रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाही

रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाही
दिवसभर बांधू शकतात राखी

🙏🏻🙏🏻🍁🍁🍁🍁🍁🍁🙏🏻🙏🏻

यावर्षी रक्षाबंधनाला भद्रा असल्याने रक्षाबंधन होऊ शकणार नाही अशी अफवा सोशल मीडियावर येते आहे. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा मकर राशीत आहे मकर राशीतील भद्रा स्वर्गात असते त्यामुळे रक्षाबंधनाला ती अशुभ नाही.
अनादी काळापासून श्रावण शुद्ध पौर्णिमा या रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या रक्षणासाठी भावाला आणि ब्राह्मण वर्ग आपल्या यजमानाला रक्षासूत्र बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवीत असतो. ज्योतिष विज्ञाना नुसार भद्रा ही वेगवेगळ्या राशीनुसार तीन लोकात फिरत असते. भद्रा ज्यावेळी चंद्र कर्क सिंह कुंभ मीन राशीत असेल त्यावेळी पृथ्वीवर असते, त्यावेळी ती शुभ कार्याला बाधक किंवा अशुभ असते. त्यामुळे 11 तारखेला सकाळी दहा वाजून 39 मिनिटांनी पौर्णिमा लागते तेथून दुसऱ्या दिवशी 12 तारखेला सकाळी 7.05 मिनिटां पर्यंत रक्षाबंधन साजरे करता येणार आहे. त्यातील दुपारी 12:20 ते 3:20 आणि संध्याकाळी 4:50 6:20 हा कालावधी अधिक शुभ आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही सोशल मीडियाच्या पोस्टला घाबरून रक्षाबंधना विषयी गैरसमज ठेवू नये.

भद्रा विचार
स्वर्गे भद्रा शुभं कुर्यात् पाताले च धनागमम्।
मृत्युलोके स्थिता भद्रा सर्वकार्यविनाशिनी ।

1) कुंभ-मीन-कर्क-सिंह =मृत्युलोक भद्रा
2)मेष-वृषभ-मिथुन-वृश्चिक =स्वर्गलोक
3) कन्या-तुला-धनु-मकर =पाताललोक

भद्रा ज्या लोकात असतात तिथे प्रभाव टाकतात.

पौर्णिमेला श्रवण नक्षत्र असुन मकर रास आहे – भद्रा पातालात आहे ..मृत्युलोका सणावर परिणाम कसा होईल व रक्षाबंधनाचा भद्रासी कसा योग येईल …

🙏🏻🙏🏻🙏🏻🍁🍁🍁🍁🙏🏻🙏🏻🙏🏻

नमस्कार , चार दिवसापासून रक्षाबंधन या सणाबद्दल खूप उलट सुलट मेसेज सोशल मीडियावर येत आहेत , त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच नाही तर तज्ञ व्यक्तींच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण होत आहेत . वास्तविक आपले सणवार हे आनंदासाठी भक्तीसाठी साजरे केले जातात . परंतु आजकाल प्रत्येक सणाच्या वेळी काहीतरी वेगळे सांगून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रकार निदर्शनाला येत आहे . वास्तविक आपल्या धर्मशास्त्रात सर्व माहिती , सर्व ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने परंतु शास्त्रानुसारच दिलेली असते . आज तितके वाचन करणे , त्याचे मनन करणे व ग्रंथ उपलब्ध करणे सर्वांना शक्य होत नाही . परंतु एखादा व्यक्ती अशाच कोणताही वेगळा ग्रंथ प्रमाण मानून त्यानुसार धर्मनियम थोपवत आहेत . महानुभव पंथातील हत्ती व आंधळ्यांची गोष्ट सर्वांना माहिती आहे . हत्तीचे सोंड पाहिलेला आंधळा म्हणतो हत्ती झाडासारखा आहे , पोट पाहिलेला म्हणतो हत्ती नगाऱ्या सारखा आहे , कान पाहिलेला म्हणतो हत्ती सुपासारखा आहे . परंतु या सर्वांचा मिळून हत्ती होतो हे ते लक्षात घेत नाही . तसेच एखाद्या ग्रंथात काही वेगळा उल्लेख असेल तर त्या मागचे कारण किंवा अभ्यास आपल्याकडून होत नाही . इतके दिवस पिढ्यान पिढ्या आपण जे पंचांग वापरतो त्यामध्ये दिलेले मुहूर्त ग्राह्य मानले जात होते . परंतु या सोशल मीडियामध्ये मात्र प्रत्येक जण धर्म तज्ञ होऊन वेगवेगळे मेसेज प्रसारित करत आहेत . त्यामुळे वैचारिक गोंधळ माजून सणाबद्दल शंका कुशंका निर्माण होत आहेत . इतकेच नाही तर धर्मग्रंथ जे पूजनीय मानले जात होते त्याबद्दल सुद्धा शंका निर्माण होत आहेत . वास्तविक आपल्या शंकराचार्यांनी किंवा धर्मसभेने किंवा धर्म मार्तंडाणी याबद्दल निर्णय घेणे व शंका दूर करणे गरजेचे असते . परंतु ते सर्वजण मूक गिळून गप्प बसलेले आहेत व सर्वसामान्य व्यक्ती एकमेकांशी वाद करत आहेत . हे धर्म दृष्टीने अत्यंत चुकीचे होत आहे . आपण रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या प्रेमासाठी व आनंदासाठी साजरा करतो , तो काही फार मोठा विधी नाही किंवा यज्ञयाग नाही त्यामुळे फार बारकाईने त्याबद्दल विचार करणे चुकीचे आहे . रूढी परंपरा अशा आहेत की विप्र रक्षाबंधनापूर्वी आठ दिवस पासून घरोघरी जाऊन यजमानांना राखी बांधतात . रक्षाबंधनाच्या दिवशी जर राखी बांधली गेली नाही तर पुढे महिनाभर कधीही बहिणीकडे जाऊन राखी बांधतात . रक्षाबंधन हा सण आनंदाचा बहीण भावाचा प्रेमाचा आहे असे विचित्र मेसेज सोशल मीडियावर आल्यामुळे त्या सणाचा आनंद लोप पावतो . पंचांग कर्ते आपल्याला जो निर्णय देतात तो आपण आजपर्यंत पाळत आलेलो आहोत , कारण सर्व विचार करून पंचांगात मुहूर्त दिलेले असतात . त्यामुळे आपण खूप बारकाईने त्यावर विचार करण्याची गरज नाही असे माझे स्पष्ट मत आहे . सर्वांनी उद्या दुपारनंतर आनंदाने राखीपोर्णीमा साजरी करावी असे मला वाटते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top