Category: Motivational

  • गेले ते रम्य दिवस …

    सध्या, 40 पेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना
    देवानं खूप काही भरभरून दिलं आहे.
    हे जरूर वाचा, म्हणजे लक्षात येईल.
    आपल्या पिढीला,, विधात्याचे
    विशेष आशिर्वाद प्राप्त आहेत..

    आपण कधी जीव खाऊन पळत
    शाळेतून क्लासेसना गेलो नाही.

    शाळा सुटल्यावर छान रमत गमत,खेळत
    घरी गेलो आहोत..

    आपण,, आपल्या ….
    खर्‍या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो,
    नेट फ्रेंड्स सोबत नाही….

    तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे
    आपल्यासाठी सेफ होते..

    आपल्याला कधी ,,,
    बिसलेरी घ्यवी लागली नाही..

    आपण चार जणांत ,,
    एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो,

    पण आजारी नाही पडलो..

    आपण रोज पोटभर भात खाऊनही
    कधी स्थुल नाही झालो..

    आपण कितीदा अनवाणी फिरलो
    तरी कधी पायांना दुखापत झाली नाही..

    आपल्याला हेल्दी राहण्यासाठी
    कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..

    आपली खेळणी आपणच बनवली.
    दोन रिकाम्या काडेपेट्या सुध्दा
    आपल्यासाठी ,,,,
    गाडी,फोन किंवा पिस्तूल बनायच्या..

    आपला भरपुर वेळ ,,,,
    आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला..

    आपल्या जवळ ,,,
    मोबाइल, फेसबुक फ्रेंड, काँप्युटर, इंटरनेट वगैरे नव्हते….

    कारण आपल्या जवळ
    खरेखुरेे मित्र-मैत्रिणी होते..

    आपण मित्रमैत्रिणींच्या घरी
    कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचोही..
    आपण कधी फोन करुन …
    येऊ का म्हणून विचारले नाही..

    आपण एक अद्भुत रसायन आहोत,
    कारण आपणच आहोत एक अशी पिढी,
    ज्यांनी ,,,,,
    आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या..
    आणि ,, तरी खूप मस्तीही केली…

    आपण भले स्पेशल नसु …

    पण ‘लिमिटेड एडिशन’ तर नक्कीच आहोत..!!

    आपली एकच पिढी अशी आहे,
    ज्यांनी ,, कमी श्रीमंतीत
    बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला,
    व्हर्चुअल लाईफ ऐवजी ,,,
    खरे तारूण्य अनुभवले…
    आणि ,,,आता ..उतार वयात
    आधुनिक विज्ञानाचाही आनंद घेत आहोत …

    आपणच ,,, फक्त..
    “कमतरतेतली गंमत आणि
    मुबलकतेतली जंमत..” अनुभवली..
    आणि हो
    आता जेष्ठ नागरिकांचे फायदे पण आपण घेत आहोत च
    कोरोना ची लस पण प्रथम आपणास च

    आणि ,,, शेवटी.....

    आठवतंय का….????
    आपण ,,, ‘मदर्स डे’
    कधी साजरा केल्याचं ???
    नाही……..ना ?
    कारण ,,, आईच, आपलं जग होतं….

      🙏🌹🙏 नक्की आवडेल 🙏🌹🙏
  • तेही दिवस येतील – औरंगाबाद स्पेशल

    तेही दिवस येतील – औरंगाबाद स्पेशल

    क्रांती चौकात थाटात शिवजयंती साजरी करणार,
    राजांना आपल्या नवीन रुपात मुजरा करणार.
    भीमजयंती सुद्धा जोरात गाजनार,
    जल्लोष साऱ्या आसमंतात दुमदुमनार.

    करू साजरी गुलमंडीवर धुळवड.,
    सध्या तरी घरी राहणे हीच योग्य निवड.
    सण सर्व साजरे होतीलच हो,
    जरा या कोरोनातुन मिळू द्या सवड.

    पुन्हा खाऊया आवडीने श्री चे पोहे,
    बरकत चा चहा, उस्मान भाईचे भजे.
    उत्तमची मिठाई आणि गायत्री ची चाट,
    फक्त योग्य दिवसाची सध्या पाहूया वाट.

    सिटीत जाऊन मनसोक्त खरेदी करू,
    आपली आवडती घासाघीस, तीही परत होईलच सुरू.
    पुन्हा सिद्धार्थ गार्डन ला जाऊन एकत्रित फिरू,
    सगळं ठीक आहे, फक्त आता घाई नका करू.

    गणरायाचा जल्लोष विचारू नका,
    डोक्यावर घ्यायला त्याला विसरू नका.
    मिरवणुकीत गणरायाच्या पुन्हा करू गर्दी,
    फक्त आता त्याची प्रार्थना तेवढी सोडू नका.

    कर्णपुरा जत्रा पुन्हा गर्दीचा रेकॉर्ड मोडेल,
    सगळी निगेटिव्हीटी जनता देवी जवळ सोडेल.
    पुन्हा आनंदाचा फवारा नक्की उडेल,
    सध्या मात्र आपल्याला संयमाची गरज पडेल.

    दसऱ्याला प्रत्येक घरी यंदा मुद्दाम जाऊ,
    पुन्हा आशीर्वाद घेऊ, गळाभेटही घेऊ.
    दिवाळीला फटाके फोडू, गोड – धोड खाऊ,
    हा कोरोना जाईलच, तोवर मात्र घरातच राहू.

    मनातले आपले सर्व संकल्प नक्की पूर्ण होतील,
    सध्याचे क्षण सुद्धा काही आठवणी देऊन जातील.
    जातील आताचे वाईट दिवस जातील,
    तेही आनंदाचे दिवस लवकरच येतील….

    निलेश दिलीपराव झाल्टे.

    माझ्या नावा सहित पोस्ट शेर करू शकता…👍

  • द्रौपदीचा श्रीकृष्ण

    हिरव्या गार रानमाळावर द्रौपदी तीचे मुल व तीचे पती रोज नेमाने कामाला जात असत, स्वतःचे नसेल तरी लोकांच्या शेतावर काम करून कसे बसे हे कुटुंब पोट भरायचं. अशातच एक दिवस तिच्या पतीला शेतात काम करताना विशारी अळीने दंष केला, एकाएकींच तब्येत जास्त झाल्याने तात्काळ मोठ्या दवाखान्यात हलवाव लागले, जवळ फक्त चारशे रूपये. सोबतीला सासरच कुणीही नव्हते. तीथ फक्त तीचा मोठा भाऊ श्रीकृष्णाच्या रुपात खंबीरपणे उभा राहिला, त्या दोघांना तर काय करावं काहीच सुचेनासे झाले, त्यातच डॉक्टरांनी त्यांच्या पायचे तात्काळ ऑपरेशन सांगितले., हे ऐकताच भाऊजींनी ऑपरेशनला नकार दिला,पण पायाच्या वेदना असह्य होत होत्या.शेवटी दादाने दोघांनाही धीर दिला.

    दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन झाले.

    द्रौपदी कडे तर कसलाही आर्थिक सपोर्ट नव्हता, व दादाचीही परिस्थिती जेमतेमच. दहा हजार पगार, बाबांच्या भिक्षुकी वर घर चालत, तरी दोन बहीनी, त्यांचे शिक्षण, बाबांना बीपी, शुगर, आईला बीपी, तसेच छोट्या बहीनीला लहानपणी मेंदूत ताप गेल्यापासून तिचा चालू असलेला दवाखाना तीचे औषधोपचार सर्व संभाळून आता परत द्रौपदी च्या या कठीण प्रसंगात दवाखान्याचा सर्व खर्च दादानेच पाहीला, अशातच एका ऑपरेशननी पाय बरा झाला नाही, चार वेळा ऑपरेशन करावे लागले, सर्व मिळुन अडीच लाखांच्या वर खर्च आला ह्या वेळी द्रौपदी व तीच्या पतीला काहीच सुचेनासे व्हायचं,कुठुन आणणार इतका पैसा व दादा पन कुठून आणणार, या विचाराने ती दोघे चिंताग्रस्त असायची, मात्र याच वेळी त्यांना धीर देत काहीही झाले तरी मी भाऊजीन त्यांच्या पायावर ऊभे करणार, हे दादाचं वाक्य ऐकून द्रौपदीला धीर आला, दादाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, होईल तेवढ्या सर्व ठिकाणाहून उसने पैसे आनले.

    भाऊजींना परत त्यांच्या पायावर उभे केले.


    आजच्या कठोर जगात जीथं पैशावरुन ईस्टेटीवरुन भावा बहीनीत वाद होत असतांना फक्त आणि फक्त कर्तव्य, जबाबदारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझेपणा, या श्रीकृष्ण नीतीने बहीनीच्या कठीण क्षणात तिच्या पाठिशी तीचा भाऊ खंबीरपणे उभा राहतो ,आभाळापेक्षाही मोठ मन असलेल्या ह्या भावासारखा ही द्रौपदी परमेश्वराला एकच मागते की माझ्या दादाला सदैव सुखी ठेव ,त्याला सर्व सुख लाभु दे.
    जेव्हा आपण आपले दुःख विसरून दुसर्याला हसवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा परमेश्वर आपोआपच आपल्या मुखावरही स्मित खुलवतो, दादाची हीच शिकवन द्रौपदी व तीच्या पतीला जगण्याचे नवे धैर्य देत आहे

  • आनंदी मन

    उगवत्या सुर्योदयाने मन आनंदी होते, सुर्योदयाच्या प्रकाशात ते नवी वाट शोधु पाहते.विस्कटलेल्या वाटेतुनच नवी वाट गवसते.
    होय अगदी हाच अनुभव आम्ही अनुभवला आहे. शिवना गावात एक छोटसं आमचं कुटुंब. नेमकेच एका खुप मोठ्या आजारातून माझे मिस्टर सुखरूप बाहेर पडले, कुटुंबाचा सर्व भार त्याच्यावरच, तेव्हा पण दवाखान्यात असतांनाच आम्हा दोघांनाही हे जगण म्हणजे खूप मोठे आव्हान वाटु लागले.घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दवाखान्याचा खर्च पाहून मन घाबरून गेले होते, तब्येत तर सुधारित होती पण मनात वेगळी भिती भरत होती, दवाखान्याच्या खर्चाने प्रचंड दडपण आले होते, सोबत सासरच्या कुणाचीही कसलीच साथ नव्हती, दवाखान्यात भरती झाल्यापासून पंधरा विस दिवस झाले ,दवाखान्यात आलो तेव्हा एक रुपया ही जवळ नाही अशी आमची परिस्थिती होती, पण अचानक तब्येत बिघडल्यामुळे ताबडतोब जावे लागले. तिथ गेल्या गेल्या माझा भाऊ आलेलाच होता, निघतांना तसा त्याला आधी फोन केला होता, त्यामुळे सर्व जबाबदारी त्यानेच सांभाळली, म्हणता म्हणता पंधरा ते विस दिवस दवाखान्यात गेले, चार ऑपरेशन होऊन गेली, दोन ते अडीच लाख रुपये खर्च ही झाला ,आमच्या जवळ तर एक रुपया ही नव्हता, भावाची परीस्थिती पण हालाखीचीच,पण करणारे दुसरे कुणी नव्हते म्हणून त्याला सर्व मेनेज करावे लागले, सूरवातीला त्याने पंन्नास हजार रुपये त्यांच्या साहेबांकडुण ऊसणे घेतले, दवाखान्याचे काम म्हणताच त्यांनी एका शब्दात पैसे दिले, नंतर हळूहळू बिल वाढत गेले तेव्हा परत दोन लाख रुपये इकडून तिकडून ऊसणे आणले,तेव्हा आमच्या नात्यातल्या गौरी वहिनी व् भावजी दवाखान्यात यांना भेटायला आले, बोलतानाच वहिनींनी माझ्या मनातली काळजी ओळखली,व त्यानी मला बाजूला बोलवुन सर्व विचारले. त्यांना आमची सर्व परीस्थिती समजली, तेव्हा त्यांनी मला BHL बद्दल माहिती सांगितली,व लगेच डॉ. अनिल कौसडीकर काकांना संपर्क करण्यास सांगितले,तेव्हा मी काकांना आमची सर्व सत्य परिस्थिती सांगितली,हे सर्व कळताच काकांनी आम्हाला BHLच्या माध्यमातून पन्नास हजाराची मदत मिळवून दिली. व आम्हाला हिम्मत ही दिली.
    त्यानंतर दवाखान्यातुन सुट्टी मिळाल्यानंतर यांची तब्येतीचीही काकांनी वेळोवेळी फोन करून माहिती घेतली, तेव्हा नेमकेच आम्ही दवाखान्यातुन घरी आलो काही दिवसांनी सगळीकडे लॉकडाउन लागले होते, अश्या वेळी घरखर्च भागवनेही कठीण झाले होते, मात्र म्हणतात ना परमेश्वराला सर्वांची काळजी आहे, तो आपल्याला तरी कसा उपाशी ठेवीन, आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी म्हटलेलं आहे….
    अनन्याश्चिन्तयंतो मां ये जना्ः पर्युपासते।
    तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम।
    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी ऊभा आहे।।।।
    हे महाराजांचे याक्य पदोपदी प्रचिती देत राहाते,.
    सगळी कडे सर्व काही बंद असतांना काही काम नसतांना घर कसे चालणार, हा मोठा प्रश्न होता,त्याचवेळी आम्हालाBHLच्या माध्यमातून कौसडीकर काकांनी व पुर्ण ग्रुपने तीन ते चार महीने घर खर्च भागेल ऐवढी मदत केली.त्यानंतर हळूहळू यांची तब्येत सुधारु लागली, काही काम करावे अस मन म्हणत होते, पण कुठेच काम मिळत नव्हते, यावेळी मनात एक ऊमेद जागी होती, काही तरी नवीन करण्याची ,मग ठरवले की आपल्या गावात लाल मिरची खुप प्रसिद्ध आहे, आपण लाल मिरची पावडर करून विकु शकतो, मग सुरुवात म्हणून दहा किलो मिरची आणली, ती स्वच्छ निवडली,देठ काढून, वाळवून दळून आणली व अश्या पध्दतीने घरगूती लाल तिखट तयार केले, पण हे विकायचे कसे, तेव्हा परत काकांचे मार्गदर्शन घेतले तेव्हा आपल्या BHLग्रुप वर याबद्दल माहिती दिली, व प्रोत्साहन म्हणून ग्रुपमध्ये सर्वांनी आमच्या कडून मिरची पावडर खरेदी केले, एकाच वेळी दहा किलो तिखट विकल्या गेले, व विशेष म्हणजे सगळ्यांना आपली क्वालिटी आवडली व परत पंधरा ते विस किलो तिखटाची औडर ही मिळाली, यावेळी खुप आनंद झाला पण एक प्रश्न ही पडला होता, पहिले दहा किलो आपण ऊधारीवर आणले होते, व औरंगाबाद ला गावाकडुण जाण्यायेण्यातच पाचशे रुपये लागले होते, पुढच्या औडर मध्ये गुंतवणूक करण्यात कसलाच सपोर्ट नव्हता, पण हीच सुरुवात आहे व आपली जिद्द ठाम आहे हे मणात पक्के केले. यावेळी तिखटाची औडर आलेली होती पण परत मिरची आणायला जवळ भागभांडवल नव्हते, मग काय करावं, तेव्हा घरातील कुलदेवतेच्या पोतीमधे एक ग्राम सोण्याचे मणी केलेले होते, एक मन म्हणे ते घ्यावे, पण दुसरे मन ते नाकारत होते, मनाच्या ह्या चलबिचल स्थितीत काही सुचत नव्हते, समोर सुरुवात व नवीन मार्ग दिसत होता, पण सर्व पैशाच्या अभावी अडलेले होते., याचवेळी आमच्या गुरुआईंना आम्ही आमच्या मनाची व आमची परीस्थिती सांगितली,तेव्हा त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने आम्हाला मार्ग सांगीतला,त्या म्हणाल्या अग ती रेणुका माता आपली आई आहे, असं समज की तिनं आपल्याला सध्याचे हे पैसे. ऊसणे दिले, व तुला फायदा झाल्यावर तु परत तिचे एक ग्राम मणी करून दे,मनात कसलीच शंका आणु नको. तेव्हा ते मणी मोडुन साडेचार हजार रुपयांत हा बिजनेस चालू केला. व रेणुका मातेच्या आशिर्वादाने तो यशस्वी झाला. आमच्या मालाची क्वालिटी लोकांना आवडु लागली व प्रत्येक वेळी नवीन औडर ही मिळु लागल्या, आणि या सर्व परिस्थितीत आपण आपल्या कामातला खरेपणा टिकवून ठेवायचा,कारण स्पर्धेच्या आजच्या युगात प्रोफीट कमवायच्या मानसिकतेत माणूस माणुसकी विसरून जातो, परिणामी तो पैसा तर कमावतो पण तोच पैसा एक न एक दिवस तो पाण्यासारखा गमवावा लागतो. वज्या मुला बाळांसाठी ही तो कमवत असतो तेही त्याचे शारीरिक, मानसिक ईत्यादी दुःख वाटुन घेऊ शकत नाही.
    असो…तर असा हा आमचा छोटासा अनुभव, ज्यात प्रत्यक्ष परमेश्वर सुरवातीला वेळ पडताच कुणाच्या न कुणाच्या रुपात धावुन आला.रक्ताच्या नात्याने भाऊ खंबीर पणे पाठीशी ऊभा राहीला, स्वतः ची परिस्थिती बिकट असुनही अडीच लाख रूपयांचे कर्ज फक्त आणि फक्त कर्तव्य म्हणून करून ठेवले, त्यातल्या त्यात कसलीही ओळखपाळख नसतानाही डॉ. अनिल कौसडीकर काकांचा BHLग्रुप एक अखंड सैन्य म्हणून आमच्या पाठीशी ऊभा राहिला, जेव्हा पण मन घाबरले, डगमगले तेव्हा हिम्मत दिली, आणि इतकचं नव्हे तर आयुष्यात या प्रवासात फक्त पुढे चाल हाच संदेशBHLग्रुप व काकांनी दिला. एवढ्या मोठ्या शहरात गावाकडुण एखादी वस्तू नेउन ती वीकने ही सोपी गोष्ट नाही, आज अनोळखी व्यक्ती ला कुणीच समजून घेऊ शकत नाही, पण BHLग्रुपमुळेच आम्ही हे व्यवसायाचं धाडस करु शकलो व या सर्वांच्या सहकार्यानेच यश संपादन शक्य झाले. यश मिळतेच फक्त नियत साफ,व परमेश्वरावर द्रुढ विश्वास असल्यास प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या मदतीला धाऊन येतो व आपल्याला नवा मार्ग दाखवतो.
    सौ.कादंबरी कमलाकरराव कादी. मु. पो.शिवना.ता.सिल्लोड. जि.औरंगाबाद.

  • 🍁 तेही दिवस येतील…

    जेव्हा एक दिवस मी टिव्ही चालू करून एखादं न्यूज चॅनल लावीन आणि माझ्यासमोर एक ब्रेकिंग न्यूज झळकेल – “भारताची कोरोनाच्या विळख्यातून सुटका. सलग तिसाव्या दिवशी एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही.”

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा माझ्या जिवलग मित्रांना मी तेवढीच ‘घट्ट’ मिठी मारीन. ह्या दिवसांत मला त्यांची किती काळजी वाटली हे त्यांना सांगताना मला शब्द शोधायची गरज पडणार नाही. त्यांच्यासोबत गप्पा मारताना एकमेकांची खेचण्याव्यतिरिक्त बोलायला खूप काही असेल आमच्याकडे…!!!

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा माझ्यासमोर माझा एखादा मित्र आत्मविश्वासाने खोकेल किंवा शिंकेल, आणि मीही तेवढ्याच सहजपणे आणि मिश्किलपणे माझा नेहमीचा डायलॉग मारीन, “ काही नाही काही नाही गेला तो”…!!!

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा खरेदीची टीचभर आवड नसलेला मी, कुठल्या तरी भव्य सुपरमार्केटमध्ये जाऊन उगाच तासनतास भटकीन, खिसा रिकामा असला तरी उत्साहाने काठोकाठ भरलेलं मन सोबत घेऊन…!!!

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा एखाद्या बाणासारखा सुटेन मी, दिशाहीन, कुठेही, कधीही…आणि जाईन एखाद्या डोंगराच्या कुशीत, माझ्या प्रिय मित्राशी म्हणजेच ‘निसर्गाशी’ गुजगोष्टी करायला, माझ्या जीवन परिवर्तनाच्या कथा त्याला ऐकवायला, त्या डोंगरापलीकडच्या दरीतून सुसाट वाहणारं वारं अंगावर झेलायला, आणि तोही तितक्याच तन्मयतेने ऐकेल माझ्या गोष्टी, शाबसाकी देईल मला, मी जे कमावलं त्याबद्दल आणि फुंकर घालेल मला झालेल्या त्रास आणि वेदनांबद्दल….शेवटी म्हणेल, “अरे वेड्या, मीच घडवून आणलेलं नाटकं होतं हे, तुला आणि तुझ्या साथीदारांना शहाणं करण्यासाठी!”…!!!

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा मला जिवंत माणसांची आणि माणसं जिवंत असल्याची, दोन्हींची किंमत कळेल. माझं बोलणं, वागणं सौम्य आणि हळूवार होईल. ‘माणसं शाश्वत नसतात’, या जाणीवेने पोखरून गेलेला मी त्यांना जपण्यासाठी कोणत्याही थराला जाईन. मतभेद असायलासुद्धा आयुष्यात माणसं असावी लागतात हे कळल्यामुळे माझ्या वैचारिक शत्रूंकडेही मी आदराने बघायला लागीन …!!!

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा मला प्रार्थनेतली ताकद कळेल. इतकी वर्षे प्रार्थना सुरू झाली की नुसते ओठ हलवणारा मी आज माझ्या प्रार्थनेने आभाळालाही पाझर फोडीन…!!!

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा मला समजेल की या निसर्गात आवाज करणारा, किंबहुना करू शकणारा मी काही एकमेव प्राणी नाही. पक्ष्यांचे गुंजन, गाईंचे हंबरणे, कोकिळेचे गायन, रातकिड्यांची किरीकीरसुद्धा हवीहवीशी वाटेल मला, त्यांना दादही देऊ लागीन मी, अगदी मनापासून…..माझ्या अवतीभवती घडणाऱ्या असंख्य घटनांपैकी निदान काही गोष्टींकडे तरी मी मुद्दाम डोळसपणे पाहायला शिकेन, माझ्यातला ‘मीपणा’ अगदी क्षणभरासाठी बाजूला ठेवून…!!!

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा मला चिकटलेली गेंड्याची कातडी सैल होऊ लागेल हळूहळू. मी खूप संवेदनशील होईन, माझ्या पर्यावरणाविषयी, प्राणीमात्रांविषयी. चालताचालता वाटेत आलेल्या किडामुग्यांना बिनधास्तपणे मारणाऱ्या मला, एकेकाळी मृत्यूच्या भयाने ग्रासलेला ‘‘मी’ आठवेल, आणि माझा पाय अचानकपणे मागे जाईल, सुकलेली पानंसुद्धा मी कदाचित कधीच पायदळी तुडवणार नाही यापुढे, कारण सर्व चैतन्य आटून गेल्यानंतर कसं वाटतं, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असेन मी…!!!

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा कामाव्यतिरिक्त इतरही गोष्टींना माझ्या आयुष्यात मानाचं स्थान असेल. कारण काही गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत हे तोपर्यंत मला पुरते उमगलेले असेल. आणि वाईट परिस्थिती आली की काम जातं, पण जगणं थांबत नाही याची मला लख्ख जाणीव झाली असेल. या प्रवासात मी अशाही काही गोष्टींचा शोध घेईन, ज्या मला ‘उत्पन्न’ मिळवून देणार नाहीत कदाचित, पण माझं जगणं अधिक ‘संपन्न’ करून जातील, आणि त्यातली उर्मी टिकवून ठेवतील, अगदी पुढची शंबर वर्षं…!!!

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा मी बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा, वरचढ, किंवा श्रेष्ठ हे दाखवण्याची स्पर्धा मी माझ्याकडून संपवलेली असेल. कारण माझ्या आवाजाचं वेगळेपण दाखवण्याच्या नादात या मैफिलीची हरवलेली मजा मला पुन्हा उद्युक्त करेल माझा आवाज बदलावयाला आणि इतरांच्या सुरात माझा सूर मिसळायला…!!!

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा मी गरजांच्या शर्यतीमध्ये भाग घेणं कमी करीन…. आणि आनंदाची शर्यत अशी कोणती शर्यत असते आणि त्याची नोंदणी कुठे करावी लागते याची आवर्जून चौकशी करीन…!!!

    🍁 तेही दिवस येतील…
    जेव्हा माझं प्रायश्चित्त पूर्ण होईल, आणि गरज पडणार नाही मला तोंड लपवून जगण्याची…..माझा मास्क भिरकावून देईन मी हवेमध्ये…खूप उंच… इतका उंच की इतके महिने मला गच्च बांधून ठेवणारी त्याची ती दोरी पूर्णपणे दृष्टिआड होईल माझ्या….
    आणि सज्ज होईन एका नव्या भरारीसाठी, पण यावेळी जबाबदारीचे पंख घेऊन…!!!

    आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!✌

    ❣स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या…!!!❣

    || जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा||

    🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲🙏🌺🌲

  • भाऊबंदकी

    डोळ्यात अश्रु येतील असा लेख

    जगाचे लॉकडाउन कधी संपेल माहीत नाही. पण आमच्या दोन घराच्या मधला लॉकडाउन संपला होता.* दुपारचं जेवण करून मी बाहेर कट्ट्यावर पुस्तक वाचत बसलो झाडाखाली. लॉकडाऊनमुळे सगळे घरातच होते. मी थोडं आजूबाजूला पाहिलं. सर्व शांत होत. भर दुपार होती. चांगलच कडक ऊन होत. नाक्यावरून एक बाई डोक्यावर कापड घेऊन तोंडावर पदर ठेवून चालत येताना दिसली. कोण असेल म्हणून जरा जवळ आल्यावर बघितलं तर अंदाज आला माझी चुलती होती. मी बघून न बघितल्या सारखे केलं आणि पुस्तकात डोकं घातलं. चुलती माझ्यासमोरून हळू चालत गेली हे मला जाणवलं. पण मी काय लक्ष दिले नाही. गेले पंधराएक वर्षांपासून आमचं बोलणं नाही. चुलतीने बोलणं टाळलं होतं.

    आमच्या ह्या वडिलोपार्जित वाड्यावरून वाद होता चुलत्यात आणि वडीलात. वडील जाऊन पाच वर्षे झाली. घराच्या वाटणीत अर्धा वाडा त्यांना आणि अर्धा आम्हाला आला होता. आम्ही वरती बांधून प्रशस्त, व्यवस्थित केले होते. शेजारी चुलता आणि चुलती राहायची. दोन घराच्या मधोमध भिंत बांधली होती चुलत्यानं. नंतर वाटणीच खूळ चुलतीन काढलं होत. भावकीतून कळले होते की, आम्ही दोन्ही भाऊ कधी लक्ष देत नसत. आम्ही आणि आमचं घर एवढंच. कधी येणं जाणं नाही. बोलणं नाही. पण वडील जाताना एकच सांगून गेलते, माझ्या भावाला अंतर देऊ नका. तो चुकला पण माझा भाऊच आहे. हीच एक कुरकुर ते हृदयात घेऊन गेले.

    मग चुलती परत बाहेर आली आणि नाक्यावर गेली. मी पाहिलं गाडी काढली. मागे गेलो. पुढं चुलती वळणावर उभी होती. मी तिच्यापशी गेलो आणि विचारलं, “काय ग काकू, काय झालं?” चुलती थोडं घाबरल्या स्वरात म्हणाली, “अरं तुझ्या काकाच्या बीपी आणि शुगरच्या गोळ्या संपल्यात दोन दिवस झाले. लै त्रास होतंय त्यांना. गाडी मिळत नाही ना रिक्षा, सगळं बंद आहे. मी म्हटलं, “बघू गोळ्या पाकीटं”. तिने जुने पाकीट दिले आणि दोनशे रुपयांची नोट आणि म्हणाली जर जमल्यास अर्धा किलो डाळ पण मिळाली तर घे.” मी पिशवी आणि पैशे घेऊन गाडीवर निघालो. चुलतीला एकच मुलगा होता सुनील. आम्ही बंटी म्हणायचो. लहानपणी एकत्र खेळायचो आम्ही. एकत्र खात-पीत खेळायचो. तो मला दाद्या म्हणायचा. पुसटस् आठवते, पण नंतर येणच बंद केलतं त्यांनी. फार जीव होता माझ्या आईचा त्याच्यावर. आणि छोटी चिमू ती पण फार गोड होती.

    नंतर त्यांनी यायचे बंद केल्यापासून परत बोलणं नाही. चिमू परदेशी असते. पाच वर्षांपूर्वी आली होती आणि बंटी हा कलकत्यात असतो. लव्हमॅरेज करून तिकडेच सेटल झाला. तो पण चिमू आली तेव्हाचं दिसला होता. परत काय आला नाही. चुलता भूसंपादन विभागातुन सेवानिवृत्त झाला होता. पेन्शनवर घर चालत असेल. आधे मधे चिमू आणि बंटी पैसे पाठवत असतील.. जर नसतील पाठवत तर कसं दिवस काढत असतील ह्या विचारांच्या घालमेलीत कधी मेडिकल दुकान आले कळालच नाही. उतरून गोळ्या घेतल्या. दोन महिन्यांच्या एकदाच घेतल्या परत त्रास नको म्हणून. बाजूला किराणा मालाचे दुकान चालू होते. तिथून डाळी, तांदूळ आणि इतर भाजी व टमाटे, बटाटा, कांदा असे वस्तू त्याच दुकानात भेटली. मग ते घेऊन निघालो. घरासमोर गाडी लावली. आई गेटसमोर आली होती. मी आईकडे बघत चुलत्याच्या घरात गेलो. चुलता खुर्चीवर बसला होता.

    त्यांनी माझ्याकडे बघितले. भिंतीवर वडिलांचा, चुलत्याचा फोटो लावला होता. कुंकू लावलेलं फोटोला बघून माझं मन भरून आलं. भावाचं प्रेम होतं शेवटी. चुलती आली. मी पिशवी तिच्याकडे दिली. चुलती भारावून आली होती. चुलता उठला. माझ्या डोक्यावर हात ठेवत डोळे पुसत आत गेला. चुलती स्वतःला सावरून, “एवढं सगळं आणलं.. घरात खरंच काय न्हवतं रे.. वरचे किती पैसे देऊ ?” मी दोनशेची नोट तिच्या हातात ठेवत, राहू दे म्हणालो. सगळं ह्या पैश्यापायी झालंय गं. चुलती न राहवता माझ्या गळ्यात पडून रडली. चुलता आतून गूळ शेंगा घेऊन आला. माझ्या खिशात टाकला. लहानपणी तो माझ्या खिशात असंच गपचिप टाकायचा हे आठवलं. मला चुलता विसरला न्हवता. मी सावरलो, चल येतो मी म्हणालो.

    काय लागलं सवरलं तर हाक मार म्हणून मी बाहेर आलो. आईने फाटक उघडलं. आत गेलो. आईचे डोळे पाणावले होते. तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि वडिलांच्या फोटोला दिवा लावला. मग मी कधी काय आणायला जातो तेव्हा चुलती बाहेर येते. किश्यात पैसे ठेवते आणि पिशवी देऊन काय पाहिजे ते सांगते. आज महिना होत आला लॉकडाउनला. दिवस चालले आहेत पण आज सकाळपासून पलीकडील भिंतीचा आवाज येत होता जोरात. जसे भीतीवर मारल्या सारखे. आम्ही उठून बाहेर गेलो. बघतो तर चुलती घरा बाहेर रडत उभारली होती. मी विचारायच्या आधी ती मला रडून सांगू लागली, “बघ रे पिंट्या, काका कसं करायला ?” मी, आई आणि लहान भाऊ पटकन आत गेलो.

    चुलता पार घेऊन भिंतीवर मारत होता. आम्हाला बघितल्यावर पार बाजूला टाकली. आईकडे बघत पुढं आला. आईच्या समोर येऊन हात जोडत माफ कर मला वैने म्हणत खाली बसला. आणि ओकसाभोक्षी रडू लागला. आईच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं. चुलती तिथंच होती. ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. मी, माझा भाऊ, आमच्या बायका हे सर्व बघत उभे होतो. आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. चुलत्याला उठवून खुर्चीवर बसवले. तो थोडा शांत झाला. आईच्या डोळ्यातले पाणी बघून, त्याला कळले की आईने त्याला कधीच माफ केलंत. शेवटी ऋणानुबंधाची नाती तुटत नसतात. अखेर घर एकत्र आल होतं. आम्ही दोन्ही भावानी आणि आमच्या बायकांनी काय बोध घ्यायचा तो घेतला आणि ते कायम मनाशी बांधून ठेवला.

    जगाचे लॉकडाउन कधी संपेल माहीत नाही. पण आमच्या दोन घराच्या मधला लॉकडाउन संपला होता.

    लेखकाचे नाव माहीत नाही आपणास धन्यवाद… आपल्या लिखाणामुळे कदाचित काही भावंडं एकत्र येतील

  • गच्च मिठी मारली पाहीजे

    गच्च मिठी मारली पाहीजे
    हातात हात पकडला पाहीजे

    नातं कोणतंही असो
    मतभेद कितीही असो
    संबध तोडण्याची भाषा
    मुळीच कधी करू नये

    प्रत्येक माणूस वेगळा
    विचारसरणी वेगळी
    मनुष्य जन्मा तुझी
    कहाणीच आगळी-वेगळी

    बापा सारखा मुलगा नसतो
    मुला सारखी सून नसते
    नवरा आणि बायकोचे तरी
    कुठे तेवढे पटत असते ?

    जरी नाही पटले तरी
    गाडी मात्र हाकायची आसते
    अबोला धरून विभक्त होऊन
    सार गणितं चुकायचे नसते

    काही धरायचं असतं
    काही सोडायचं असतं
    एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून
    एकमेकाला सोडायचं नसतं

    चुकल्यावर बोलावं
    बोलल्यावर ऐकूण घ्यावं
    एकांतात बसल्यावर
    अंतरंगात डोकवावं

    राग मनात ठेवला म्हणून
    कोणाचं भलं झालं का ?
    बिन फुलाच्या झाडा जवळ
    पाखरू कधी आलं का ?

    समोरची व्यक्ती चुकली तरी
    प्रेम करता आलं पाहिजे
    झालं गेलं विसरून जाऊन
    गच्च मिठी मारली पाहिजे

    स्वागत होईल न होईल
    जाणं येणं चालू ठेवल पाहीजे
    समोरचा जरी चुकला तरी
    म्हणा “खुशाल ठेव देवा त्याला !”

    आयुष्य खूप छोटं आहे
    हां हां म्हणता संपुन जाईल
    प्रेम करायचं राहिलं म्हणून
    शेवटी खूप पश्चताप होईल

    लक्षात ठेवा नात्या पेक्षा
    दुसरं काहीही मोठं नाही
    आपलं माणूस आपल्या जवळ
    या सारखी श्रीमंती नाही !

    सर्व मित्र मैत्रीणीना समर्पित 🙏🏻

  • खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

    🌸🌸

    खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

    पु. ल. म्हणतात –

    प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात.

    पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
    ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.

    शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

    माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.

    बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.

    खरं तर सगळे कागद सारखेच.
    त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

    रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
    पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.

    आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.

    सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.

    कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.

    रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.

    आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.

    ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.

    आयुष्य फार सुंदर आहे..

    ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे…
    माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे..

    🙏🏻🙏🏻

  • पढत मूर्ख

    पढत मूर्ख

    आठ वर्षांचा घेलाराम कच्छमधून बापाचे बोट धरून पुण्यात आला. बापाने किराणामालाच्या दुकानात नोकरी केली. हळूहळू घेलारामच्या बापाने स्वतःचे दुकान टाकले. दुकानाच्या मागेच राहायला लागले. दुकान बंद करताना गिऱ्हाईक आले तर पुन्हा दार उघडून त्याला माल देत. पुण्याच्या प्रसिद्ध पेठामधल्या पाट्या त्याच्या दुकानावर नव्हत्या. तसेच एक पैसा नफ्यावर ते धंदा करत. घेलाराम लहान वयातच दुकानावर बसायला लागला. कोणती गोष्ट केवढ्याला विकायची हे सांगून बाप माल आणायला, येणी वसूल करायला जायचा. पाढे पाठ करायला घेलारामला शाळेत जावे लागले नाही. दुकानाचा जम बसला. घेलारामच्या बापाने त्याच्या दोन्ही मुलींची लग्ने करून दिली. घेलारामचेही लग्न कच्छमधील मुलगी पाहून करून दिले.

    घेलारामच्या बरोबरीने त्याची नवपरिणित पत्नीही दुकानात पुड्या बांधू लागली. ही गोष्ट आहे 1955 सालामधली. घेलारामने दुकान आणखी वाढविले. दुकानामागची राहण्याची जागाही वाढवली. पैसा मिळाला आणि वाढला तरी त्याच्या गाठी मारलेले धोतर नवीन धोतरात बदलले नाही. घेलाराम घेलाशेठ झाला. दुकान उघडायची व बंद व्हायची वेळ कधीही बदलली नाही. तुफान पाऊस असो, कडाक्‍याची थंडी असो, सकाळी सात वाजता त्याचे दुकान उघडत असे. इतर लोक गाजावाजा करून जंक फूडचे स्टॉल टाकतात. सुरुवातीचा हुरूप संपल्यानंतर दुकानाच्या वेळा आकुंचन पावतात. खूप पाऊस असेल तर गिऱ्हाईक येणारच नाही अशा ठाम समजुतीने दुकान उघडले जात नाही. थंडीत दुकान लवकर बंद होते. असे होत होत दुकान दुसऱ्या कुणालातरी चालवायला दिले जाते.

    वर्षांमागून वर्षे गेली. आसपासचा परिसर बदलला. घेलाशेठच्या दुकानाच्या आजूबाजूला त्याच्याच धंद्यातील इतर दुकाने आली. घेलाशेठ मजेत. माल कुठून, कसा स्वस्त मिळवायचा, त्याची प्रतवारी कशी करायची व तो कसा विकायचा हे ज्ञान घेलाशेठच्या मुठीत बंद होते.
    घेलाशेठने त्याच्या मुलाला शाळेत घातले. मुलगा मॅट्रीकपर्यंत पोचला. नंतर दुकानावर आला. घेलाशेठचे समोर एकाने किराणामालाचे दुकान टाकले. घेलाशेठचा मुख्य धंदा तेल विक्रीचा होता; वाणसामान जोडधंदा. समोरच्याने दुकानाची भरपूर जाहिरात केली. दुकानाच्या ओपनिंगला घेलाशेठला बोलावले. ते आवर्जून गेले.

    “”आओ, जी घेलाशेठ आओ” “”जय गोपाल हरिराम” “”मारो डिकरा बिझनेस मॅनेजमेंट की शिक्षा पुरी करके आयो” हरिरामचं पॉश कपड्यातलं शिक्षित पोरगं घेलाशेठकडे बेरकी नजरेनं पाहत होतं. हरिरामचे दुकान सुरू झाले आणि त्याच्या मुलाने दहा दिवसांत “प्राइस वॉर’ सुरू केले. घेलाशेठच्या दुकानात तेलाच्या भावाची पाटी होती “साठ रुपये किलो’. समोरच्या दुकानात पाटी लागली 58 रुपये. गिऱ्हाईकाला किमतीशी सोयसुतक असतं. आठ दिवसांनी घेलाशेठच्या दुकानात 58 रुपयांची पाटी लागली. जुने गिऱ्हाईक परत आले. काही दिवस गेले. समोरच्या दुकानात 55 रुपयांची पाटी लागली. आठ दिवसांनी घेलाशेठचे दुकानातही 55 रुपयांची पाटी. लक्षण ठीक दिसत नव्हते. ही व्यापारी पद्धत नसते. हरिरामच्या दुकानात पन्नासची पाटी लागली. आठ दिवसांनी घेलाशेठच्या दुकानात 48 रुपयांची पाटी. घेलाशेठचं पोरगं गडबडलं.

    “”बापू अपना धंदा बंद हो जायेगा” घेलाशेठने त्याला गप्प राहायला सांगितले. आता हरिरामची पाटी 45 वर आली. घेलाशेठने 40 ची पाटी लावली. पुन्हा हरिरामने 35 ची पाटी लावली. घेलाशेठचे गिऱ्हाईक तुटले. घेलाशेठ निवांत. पोरगं गडबडलेलं. हरिरामचे दुकान पंचक्रोशीत स्वस्त म्हणून रांगा लागल्या. चार महिन्यानंतर हरिरामच्या दुकानाचे दिवाळे निघाले. घेलारामने पुन्हा 60 रुपयांची पाटी लावली. हरिरामने त्याच्या बिझिनेस मॅनेजमेंटवाल्या मुलाला चांगलेच धारेवर धरले. बिनशिकलेल्या घेलाशेठने कोणाचा सल्ला घेतला हा विचार हरिरामला छळू लागला.

    एक दिवस हरिराम घेलाशेठच्या दुकानावर आले. “”आओ, आओ भाई” व्यापारी चहा झाला. हरिरामने हळूच विषयाला हात घातला. “”थारो कन्सलटंट कौन छे, तू तो पढा लिखा नही” घेलाशेठ मिश्‍कील हसले. “”अरे हरिराम आपल्या धंद्यात आपला कन्सलटंट आपले जीवन असते.”
    “”मी समजलो नाय.” “”अरे, तुझ्या पोराने आपल्या व्यापारी वर्गातल्या रितीला सोडून धंदा केला. तू भाव पाडले आणि वस्तू मूळ खरेदी किमतीपेक्षा कमी भावाने विकलेस मी फक्‍त पाटीवरचे भाव बदलले. पण…” “”पण काय शेठ?” हरिराम अधिर झाला. “”मी फक्‍त पाट्या कमी भावाच्या लावल्या. वस्तू विकलीच नाही. गिऱ्हाईक आले की, माझ्याकड नाही सांगून तुझ्याकडे पाठवले” हरिरामचं पोरगं अजूनही पुस्तक चाळतच बसलंय. 😊

  • रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण

    रागावर नियंत्रण करण्याचे
    एक सुंदर उदाहरण —

    एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा “

    “नेहमीप्रमाणे बसलो होतो.
    एक पक्षकार आले.
    हातात कागदाची पिशवी.
    रापलेला चेहरा.
    वाढलेली दाढी.
    मळलेली कपडे.
    म्हणाले..,
    ” सगळ्या च जमीनीवर स्टे
    लावायचा आहे. आणखी काय
    कागदं पाहीजेत?
    किती खर्च येईल? “

    मी त्यांना बसायला सांगितलं.
    ते खुर्चीवर बसले.
    त्यांची सर्व कागदपत्रे तपासली.
    त्यांच्या कडून माहीती घेतली.
    अर्धा पाउण तास गेला.
    मी त्यांना सांगितलं. ,
    ” मी अजून कागदपत्रे पाहतो.
    तुमच्या केसचा विचार करूया.
    तुंम्ही असं करा
    ४ दिवसांनी परत या. “

    ४ दिवसांनी ते पक्षकार
    पुन्हा आले.
    तसाच अवतार.
    भावा बद्दलचा राग अजूनही
    कमी झाला नव्हता.
    मी त्यांना बसायची खूण केली.
    ते बसले.

    मग मीच बोलायला सुरूवात
    केली.
    ” मी तुमची कागदपत्रे पाहीली.
    तुम्ही दोघे भाऊ.
    एक बहीण.
    आई वडील लहानपणीच गेले.
    तुमच शिक्षण ९ वी पास.
    धाकला भाऊ M.A.B.ed.
    तुंम्ही भावाच्या शिक्षणा साठी
    शाळा सोडली.
    रानात लंगोटी वर राबला.
    नेवरा दाजी च्या विहीरीवर
    दगड फोडली.
    सदाबापू च्या उसात
    च-या पाडल्या.
    पण भावाच्या शिक्षणाला पैसा
    कमी पडू दिला नाही.
    एकदा बहीण शेतात गुरं
    चारत होती.
    तुमचा भाऊ शाळेतून आला होता.
    कसा तो म्हशीच्या आडवा गेला
    आणि त्याला शिंग लागली संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं.
    तुंम्ही खांद्या वरून त्याला
    बोरगावला नेलं.
    खरं म्हणजे त्यावेळी तुमचं
    पण कळतं वय नव्हतं….

    फक्त कळती माया होती..

    आई बापाच्या मागं यांचा मीच
    आई बाप ही भावना होती…
    तुमचा भाऊ B.A ला गेला.
    उर भरून आला.
    तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट
    उपसायला लागला.
    पण अचानक त्याला किडनीचा
    त्रास सुरू झाला.
    दवाखानं केल..
    बाहेरचं केलं..
    पण गुण आला नाही..
    शेवटी डॉक्टर नं किडनी काढायला
    सांगितली.
    तुंम्ही तुमची किडनी दिली.
    ऑफिसर झाल्यावर खुप
    फिरायच आहे..
    नोकरी करायची आहे..
    तुला आमच्या पेक्षा लय त्रास..

    आंम्ही रानातली माणसं.
    आंम्हाला एक किडनी असली
    तरी चालतय.
    तुम्ही बायकोच सुध्दा न
    ऐकता किडनी दिली.

    भाऊ M.A ला गेला.
    होस्टेल वर रहायला गेला.
    गावात मटण पडलं..
    डबा नेवून द्यावा.
    शेतात कणसं आली..
    कणस नेवून द्यावी.
    कुठला सण आला..
    पोळ्यांचा डबा द्यावा..
    घरा पासून हॉस्टेल च अंतर
    २५ की.मी.
    पण तुंम्ही सायकलने गेला.
    घासातला घास घातला.
    भावाला नोकरी लागली..
    तुंम्ही गावात साखर वाटली..

    ३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..
    झालं म्हणजे त्यानंच केलं.
    तुंम्ही फक्त हजर होता. पण
    तरी अभिमान होता..

    भावाला नोकरी लागली.
    भावाच लग्न झालं..
    आता तुम्हाला आणि बायका पोरांना
    सुख लागणार होतं;
    पण झाल उलटंच….
    लग्न झाल्या पासुन भाऊ घरी
    येत नाही..
    बोलावलं तर म्हणतो;
    मी बायकोला शब्द दिलाय..
    घरी पैसा देत नाही..
    विचारलं तर म्हणतो अंगावर
    कर्ज आहे..
    गेल्या वर्षी कोल्हापुरा त फ्लॅट
    घेतला.
    विचारल तर म्हणतो कर्ज
    काढून घेतलाय..!! “

    सगळं सांगून झाल्यावर मी
    थोडा वेळ थांबलो.

    नंतर म्हणालो …
    ” आता तुमचं म्हणणं आहे की
    त्याने घेतलेल्या मिळकती वर
    स्टे लावायचा ?

    तो पटकन म्हणाला;
    हो बरोबर…

    मी म्हणलं;
    स्टे लावता येईल.
    भावाने खरेदी केलेल्या मिळकती
    मधला हिस्सा पण मिळेल.
    पण……

    पण तुंम्ही दिलेली कीडनी परत
    मिळणार नाही.
    तुम्ही भावासाठी आटवलेलं
    रक्त परत मिळणार नाही.
    तुंम्ही त्याच्या साठी खर्च केलेलं
    आयुष्य पण परत मिळणार नाही..
    आणि मला वाटतयं या
    गोष्टी पुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची
    किंमत शुन्य आहे.
    त्याची नियत बदलली.
    तो त्याच्या वाटंनं गेला.
    तुंम्ही त्याच वाटेनं नको जाऊसा.
    तो भिकारी निघाला..
    तुंम्ही दिलदार होता..
    दिलदारच रहा..
    तुम्हाला काहीएक कमी
    पडणार नाही.. !!
    उलट मी म्हणेन वडीलो पार्जित
    मिळकती मधला तुमचा हिस्सा
    तेवढा पेरा.. त्याचा हिस्सा पडीक
    राहु द्या..
    कोर्ट कचेरी करण्या पेक्षा मुलांना
    शिकवा.. शिकुन तुमचा भाऊ
    बिघडला ;
    म्हणुन पोरं बिघडणार नाहीत.. !! “

    त्यान १० मिनीटं विचार केला..
    सगळी कागद पिशवीत कोंबली..
    डोळं पुसत म्हणाला;
    ” चलतो सायेब… !! “

    या गोष्टीला ५ वषॅ झाली.
    परवा तो पक्षकार अचानक
    ऑफीस ला आला.
    बरोबर गोरागोमटा पोरगा.
    हातात कसली तरी पिशवी.
    मी म्हटले बसा..
    तो म्हणाला ,
    “” बसायला न्हाय आलो सायेब,
    पेढं द्यायला आलोय “”.

    हा माझा पोरगा.
    न्युझिलॅंन्डला असतो.
    काल आलाय.
    आता गावात ३ मजली घर हाय.
    ८-९ एकर शेत घेतलय.
    तुंम्ही म्हणाला होता कोर्ट
    कचेरी च्या वाटला लागु नका.

    मी पोरांच्या शिक्षणा ची
    वाट धरली.. !! “

    मला भरुन आलं…

    हातातला पेढा हातातच राहीला..

    . .. .”

    रागाला योग्य दिशा दिली तर
    पुन्हा रागवायची वेळ
    येणार नाही…

    कितीही कमवा
    पण कधी गर्व करू नका
    कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
    ऱाजा आणि शिपाई
    शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात,
    आयुष्य खूप सुंदर आहे
    एकमेकांना समजून घ्या व जीव लावा
    ..
    लेखक अनभिज्ञ