे ऐकून अकबर संतापला.
    आणि त्यांना बेड्या ठोकून अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.

    दुसऱ्या दिवशी शेकडो माकडांनी आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला.

    लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता, मग अकबराने बिरबलला बोलावून विचारले, बिरबल काय चालले आहे ?

    तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते.पण तूम्ही सहमत झाला नाहीत
    आणि हा करिश्मा झाला.

    अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधारकोठडीतून बाहेर काढले आणि
    साखळ्या उघडल्या गेल्या.
    तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे.

    मला अंधारकोठडीत भगवान श्री राम आणि हनुमानजींची आठवण झाली. मी रडत होतो.
    आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते.
    हे ते 40 चतुर्भुज, चालिसा
    हनुमान जी यांच्या प्रेरणेने लिहिलेले.

    तुलसीदास जी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात किंवा संकटात सापडला आहे आणि ही हनुमान चालिसा म्हणेल, त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील.

    ती हनुमान चालीसा म्हणून ओळखली जाईल.

    अकबरला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि संरक्षण देऊन, मथुरेला पाठवले.

    आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत. आणि
    या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे.
    आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत.
    म्हणूनच हनुमानजींना “संकट मोचन” असेही म्हणतात.

    कृपया ही सुसंस्कृत आणि प्रेरणादायी पोस्ट तुम्ही सगळ्याना शेअर करा, कृपया जास्तीत जास्त शेअर करा.

    ।। श्रीराम जय राम जय जय राम।।🪷🙏🏻🪷

  • शक्य आहे तिथे नदी नांगरा

    ● शक्य आहे तिथे नदी नांगरा !

    ● सध्या उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडतात. नदीतील वालुका , दगड-गोटे दिसत असतात. भूशास्त्र असे सांगते की नदीचा प्रवाह जमिनीच्या मऊ भागातून जात असतो व त्यामुळे ती खोल खोल होत असते व तिचे ऊंच किनारे तयार होतात. अनेक मोठया नद्या डाईक किंवा फॉल्ट झोनमधून वहात असतात. नदीच्या या पात्रात अनेक पावसाळ्यातील गाळ साचल्यामुळे पात्र जलाभेद्य होते व पावसाळ्यातील नदीत वाहणारे पाणी जेवढे भूगर्भात जायला हवे तेवढे जात नाही. त्यासाठी सामुदायिक ट्रॅक्टर चा उपयोग करून नदीची शक्य आहे तेवढी नांगरणी आवश्यक आहे ! हे समजून घेण्यासाठी ही खालील घटना वाचा …

    ● नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर….शहादा तालुख्यातील घटना !

    ● दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट अवश्य वाचा व आपल्या गावातही अंमलात आणा.

    शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे , पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते ना ? सतरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ,पण तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे.
    शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव . गोमाई मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
    *२००० ची गोष्ट आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की , परिसरातील बऱ्याच विहिरी , बोअरवेलना पाणी येत नव्हते. चारसहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी , बोअर मृत . पाचशे ते सातशेफुटापर्यंत जलस्तर खोल गेला . लोक बोअरची खोली तेवढी वाढवत होते. पण पाणी वरती येत नव्हते .असे का ? शेतकरी हैराण. कुणाकडे नीट उत्तर नव्हते.
    मोतीलाल पाटील ( पटेल ) तात्या. नांदरखेडा त्यांचे गाव. शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते . त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे १९७० चे एम एस्सी ऍग्री . डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहरी , बोअर कोरड्या होत्या. सर्वचजण विचारात पडले होते , पण उत्तर सर्वांकडे नव्हते.
    तात्यांनी एकेदिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या चार गोष्टी सांगितल्या . खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा परिपाक लोकांपुढे ठेवला. समस्येचा मुळापर्यंत जाऊनच उत्तर सापडतात. आणि ती चिरस्थायी असतात. *जलस्तर खोल गेला या समस्येवर तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा , पण त्यामागे अभ्यास , संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले आणि पाचशे ते सातशे फुटावर गेलेला जलस्तर चक्क नव्वद फुटावर आला.*
    डांबरखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वतः डिझल पुरवले , ट्रॅक्टर , लाकडी नांगर , लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. चार किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्ठेचा विषय झाला. गावकऱ्यांनी फक्त फक्त एक किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरडा गेला , जुलैत पहिला पाऊसपूर आला . मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूरपाणी पिऊन टाकले . अवघ्या चोवीस तासात पाचशे फुटावरचे पाणी नव्वद फुटावर आले.लोक आनंदले.सकाळी परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणी फेकले.
    तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना ” वॉटर मॅन ऑफ शहादा ” असे संबोधून तात्यांचे तोंडभरून कौतुक केले होते .महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाची पाहणी करून कौतुक केले.
    नदी नांगरण्याची ही अभिनव कल्पना कशी सुचली ? या विषयी सांगताना तात्या बोलले , ” दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूरपाण्यातले ‘फाईन पार्टीकल’ वाळूत साचून साचून दोन-तीन फुटावर हे पार्टीकल सेटल होतात , थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. माझ्या अनेक वर्षांच्या अभ्यास आणि चिंतनातून मला समस्येचे हे कारण लक्षात आले. “
    खेतीया या मध्यप्रदेशातील शहारापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे , आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात जिरवले आहे. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फलित आहे. निराश न होता , आत्महत्येचा पर्याय न अवलंबता शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या पटेल या वेड्या माणसासारखा परिपक्व विचार शेतकऱ्याने करावा बस.

    माझी सर्वाना विनंती आहे की हा प्रयोग प्रत्येक गावाने केला तर आपले गाव पण पाण्याच्या समस्येतून मुक्त होईल.

    ..

  • करिअर चा सात बारा

    करिअर चा सात बारा

    यंदाच्या सुट्टीत MS-CIT का करावे याची 12 कारणे

    खूप लोकांच्या दृष्टीने MS-CIT म्हणजे कम्प्युटर चा बेसिक कोर्स असाच असतो. किंबहुना ज्या वेळेस संगणक जगासाठी नवीनच होते त्या वेळेस संगणकाचे मूलभूत म्हणजे बेसिक नॉलेज महत्वाचेच होते.

    काळानुरूप संगणक सर्वत्र उपलब्ध होऊ लागले. शाळांमध्ये सुध्धा संगणकाचे ज्ञान देण्यात येऊ लागले. अशावेळेस MS-CIT मध्ये सुध्धा आमूलाग्र बदल घडलेत्त. MS-CIT मध्ये भविष्यातील म्हणजे आज पासून 8-10 वर्षांनंतर चे करिअर, संगणक चुकीच्या पद्धतीने कसा वापरू नये अशा शेकडो नवीन पण अत्यावश्यक बाबींना प्राधान्य देण्यात आले. त्या मुळे MS-CIT हा प्रत्येक काळातील, प्रत्येक वयोगटातील सर्व लोकांना अत्यावश्यकच ठरतो.

    यात गफलत अशी होऊ शकते की ज्या पालकांनी त्यांच्या लहानपणी MS-CIT केला असेल, त्याचा त्यांना नक्कीच फायदा झालेला असेल. पण त्यांची ही गैरसमजूत की अजूनही MS-CIT मध्ये तेच शिक्षण असेल, त्यांच्या मुलांना एका अतिशय गरजेच्या, अत्याधुनिक शिक्षणापासून वंचित ठेवू शकते.
    थोडक्यात,

    तंत्रज्ञानाच्या दुनियेत जे लेटेस्ट हिट,
    त्याचेच शिक्षण नेहमी MS-CIT मध्ये फिट….

    जाणून घेऊ यात काय नवीन आहे MS-CIT मध्ये.

    1. आता आपल्या करिअर ची दिशा ठरवणे क्रमप्राप्त आहे. कोणती शाखा निवडायची हे आता जगातील बदलते ट्रेंड्स ठरवणार आहेत. मग ते ट्रेंड्स कुठले ही माहिती फक्त MS-CIT तच.
    2. जगात आता खूप सारे सायबर गुन्हे होऊ लागले आहेत. किंबहुना आपल्या स्वतःकडून सुध्धा केवळ अज्ञानापोटी गुन्हा घडू शकतो. मग सायबर गुन्ह्यांपासुन स्वतःला कसे वाचवायचे हे ज्ञान फक्त MS-CIT तच.
    3. आता सुट्टी मध्ये मोबाईल, स्क्रीन वापरला जाणारच. चुकीच्या बैठक व्यवस्थेमुळे पाठीचे जीवघेणे आजार जडू शकतात. स्क्रीन हाताळताना योग्य बैठक कुठली या विषयीच्या माहितीचे ज्ञान फक्त MS-CIT तच.
    4. विविध परीक्षांचा स्मार्ट पणे कसा करावा याचे ज्ञान फक्त MS-CIT तच.
    5. अत्याधुनिक AI आणि ML हे टेक्नॉलॉजी च्या दुनियेत अत्यावश्यक मानले जातात. AIML विषयीचे 10 तासांचे विस्तृत विवेचन फक्त MS-CIT तच.
    6. MSOFFICE 2019 सारख्या लेटेस्ट सॉफ्टवेअर वर शास्त्रशुध्द पद्धतीने प्रशिक्षण फक्त MS-CIT तच.
    7. 200 हून अधिक डिजिटल स्किल्स फक्त MS-CIT तच.
    8. आज पर्यंत जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांनी त्यांच्या करीअर ची सुरुवात MS-CIT पासून केलेली आहे. यातील लाखो विद्यार्थी आता विविध IT कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. म्हणजेच IT करिअर ची सुरुवात फक्त MS-CIT तच.
    9. सुट्टी त घरी बसून फक्त मोबाईल अथवा गेम खेळण्यापेक्षा तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण फक्त MS-CIT तच.
    10. पुढे कॉलेज मध्ये सर्व बोर्ड चे विद्यार्थी असणार. काही बोर्ड ला संगणकाचा सिलॅबस खूपच advanced असतो. मग आपल्याला हे सर्व ज्ञान मिळणार फक्त MS-CIT तच.
    11. सततच्या अभ्यासानंतर एकदम रिकामपण धोकादायक ठरू शकते. मग एका वेगळ्या वातावरणात, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगणकाचे ज्ञान फक्त MS-CIT तच.
    12. खरे करिअर आता सुरू होणार. मग त्याची पूर्वतयारी फक्त MS-CIT तच.

    कोडिंग काय असते आणि ते माझ्या पाल्याने का करावे याची 7 कारणे

    आजकालच्या युगात कोडींग हा परवलीचा शब्द होऊ घातला आहे.

    कोडींग म्हणजे संगणकाच्या साहाय्याने विविध कामे करवून घेणे.

    1. BATU, KBCNMU, SPPU सारख्या विद्यापीठांमध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या सिलॅबस मध्ये कोडींग असतेच. त्यात विद्यार्थ्याला कोडींग चे बेसिक ज्ञान अध्यारुत मानले जाते. अशा वेळेस जर आपल्याला कोडींग येत असेल तर आपला आत्मविश्वास वाढलेला असेल.
    2. सुट्टी त घरी बसून फक्त मोबाईल अथवा गेम खेळण्यापेक्षा कोडींग चे प्रशिक्षण घेतले तर वेळेचा सदुपयोगच.
    3. पुढे कॉलेज मध्ये सर्व बोर्ड चे विद्यार्थी असणार. काही बोर्ड ला संगणकाचा सिलॅबस खूपच advanced असतो. मग आपल्याला त्या विद्यार्थ्यांशी बरोबरी करायची असेल तर त्यासाठी योग्य वेळेस कोडींग करणे अत्यावश्यकच.
    4. या पुढे आपला पाल्य पुणे अथवा इतर शहरात शिकायला जाण्याची शक्यता आहे. मोठ्या शहरात, नवीन ठिकाणी, खूप जास्त प्रवास करून, बहुमूल्य असा अभ्यासाचा वेळ घालवून नंतर कोडिंग शिकण्यापेक्षा आता सुट्टीतच कोडींग शिकणे कधीही उत्तमच.
    5. IT क्षेत्रात झपाट्याने बदल होत असतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निग साठी पाया म्हणजे C, Python programming आताच करणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
    6. मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, IoT सारखे कोर्स आपल्यात आवड निर्माण करू शकतात आणि त्या नुसार आपण करीअर ची निवड करू शकतो.
    7. आपल्या गावातच, एकच छताखाली कोडिग देखील शिकणे हे आर्थिक आणि मानसिक दृष्टीने देखील फायद्याचेच ठरते.
  • मंत्र जो बच्चों को पता हो । Must know Mantras

    मंत्र : ये 16 मंत्र हैं जो… बच्चों को सिखाना चाहिए…

    1. Gayatri Mantra
    ॐ भूर्भुवः स्वः,
    तत्सवितुर्वरेण्यम्
    भर्गो देवस्य धीमहि
    धियो यो नः प्रचोदयात् ॥

    2. Mahadev मंत्र
    ॐ त्रम्बकं यजामहे,
    सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ,
    उर्वारुकमिव बन्धनान्,
    मृत्योर्मुक्षीय मामृतात् !!

    3. Shri Ganesha मंत्र
    वक्रतुंड महाकाय,
    सूर्य कोटि समप्रभ
    निर्विघ्नम कुरू मे देव,
    सर्वकार्येषु सर्वदा !!

    4. Shri hari Vishnu मंत्र
    मङ्गलम् भगवान विष्णुः,
    मङ्गलम् गरुणध्वजः।
    मङ्गलम् पुण्डरी काक्षः,
    मङ्गलाय तनो हरिः॥

    5. Shri Brahma ji मंत्र
    ॐ नमस्ते परमं ब्रह्मा,
    नमस्ते परमात्ने ।
    निर्गुणाय नमस्तुभ्यं,
    सदुयाय नमो नम:।।

    6. Shri Krishna मंत्र
    वसुदेवसुतं देवं,
    कंसचाणूरमर्दनम्।
    देवकी परमानन्दं,
    कृष्णं वन्दे जगद्गुरुम।

    7. Shri Ram मंत्र
    श्री रामाय रामभद्राय,
    रामचन्द्राय वेधसे ।
    रघुनाथाय नाथाय,
    सीताया पतये नमः !

    8. Maa Durga मंत्र
    ॐ जयंती मंगला काली,
    भद्रकाली कपालिनी ।
    दुर्गा क्षमा शिवा धात्री,
    स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।।

    9. Maa Mahalakshmi मंत्र
    ॐ सर्वाबाधा विनिर्मुक्तो,
    धन धान्यः सुतान्वितः ।
    मनुष्यो मत्प्रसादेन,
    भविष्यति न संशयःॐ ।

    10. Maa Saraswathi
    ॐ सरस्वति नमस्तुभ्यं,
    वरदे कामरूपिणि।
    विद्यारम्भं करिष्यामि,
    सिद्धिर्भवतु मे सदा ।।

    11. Maa Mahakali
    ॐ क्रीं क्रीं क्रीं,
    हलीं ह्रीं खं स्फोटय,
    क्रीं क्रीं क्रीं फट !!

    12. Hanuman ji
    मनोजवं मारुततुल्यवेगं,
    जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।
    वातात्मजं वानरयूथमुख्यं,
    श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥

    13. Shri Shanidev
    ॐ नीलांजनसमाभासं,
    रविपुत्रं यमाग्रजम ।
    छायामार्तण्डसम्भूतं,
    तं नमामि शनैश्चरम् ||

    14. Shri Kartikeya
    ॐ शारवाना-भावाया नम:,
    ज्ञानशक्तिधरा स्कंदा ,
    वल्लीईकल्याणा सुंदरा।
    देवसेना मन: कांता,
    कार्तिकेया नामोस्तुते ।

    15. Kaal Bhairav ji mantra
    ॐ ह्रीं वां बटुकाये,
    क्षौं क्षौं आपदुद्धाराणाये,
    कुरु कुरु बटुकाये,
    ह्रीं बटुकाये स्वाहा।

    16. Bharat Mata mantra
    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
    त्वया हिन्दुभूमे सुखद् वर्धितोऽहम्
    महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
    पतत्वेष काथो नमस्ते-नमस्ते ।। १

    🚩 जय श्री राम जय श्री कृष्ण🚩

  • महाशिवरात्री उत्सव उपवास की उपासना?

    महाशिवरात्री उत्सव उपवास की उपासना?

    महाशिवरात्री उत्सवानिमित्त उपवासाचे पदार्थ काय काय करायचे? यासंबंधी बर्‍याच घरांमध्ये चर्चा सुरू आहेत. सकाळी, दुपारी, रात्री विविध चमचमीत उपवासाचे पदार्थ तयार करण्यातच आपला वेळ जातो.

    पण आता ह्या दिवशी काय उपासना करायची? ह्याची चर्चा कोणत्या घरात होते का? बहुतेक ह्याचे उत्तर नाही असेच असेल. एकवेळ उपवास नाही केला तरी चालेल, उपासना केली पाहिजे. विशिष्ट झाडाच्या चिकापासून तयार केलेला साबुदाणा उपासाला कसा काय चालतो? खरे पाहता उपवासाच्या दिवशी साबुदाणा अजिबात खाऊ नये. ह्यापेक्षा ताजी फळले खावीत , फळांचे रस म्हणजेच ज्यूस 😜, आणि भरपूर दूध प्यावे. पोट हलके ठेवावे आणि उपवासाचे पदार्थ तयार करण्यात आणि खाण्यात वेळ घालवण्यापेक्षा उपासनेकडे अधिक वेळ द्यावा अशी माझी सर्वांनाच कळकळीची विनंती आहे.


    आता उपासना कोणती करावी? ज्यांना शक्य असेल त्यांनी ११ वेळा रुद्र म्हणावे, नाहीतर ११ वेळा शिवहिम्न स्तोत्र म्हणावे किंवा ११ वेळा शिवतांडव स्तोत्र म्हणावे. तेही शक्य नसेल तर ११ माळा ॐ नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास मृत्युंजय मंत्रांच्या ११ माळा कराव्यात. महाशिवरात्र ह्या तिथीस उपास करून देवळात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले की आपली जबाबदारी संपली असे होत नाही. आपल्याकडून त्या दिवशी उपासना घडणे आवश्यक आहे. ह्या दिवशी संपूर्ण शिवलीलामृत पोथी वाचली तर अतिशय उत्तम. पूर्ण पोथी वाचणे शक्य नसेल तर अध्याय २ रा किंवा अध्याय ११ वा नक्की वाचावा.


    वरील विविध पर्यायांपैकी एक किंवा अनेक पर्याय निवडून तुम्ही सर्वांनी उपासना करावी म्हणजेच तो खरा उपवास (उप = जवळ, वास = रहाणे = देवाच्या जवळ राहणे ) ठरेल आणि सर्वांनाच मनःशांती लाभेल.
    🚩

  • महाशिवरात्र पूजा मुहूर्त

    🌹 महाशिवरात्र पूजा मुहूर्त 🌹


    संकलन :- अशोककाका कुलकर्णी

    पहिल्या प्रहरातील पूजेची वेळ – ८ मार्चला सायंकाळी ६.२५ ते रात्री ९.२८ वाजेपर्यंत
    दुसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ – ९ मार्चला रात्री ९.२८ ते १२.३१ वाजेपर्यंत
    तिसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ – ९ मार्चला मध्यरात्री १२.३१ ते पहाटे ३.३४ वाजेपर्यंत
    चतुर्थ प्रहार पूजेची वेळ – ९ मार्चला पहाटे ३.३४ ते ६.३७ वाजेपर्यंत