Author: admin

  • रूद्र अभिषेक : श्री महादेव रूद्र अभिषेक महत्त्व आणि फलश्रुती | Importance of Rudra Abhishek | महाशिवरात्री विशेष सेवा

    श्री महादेव रूद्र अभिषेकाचे महत्त्व आणि फलश्रुती ( Abhishek )

    रुद्र अभिषेक : कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीशिवाचे आशिर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला ”रुद्र अभिषेक” हे प्रभावी अनुष्ठान आहे व रूद्राभिषेक अभिषेक आपल्या कुलदेवाला अथवा श्री महादेवाला आपल्या घरीत वर्षातून एक तरी करावा अभिषेक करून अभिषेकाचे तीर्थ पुर्ण वास्तु मध्ये शिपडावे.

    महाशिवरात्री ला विशेष महत्व

    महाशिवरात्री ला रुद्राभिषेकाचे विशेष महत्व आहे, हा रुद्र अभिषेक महादेवाला अतिशय प्रिय आहे. या अभिषेकाने महादेव अतिशय प्रसन्न होतात आणि सर्व दुखांचा नाश करतात म्हणून महाशिवरात्रीला निशा समयी म्हणजे मध्यरात्री १२ ते १ मध्ये हा अभिषेक शिव लिंगावर नक्की करावा. या दिवशी ऊसाच्या रसाने अभिषेक करण्याचा सुद्धा प्रघात आहे ज्याने प्रभू शिवजी लकवर प्रसन्न होतात.

    रुद्राभिषेकाचे महत्व 
महादेव को प्रिय अभिषेक 
महाशिवरात्री ला कोणता तोडगा

    रुद्राभिषेकाचे महत्व

    रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे, ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे. या देवतेचे वेद्पश्चात शंकर, शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे. रुद्राचे मूलस्वरूप हे फार भीषण, हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे. म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.

    रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात. रुद्र्सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात.

    श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.

    रुद्र्सुक्ताचे दोन भाग आहेत:

    १] अकरा नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो याअर्थी “नमः” असे पद येते. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते अकरा रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो.

    २] अकरा चमके म्हणजे ज्यात “च मे” हे शब्द आहेत ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे. चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो. चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली, त्याचा व्याकरणाशी संबंध नाही.

    याशिवाय रुद्रसुक्ताचा भाग नसलेला “ओम शान्तिः शान्तिः शान्तिः” हा शांतीमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. ११ रुद्र असल्याने ११ या संख्येला महत्व आहे असे दिसते. सर्वसाधारणपणे लघुरुद्राला ११ ब्राह्मण असतात.

    एक ब्राह्मण एक नामक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात, अश्या रीतीने नमकाची ११ आवर्तने झाली असे मानतात. ११ वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केलाजातो. आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात.

    यजुर्वेदकाळातही चोर, डाकू, दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे, फसविणाऱ्या, लबाड लोकांचे, तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे, वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. [नमक ३]

    तसेच मर्दानी, घाव घालणाऱ्या स्त्रियांचे, विषयलंपट, टोळ्या आणि त्यांचे पुढारी, भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारुपधारी असे अनुयायी आहेत, कुंभार, लोहार, पारधी, कोळी, शिकारी इ. चा नायक अशीही स्तुती आहे. [नमक ४]

    सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा, वाळवांटात, बर्फात, धुळीत, खडकात, जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे [नमक ९]

    त्याचे फार मोठे सैन्य आहे, आणि आळवणी जी केली जात आहे ती अश्या या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणार्या शक्तींपासून आपले रक्षण करावे, कृपा करावी म्हणून हे सुक्त आहे.

    आता भक्त या अभिषेक मध्ये ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबीचौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे. त्यात तांदूळ, सातू, मका, उडीद, तील, मूग, हरभरे इ. इ. धान्य मागितली जात आहेत. सोने, लोखंड, शिसे, बीड, जस्त, कथील हे धातू मागितले जात आहेत. यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते. पूजेचे सामान, यज्ञाचे सामान मागतो आहे. सुक्तपठनकर्ता दूध, तूप, मध इ. मागतो आहे. दीर्घायुष्य, औषधे, सुंदर कांती, धनसंपदा, शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य, प्राण, अपान, चक्षु, कान, मन वाणी, आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे.

    तसेच विषम संख्याची भाजणी, चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्याकाळचे गणिताचे ज्ञान दिसते.

    रुद्र्सुक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, पारमार्थिक नाही. सुक्तकार हा धनधान्य, घरदार, बायकामुले, गुरेढोरे, शेती इ. सगळ्या गोष्टी मागतो आहे, द्युतासारखी क्रीडाही मागतो आहे. सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत. रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे.

    हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे, रान, शत्रू, चोर, दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे, ज्यात सुक्तकार आधी स्तुती, आळवणी करून मग आपल्याला काय पाहिजे त्याची यादी देत आहे. हा रुद्र्सुक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसुक्ताचे म्हणजे अभिषेकाचे पठण हा एक अनुभव आहे जेंव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम, सोवळे आणि इतर वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो.

    या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्यामध्ये एकादशीनी, लघुरूद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादि प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.

    अभिषेक :

    अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविने. रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणा बरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो.

    श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक.

    रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र -एकादशिनी ) – ११ आवर्तने.
    लघुरुद्र अभिषेक :- (लघुरुद्र ) -१२१ आवर्तने.
    महारुद्र अभिषेक:- (महारुद्र) – १३३१ आवर्तने.
    अतिरुद्र अभिषेक :- (अतीरुद्र) – १४६४१ आवर्तने.

    ॐ नम: शिवाय

  • देवाजवळ दिवा का लावावा? आणि कधी लावावा? | why to light Diya toward God

    दिवा लावणे महत्व : देवाजवळ दिवा का लावावा. आणि कधी लावावा…

    दिवा का लावता ते पान सायंकाळी : – सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असते. दिवसाला एकूण ०८ प्रहर असतात यात दिवसाला ०४ व रात्रीचे ०४ चे प्रहर असे एकूण ०८ प्रहर असतात. यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो ०४ ते ०७ वाजे पर्यत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. संध्या मध्ये सुर्य अस्ताची वेळ आणि सुर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते. जी सध्या ६.४५ ते ७.३० आहे. दिनमानानुसार ती बदलत जाते जसे की उत्तरायणात सुर्यास्त ऊशीरा होतो तर दक्षिणायणात सुर्यास्त लवकर होतो त्यामूळे संध्या समय वरखाली होतो त्यामूळे दिनमानानुसार कातरवेळ बदलते.

    काही लोक सांगतात ७.३७ ला दिवा लावावा कारण कामाख्या देवीचा दिवा हा ७.३७ लावतात परंतू पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती. गावात वरसकी पद्धती असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याची वरसकी असेल तो सुर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत. दिवा लावल्यावर घंटानाद होत असे. घंटानाद ऐकताच सर्व जण आपआपल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावत. त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मान-पाण होता, ग्रामदेवताची दिवाबत्ती लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे या मागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखणदारा सोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करते. कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रुप धारण करुन जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रुपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातारवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो.

    संध्याकाळी 6.30 नंतर केव्हाही दिवा लावावा, दिवा लावल्यावर घरातील सुवासींनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे. आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे.

    देवाजवळ आणि तुळशीजवळ
    दिवा लावून देव अन् दिवा यांना नमस्कार करावा !

    सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ, तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

    स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधीकालात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल. तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा. सूर्यास्तानंतरच्या संधीकालातही दिवा लावावा. (खरे तर देवाजवळ दिवा २४ घंटे तेवत असायला हवा.)

    ‘यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो’, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडेतेलाचा दिवा लावावा.

    देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते. देवतेच्या या कृपाकवचामुळे घराचे अन्य संकटांपासूनही रक्षण होण्यास साहाय्य होते.

    दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे.
    हे लक्षात आले कि मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल.
    दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर, वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते.
    यामुळे, जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात. आणि असे जीव हे अतिसुक्ष्म असल्याने शरिरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरिरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात.

    स्त्रियांच्या शरिरावरील रंध्रे ही पुरूषांच्या शरिरावरिल रंध्रांपेक्षा मोठी असतात. त्यामुळे स्त्रियांच्या शरिरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटील शरिररचनेनुसार, स्त्रियांना जास्त धोका असतो.
    त्यामुळेच सातच्या आत घरि असावे असे सांगण्यात आले आहे.

    वातावरणात सुक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा, सर्वत्र दिवे लावून मिळवता येते.
    म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाचीही कमतरता भरुन निघते.
    सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात. यावेळी प्रचण्ड डिस्टर्बन्स असतो. या काळात ऊर्जेची आवश्यकता असते.
    त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्रदर्शन होण्याआधी पर्यंत दिवे लावावेत.
    तसेच हे दिवे तेलाचे किंवा तुपाचेच असावेत.
    वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूंची वाढ ही, फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडले जाणार्या लहरींद्वारेच थोपवली जाते.
    इलेक्ट्रीकल दिव्यांद्वारे निघणार्या लहरींद्वारे थोपवली जाऊ शकत नाही.

    सायंकाळी संध्या करावी आणि देवाजवळ दिवा लावावा. याच वेळी अंगणात तुळशीजवळही दिवा लावावा. देवाजवळ लावलेला दिवा २४ घंटे तेवत असायला हवा. सायंकाळी दिव्याच्या वातीवर आलेली काजळी काढावी. सध्या बहुतेक जणांच्या घरात २४ घंटे दिवा तेवत ठेवलेला नसतो. त्यामुळे त्यांनी सायंकाळ झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावावा.

    तिन्हीसांजेला घरात अन् तुळशीजवळ दिवा लावल्याने
    घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होणे
    आणि त्या वेळी वातावरणातील वाईट शक्तींचा त्रास होऊ नये; म्हणून घरी थांबणे

    ‘तिन्हीसांजेला, म्हणजेच दिवेलागणीच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वातावरणातील वाईट शक्तींच्या संचाराम म्हणून शक्यतो दिवेलागणीच्या वेळेपूर्वी घरी यावे किंवा दिवेलागणीनंतर घरातून बाहेर पडू नये. बर्‍याचदा वाईट शक्तींची त्रास हा तिन्हीसांजेच्या वेळी सर्वांत जास्त प्रमाणात होते. अघोरी विद्येचे उपासक तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणार्‍या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात. म्हणून तिन्हीसांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात, हत्या (खून) होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात. या काळाला ‘कातरवेळ’ म्हणजेच ‘त्रासदायक किंवा विनाशाची वेळ’, असे म्हणतात.’

    तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायूमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते.

    वायूमंडलात कार्यरत असणार्‍या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय (भीती) निर्माण करतात.

    तिन्हीसांजेच्या वेळी ‘शुभं करोति०’ म्हटल्यामुळे देहाभोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते. तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने १२ घंटे सूक्ष्मातून कार्यरत रहातात.

    मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते. तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास साहाय्य होते.’

    दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात . दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशीर करावी . दिवस लहान होत गेला कि सकाळची पूजा उशीरा आणि सायंकाळची लवकर . या दोन विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टाईमिंग फिक्स ठेवा . आणि पूजा , दिवेलागण करा .

    आता लवकर दिवस मावळायला लागलाय भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो म्हणून दिवेलागण लवकर करावी . फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो. चैत्र वैशाखात तर सायंकाळी सात वाजता ही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवेलागण करावी .

    देव्हाऱ्यात व तुळशी जवळ पहाटे पासून(दुपारी वगैरे आपोआप विझला तरी हरकत नाही) रात्री ९ वाजेपर्यंत तेवत ठेवणे कारण,
    हिंदू धर्मानुसार रात्री ९ वाजता शेजारती झाल्यानंतर देव विश्राम करतात व तेंव्हा उजेड नसावा!

    दिवा सुर्योदया आधी आणि सुर्यास्ता नंतर लावावा….
    कारण ती प्रकाशाची पुजा आहे.. त्या प्रतीचा ऋणानुभाव आहे आणी प्रकाशाची पुजा म्हणजेच देवाची पुजा होय….
    ||श्रीराम जय राम जय जय राम ||🙏🏻🙏🏻🪷🪷🪷🪷🙏🏻🙏🏻

  • श्री दत्त महाराज व क्षमाशीलता

    श्री दत्त महाराज व क्षमाशीलता

    एके ठिकाणी बसलो होतो, समोरच्या बाकावर एक माता आपल्या लहानग्या समवेत बसली होती. मातेचे फोनवर काही बोलणे सुरु होते मात्र हे संभाषण तिच्या मनाला नक्कीच न रुचणारे असावे, संभाषण संपले. ती काही काळ स्तब्ध होती. इतक्यात त्या लहानग्याच्या हातून काही चूक घडली. तात्काळ त्या मातेचा हात उचलला गेला आणि एक सणसणीत चापटी त्या लेकराला बसली. लेकरू कळवळून रडावयास लागले. त्याकडे पाहत तोंडावर बोट ठेवत पुन्हा ती माता रागे भरत म्हणाली रडलास तर पुन्हा मार देईन. गप्प अगदी गप्प… आधीच भेदरलेले ते लेकरू पुन्हा रडत रडत काकुळतीने आईकडे पाहत मारू नको म्हणत होते. अनेकदा हा ताडन प्रकार सर्वत्र पाहावयास मिळतो. मनाविरुद्ध घडलेल्या घटनांचा राग आपल्या लेकरांवर काढणे हे केवळ चूकच नाही तर एका प्रकारे पाप देखील आहे.

    दत्त महाराजांना माता आणि तात या भावनेने नित्य पाहतो, आपल्या चुका त्यांनी उदार अंतःकरणाने माफ कराव्यात आणि सर्व झाल्या अपराधांची क्षमा करावी असे नित्य वाटत असते पण तोच न्याय इतरांना आपण देत नाही. आपल्या गंभीरातील गंभीर अपराधाची क्षमा दत्त महाराज करत असताना इतरांसमवेत असे वर्तन कधीही करू नका.

    गुरुचरित्रात अगदी लहान बालकाला दत्त महाराजांनी उचलून कौतुक केल्याचा उल्लेख आहे. गंगा ही विप्र स्त्री पुत्रवती झाली तेव्हा काही दिवसांनी महाराजांच्या दर्शनाला ती आपल्या लहान मुलीला घेऊन आली. कडिये घेतले प्रीतीसी ll अगदी प्रेमाने महाराजांनी त्या लेकराला उचलून घेतले. त्या मुलीचा भविष्यकाळ सांगितला. अतिशय प्रेमळ आणि वात्सल्यपूर्ण अशा स्वभावाचे दत्त महाराज आहेत. दत्त महाराजांच्या करुणा त्रिपदीत त्यांच्या कनवाळू मनाचा अंदाज येतो. चोरांनी वल्लभेशाला मारताच त्यांचे मन कळवळले आहे, पोटशुळाने व्दिजाला वेदना होताच त्यांचे मन कळवळले आहे, व्दिज सुताचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे मन कळवळले आहे. माहूरच्या सतीचा पती मृत्यू पावताच त्यांचे मन कळवळले आहे.

    लहान निष्पाप लेकरांना मारहाण करणे योग्य नाही. दत्त महाराजांना ते आवडणार नाही. सर्व घडणाऱ्या घटनांचे साक्षी ते असताना ताडनाचे असे प्रसंग आपल्या हातून झाल्यास कोणत्या तोंडाने क्षमस्वापराधम् — म्हणाल सांगा.

    ll श्रीगुरुदेव दत्त ll

    ✍🏻 © – अभय आचार्य

  • पिन सुरक्षा – Cyber Tips of the Day | आजच्या दिवसाची सायबर टीप्स

    आजच्या दिवसाची सायबर टीप्स : सुरक्षित पिन

    तुमच्या पैशाचे रक्षण करा: तुम्ही एटीएम आणि पीओएस मशीनवर तुमचा पिन नेहमी कव्हर का केला पाहिजे..?

    तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन) संरक्षित करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही एटीएम किंवा पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन वापरत असलात तरीही, तुम्ही नेहमी तुमच्या सभोवतालची काळजी घेतली पाहिजे आणि तुमचा pin डोळ्यांपासून वाचवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

    तुमचा पिन संरक्षित करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कीपॅड तुम्ही एंटर करताना तुमच्या हाताने झाकणे. हे अक्कल वाटू शकते, परंतु हे करणे किती लोक विसरतात हे आश्चर्यकारक आहे. तुम्ही तुमचा पिन कव्हर करत नसल्यास, जवळपास उभा असलेला कोणीही तुम्ही काय टाइप करत आहात ते सहजपणे पाहू शकतो.

    याव्यतिरिक्त, आपल्या सभोवतालची जाणीव असणे महत्वाचे आहे. अनेक एटीएम आणि पीओएस मशीन्समध्ये बिलिंग काउंटरच्या वर कॅमेरे बसवलेले असतात, जे तुम्ही तुमचा पिन टाकताच कॅप्चर करू शकतात. हे कॅमेरे लपलेले असू शकतात, त्यामुळे तुम्हाला त्यांची माहितीही नसेल.

    तुमचा पिन संरक्षित करण्यासाठी, तुम्ही नेहमी अशा स्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे कोणत्याही संभाव्य कॅमेऱ्यांचे दृश्य अवरोधित करते. याचा अर्थ मशीनच्या जवळ उभे राहणे किंवा कॅमेरा आणि कीपॅडमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी आपल्या शरीराचा वापर करणे देखील असू शकते.

    तुम्ही एटीएम वापरत असल्यास, मशीनवर स्थापित केलेली स्किमिंग उपकरणे तपासणे देखील महत्त्वाचे आहे. स्किमर ही छोटी उपकरणे आहेत जी कार्ड रीडरशी संलग्न केली जाऊ शकतात आणि तुमची कार्ड माहिती कॅप्चर करू शकतात, तुमच्या पिनसह. छेडछाड करण्याच्या कोणत्याही चिन्हांसाठी कार्ड रीडर नेहमी तपासा, जसे की सैल किंवा असामान्य दिसणारे भाग.

    या शारीरिक खबरदारी व्यतिरिक्त, तुमचा पिन ऑनलाइन संरक्षित करणे देखील महत्त्वाचे आहे. तुमच्या बँक खात्यासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी पिन तयार करताना, तो संख्यांचा मजबूत आणि अद्वितीय संयोजन असल्याची खात्री करा. तुमची जन्मतारीख किंवा फोन नंबर यासारखे सहज अंदाज लावता येणारे नंबर वापरणे टाळा.

    तुमचा पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका आणि तुमचा पिन किंवा इतर वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या ईमेल किंवा फोन कॉलपासून सावध रहा. कायदेशीर वित्तीय संस्था कधीही फोनवर किंवा ईमेलद्वारे ही माहिती मागणार नाहीत.

    तुमचा पिन कव्हर करणे इतके महत्त्वाचे का आहे याची काही कारणे आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिपा येथे आहेत:

    पिन चोरीला प्रतिबंध करणे
    तुमचा पिन कव्हर करण्याच्या सर्वात स्पष्ट कारणांपैकी एक म्हणजे एखाद्याला तो चोरण्यापासून रोखणे. तुमचा पिन टाकताना तुम्ही कीपॅड झाकून न ठेवल्यास, तुम्ही काय टाइप करत आहात ते जवळपास असलेले कोणीही सहज पाहू शकतात. हे त्वरीत आणि सावधपणे घडू शकते, म्हणून नेहमी आपल्या सभोवतालची काळजी घेणे महत्वाचे आहे.

    लपविलेल्या कॅमेऱ्यांपासून संरक्षण करणे
    अनेक एटीएम आणि पीओएस मशीन्समध्ये बिलिंग काउंटरच्या वर कॅमेरे बसवलेले असतात, जे तुम्ही तुमचा पिन टाकताच कॅप्चर करू शकतात. हे कॅमेरे लपलेले असू शकतात, त्यामुळे तुम्हाला त्यांची माहितीही नसेल. तुमच्या हाताने कीपॅड झाकून, तुम्ही कोणत्याही संभाव्य कॅमेऱ्यांचे दृश्य ब्लॉक करू शकता आणि तुमचा पिन सुरक्षित ठेवू शकता.

    स्किमिंग टाळण्यासाठी मदत करणे
    स्किमिंग ही चोरांकडून क्रेडिट कार्डची माहिती चोरण्यासाठी वापरली जाणारी एक सामान्य पद्धत आहे. स्किमर ही छोटी उपकरणे आहेत जी कार्ड रीडरशी संलग्न केली जाऊ शकतात आणि तुमची कार्ड माहिती कॅप्चर करू शकतात, तुमच्या पिनसह. कार्ड रीडरमध्ये छेडछाड झाल्याची कोणतीही चिन्हे तपासून आणि तो प्रविष्ट करताना तुमचा Pin झाकून ठेवल्यास, तुम्ही स्किमिंग टाळण्यास आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकता.

    तुमच्या ऑनलाइन खात्यांचे संरक्षण करणे
    तुमच्या बँक खात्यासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी PIN तयार करताना, संख्यांचा मजबूत आणि अद्वितीय संयोजन निवडणे महत्त्वाचे आहे. तुमची जन्मतारीख किंवा फोन नंबर यासारखे सहज अंदाज लावता येणारे नंबर वापरणे टाळा. तुमचा PIN कधीही कोणाशीही शेअर करू नका आणि तुमचा PIN किंवा इतर वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या ईमेल किंवा फोन कॉलपासून सावध रहा.

    एटीएम आणि पीओएस मशीनवर तुमचा पिन संरक्षित करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत:

    ➡️ तुमचा पिन टाकताना कीपॅड तुमच्या हाताने झाकून ठेवा.

    ➡️ तुमच्या सभोवतालची जाणीव ठेवा आणि अशा स्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा जे कोणत्याही संभाव्य कॅमेऱ्यांचे दृश्य अवरोधित करते.

    ➡️छेडछाडीच्या कोणत्याही लक्षणांसाठी कार्ड रीडर तपासा, जसे की सैल किंवा असामान्य दिसणारे भाग.

    ➡️ तुमच्या पिनसाठी संख्यांचे मजबूत आणि अद्वितीय संयोजन वापरा.

    ➡️ तुमचा पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका.

    ➡️तुमचा पिन किंवा इतर वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या ईमेल किंवा फोन कॉलपासून सावध रहा.

    शेवटी, तुमचा PIN संरक्षित करणे हा तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुमचा PIN एंटर करताना कीपॅड झाकून, तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल जागरूक राहून आणि तुमचा PIN ऑनलाइन संरक्षित करण्यासाठी पावले उचलून, तुम्ही तुमच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यात आणि तुमचे वित्त सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकता.

    सायबर क्राइम विरुद्धच्या लढाईत सक्रियपणे सहभागी होऊन सायबरस्पेस अधिक सुरक्षित करण्यासाठी स्वत:ला सक्षम बनवा. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर अहवाल देणे हे सर्वांसाठी सुरक्षित ऑनलाइन वातावरण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
    ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यास 1930 कॉल करा किंवा https://cybercrime.gov.in वर ऑनलाईन तात्काळ तक्रार नोंदवा.

    सतर्क रहा..!! सायबर सुरक्षित रहा..!!!

    ✍️Cybercop Sandy..

  • राखी पौर्णिमा खुलासा

    राखी पौर्णिमा खुलासा 🌹

    पूर्वी रक्षा सूत्र बंधन होते . रक्षा सूत्र बंधन हे राजा लढाईला जाण्यापूर्वी त्याच्या रक्षणासाठी हातात बांधण्याचे एक बंधन होते . रक्षा सूत्र बंधन करण्याचे कर्म हे खूप मोठे आहे . त्यामध्ये मंत्रोपचार करून ते रक्षा सूत्र राजाच्या हातात बांधले जाई . पुढे त्याचा उद्देश बदलला व बहिणीने भावाला बांधायची राखी हे स्वरूप त्याला आले . परंतु आजकाल कोणीही नवीन धर्मशास्त्र तयार करून राखी पौर्णिमा बद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत . ज्यायोगे हिंदू धर्मावर लोकांची श्रद्धा कमी होईल किंवा त्यांनी सण साजरे करू नयेत अशा पद्धतीने प्रत्येक सणापूर्वी असे विचित्र मेसेज प्रसार माध्यमातून पाठवले जातात . आजकाल जी राखी पौर्णिमा साजरी केली जाते तो एक लौकिक विधी आहे . म्हणजे बहिणीने फक्त भावाच्या हाताला दोरा बांधण्याचा एक विधी आहे . त्यामध्ये कुठलेही मंत्र उपचार होत नाहीत किंवा कुठलाही विधी होत नाही . त्यामुळे त्याबद्दलचे भद्रा किंवा इतर कुठली मूहूर्त बघण्याची कोणतीही आवश्यकता नाही . सर्वांनी आपले सण आनंदाने साजरे करावेत असेच धर्मशास्त्र सांगते . पण आजकाल हे व्हाट्सअप आल्यापासून खूप विचित्र मेसेज फॉरवर्ड होत आहेत . हे सांगणारे आहेत ते कोणीही धर्मपंडित नाहीत , ते असेच कुठून तरी गोळा करून आपल्या माथ्यावर ते शास्त्र थोपवत आहेत .
    आज काल भद्रा दोष सांगितला जातो , वास्तविक दर वर्षीच राखी पौर्णिमेला भद्रा असतेच मग इतके दिवस आपले पूर्वजांनी कोणतेही बंधने आपल्याला सांगितलेली नाहीत . ते वेडे होते का ?
    आपण सर्वसामान्य व्यक्तींनी याचा विचार केला पाहिजे की आपण सण का साजरे करत आहोत , त्यामागचा उद्देश काय आहे . आणि त्यानुसार आपण पूर्णपणे आनंदाने आपले सण साजरे करावेत . दिवसभरात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राखी पौर्णिमा आपण साजरी करू शकतो . त्याबद्दल कुठलेही बंधन नाही आणि धर्मशास्त्रात असे कुठेही उल्लेख नाहीत हे मी माझ्या खात्रीने सांगू शकतो .
    जय श्रीराम

  • विष्णुसहस्त्रनामाचे महत्त्व

    विष्णुसहस्त्रनामाचे महत्त्व खास आपल्यासाठी, जाणून घ्या विष्णुसहस्त्रनामाचे महिमान.

    विष्णुसहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे दूर पळतात.

    १)दर बुधवारी ४वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले, तर आपल्या सर्व पितराना सद्गति मिळते.

    २)नियमित रोज १२वेळा विष्णुसहस्रनाम ६ महिने म्हटले, तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते. इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच भुक्ति व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात.

    ३) १५,००० वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले, तर एक विष्णुयाग केल्याचे फळ मिळते असे पू. श्रीडोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे.

    ४)एकादशीच्या रात्री १२ वाजता स्नान करून विष्णुपुढे (राम/ बालाजी/पांडुरंग/ कृष्ण, फक्त नृसिंह नको) तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णुसहस्रनामाचे १२ पाठ १२ एकादशीना केले, तर साक्षात भगवंताचे दर्शन होते.

    ५)४०दिवसांच्या रोज १२ वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात.

    ६)सहस्र तुलसीपत्रानी सहस्रनामानी अर्चन अथवा हवन केले, तर अतिशय उत्तम अनुभव येतात.

    ७)बालकृषणाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णुसहस्रनाम म्हणवून घेतले, तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते, ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली, तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते.

    ८)वास्तु दोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत, याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच.

    ९)बाहेरच्या त्रास असेल, संतती मतिमंद-गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ- संध्याकाळ श्रीविष्णुसहस्रनामाचे पाठ ऐकवावेत.

    १०)घरामधे कोणी व्याधिग्रस्त असेल, तर विष्णुसहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते.

    ११)श्रीविष्णु मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो, त्याचे सर्व अहित नाहीसे होते, त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो.

    १२)विष्णुसहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे, त्याच्या ऐवजी विष्णुसहस्रनामाच्या आधी व शेवटी ३ वेळा ॐ नम: शिवाय आणि ३ वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा.

    १२)श्रीविष्णुसहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की, जो या स्तोत्राचे पठन करेल, त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे.

    १३)पिंपळाच्या पारावर बसून विष्णुचे ध्यान करीत जो विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो, त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळू हळू नष्ट होतात.

    १४)शिवालयात, तुलसीवनात बसून जो रोज विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो, त्याला कोट्यवधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे.

    १५)श्रीविष्णु यांच्या अच्युत, अनंत, गोविंद या तीन नावानी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो.

    १६)आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर, तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाउल ठेवण्या आधी मनातल्या मनात ४ वेळा नारायण, नारायण, नारायण नारायण असे नाम घ्यावे.

  • अधिक मास संबंधी माहिती

    🌹श्री गुरुमहाराज समर्थ🌹
    🌹अधिक मास🌹

    अधिक मास संबंधी संकलित माहिती देत आहे.

    यासंबंधी पौराणिक कथा आहे .
    एकदा श्रीविष्णु याना नारदमुनी म्हणाले, दरवर्षी फक्त बाराच महिने असतात. मग दर तीन वर्षांनी हा तेरावा महिना कसा येतो ? ते मला कृपा करून समजावून द्या.

    तेव्हा नारायण म्हणाले, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या प्रमाणांवर अवलंबून असते.

    आजकाल दुष्कृत्याचेच प्रमाण वाढल्यामुळे, ते पाप आपल्याला सहन होत नाही, अशी बाराही महिन्यांची केव्हापासूनची तक्रार होती. त्या पापाचे जड ओझे बारा महिन्यांच्या पोटांत मावेनासे झाले.
    त्यामुळे त्या बाराही महिन्यांनी आपापल्या पोटांतील पापाचा फक्त तिसराच हिस्सा बाहेर काढून टाकला. आपला पापभार तेवढा कमी केला.

    परंतु बाराही महिन्यांनी काढून टाकलेल्या त्या पापभागांपासून तेरावा महिना म्हणजेच अधिकमास उत्पन्न झाला. तो पापमय असल्याने त्याला मलिनमास किंवा मलमास असे नाव पडले.

    अधिकमास पाळणाऱ्या स्त्रीपुरुषांनी महिनाभर एकभुक्त राहून पुरुषोत्तम व्रत करावे. संबंध अधिकमासांत प्रत्येक दिवशी अधिक मास पोथी सकाळी, दुपारी व संध्याकाळी वाचावी अगर ऐकावी.

    निदान सोयीप्रमाणे एकदातरी तसे करावे.

    वैदिक काळात अधिक महिन्याला संसर्प, मलीमलूच असे म्हटले गेले आहे.अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास,धोंड्याचा महिना असेही म्हणतात.
    अधिक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात. सौर कालगणना वेदकाळात अस्तित्वात होती आणि चांद्र कालगणना ही अस्तित्वात होती. वैदिक ऋषींना हे लक्षात आले की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. हे अंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले. वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर ३ वर्षांनी कालगणनेमध्ये ३० दिवस अधिक घेतले गेले. हाच तो अधिक मास होय.

    चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो

    ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना. याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.

    पौर्णिमेला महिना संपतो अशा पद्धतीच्या पंचांगात निजमासाच्या एका (कृष्ण) पक्षानंतर अधिक मासाचे दोन पक्ष येतात, आणि त्यानंतर निजमासाचा शुक्ल पक्ष (दुसरा पंधरवडा). त्या पंचांगातला अधिक मास आणि अमान्त पद्धतीच्या पंचांगातील अधिक मास एकाच वेळी असतात.

    प्रत्येक महिन्यात दोन (वा अधिक) एकादश्या असतात; त्यांतल्या २४ एकादश्यांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना ‘कमला एकादशी’ हेच नाव असते.

    ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो.

    अधिक मासात निजमासांप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात.

    पूर्वी याचे मल मास असे नाव होते। मल मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करत होते।. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात कृष्णाकडे पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून ‘पुरुषोत्तम मास’ असे ठेविले अशी कथा प्रचलित आहे.या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.

    अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या विशिष्ट महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. . भागवत पुरणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप यांचे आचरण या महिन्यात केले जाते. ब्राह्मणांना भोजन, दान देणे यासाठीही या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात.

    अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे, त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे

    २०२३ मध्ये, मराठी श्रावण महिना १८ जुलै २०२३ पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत असेल. अशा प्रकारे, यावेळी श्रावण ५९ दिवसांचा असेल. या दोन श्रावण महिन्यांची विभागणी अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी केली जाते. अधिक श्रावण महिना १८ जुलै पासून सुरू होईल आणि १७ ऑगस्टपासून निज श्रावण महिना सुरू होईल तो १५ सप्टेंबरला संपेल. अधिक आणि निज असे दोन श्रावण महिने असल्याने यंदा ८ श्रावण सोमवार असतील. त्यामुळे शंकराचा श्रावण सोमवार उपवास करणाऱ्यांना ८ सोमवार व्रत-उपवास करावे लागतील.

    अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरोषत्तम म्हणजे नारायण. मुलीचे लग्न केले जाते त्यावेळी विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार पार पडतात. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांसाठी जावई हा नारायण असतो

    शास्त्रानुसार जावयाला तीस तीन अनारसे, म्हैसूर पाक किंवा बत्तासे असे सच्छिद्र पदार्थांचे वाण देण्याची पद्धत आहे.
    अधिक मासाचे निमित्त, म्हणून सुवासिनींनादेखील जोडवी बदण्यास निमित्त मिळते.

    अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. नियमित सुरू असलेल्याल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा, मध्येच आलेल्या दगडासारखा (धोंड्यासारखा) आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असेही एक मत आहे. मात्र, धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला धोंडा' म्हटले जाते. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो, त्यालादिंड’ म्हणतात, तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो. त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणातात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रुपाने नारायणाने धोंड्यांचा नैवेद्य स्वीकार केला, असे समजतात…

    या महिन्यात गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस. तुती, मेथी पदार्थांचे सेवन करावे. या महिन्यात प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, कोर्ट कचेरी काम करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, सामाजिक कामे करणे, सेवा कार्य करणे..बँकिंग क्षेत्रात कामे उरकून घेणे यात दोष नाही

    लग्न कार्य मुंज साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिकमासात करू नये. या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृह प्रवेश यासारखे शुभ कार्ये करणे टाळावे.

    या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहावे

    श्री गुरुमहाराज समर्थ🌹
    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • Life is blessing – be thankful

    कृतज्ञ = Life is full of blessing कृतज्ञ रहायला शिका

    हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.


    या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं, इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे.


    आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.


    जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.
    आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.

    ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही.
    कृतज्ञ रहा.

    ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही.
    कृतज्ञ रहा. Be thankful

    तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.
    कृतज्ञ रहा.

    ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचेजीवन विसंवादात आहे.
    कृतज्ञ रहा.

    तुम्ही हॉस्पिटलमध्‍ये वापरलेला बेड, तुम्‍ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.
    कृतज्ञ रहा.

    ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.
    कृतज्ञ रहा.

    कृतज्ञ रहा कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त
    “ईश्वरी कृपा” आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे.

    म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा.
    पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.

    वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, “आत्मविश्वास” जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.

    समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोणी आपले वाईट चितले तरीही त्या व्यक्तीचे तुम्ही वाईट चिंतु नका. आपल्या चांगल्या कामात मग्न राहायला शिका. दुसऱ्याचे अजिबात वाईट चिंतु नका. दुसऱ्याच्या दुखाकडे न, हसता, त्यांच्याकडे मायेची फूकंर घाला. जीवनात. सकारात्मक दुष्टीकोण बाळगा.

  • Law of Attraction

    असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते,नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते. It’s law of attraction

    एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्याच विषयात का बरं नापास होतो?

    पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी घोकणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो?

    आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी आर्थिक फटका बसतोचं बसतो,

    कष्ट नकोत, कष्ट नकोत, असं घोकणार्‍याच्या नशिबातंच श्रम आणि राबणं असतं का बरं असत?

    का बरं एखादीला नको असलेलं गावचं ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?

    का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतातं?

    तर ह्या सगळ्यासाठी एकचं कारण आहे, आणि ते कारण आहे आकर्षणाचा सिद्धांत

    लॉ ऑफ अट्रॅक्शन..

    तुम्हाला माहीतीय का ?…
    जगातील फक्त चार टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे.
    हा केवळ योगायोग नाही मित्रांनो,
    हा आकर्षणाचा नियम आहे.
    काय सांगतो हा नियम?

    “तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट, घटना ही कळत नकळत तुमच्या विचारांनीचं आकर्षित केलेली असते.
    जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…

    जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल ना,

    अगदी तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थिती वास्तव बनुन तुमच्या जीवनात समोर येते.

    उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस केवळ आणि केवळ कर्जावर जातो तर त्यामुळे कर्ज वाढतं.

    माझं वजन वाढतयं, वजन वाढतयं म्हटलं की वजन अजुनंच वाढतं,

    माझे केस गळतायंत म्हटलं की अजुनंच जास्त केस गळतात,

    माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,

    कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून आर्थिक अडचणी निर्माण होतात,
    वगैरे वगैरे…

    ज्या गोष्टीवर मन अधिक लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट आपल्या Subconscious Mind म्हणजेच सुप्त मनाद्वारे अंमलात आणली जाते.

    म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळालयं अशी त्याच्या रंग,चव आकार, गंध याच्यासह कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर दृढ विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.

    फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं म्हणजेच त्याप्रकारच्या संवेदना तयार करुन त्यात रंग भरुन कल्पना करावी यालाच Creative Visualization अशी संज्ञा आहे.

    अगदी मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर दृढ विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली आहेत.

    विश्वातील सर्वचं थोर माणसांनी हा आकर्षणाचा सिद्धांत जाणला होता. आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

    तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान हवं असल्यास, दररोज ठराविक वेळी, ठराविकचं स्थळी शांतचित्ताने प्राणायाम करुन चेहर्‍यावर समाधानाचे भाव ठेवुन मनात ही वाक्ये पुर्ण संवेदना आणि भावनेसह म्हणा!.. affirmation

    १) स्वस्थ आणि आरोग्यपुर्ण जीवन मी जगत आहे. I am healthy and fit

    • ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे. I am thankful god

    २) मी सुंदर आहे, तेजस्वी आहे, मी चिरतरूण आहे. I am young, beautiful and attractive

    • ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.

    ३) मी धैर्यवान, बलवान,सुज्ञ आणि विवेकी आहे. I am strong fine

    • ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.

    ४) समृद्ध, समाधानी आणि आनंदी जीवन मी जगत आहे. I am satisfied, wealthy and Happy Person in the world

    • ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.

    ५) माझ्या मनात प्रेम आणि परोपकार उत्पन्न होतं आहे. I have lot of love in my mind

    • ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.

    ६) मला सर्वत्र अनुकूल परिस्थिती प्राप्त होतं आहे. All is well around me

    • ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.

    ७) तुझी माझ्यावर अखंड कृपा आहे. तुझ्या प्रेमाचा माझ्यावर अखंड वर्षांव होतो आहे. I am lucky that you blessed me with love

    • ईश्वरा मी तुझा खुप खुप आभारी आहे.

    याला पॉझीटीव्ह अफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक स्वयंसुचना Auto Suggestions असे म्हणतात. यामुळे तुमच्या मानसिकतेत बदल होवुन दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल

    तुम्ही हे जर मनापासुन, आणि तशाच संवेदना निर्माण करुन वारंवार बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत म्हणजेच Subconscious Mind पर्यंत पोहोचलं, तर मित्रांनो तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍याही करुन दाखवेल. Law of attraction

    यात अट एकचं असेल ती म्हणजे तुम्ही घेत असलेल्या स्वयंसुचना या तुमच्या किंवा जगाच्या कल्याणासाठी असाव्या. इतरांना नुकसान पोहोचविणारी स्वयंसुचना बुमरॅग सारखी तुमचेच अपरिमित नुकसान करणारी ठरते.

    म्हणूनच आपल्या मनात उत्पन्न होणा-या प्रत्येक विचारांविषयी सजग रहा.
    कधीकधी वर वर सकारात्मक वाटणारा विचार नकारात्मक अर्थ निघणारा असतो. त्यामुळे विचारांची काळजी घेणं फार महत्त्वाचे असते.

    उदाहरणार्थ “मी कधीच आजारी पडणार नाही.” हे वाक्य वरकरणी सकारात्मक वाटत असले तरी त्या वाक्यात आजार हा नकारात्मक शब्द आहे.त्याच्या वारंवार उच्चाराने तशीच भावना मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी “मी आरोग्यपुर्ण जीवन जगत आहे” हे वाक्य अधिक सकारात्मक आहे.Law of Attraction

    इतक्या सूक्ष्म स्तरावर आपण आपल्या मनात निर्माण होणा-या विचारांची छाननी करणे आवश्यक आहे.

    अशाप्रकारे आपण आपल्या विचारांची छाननी केली की आपल्या मनात निर्माण होणारा प्रत्येक नकारात्मक शब्द आणि विचार हळूहळू कमी होतील आणि नव्यानेच आयुष्याचा अर्थ उमजेल.
    अनुभव येईल.

    आपणही आपल्या आयुष्यात ही शुभसुरुवात करावी.आणि आपलं आयुष्य समृद्ध करावं ही शुभेच्छा!!

    आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची खरीखुरी सुरुवात असेल!..

    🙏🌹🌹

  • Letter to Monsoon

    …..प्रिय पर्जन्य राजा…..

    वेशीपर्यंत आलायस… आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस… पटकन माप ओलांड आणि आत ये… कंजूसपणा करू नको…. दिल खोलके बरस… येताना चोर पावलांनी नको, राजासारखा सनी चौघडे वाजवत ये… येता-येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव… तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल… एरवी आभाळातून बरसणारा तू तिच्या डोळ्यांतून बरसशील… ती तुला मनातल्या मनात एखादी कचकचीत शिवीही देईल, पण तरी पण तिथे थांब… कारण तिचा धनी गेल्यावर पोराबाळांसकट सगळ्या संसाराचा गाडा तिलाच ओढायचाय… म्हणूनच तिच्या शेतात सगळ्यात आधी जा… आणि तिथल्या मातीत रुजून राहा… मग रानावनांत पड, रस्त्यारस्त्यांवर पड, खिडक्यांना पागोळ्या होऊन लगड… नद्या भर, विहीरी भर, धरणाचे दरवाजे उघड… हंड्या घागरींतून बरस, गच्चीतल्या टाकीवर बरस, म्युन्सिपाल्टीच्या नळांतूनही बरस… धन-धान्यासाठी ये, छत्र्या, रेनकोटच्या बिझनेससाठी ये, सगळी अर्थव्यवस्था बळकट करायला ये… पानाफुलांना सजव, गाईगुरांना भिजव, पक्षी-पाखरांना नाचव… आसुसलेल्या मनांना रिझव, सुकलेल्या ओठांनाही भिजव… सगळ्यांना पाणी दे, प्रेमात पडलेल्यांना गाणी दे, फेसबुकवर टाकायला तुझ्याबरोबरचा सेल्फी दे… वाफाळलेल्या चहासाठी ये, गरमा-गरम भज्यांसाठी ये, शेगडीवरच्या कणसासाठी ये… तर्राट होऊन ये….

    सैराट होऊन ये… आणि सगऴीकडे झिंग झिगं झिंगाट करुन टाक………