Author: admin

  • देव पूजे विषयी विशिष्ट माहिती

    देव पूजे विषयी विशिष्ट माहिती

    देव्हार्यात एकाच देवतेच्या दोन दोन तिन तिन मूर्ती नसाव्यात , फोटो सुद्धा डबल नसावेत ,
    घरातील देव्हार्यामध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये . देव्हारा हा शक्यतो पूर्व भिंतीला
    असावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल ,

    देव्हारा नियमित पणे स्वच्छ करावा , देव हे वस्रावर असावेत , आपल्या घरी देव्हाऱ्यात कुलदेवतेची मूर्ती ,
    प्रतिमा असावीच असावी . सर्वात मागे मध्यभागी कुलदेवता प्रतिमा आणि त्या समोर मध्यभागी गणपती
    व गणपतीच्या डाव्या बाजूस देवी मूर्ती म्हणजे लक्ष्मी / अन्नपूर्णा / दुर्गा इत्यादी आणि
    उजव्या बाजूस देव मूर्ती म्हणजे बाळकृष्ण इत्यादी…

    देवघरात शंख असावा , पण तो छोटा पूजेचा शंख असावा , वाजविण्याचा मोठा शंख देव्हाऱ्यात ठेऊ नये , बाजूला ठेवावा .
    देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूला शंख असावा आणि देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस घंटी असावी ..

    पूजेचे साहित्य —

    अक्षता, हळद, कुंकू, गंध, फुले, तुळशी, दूर्व, बेल, उदबत्ती, निरांजन, कापूर,वस्त्र,फळं,नारळ, विडा, नैवेद्य व पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर, मध नसेल तर थोडा गूळ)

    वापरती भांडी –

    तांब्या, भांडे,(पंचपात्र),पळी ताम्हण, अभिषेकपात्र,निरांजन, समई ( विषेश प्रसंगी ) घंटा.

    पूजेचे साहित्य कसे असावे ?

    सर्व पूजेची भांडी तांब्या , पितळेची – शक्य तर चांदीची असावी. स्टेनलेस स्टीलची अथवा प्लॅस्टिकची नसावी.

    गंध –

    चंदनाचे उगाळतात. त्यात कधी केशर घालतात. करंगळी जवळच्या बोटाने (अनामिकेने) देवाला गंध लावावे.
    सहाणेवर गंध उगाळून तो प्रथम दुसऱ्या तबकडीत घेऊन गंध लावावा . देवासाठी गंध हातावर उगाळू नये .

    अक्षता –

    धुतलेल्या अखंड तांदुळांना थोडेसेच कुंकु लावून त्या अक्षता वाहाव्या.
    शाळिग्राम आणि शंख यांना अक्षता वाहू नयेत.
    शंख नेहमी पाण्याने भरून ठेवावा , दुसऱ्या दिवशी ते पाणी कृष्णावर / देवांवर स्नान म्हणून अर्पण करावे .

    हळद – कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही (काळा/ पांढरा अबीर ) पूजा साहित्यात असावा.
    गणपतीला शेंदूर, विठ्ठलाला बुक्का (काळा अबीर ) वाहण्याची वहिवाट आहे.

    फुले –

    ऋतुकालोद्भभव पुष्पे म्हणजे त्या त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासिक फुले देवाला वाहावी.
    जाई, जूई, कण्हेर, मोगरा, जास्वंदी चाफा, कमळे, पारिजातक, बकुळ, तर वगैरे फुले सर्व देवांना चालतात.

    विष्णुला – चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुले आवडतात.
    शंकराला – पांढरा कण्हेर, कुंद, धोतरा इ. पांढरी फुले वाहतात.
    गणपतीला – गुलाब, जास्वंद वगैरे तांबडी फुले प्रिय असतात. गणपतीला दूर्वा वाहातात. गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाही.

    गणपतीला रक्तचंदनाचे गंध आणि शेंदूर प्रिय असतो.

    देवीला सर्व सुवासिक फुले चालतात.

    पाने –

    विष्णु, विठ्ठल, शाळिग्राम या देवतांना तुळस, शंकराला बेल तर गणपतीला दूर्वा वाहातात.

    धूप –

    देवाला उदबत्ती ओवाळून तिचा धूप देवावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा.
    अगरबत्ती देव्हाऱ्याच्या आत मध्ये ठेवू नये , बाहेर बाजूला ठेवावी .

    दिप –

    निरांजन ओवाळून ते देवाच्या उजव्या बाजूस ठेवावे. देवाजवळील समईंची ज्योत दक्षिणेकडे करू नये.
    समईत एक दोन पाच सात अशा ज्योती (वाती) असाव्या. तीन नसाव्या.
    देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस तुपाचा दिवा असावा आणि
    देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूस तेलाचा दिवा असावा .
    वाती या जोड वाती असाव्यात म्हा जे दोन वाती एकत्र करून केलेली एक वात ..

    नैवैद्य –

    रोजच्या पूजेत देवाना पंचामृताचा नैवैद्य दाखवितात.
    दूध, पेढे, फळे आणि पक्वाने नैवेद्यात सर्व देवांना चालतात.
    विशेष प्रसंगी गणपतीला मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य,
    देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.

    फळे –

    देवाला कच्ची फळें वाहू नयेत.
    पक्व फळाचे देठ देवाकडे करून ठेवावीत.

    तांबूल –

    म्हणजे विड्यांची पाने आणि त्यावर सुपारी खारीक खोबरे बदाम इत्यादी ठेवावे.
    पानाचे देठ देवाकडे करावेत. विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी.
    तसेच ड्रायफ्रुट्स सुद्धा असल्यास उत्तम .

    नमस्कार –

    दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार घालावा.

    आरती –

    देवाला आरती ओवाळताना देवावर प्रकाश पडेल अशी ओवाळावी.
    आवाज सौम्य असावा , किंचाळू नये. आर्ततेने म्हंटली जाते ती आरती हे लक्षात घ्यावे .

    प्रदक्षिणा –

    देवाला प्रदक्षिणा घालावी. अथवा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी.
    गणपतीला एक, सूर्याला दोन , शंकराला तीन, विष्णूल चार, पिंपळाला सात,
    आणि मारुतीला अकरा अशा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.
    हात जोडून आणि तोंडाने नामघोष करीत प्रदक्षिणा घालव्यात.
    किंवा सर्वाना समान तीन किंवा पाच प्रदक्षिणा कराव्यात ..

    प्रार्थना –

    देवाला नमस्कार करून भक्तिभावाने प्रार्थना करावी. प्रार्थना आणि सर्व पूजा
    एकाग्र चित्ताने शांतपणे मनःपूर्वक करावी. देवाजवळ व्यावहारिक गोष्टी मागू नयेत
    किंवा त्याला सांकडे , नवस घालू नये. फक्त त्याची कृपा मागावी.
    देवाच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात.

    देवपूजेचे महत्त्व —

    प्रत्येक माणासाला जीवनात सुख समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा हे एक उत्तम साधन आहे.
    हल्लीच्या संघर्षमय व तणावपुर्ण जीवनात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी
    आपणाला जास्त वेळ मिळत नाही. तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करणे आवश्यक आहे.

    यथाशक्ती, यथाज्ञानाने व मिळतील त्या उपचारांनी मनोभावे देवपूजा केली तर मनाला शांती मिळते,
    घरातील वातावरण पवित्र व प्रसन्न होते, आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो.

    देवपूजा करणाऱ्यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते, वाणीला तेज चढते,
    अंगीकृत कार्याला यश येते आणि इतरांचाही उत्साह वाढतो , आनंद होतो.

    देवपूजेमुळे शारीरिक, मानसिक आणि आचरणातील दोष दूर होतात.
    आत्मिक बळ वाढते. आत्मा हाच खरा परमात्मा आहे.
    तो संतुष्ट असला तरच जीवनाचे सार्थक होते.

    आपल्य कुटुंबास देवघरातील देवांची पूजा एकजणच करतो.
    बाकीचे कुटूंबीय स्नानानंतर देवाला फुले, अक्षता वाहून देवाला
    नमस्कार करतात. आपल्या नित्यक्रमातुन थोडासा वेळ काढून
    पूजेनंतर जप करावा. पोथी वाचावी. गीतेचा अध्याय, गुरुचरित्र,
    गजानन विजय यासारख्या आपल्या आराध्य देवतेची कथा,
    पोथी यांचे वाचन करावे. जेवढे शक्य असेल तेवढे करावे …

    अधिकस्य अधीकम् फलम् .. असे म्हटलेच आहे.

    अशा प्रकारे जप, पोथी-वाचन, देवदर्शन आणि व्रते, पूजा, स्तोत्रे,
    प्रार्थना वगैरे उपानसनेचे प्रकार आहेत.
    त्यांच्यामुळे मन प्रसन्न होऊन मनोरथ पूर्ण होतात.

    देवपुजा करण्याचे प्रकार —

    १ मानसपूजा
    २ मुर्तीपूजा

    मुर्तीपुजा करताना म्हणजे नेहमी प्रमाणे पूजा करताना
    देवाची मुर्ती किंवा प्रतीमा किंवा सुपारी , नारळ किंवा टाक ह्यांची पूजा केली जाते.

    ही पूजा करताना दोन प्रकारे करतात

    १ पंचोपचार पूजा

    २ षोडशोपचार पूजा

    १ पंचोपचारी पूजा Panchopchari Puja –

    यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
    (१) गंध (२) पुष्प (३) धूप (४) दीप (५) नैवेद्य

    २ षोडशोपचार पूजा ShodShopchari Puja –

    यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
    (१) आवाहन (२) आसन (३) पाद्य (४) अर्ध्य (५) आचमन
    (६) स्नान (७) वस्त्र अथवा यज्ञोपवीत (८) गंध (९) पुष्प
    (१०) धूप (११) दीप (१२) नैवेद्य (१३) फल (१४) तांबूल
    (१५) दक्षिणा (१६) प्रदक्षिणा .

    देवाला वरील सर्व उपचार करताना विशिष्ट मंत्र स्तोत्र येत असल्यास उत्तम ,
    नसेल येत तर निदान त्या त्या देवतेचे नाम मंत्र तरी म्हणावे .

    अभिषेक करताना त्या त्या देवतेचे स्तोत्र , मंत्र म्हणावेत .

    उदा .- गणपती पूजा करताना गणेश स्तोत्र किंवा गणेश मंत्र ,
    विष्णू पूजा करताना विष्णू स्तोत्र / व्यंकटेश स्तोत्र /
    विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र इत्यादी इत्यादी ..

    आणि मानसपूजा हि सश्रद्ध अंतःकरणाने / मनाने करायची असते ..

    वरील सर्व साहित्य व उपचार हे मनानेच देवाला अर्पण करायचे असते .
    मानासपूजेमध्ये एकाग्रचित्त अंतःकरण आणि सश्रद्ध भाव असणे जरूरी आहे .

    मानसपूजा हिच श्रेष्ठ सांगितली गेली आहे ..

  • श्री बालाजी मंदिर उंडणगांव

    श्री बालाजी मंदिर उंडणगांव


    श्री बालाजी मंदिराची स्थापना साधारणपणे 300 ते 400 वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे सांगितल्या जाते, या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यास मंदिर किंवा देऊळ न म्हणता देवाडा असे म्हटल्या जाते.


    या मंदिराची जुनी बांधणी बघितल्यास याला एक वाड्याचे रूप देण्यात आले होते ज्यात धाब्याची माडी, चौक आणि छान उंच ओटे होते. म्हणुनच कदाचित याला देवाचा वाडा अर्थात देवाडा म्हणत असावेत.

    गाभाऱ्यात श्री लक्ष्मी वेंकटेश आणि पद्मावती देवीची तांब्याची मूर्ती असून सोबत इतर देवतांच्या पितळी मूर्ती आहेत.
    साधारण देवघरा सारखी घडण आहे.


    आणखी विशेष म्हणजे उंडणगांव मध्ये या देवाला बालाजी सोबत बालासाहेब संबोधले जाते आणि म्हणूनच “लक्ष्मी रमण गोविंदा, बालासाहेब की जय” हा इथला जयघोष इतर कुठे ही बघायला मिळत नाही. यातून देवा सोबतची आपुलकी प्रामुख्याने दिसुन येते.
    काल परत्वे या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यात काही बदल करण्यात आले असले तरी अजूनही गाभारा आणि धाब्याची काही चिन्हे आपल्याला या वाड्याची भव्यता लक्षात आणून देतात.

    देवाड्यात माजी स्वातंत्र्य सैनिक कै. श्री सदाशिव मोदी( मोदी बाबा) पुजारी म्हणून सेवा करत असे आता त्यांचे चिरंजीव श्री वैभव मोदी सेवा करतात.

    देवड्यात अनेक सण-उत्सव प्रेमाने साजरे केले जातात ज्यात वैशाख महिन्यातील बाळाजी उत्सव मुख्य मानल्या जातो
    या उत्सवात खालील गोष्टींचा समावेश होतो

    “देव भक्तांच्या भेटीला”
    वैशाख वद्य नवमीला या उत्सवाची सुरुवात सकाळी ध्वजारोहण आणि मंडप टाकून होते, या ध्वजा साठी लागणारी दोरी, झेंडा, गोंडा इत्यादी साहित्याचा विशेष मान असणारे मानकरी हे वंश परंपरेनुसार ठरवलेले आहेत रात्री पालखी सोहळा होतो आणि गावातील प्रत्येक घरासमोर औक्षण करून देवाचे स्वागत केले जाते, सडा- रांगोळी करून सर्व मुली आणि स्त्रिया आपली कला कुसर देवाला दाखवतात. देवाला कानगी(देणगी) करून प्रसाद स्वरूपी नारळ दिल्या जाते.

    “ओढ भक्तांच्या भेटीची”
    या काळात देवाला भक्तांची भेटीची एवढी घाई असते की गाभाऱ्यात गर्दी होऊन भक्तांच्या भेटीत कसलीही अडचन येऊ नये आणि बिनधास्त दर्शन घेता यावे म्हणून 15 दिवस देवाला गाभाऱ्याच्या दरवाजात विराजमान केल्या जाते.
    या काळात दररोज विष्णू सहस्त्र नाम पठण, लघुरुद्र अभिषेक, पुराण, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. पूर्वीच्या काळी नाटक, नाट्यसंगीत आदी कार्यक्रमातून मोठ्या मोठया कलाकारांना तयार करण्याचे काम ही या देवड्याने केले आहे.(कमलाकर सोनटक्के, ज्ञानेश्वर सोनवणे) असे अनेक नावे सांगता येतील.

    15 दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज अन्नदान केल्या जाते त्यासाठी पुढील 30 वर्षाची बुकिंग झालेली आहे यातून भक्तांची ओढ आणि भक्ती दिसुन येते.


    या उत्सवाचे आणखी महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात कोणी पुरुष मंडळी दाढी कटिंग करत नाही, महिला मंडळी माहेरी आलेल्या सुद्धा 15 दिवस वेस ओलांडून बाहेरगावी जात नाही,नवीन वस्तू,कपडे घेत नाही, लोणचे, पापड, वाळवण करत नाही, घरात तळण केले जात नाही, कोठेही लग्न किंवा इतर शुभ कार्य होत नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्व धर्मीय बांधव हे नियम कठोरपणे पाळतात.


    शेवटच्या दिवशी घरोघरी पाहुणे मंडळी बोलवून आमरस,पुरणपोळी चे जेवन केले जाते आणि लळीत करून आनंदोत्सव साजरा केला जातो.

    वर्षाच्या इतर काळात सुद्धा
    आषाढ महिनाभर रोज लघुरुद्र अभिषेक
    हरिनाम सप्ताह
    भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव त्यात सुद्धा व्याख्यान माला विशेष, आणि त्यात माहेरचा आहेर नावाचा पुरस्कार दरवर्षी दिल्या जातो आणि या गणेशोत्सव साठी लागणारी गणेशाची गोड मूर्ती गावातील प्रसिद्ध डॉ. सतीश खुल्लोडकर स्वतः तयार करतात.

    पूर्वी वेदमूर्ती डॉ. श्री प्रभाकर शास्त्री (झाल्टे) यांच्या रसाळ वाणीतून श्री मदभागवत कथेचे आयोजन केले जायचे त्यातील गोवर्धन सोहळा, कंस वध असे कार्यक्रम आणि त्याचे वर्णन तर ग्रेटच.

    अश्विन महिन्यात नवरात्रात वेंकटेश पुराण व सप्तशती वाचन आणि रोज फुलोरा असतो.
    अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा रोज भल्या पहाटे काकड आरती होते.

    श्री बालाजी च्या मूर्ती या गावातील पाटील समाजाने  त्याकाळी घोड्यावर तिरुपती हुन आणलेल्या असून त्यासाठी सोने चांदीचे दागिने तयार केलेले आहेत त्यातील मुख्य बालाजी मूर्तीच्या गळ्यात घालण्यासाठी हिरे माणिक असलेला हार आहे हे सर्व दागिने उत्सव काळात श्रीना दररोज चढवले जातात आणि त्या काळात गावातील उपाध्ये म्हणजे व्यवहारे कुटुंब त्याचे संरक्षण करते.

    या श्री बालाजी मंदिर (देवाड्या बद्दल) मी सांगू तेवढे कमीच आहे पुढील भागात अजून माहिती सांगेल…

    आमचे भाग्य, पूर्व संचित की आम्ही उंडणगांव मध्ये जन्माला आलो, या गावात आणि देवाड्यात आमचे बालपण सुखात गेले त्या आठवणी शब्दात गुंफने केवळ अशक्य आहे.

    शेवटी एवढेच येते मनात
    नतमस्तक व्हावे श्री च्या चरणात…

    निलेश दिलीपराव(बाळूशास्त्री) झाल्टे, उंडणगांवकर,
    ह.मु. छत्रपती संभाजीनगर

  • होलिकापुजन

    होलिकापुजन- फाल्गुन शुक्ल पौर्णिमा हुताशनी II१५II होलिकापुजन करावे. याकरीता प्रदोषकाळ मुख्य आहे.


    होलिकाप्रदीपनशास्रार्थ- होलिका प्रदिपन भद्रारहित पौर्णिमा-प्रदोषकाळी करावयाचे असते. भद्रारहित प्रदोषकालव्यापिनी पौर्णिमा मिळत नाही. अशा वेळी भद्रामुख सोडून होलिकाप्रदिपन करावे असे धर्मसिन्धूत सांगितलें आहे.


    सायंकाळी होलिकापूजन करतांना प्रथम- आचमन I प्राणायाम II संकल्प- देशकालादि उच्चारुन ‘सहकुटुंबस्य मम ढूंढाराक्षसी प्रीत्यर्थ तत्पीडापरीहारार्थ होलिका पूजनमहं करिष्ये II सुकीं काष्ठें, गोवऱ्या याचा ढीग करुन अग्नीने पेटवावा त्यावर “असृक्पा भयसंत्रस्तं कृत्वा त्वं होलिबालिशै: II अतस्त्वं पूजायिष्यामि भूते भूतिप्रदाभव II” या पूजेच्या मंत्राने “श्रीहोलिकायनम: होलिकां आवाहयामी II असे होलिकादेवीचे आवाहन करावे. “होलिकायै नम:” या मंत्राने आसनादि षोडषोपचार पूजा करावी.

    अग्नींला तीन प्रदक्षणा घालून आचाराप्रमाणे शंखध्वनी, गायन हास्यविनोद करावे.
    राजाने वाद्याचा गजर करुन स्नान पुण्याहवाचन वगैरे करुन होळी प्रदिप्त करावी व दुध, तुप यांनी विझवावी. नारेळ, म्हाळुंगे याचा प्रसाद करावा. नंतर गायनवादन इत्यादि करमणूक करावी. व बीभत्स शब्दानी ढुंढादेवी तृप्त करावी.

    याप्रमाणे पौर्णिमेचा रात्रभर उत्सव करुन दुसऱ्या दिवशी.. अभ्यंगस्नान करून नित्यकर्म आटोपल्यावर अरिष्टाच्या निशार्थ होळीच्या विभूतिला नमस्कांर करावा, म्हणजे सर्व अरिष्टांचा नाश होतो. नमस्कार मंत्र- “वंदितासि सुरेन्द्रेण ब्रम्हणा शंकरेण च I अतस्तां पांहि नो देवि भूते भूतिप्रदा भव II”


    श्री गजानन गुरु गोविंदराव कुलकर्णी

  • परमेश्वराचा नामजप कसा करावा ?

    परमेश्वराचा नामजप कसा करावा ?


    १) सकाळची वेळ सर्वोत्तम. पहाटे न जमल्यास देवपूजा झाल्यावर जप करा कारण देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. पूजेमुळे सात्विकता वाढीस लागते. हात पवित्र होतात. (संत एकनाथ महाराज-एकनाथी भागवत)


    २) कधीही रुद्राक्ष माळेवर जप करा. ( ओरिजिनल, डुप्लिकेट मनातून काढून टाका. ती कालांतराने मंत्राच्या प्रभावाने ओरिजिनल होईल,ती स्वतः दाखवेल मी सिद्ध झालीय -माझा अनुभव ) – श्री गुरुचरित्र. वैष्णव असाल तर तुळसी माळा घ्या. अन्य माळांच्या नादी लागू नका कारण तुम्हाला मोक्ष हवाय सिद्धी नाही.
    ३) जप करायचाय हे निश्चित करा. वेळ एकच ठेवा. आसन उणी घ्या (लोकर). थोडे उंच असूद्यात. जमिनीपासून, विना आसन करू नका. समोर श्री महाराजांचा फोटो राहुद्यात. कारण तेच श्री गुरु आहेत जप हा नेहमी गुरूंच्या सानिध्यात करावा.
    ४) प्रथम फुले वाहून, अगरबत्ती लावून ओवाळून सुंदर लहानसा दिवा लावून ओवाळा. मग सज्ज व्हा.
    ५) भान ठेवा समोर श्री जगतचालक , मोक्षदायक , सर्वशक्तिमान ,सर्व देव त्यांच्या ठायी आहेत असे श्रीमहाराज विराजमान आहेत. आपल्यासाठी वेळ काढून ते आपली साधना करून घेत आहेत. सांसारिक ताप विसरा, ते आपल्याकडे आनंदाने पाहत आहेत असा दृढ भाव ठेवा.
    ६) प्रार्थना करा, स्तुति गा, शास्त्र नियम आहे प्रथम देवी देवता स्तुती किंवा श्री गुरूंना गुरुवंदना करावी ( श्री रुद्र स्तोत्र सर्वोत्तम असे श्री गुरु सांगतात – गुरुचरित्र ) , म्हणजेच स्तुती गा, जयजयकार करा म्हणजे होईल श्री गुरुमूर्ती प्रसन्न आपल्यावर.
    ७) दृष्टी समोर त्यांच्या श्री चरणाकडे………. डोळ्यात नको……… आपण दास आहोत त्यामुळे आपली विनम्रता आपल्या दृष्टीत हवी . आपण शरण आहोत , दीन, आहोत , तृणाप्रमाणे विनम्रता असावी.
    ८) माळ कापडाच्या गोमुखींत ठेवा (पूजेच्या दुकानात मिळेल किंवा मंदिराबाहेर, तीर्थक्षेत्र ठिकाणी) कारण पितर , अदृश्य शक्ती आपल्या जपाचे फळ, तेज आपल्यापासून हिरावून घेतात आणि स्व मुक्ती साठी वापरतात. (अनुभवावरून) म्हणून साधनेत प्रथम कवच वाचतात ..नंतर याचा उपद्रव होत नाही.
    ९) तुमचे मुख ईशान्य दिशेला हवे. शक्यतो ईशान्य दिशेला बसायला न जमल्यास चालेल कोठेही, पण जपमात्र करा.
    १०) उजवा हात त्यामधील अंगठयापासून २ नंबरचे बोट (तर्जनी) गोमुखींच्या बाहेर बाजूला काढा म्हणजे माळेला स्पर्श करू देऊ नका.

  • शिट्टी वाजली तरच खेळ संपेल ना??

    स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    एकदा मी शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक स्थानिक फुटबॉल सामना बघितला होता.

    तिथे बसल्यावर मी एका मुलाला विचारले की स्कोर काय आहे?

    त्याने हसून उत्तर दिले,“ते आमच्यापेक्षा ३-० ने आघाडीवर आहेत.”

    मी म्हणालो,”खरंच..!”

    म्हणजे मला म्हणायचे आहे तुम्ही निराश वाटत नाही.

    “निराश!!” त्या मुलाने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं.

    मी निराश का होईन..!अजून पंचांनी खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी वाजवलेली नाही.

    माझा संघावर आणि संघ व्यवस्थापकांवर पूर्ण विश्वास आहे,आम्ही नक्कीच जिंकू.

    खरोखरीच तसेच झाले,खेळ त्या मुलाच्या संघाने ५-४ च्या आघाडीने जिंकला.

    त्याने एका स्मित हास्यासह सावकाश माझ्याकडे बघून हात हलवला आणि तो निघून गेला.

    मी आश्चर्याने,आ वासून बघतच राहिलो,
    असा आत्मविश्वास…
    इतका ठाम विश्वास..!

    त्या रात्री मी घरी परत आल्यावरही,त्याचा प्रश्न माझ्या मनात घुमत होता;
    मी निराश का होईन?अजून पंचांनी खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी वाजवलेली नाही.

    आयुष्य हे सुद्धा एका खेळासारखे आहे, शेवट पर्यंत धैर्याने सामोरे जा…

    जीवन अजून संपलेलं नसतांना निराश का व्हायचं?
    शेवटची शिट्टी वाजत नाही,तोपर्यंत आशा का सोडायची.

    खरी गोष्ट अशी की बरेच लोक खेळ समाप्तीची शेवटची शिट्टी स्वतःच वाजवतात.

    जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत काहीही अशक्य नाही,आणि तुमच्यासाठी कधीही फार उशीर झालेला नसतो.

    अर्धवेळ म्हणजे पूर्णवेळ नसते.

    स्वतःच शिट्टी वाजवून खेळ समाप्त करू नका.धीर सोडू नका. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. Do ur Best. U can
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • Mobile Number Changed ?? Risk Hai…

    आपण मोबाईल नंबर बदलतो, त्यामुळे आपले काय नुकसान होते

    नुकतेच एका महिलेचे तिच्या बँक खात्यातून ८,१६,०००/- रुपये गायब करण्यात आले.

    हे नक्की घडले कसे ?

    १. या महिलेने तिच्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक केला होता. तो नंबर तिने 4 वर्षे वापरला नाही.

    २. पण तिच्या KYC मधून ते हटवण्यासाठी बँकेला कळवले नाही.

    ३. आता, ती वापरात नसलेल्या मोबाईल सिम नंबर मोबाईल कंपनीने बंद केला आणि दुसऱ्या व्यक्तीला दिला.

    ४. मोबाइल कंपनी पॉलिसीनुसार, जर कोणताही नंबर तुम्ही ६ महिन्यांपर्यंत वापरला नाही तर तो दुसऱ्याला देवु शकतात.

    ५. आता बँकेचा नियमित येणारा एसएमएस ज्याला नवीन नंबर मिळाला होता त्याला यायला लागले. त्याने काय केले ? तर त्याने एका लिंकद्वारे बँकेच्या साइटवर प्रवेश केला. आणि फरगेट पासवर्ड असे लिहिले. आता बँकेकडून आलेल्या लिंकचा OTP सत्यतेसाठी त्याच्या ताब्यात असलेल्या नंबरवर गेला, त्याने औपचारिकता पूर्ण केली आणि इंटरनेट बँकिंगद्वारे आनंदाने सर्व पैसे काढले.

    त्यामुळे, बँक खात्याशीस काय पण आपण वापरत नसलेला किंवा बंद केलेला आपला जुना नंबर आपण कोठेही लिंक केलेला असेल तर, बँकिंग नियमानुसार बँकेत जाऊन तो नंबर डीलिंक करावा लागेल.

    कृपया वरील बाबी लक्षात घेता. आपला सहा महिने वापर न केलेला मोबाइल नंबर दुसऱ्याला रिअलॉट केला जाऊ शकतो.

    ही वस्तुस्थिती आपल्यापैकी अनेकांसाठी नवीन माहिती असू शकते.
    खुप महत्त्वाची गोष्ट आहे. नक्की विचार करा

  • श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती

    जय श्री कृष्ण – सर्वांचे लाडके प्रभू भगवान श्रीकृष्ण, नटखट गोपाल त्यांची माहिती आपल्याला सर्वाना असलीच पाहिजे

    तेव्हा जाणून घेऊ चला भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती

    श्रीकृष्ण प्रभूंबद्दल महत्वाची माहिती

    १) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला
    २) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व
    ३) महिना: श्रावण
    ४) दिवस: अष्टमी
    ५) नक्षत्र: रोहिणी
    ६) दिवस: बुधवार
    ७) वेळ: १२:०० रात्री
    ८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस आयुष्य.
    ९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व
    १०) जेव्हा कृष्ण ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध) झाले.
    ११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.
    ११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते.
    १२) २१ डिसेंबर १३३९ ईसा पूर्व रोजी “दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.)
    १३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ ईसा पूर्व अवतार समाप्ती.

    कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते.
    मथुरेत कृष्ण, कन्हय्या
    ओडिशामध्ये जगन्नाथ
    महाराष्ट्रात विठ्ठल ,विठोबा
    राजस्थानमध्ये श्रीनाथ
    गुजरातमध्ये द्वारकाधीश
    गुजरातमध्ये रणचोछोड
    कर्नाटकातील उडुपी, कृष्णा
    केरळमधील गुरुवायुरप्पन

    जन्म ठिकाण:- मथुरा
    जन्मदाते माता पिता:- देवकी, वासुदेव
    संगोपन करणारे पालक:- यशोदा, नंद
    बहीण भाऊ:- सुभद्रा, बलराम,(द्रौपदी मानलेली बहीण.)
    गुरु, शिक्षक:- ऋषी संदिपनी
    जिवलग मित्र:- सुदामा

    धर्मपत्नी ८:- रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मना (शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.)

    कृष्णाची मुले:- एकूण ८०

    श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.

    श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु.

    श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु.

    श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती.

    श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक.

    श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०): प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित.

    श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि.

    श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०):- संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.

    राधा:- राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे,’ असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती.

    श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तु

    आवडती फुल:- फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फुल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे)

    प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्री कृष्ण हे उत्तम (रथाचा) सारथी होते.

    शंख:- शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.

    आयुधं:- त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.

    बासरी:- कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती .

    मोरपंख:- रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे.

    शिक्षण:- श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.

    कार्य:- कुरुक्षेत्र च्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. (म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यकी होता ज्याला भुतकाळ आणि भविष्यकाळ माहित होते तरी सुध्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले.श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे.

    गीता उपदेश:- महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.

    श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण

    कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणार-निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम. ज्याला अंतरंग कळलं-त्याच्यातील सुष्ट-दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो-कर्तव्याच्या पालनासाठी. वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत. वाढ म्हणजे आकाराची-बाहेरची-शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी. “कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं.”
    “मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते.” गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे. “अहंकार, मग तो सत्ता संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही.” सर्वांहून ज्ञानाचा-अद्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन.

    अवतार समाप्ती:- महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीच वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णांची अवतार समाप्ती इ. स. पू. ५५२५ या वर्षी झाला

    यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवति भारत।
    अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम्।।
    परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम्।।।
    धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे।।।।
    🙏🕉️🙏
    श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय …

  • श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!!

    श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!!

    ★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.

    ★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.

    ★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.

    ★अध्याय ४:- स्त्री छळणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.

    ★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.

    ★अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.

    ★अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.

    ★अध्याय ८:- बुध्दिमांद्य नाहिसे होतात. विवाह कार्य सुलभ होते.

    ★अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.

    ★अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.

    ★अध्याय ११:- वाचादोष तसेच,वेड नाहीसे होते.

    ★अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.

    ★अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.

    ★अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.

    ★अध्याय १५:- तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.

    ★अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.

    ★अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.

    ★अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.

    ★अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.

    ★अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी , पूजा करी वो गुरुचरणी , तुझे पाप होईल धुनी , ब्रह्मासमंध परिहरेल!!

    ★अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .

    ★अध्याय २२:- वांझपण दूर होते . बाळणतिनिला चांगले दूध येते.

    ★अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.

    ★अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.

    ★अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.

    ★अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.

    ★अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.

    ★अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.

    ★अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.

    ★अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.

    ★अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.

    ★अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.

    ★अध्याय ३३:- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.

    ★अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.

    ★अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.

    ★अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.

    ★अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.

    ★अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात , अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.

    ★अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .

    ★अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.

    ★अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.

    ★अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.

    ★अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.

    ★अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.

    ★अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.

    ★अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.

    ★अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.

    ★अध्याय ४८:- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.

    ★अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो . सर्व पापांचे समान होते.

    ★अध्याय ५०:- ग्रंथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.

    ★अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.

    ★अध्याय ५२ :- श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

    गुरुदेव दत्त

  • प्रसाद मिळतोच – देवाला काळजी

    देवाला काळजी’ असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला प्रसाद मिळतो व दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत एक दृष्टांत सांगतो. एके ठिकाणी,
    विष्णुसहस्रनामाचे पारायण सुरू होते.

    अनेक लोक नित्यपारायणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत. असेच एके दिवशी, पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली. सगळे भाविक शिस्तबद्धपणे एका रांगेत उभे होते. सेवक प्रसाद वाढण्यासाठी उभे राहिले. तेवढ्यात एक फाटक्या वेषातील व्यक्ती, हातात भले मोठे पात्र घेऊन पुढे आली आणि प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करू लागली. सेवकांनी तिला रांगेने ये सांगितले. परंतु, ती व्यक्ती अरेरावी करू लागली आणि चर्चेचे पर्यवसान वाद-विवादात झाले. सेवक त्या व्यक्तीला मठाधीपती यांच्याकडे घेऊन आले. स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिले आणि त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल विचारणा केली. स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती म्हणाली, ‘स्वामीजी, माझ्या घरात सहा लहान-लहान मुले आहेत. ती उपाशी आहेत. त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे.’
    ‘अरे, पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होता ना?’- स्वामीजी उत्तरले.
    ‘काय सांगावं? भली मोठी रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असता तर? मी आणि माझी मुले उपाशी राहिलो असतो. म्हणून मी घुसखोरी केली. मला प्रसाद द्या स्वामी….’
    स्वामींनी सेवकांना सांगून व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला. प्रसाद सोपवताना स्वामीजी म्हणाले, ‘तू इथे विष्णुसहस्रनाम म्हणायला येत होतास ना, थोडेसे मलाही म्हणून दाखवतोस?’ तोंडघशी पडणार, या भीतीने त्या व्यक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.


    ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभु:।
    भूतकृद् भूतभृद् …..


    एवढे म्हणून ती थांबली. कारण पुढचे स्तोत्र पाठ नव्हते. त्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दाचा आधार घेत स्वामीजी म्हणाले, ‘तुला १००० नावांपैकी फक्त ६ च नावे पाठ आहेत? त्या सहाव्या नावावर लक्ष केंद्रित कर. ‘भूतभृद्’ म्हणजे, अशी व्यक्ती, जी अखिल विश्वाचा सांभाळ करते, पोषण करते. तुला जर, हा अर्थ उमगला असता, तर तू अशी कृती केली नसती आणि परमेश्वरावर भार टाकला असता. म्हणून प्रत्येक नामाचे महत्त्व समजून घे आणि संपूर्ण विष्णुसहस्रनाम आत्मियतेने पाठ करून दररोज भगवंताचे स्मरण कर. ती व्यक्ती खजिल होऊन प्रसाद घेत निघून गेली. स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे भक्तीभावाने विष्णुसहस्रनामाचे पठण करू लागली. मठात सामुहिक पठण आणि प्रसादाचे वाटप सुरू होते. मात्र, काही दिवसात एक अजबच घटना घडू लागली. भंडारा वाटून संपेपर्यंत भगवान कृष्णासमोर ठेवलेला नैवेद्य गायब होऊ लागला. सेवकांनी ही बाब स्वामीजींच्या कानावर घातली.

    स्वामींना अचानक त्या दीन व्यक्तीची आठवण झाली आणि विचारपूस केल्यावर, त्या व्यक्तीचे येणे बंद झाले, असे कळले. सेवकांना त्या व्यक्तीवर संशय आला. स्वामीजींनी त्या व्यक्तीची भेट घ्यायची, असे ठरवले. ती व्यक्ती नदीच्या पलीकडे असलेल्या गावात राहत होती. स्वामीजी येताच ती नम्रपणे उभी राहीली आणि नतमस्तक झाली. स्वामीजींनी तिची ख्यालीखुशाली विचारली आणि मठात न येण्याचे कारण विचारले. आपण घरीच स्तोत्रपठण करतो, असे ती म्हणाली. कुटुंबाच्या पालपोषणाचे काय? असे विचारले असता, ती व्यक्ती म्हणाली…’स्वामीजी! विष्णुसहस्रनामाचे पठण सुरू केल्यापासून एक तरुण रोज प्रसादपात्र घेऊन येतो आणि तो आपला सेवक आहे असे सांगतो. आपण एवढी कृपादृष्टी ठेवलीत, धन्य झालो.’ यावर स्वामीजी म्हणाले, ‘मी कोणीही सेवक पाठवला नाही. स्वयं परमात्मा तुमची क्षुधाशांती करण्यासाठी सेवकरूपाने तुझ्या द्वारी आला. हे तुझ्या श्रद्धेचे आणि भक्तीचे फळ आहे. भगवंतावर अशीच श्रद्धा कायम ठेव. कारण, तोच या जगाचा पालनकर्ता आहे.

  • फटाक्यांची सुरक्षिता

    फटाक्यांची सुरक्षिता महत्वाची…………..
    निमित्त दीपावलीचे असले तरी फटाक्यांची सुरक्षिता महत्वाची…………..
    👉 असे करा ………….
    1) फटाके वडीलधाऱ्या मंडळींच्या उपस्तिथ वाजवावेत.
    2) मोठ्या व्यक्तींचे लहान मुलाकडे लक्ष असेल तर दुर्घटना घडल्यास तातडीने उपाय योजना करता येतील.
    3) फटाके उघड्या पंटांगनातं फोडावेत,त्यामुळे आजूबाजूच्या वस्तुंना आग लागण्याची शक्यता कमी होते.
    3) मोठे फटाके,बॉम्ब,तोटे,रॉकेट,भुंगा या प्रकाराची फटाके लहान मुलांना फोडण्यासाठी देऊ नयेत.
    4) फटाके शरीरा पासून सुरक्षित अंतरावर प्रज्वलित करावेत.
    5) पादत्राणे घालूनच फटाके वाजावेत.
    6) फटाके फोडण्याच्या जागेवरच थंड पाण्याची बकेट भरून ठेवावी जेणेकरून दुर्देवाने कोणास भाजले तर त्याच्या जखमेवर ताबडतोब पाणी टाकता येईल.
    👉 असे करू नका…..
    1) फटाके शिलगवताना वाकू नका,फाटक्या पासून येणारी ठिणगी डोळ्यात जाऊन अंधत्व येऊ शकते.
    2) न फुटलेले,न वाजलेले फटाके पुन्हां लावण्याचा प्रयत्न करू नका,कारण असे करत असतांना अचानक फटाका फुटून शरीरास इजा होऊ शकते.
    3) नायलॉनचे व ढगळ कपडे घालून फटाके वाजवू नका .
    4) फटाके हातात धरून फोडण्याचा प्रयत्न करू नका.विशेशत झाड किंवा अनार हातामध्ये फुटून गंभीर जखम होण्याचे प्रकार नेहमी होतात.
    5) अंगावरील कपड्यात फटाके साठवू नका
    6) मोठा आवाज करणारे किंवा कोणत्याही अनियंत्रित दिशेने वेगाने फुटणारे फटके फोडू नका.
    💉💉💉💉💉💉💉💉
    प्रथोमपचार
    1) भाजलेल्या जखमेवर ताबडतोब थंड पाणी टाका, मात्र बर्फ वापरू नये,पाणी टाकल्याने त्वचेचे तापमन कमी होऊन जखमा खोलवर जात नाहीत.
    2) जखमेवर स्वच्छ सुती कापड,बेडशीट टाका.
    3) जखमेवर फोड आल्यास हे मात्र चांगले लक्षन आहे,असे फोड स्वतः फोडू नका.
    4) वैदयकीय उपचार घ्यावेत.
    ✨ सुरक्षित दिवाळीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💥💥💥💥💥🙏🙏😊💐