Category: informative

  • Different things about Chatrapati Shivaji Maharaj

    छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच राजकिय गोष्टी सांगितल्या जातात….!
    1.अफजलखानाचा कोथळा
    2.शाईस्तेखानाची बोटे
    3.आग्राहून सुटका


    पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात….!


    1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज “सामाजिक क्रांती” करणारे होते…!
    2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे “लोकपालक” राजे होते…!
    3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे “उत्तम प्रशासक” होते…!
    4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे “पर्यावरण रक्षक” होते…!
    5.समुद्र प्रवास करण्यास धर्म शास्त्रात बंदी होती. तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे “स्व-धर्मचिकित्सक” होते …!

    1. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून ” अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे चिकीत्सक राजे”
    2. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! “जलतज्ञ” राजे छत्रपती शिवराय!!
    3. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे १०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, “उत्तम अभियंते राजे”
    4. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!
    5. परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे “मातृभक्त, नारीरक्षक” छत्रपती शिवराय

    खऱ्या अर्थाने ते “लोकराजे” होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती…..!

  • Tips to live 100 years

    १०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र

    १) वात २) पित्त ३) कफ
    वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
    आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे ?

    त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा, जादु होईल

    १) *सकाळी लवकर उठावे म्हणजे *ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० या वेळेत उठावे.*

    २) दात घासण्याआधी *कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे *१- ३* ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)

    ३) पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातिर्विधी करुन घ्यावा.

    ४) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
    दंत रोग दूर राहतात

    ५) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरु नये.

    ६) सकाळी ७.३० ते ९.३० च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
    जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.

    ७) जेवणाच्या अगोदर *४५ *मिनीट आणि *जेवणानंतर *१ * तासाने पाणी प्यावे.* जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.

    ८) सकाळी फळांचा ज्युस प्या दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या आणि झोपताना देशी गाईचे दूध, देशी गाईचे तूप व हळद टाकुन प्या.
    ९) नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून, गड़बडीने पाणी पिऊ नये.
    ( शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

    १०) नेहमी जेवण केल्यावर १० ते १५ मिनीटे वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीटे झोपावे) घ्यावी. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर ३ तास झोपू नयेशतपावली करावी.

    ११) ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये. ॲल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय.

    १२) भोजन करतांना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या, पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.

    १३) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत, आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले, पोटावर झोपु नये.

    १४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
    *लाकडी घाण्याचे तेलच वापरा. * (रिफाईन्ड तेल/ डबल रिफाईन्ड विष आहे)*

    १५) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा. (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)

    १६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.

    १७) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

    १८) कमीत कमी ६ ते ७ तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.

    १९) दररोज एक तास प्राणायाम, १५ मिनीट योगासने, व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे.

    २०) प्राणायाम मात्र नियमित करणेच चांगले.

    २१) रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा. तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी, कोबी यांचा वापर करावा.

    २२) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे, उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील.

    २३) भारतीय रस म्हणजे उसाचा रस, कोकम सरबत,आवळा रस, लिंबू सरबत, फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत.

    २४) भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो पांढराच असावा.

    २५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
    लघवीला आली की थांबवू नये, बसूनच लघवी करावी, अश्रू बाहेर येवू द्यावेत, * रडायला आले तर ऱडावेच, हसायला आले की भरपुर हसावे, जांभई आली की द्यावीच, शिंक आली की बिनधास्त द्यावी , अपानवायू आला की तसाच बाहेर येऊ द्यावा,

  • Find my phone

    चोरीला गेलेला फोन आता झटक्यात करता येणार ट्रॅक, कसं ते जाणून घ्या…..

    चोरीला गेलेला फोन आता झटक्यात करता येणार ट्रॅक, कसं ते जाणून घ्या

    अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुम्हाला तुमचा फोन हरवल्यावर त्याला शोधण्यात मदत करतील.

    मुंबई : स्मार्टफोन ही एक अशी गोष्ट आहे जी, आजकाल सगळ्याच लोकांकडे आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच लोकांकडे फोन आहे. परंतु बऱ्याचदा लोकांच्या हातातून फोन विसरल्याच्या किंवा हरवल्याच्या घटना घडतातय असं तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरच्यांसोबत घडलं असावं. परंतु तुम्हाला माहितीय? सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये अशी टूल्स असतात, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन सुरक्षित ठेऊ शकता. यासोबतच याच्या मदतीने स्मार्टफोन्सही सहज ट्रॅक करता येतात. चला अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुम्हाला तुमचा फोन हरवल्यावर त्याला शोधण्यात मदत करतील.

    प्रथम काय करावे…..?

    प्रथम आपण आपल्या फोन नंबरवर कॉल करणे आवश्यक आहे. तुमचा फोन कदाचित हरवला नसेल, पण तुम्ही तो कुठेतरी सोडला असेल. अशा परिस्थितीत, आपण इतर कोणत्याही नंबरवरून फोनवर कॉल करून ते सहजपणे शोधू शकता. जर एखाद्या व्यक्तीच्या हातात तुमचा फोन आला तर तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकतो.

    समजा तुम्ही स्मार्टफोनवर कॉल केला आहे आणि तो बंद आहे. अशा स्थितीत तुम्ही प्रथम फोन लॉक करावा. तसे, तो Android स्मार्टफोन असो किंवा आयफोन, दोन्ही मूलभूत सुरक्षा वैशिष्ट्यांसह येतात. याशिवाय, तुम्ही तुमचा फोन इतर मार्गांनीही लॉक करू शकता जेणेकरून इतर कोणीही तुमचा डेटा ऍक्सेस करू शकणार नाही.
    यासाठी, आयफोन वापरकर्त्यांना प्रथम दुसऱ्या डिव्हाइसवर लॉग इन करावे लागेल आणि फोनवर लॉस्ट मोड सक्रिय करावा लागेल. तसेच तुम्ही Find My iPhone पर्याय वापरू शकता.
    दुसरीकडे, तुम्ही Android वापरकर्ता असल्यास, तुम्ही Android डिव्हाइस व्यवस्थापक वापरू शकता. त्याच्या मदतीने तुम्ही Find My Device पर्याय वापरू शकता. तसेच याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनमधील डेटा देखील हटवू शकता.

    जर तुमच्या फोनमध्ये GPS चालू असेल, तर Find My Device हा पर्याय तुम्हाला मदत करू शकतो. अँड्रॉइड डिव्‍हाइसमध्‍ये, तुम्‍हाला अंगभूत लोकेशन ट्रॅकिंग सेवा मिळते, ज्याच्‍या मदतीने तुम्ही तुमचा फोन ट्रॅक करू शकता. परंतु जर तुमच्या डिव्हाइसचा GPS बंद असेल, तर हा पर्याय तुम्हाला मदत करू शकणार नाही.

    Find My कसे वापरावे….?

    प्रथम तुम्हाला iPhone वर जाऊन Settings > [your name] > Find My वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमच्या ऍपल आयडीने साइन इन करावे लागेल.
    साइन-इन केल्यानंतर, तुम्हाला Find My iPhone वर टॅप करून ते सक्षम करावे लागेल.
    Find My Network च्या मदतीने फोनमध्ये नेटवर्क नसले तरीही तुम्ही तुमचे डिव्हाइस शोधू शकाल.

    Find My Network ऑन केल्याने, फोन बंद केल्यानंतरही वापरकर्ता 24 तासांसाठी त्याच्या डिव्हाइसचे स्थान ट्रॅक करू शकतो. तुमच्याकडे दुसरे Apple डिव्हाइस नसल्यास, तुम्ही iCloud.com वापरून तुमचे डिव्हाइस शोधू शकता.

    Android वापरकर्ते काय करु शकतात…..?

    Google वापरकर्त्यांना प्रथम android.com/find वर ​जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या Google खात्याने साइन इन करावे लागेल.
    यानंतर, वापरकर्त्यांना स्क्रीनच्या शीर्षस्थानी सापडलेल्या लॉस्ट फोनच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
    तुमच्या फोनवर एक सूचना पाठवली जाईल, त्यानंतर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर फोनचे लोकेशन पाहू शकाल.

    याच्या मदतीने तुम्ही फोनचा डेटा सहजपणे डिलीट करू शकता. वापरकर्ते फोनवरून iCloud आणि Google खात्याचा सर्व डेटा हटवू शकतात. मात्र, हे केल्यानंतर तुम्ही तुमचा फोन पुन्हा ट्रॅक करू शकणार नाही. त्यामुळे ते करताना आधी विचार करा.

  • Good Signals

    हे शुभ संकेत लक्षात घ्या ..

    अनेक लोकांसोबत असे घडते की, कपडे घालताना खिशातून पैसे पडतात.
    तसं पाहायला गेलं तर ही सामान्य घटना आहे.
    परंतु ज्योतिषच्या शकुन-अपशकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते.

    शकुन शास्त्र ज्योतिषमधील एक सहायक ग्रंथ मानला जातो.
    आजही कुठे न कुठेे या गोष्टींचे अस्तित्व आहे. या

    असेच काही संकेत आज आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.

    १)खिशातून नाणे खाली पडणे :
    कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे. तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते, यासाठी तयार राहावे.

    २)घरातील नारळ आपोआप तडकणे :

    घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असली आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की, घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे. तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही.

    ३)घरामध्ये आपोआप तुळस उगवणे :

    तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा. घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे.

    ४)आपोआप दुर्वा उगवणे :

    घरातील बागेमध्ये दुर्वा (श्रीगणेशाला अर्पण करण्यात येणारे एक गवत) उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत.

    ५)घरामध्ये मध पडणे :

    घरामध्ये मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पसरल्यास समजावे की, घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्हएनर्जी राहिलेली नाही. घरामध्ये एखादे मंगलकार्य होऊ शकते.”

    काही घटनांबाबत शुभ संकेत,

    घटनांचा आणि मनुष्याचा आपसात फार जवळचा संबंध असतो. हे वेळे अनुसार व्यक्ती सोबत घडत असते. यापैकी अनेक घटना जीवनामध्ये सुख घेऊन येतात तर अनेक घटना समस्यांची चाहूल करून देतात. आपण बहुतेक वेळा आपल्या आयुष्यात होणाऱ्या घटनांना सामान्य पणे घेतो आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. यापैकी अनेक घटना आपल्याला भविष्यात घटणाऱ्या गोष्टींचा संकेत देत असतात.

    आजच्या या पोस्ट मध्ये अश्या काही परिस्थिती बद्दल म्हणजेच घटनांबद्दल काय संकेत असतात हे आपण जाणून घेऊ. या घटना भविष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टीचे संकेत मानले जातात.

    या घटना आपल्या समोर कोणत्याही रूपाने समोर येऊ शकतात पण वेळीच यांना ओळखणे महत्वाचे आहे. या घटना आपल्यासाठी कधी शुभ असतात तर कधी अशुभ असतात. या घटना आपल्या जीवनाला प्रभावित करतात.

    तर चला जाणून घेऊ चांगल्या भविष्याचे किंवा चांगला काळ सुरु होण्याचे ईश्वर आपल्याला काय संकेत देतो.

    १) चिमणीचे घरात घरटे बनवणे

    चिमणी ने आपल्याला घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानले जाते. असे मानले जाते कि जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे आपले पिल्ले जन्माला घालते तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे. या संकेता नंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात आहोत आणि घरा पासून संकटे दूर राहतात. त्यामुळे चिमणीचे आपल्या घरा मध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो.

    २)सकाळच्या वेळी मांजरीचे पिल्ले दिसणे

    सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही खुशखबर मिळाली तर आपला पूर्ण दिवस आनंदात जातो तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीचे पिल्ले नजरेस पडली तर हे त्याच्या आणि कुटुंबासाठी हा शुभ संकेत आहे. जर आपल्या सोबत असे घडले तर असे समजावे कि आपला चांगला काळ लवकरच सुरु होणार आहे.

    ३) मुंग्याचे समूहात दिसणेमुंग्या एवढी मेहनत कदाचित कोणीही करत नसेल. त्याच सोबत मुंग्या एकतेचे प्रतीक देखील मानले जाते त्यांना अनेक वेळा समूहाने एका लाईन मध्ये चालताना आपण पाहिले असेल. जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्याचा समूह दिसला तर हे आपल्यासाठी शुभ काळाचे संकेत आहेत. या संकेताचा अर्थ आपल्या आयुष्यात लवकरच खुशखबर येणार आहे आणि यश मिळण्यासोबतच धनप्राप्ती देखील होणार आहे.


    इतर काही शुभ संकेत

    एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट पटकन आपल्या समोर येऊन निघून जाते. आपलं त्या वस्तूकडे फारसं लक्षही नसतं. पण बऱ्याचदा या वस्तू समोर दिसल्यामुळे येत्या काही काळात काहीतरी चांगलं घडणार असतं. त्याचे ते संकेत असतात. आता हा मानण्यातला भाग असला तरी पूर्वजांनी जे लिहून ठेवलंय त्यानुसार काही वस्तू, काही गोष्टी दिसल्या तर त्या शुभ मानल्या गेल्या आहेत. त्यांचाच हा परामर्श…

    १) रस्त्यात पांढरी गाय दिसणं शुभ मानलं जातं. हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिलेला आहे. गाय आर्थिक सुदृढीकरणाचं प्रतीक आहे. त्यामुळे कोठेही सफेद गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचं दर्शन झाल्याचं समजलं जातं.

    २) सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजेच श्रीफळाचं दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे ते संकेत असतात. कारण नारळाला हिंदुस्थानच्या सामाजिक परंपरेत शुभ मानलं जातं.

    ३) प्रवास करतानाही काही शुभ संकेत असतात. पण ते आपल्या लक्षात येत नाहीत. कधी प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो.

    ४) सोनेरी साप दिसणंही चांगलं असतं म्हणे. रात्री झोपतांना जर पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर तो एक शुभ संकेत असल्याचं मानायला काहीच हरकत नाही. काहीजणांना याचा चांगला अनुभव आलाय.

    ५) हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला कुणालाही आवडेल. पण हाच निसर्ग जर स्वप्नात दिसला, म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरीही तेशुभ मानलं जातं. त्यातूनही हा हिरवेगारपणा जर पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहूनही शुभ मानलं गेलं आहे.

  • स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर….

    #एकसत्यघटना…. कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल….

    स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर….

    जगात आज अनेक अरबपति असतील पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मीळाला तो राॅकफेलर मुळे! प्रचंड श्रीमंत माणूस….. जगातील पहीला अरबपति!रात्रंदिवस एकच ध्येय फक्त पैसा. हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा याचे नातीगोती, मीत्र, सगेसोयरे फक्त पैसा 😌

    घटना अशी घडली 1893 साली वयाच्या 53 व्या वर्षी हा माणूस आजारी पडला… डोक्यावरचे सारे केस झडून गेले…. शरीर गळायला लागलं… तोंडात अन्न गीळेना थोडसं सुप पिऊन जगण्याची वेळ आली… त्याला झोपही लागत नव्हती ईतकच नाही तर त्याला हसता रडता देखील जमेना…. अमेरीकेतील सर्व नामवंत डाॅक्टरना दाखवून झाले पण उपयोग शुन्य..,.. डाॅक्टरनी शेवटी सांगितले आपण फक्त एक वर्षाचे मेहमान आहात…..

    त्याचवेळी स्वामी विवेकानंद शिकागो मध्ये होते.

    आणि राॅकफेलर च्या एका मीत्राने सहजच एक सल्ला दिला की हिंदुस्थानांतील एक सन्यासी ईथे आलाय आपण एकदा त्यांची भेट घ्यावी! राॅकफेलर सुरवातीला भडकला “असल्या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही, तो सन्यासी काय करणाराय? ” म्हणून त्याने टाळले. पण काय कुणास ठाऊक दोन दिवसांनी तो भेटीला निघाला.

    स्वामी विवेकानंद हाॅटेलच्या रुममध्ये काहीतरी लिखाण करण्यात व्यस्त होते… राॅकफेलर जाउन थांबले राॅकफेलरला अपेक्षा होती मी एवढा माणूस माझ्यासाठी मोठं आदरातिथ्य होईल पण विवेकानंदानी ढुंकूनही पाहिलं नाही! शेवटी राॅकफेलर म्हणाला मी उद्योजक राॅकफेलर….
    स्वामी म्हणाले, “बरं…मग”
    “मला पाहुन ईथला राष्ट्राध्यक्ष सुद्धा उभा राहतो”-ईति राॅकफेलर
    ” असं आपलं काम सांगा”स्वामी विवेकानंद
    शेवटी स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली.
    “तुम्ही मनाने फार बैचैन आहात” आणि मग त्याच्या जीवनातील अशा काही घटना सांगीतल्या की, ज्या त्याच्याशिवाय कुणाला माहिती नव्हत्या! तो ही परेशान झाला! एक तासांच्या चर्चेनंतर स्वामी विवेकानंदानी त्याना सांगीतलं की यावर एकच पर्याय आहे तुम्ही दानधर्म केला पाहिजे.

    राॅकफेलरवर स्वामींचा एवढा प्रभाव पढला की त्याने एक फाउंडेशन काढलं त्यातुनच पुढे मलेरिया, टीबी, यारख्या अनेक रोगावर औषध बनवून मुफ्त मध्ये ईलाज झाले तो जगातील सर्वात मोठा डोनर झाला…..
    पुढे??? आश्चर्य हे झाले ज्याला एक वर्षाची मुदत डॉ. नी सांगितली होती तो #राॅकफेलर 98 वर्षे जगला तोही आनंदात…

    आज जो जगातील सर्वात मोठा डोनर आहे बील गेट्स तो त्याच्या पुस्तकात लिहतो मला डोनेशन ची प्रेरणा राॅकफेलर फाउंडेशन मुळे मीळाली!

    मीत्रानो ही आहे एका हिंदू सन्याशाची व हिंदू तत्त्वज्ञानाची किमया आणि आम्ही मात्र आज त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतो, आपली ताकद ओळखा!
    आणि भौतिक सुखाच्या मागे लागुन पैसा हे सर्वस्व आहे हे समजु नका वेळ आली ना तो हि कामाचा नाही!
    आणि तीसरं द्यायला शिका…. द्याल तरच मीळत जाईल हेच हिंदू तत्त्वज्ञान आहे साठवाल तर सडायला सुरवात होईल!

    उमाकांत नामदेव माने
    माऊली प्रतिष्टाण उमरगा

  • Original or Duplicate

    थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो,
    “माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये.”


    जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !!
    राजा म्हणतो, “त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत.”
    तो माणूस म्हणतो, “नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे.”
    आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, “हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय”


    राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि “हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे”


    सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले?
    यावर हसून अंध म्हणतो, “सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही”


    टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !!


    : जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो “हिरा” समजावा..!

    !! अशा व्यक्तीशी मैत्री वाढवावी..!
    अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !!🙏🏻🚩

  • जग बदलले ?

    काय बदलले आहे ? असे विचारल्यावर नेहमी ऐकिवात येते की, जग बदलत आहे”, पण जरा विचार करा, नेमके काय बदलले आहे जगात…!!! कोणी काय सोडले?

    आजपर्यंत मिरचीने तिखटपणा नाही सोडला.., तर आंब्याने गोडपणा नाही सोडला…!!!

    वृक्षांच्या पानांनी हिरवेपणा नाही सोडला…., तर वृक्षांनी सावली देणे नाही सोडले…!!!

    सूर्याने तळपणे नाही सोडले.., तर चंद्राने शीतलता नाही सोडली…!!!

    फुलाने सुगंध नाही सोडला.., तर वा-याने वाहणे नाही सोडले…!!!

    नदीने आपला मार्ग नाही बदलला.., तर सागराने आपली मर्यादा नाही सोडली…!!!

    पक्षांनी विहार करणे नाही सोडले.., निसर्गाने कोमलता नाही सोडली.., ईश्वराने दयाळूपणा नाही सोडला…!!!

    मग नेमके बदलले आहे ते काय?, बदलला आहे तो फक्त माणूस.., माणसाने माणूसकी सोडली…!!!

    स्रुष्टी त्रेतायुगात अशीच होती. सत्त्ययुगात पण अशीच होती. द्वापार युगातही अशीच होती. आणि आता कलीयुगातही तशीच आहे…!!!

    बदलला आहे फक्त केवळ माणूस आणि त्याचे विचार, पण तो मात्र साऱ्या जगाला तो दोष देत असतो…!!!

    माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा…!!!

    आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की, आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ शकत नाही…!!!

    तसेच जग बदललेय म्हणून जगरहाटीला दोष देऊ नका, समाधानी रहा सर्वांचे आभार माना…!!!

    आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!

  • घरात गोमूत्र का शिंपडावे?

    घरात गोमूत्र का शिंपडावे?

    आपल्या हिंदू संस्कृतित गोमुत्राला महत्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पुजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमुत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी धारणा आहे.

    सगळ्या परंपरांच्या मागे मनोवेज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे. घर-परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे.

    जुन्या काळापासून गोमुत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानले आहे. गाईला माता असे संबांधले आहे. त्यामुळे गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सग़ळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पुजा केल्याने आपले पाप नष्ट होते, अशी धारणा आहे.

    काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल, घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत. वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे? गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात. अन्नातून युरिया, कीटकनाशके शरीरात जातात. पाणी आणि हवेतूनही दूषित घटक रीरात जातात. त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात. गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे.

    आता गोमुत्राचे फायदे लक्षाते घेतले पाहिजेत. यात घरातील वास्तूदोष मिटण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे. गोमुत्रामुळे वातावरणातील सुक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते. तर ज्या घरात गोमुत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देव-देवतांचे कृपादृष्टी प्राप्त होते, अशी समजूत आहे. गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही. *श्री स्वामी समर्थ*

  • गणपतीच्या पूजेत महत्त्वाची २१ पत्री

    गणपतीच्या पूजेत २१ पत्रीचा समावेश असतो. या पत्रींचे औषधी गुण आपण जाणून घेऊ .

    🙏🌹🦚पिपंळ

    याला ‘बोधीवृक्ष’ म्हणतात.

    याच्या पानांत औषधी गुणधर्म असतात म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना जेऊ घातले जाते. पिपंळाची लाख (राख) खडीसाखरेबरोबर दिल्यास चांगली झोप लागते.

    🙏🌹🦚जाई

    या वनस्पतीला जास्मीन देखील म्हणतात. ही वनस्पती शहरात मोठया प्रमाणात दिसते. तोंड आल्यावर जाईची पाने खातात, तसेच जुन्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो. ही वेल सुगंधी फुलांची आहे.

    🙏🌹🦚अर्जुन

    हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी पट्टयात हिला ओळखतात. या वृक्षाचा उल्लेख रामायणात देखील आढळतो. हृदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते. या वनस्पतीत कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.

    🙏🌹🦚रूई

    रुई या वनस्पतीला ‘मांदार’ म्हणूनही ओळखतात. ओसाड जागेत ही वनस्पती मोठया प्रमाणात दिसते. हिला पांढर्या, जांभळया रंगाची फुले येतात. हत्तीरोगावर हे फार उत्तम औषध आहे. तसेच कुष्ठरोगावर देखील त्याचे औषध प्रभावी ठरते. पांढरी रूई गणेशाला अधिक प्रिय असते.

    🙏🌹🦚मारवा

    ही सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या जखमा, भाजणे, किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर आलेल्या डागांसाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते. नवीन संशोधनात तर मारव्यापासून कर्करोगावर औषध तयार करण्यास यश आले आहे. ही वनस्पती घरात कुंडीतदेखील लावता येते.

    🙏🌹🦚कण्हेर

    कण्हेरीची पाने व मुळाचा साठा औषधी आहे. परस बागेतही हमखास दिसणारी वनस्पती एक विषारी झुडूप आहे. याच्या फुलांना सुगंध असतो. वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो.

    🙏🌹🦚देवदार

    हा महाकाय वृक्ष पश्चिम घाट, हिमालयात आढळतो. या वृक्षाचे लाकूड अतिशय मजबूत असते. कफ, पडसे, संधिवात यासाठी याचा रस फायदेशीर ठरतो. याची झाडे महाराष्ट्रात नाशिकजवळ पेठ, हरसूल भागात देखील दिसतात.

    🙏🌹🦚डोरली

    या रोपाला ‘काटे रिंगणी’ म्हणूनही ओळखतात. या वनस्पतीच्या पानवर देखील काटे असतात. त्वचारोग, पोटातील विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरते. आदिवासी भागात हे झुडूप मोठ्या प्रमाणात आढळते.

    🙏🌹🦚डाळिंब

    आपल्याकडे आरक्ता आणि गणेश अशा दोन जाती मोठयाप्रमाणात बघावयास मिळतात. देखणी फुले, काहीसे काटेरी झुडूप आहे. याचा उपयोग जंतावर गुणकारी आहे. काविळीसाठीही उपयोग केला जातो.

    🙏🌹🦚आघाडा

    ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी त्याचा वापर करतात. आघाडा मुखरोग व दंतरोगावर उत्तम औषध आहे. ही वनस्पती पडिक जागेत माळरानांवर बघावयास मिळते.

    🙏🌹🦚विष्णुकांता

    या वनस्पतीला आपल्याकडे ‘शंखपुष्पी’ म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. निळसर फुले येणारी ही वनस्पती जमिनीलगत उगविणारी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारावर औषध म्हणून केला जातो. नदीच्या बाजूला, डोंगर-टेकडया आदी ठिकाणी ही आपण बघू शकतो.

    🙏🌹🦚शमी

    शमीला सुप्त ‘अग्नीदेवता’ असेही म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी ठेवतात. हा वृक्ष कोरडया हवामानात वाढणारा आहे. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी ठरते.

    🙏🌹🦚दुर्वा

    ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. पांढरी (श्वेत) आणि निळा (नील) या दोन जाती आहेत. पांढ-या दुर्वा गणेशाला प्रिय असते. आपल्याकडे तिला ‘हरळ’ म्हणतात.

    नाकातून रक्त येणे, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दूर्वांचा रस अमृतासमान असतो. दूर्वा रस्त्याच्या बाजूला, बागेतही मिळतात.

    🙏🌹🦚तुळस

    ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना पळवून लावणारी तुळस जवळपास प्रत्येक घरात बघावयास मिळते. तुळशीत राम, कृष्ण असे दोन प्रकार असले तरी आणखी तीन चार इतर प्रकारही आहेत. कफ, दम, सर्दी, कीटक दंश तसेच कॅन्सर सारख्या रोगांवर तुळशीचा रस औषध उपयोगी पडतो.

    🙏🌹🦚धोतरा

    धोतर्याचा काळा, पांढरा, व राजधोतरा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचे औषध काढतात. वेदनाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ही वनस्पती पडिक जागेत उगविणारी विषारी वनस्पती आहे. काटेरी पांढर्या लांब नरसळ्यासारखे फूल दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते. या वनस्पतींची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला हमखास दिसतात.

    🙏🌹🦚बेलपत्र

    शंकराचे बेलपत्र सर्वांना परिचित आहे. या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो.

    🙏🌹🦚माका

    पावसाळयात आढळणारी ही वनस्पती डोंगर – टेकडयांवर नजर लावून तिचा शोध घ्यावा लागतो. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते.

    🙏🌹🦚मधुमालती

    मधुमालती ही वेल तशी शहरात बंगल्यांमध्ये सहज बघावयास मिळते. ही एक काष्ट वेल आहे. गुलाबी, पांढर्या, पिवळया रंगाची फुले व सदाहरित पाने हे त्याचे वैशिष्टय.

    फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.

    🙏🌹🦚बोर

    बोराच्या बियांचे चुर्ण चेहर्यांवर लावल्यास पुटकुळया जातात. मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे, तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो.

    🙏🌹🦚हादगा

    हादग्याला आपण ‘अगस्ती’ म्हणूनही ओळखतो. याच्या फुलांची भाजी छान लागतात. या फुलात अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे.

    🙏🌹🦚केवडा

    ही वनस्पती समुद्र किनार्यावर मोठया प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.

    संकलन :- अशोककाका कुलकर्णी
    🙏🌹🤝🌸☯🕉🛐🌸🤝🌹🙏

  • दिवाळी का साजरी केली जाते

    दिवाळी का साजरी केली जाते

    खर हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण येतोय दीपावली, ज्याला आपण मराठी मधे दिवाळी म्हणतो ।

    परंतु 30% लोकांनाच माहित आहे की दिवाळी हा सण का साजरा केला जातो . बाकी 70% तर फक्त लहानपणापासून असे समजतात की फक्त दिवे लावणे , फराळ , आणि फटाके फोड़णे ,लक्ष्मी पूजन करणे, बस हीच आहे दिवाळी असो काही हरकत नाही ।

    आज मी तुम्हाला या पोस्ट मधे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की दिवाळी का साजरी केली जाते आणि दिवाळीला प्रभु श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा का केली जाते.
    नीट वाचा 👍

    दिवाळी हा हिंदुंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी भगवान श्री राम, बंधू श्री लक्ष्मण आणि माँ सीता यांच्या सोबत 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर आयोध्येत परत आले होते.
    आयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभु श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि आयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत तेव्हा पूर्ण आयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी आयोध्या सजवली होती.

    जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत केला त्याच्या बरोबर 21 दिवसांनी श्रीराम हे आयोध्येमध्ये पोहोचले होते तेव्हा पासून दिवाळी हा सण साजरा केला जातो ।
    म्हणजे लाखो वर्षापासूनची ही परम्परा अजूनसुद्धा हिन्दू बांधव साजरी करतात.

    दिवाळी 5 दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे ।
    चला तुम्हाला या 5 दिवसाचं महत्त्व सांगतो 👍

    1:- पहिला दिवस आहे धनत्रयोदशी. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत समुद्रमंथन केलं होतं तेव्हा समुद्रामधून 14 रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या कॅलेंडरनुसार पितृपक्षाच्या 13 दिवसानंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रामधून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले.
    भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली.
    त्या दिवसापासून या दिवसाला धनतेरस , धनत्रयोदशी असे नाव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो.

    2:- दिवाळी चा दूसरा दिवस आहे नरकचतुर्दशी👍

    एके काळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता , त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फ़क्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो.
    पुढच्या जन्मात भूमि देवी ने सत्यभामा च्या रुपात अवतार घेतला , सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झाले. त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला.
    तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरक चतुर्दशी या नावाने ओळखलं जातं.

    3:- दिवाळीचा तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजा 👍

    देव आणि असुर हे जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माँ लक्ष्मी प्रकट झाली होती ।
    तेव्हा पासुन त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश , सुख ,आणि संपत्तीसाठी माँ लक्ष्मी यांची पूजा होते।

    दिवाळीच्या दिवशी माँ लक्ष्मी यांच्या सोबत श्री गणेश यांची सुद्धा पूजा होते ।
    पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माँ पार्वती चे 2 पुत्र होते ।

    लक्ष्मीने पार्वती जवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही. मग गणपतीची काळजी ती कशी घेईल. याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईन तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईन.
    म्हणून तेव्हापासून
    जिथे लक्ष्मीची पूजा होते तिथे गणपतीची सुद्धा पूजा होते ।

    खर तर दिवाळीच्या दिवशी श्री राम आयोध्येमध्ये आले होते परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा होते ।
    पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णु हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णु चा अवतारच आहे ।
    त्यामुळे भगवान श्रीराम यांची पूजा केली जात नाही

    4:-मित्रानो अश्विन अमवस्ये ला लक्ष्मी पूजन झलयस नंतर बलि प्रतिपदा हा दिवस दीवाली पाडवा म्हणून साजरा होतो ।
    साडे तिन मुहूर्तान पाईकी एक हा दिवस आतिशय शुभ मानला जातो ।
    अक्षय तृतीय , गुढी पाडवा , विजय दशमी हे पूर्ण मुहूर्त असून ,दिवाळी पाडवा हे अर्ध मुहूर्त आहे या दिवशी सोन खरदी , सुवासिनी कढुन पति ला ओवाळ ले जाते ।
    असे खुप काही महत्त्व आहेत
    व्यापारी लोकांचे नवीन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते

    हिशोबाच्या नवीन वह्या ज्याला खतावणी म्हणतात त्यांचे पूजन करून नवीन सुरुवात केली जाते
    कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो

    5:- दिवाळीचा चौथा दिवस आहे गोवर्धन पूजा 👍
    रामायणानुसार जेव्हा श्री राम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा सगळे वानर हे आपल्या आपल्या शक्तिनुसार दगड जमा करत होते तेव्हा हनुमानजीनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता ।
    परंतु ते यायच्या आधीच सेतूचं काम झाल होतं.
    सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं.
    श्रीराम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील ।
    आणि हनुमानाला सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेऊन ये.
    पुढच्या जन्मात जेव्हा भगवानांनी कृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातल्या लोकांना गोवर्धनाची पूजा करण्यास सांगितली.
    याला नाराज होऊन इंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केलं. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला.
    तेव्हापासून गोवर्धन पूजा केली जाते ।

    6:- पाचवा दिवस आहे भाऊबीज 👍
    या दिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले ।
    त्यांच्या बहिणी कडून झालेला आदरसत्कार पाहून ते खुप प्रसन्न झाले ।
    तेव्हा यमराजाने हे वरदान दिलं की या दिवशी जो भाऊ तिच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ति मिळेल आणि मोक्ष मिळेल तेव्हापासुन हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.
    त्या दिवशी सगळ्या बहिणी त्याच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात

    तर मित्रानो हे 6 दिवास दिवळीचे अपल्या साठी खुप महत्वाचे आहे ।
    अपन कट्टर हिन्दू आहेत अपल्या ला या गोष्टी 100% माहिती असायला हवी ।

    भविष्यात सेक्युलर अथवा गैर हिंदुनि ” दिवाळी का साजरी केलि जाते विचारल्यास तुम्हाला या गोष्टी तोंड पाठ पाहीजे ।