🛑दिपावली सेवा संच विषयी माहिती व वेळा🛑
आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाची आचारसंहिता आपल्या सेवेकऱ्यांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलीं विविध सेवा आपणाकडून करून घेत आहेत. दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे. जर परमपुज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे खालील नियमांचे पालन करुन दिपावलीत सेवा केली, तर गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपादृष्टीमुळे आपणा सर्वांच्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा होईल.
🛑 दिपावलीची सेवा करावयाचा कालावधी 🛑
👉प्रारंभ- सोमवार दि. 17 ऑक्टोबर 2022 कालाष्टमी)
👉समाप्त- सोमवार , दि. 24 ऑक्टोबर 2022 अमावस्या)
🛑या नऊ दिवसात दररोज करावयाची सेवा🛑
🌺घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म व लक्ष्मी पद्म रांगोळी काढावी व प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गाईचे व लक्ष्मीचे पावले काढून रांगोळीवर हळद-कुंकू वाहावे.
🌺दररोज देवांसमोर गायीचा शुद्ध तुपाचा दिवा व धूप लावावा व घरात गोमूत्र शिंपडावे.
🌺 अभिषेक – अष्टमी ते अमावस्येच्या दरम्यान कुलदेवतेच्या टाकावर १ किंवा १६ वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक घ्यावा.तसेच स्वामी महाराजांच्या मूर्तीवर १ किंवा १६ वेळा श्रीसूक्त/पुरुष सूक्त अभिषेक करावा व मूर्तींना अत्तर लावावे मूर्ती नसल्यास फोटोला अत्तर लावा.
🌺 कुंकू मार्चन – दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी कुंकू मार्चन करावे. कुलदेवतेचा टाक ताम्हानात ठेवून त्यावर पाच बोटांनी १०८ वेळा मंत्र म्हणून कुंकू वहावे व व तेच कुंकू कपाळी लावावे.
🌺 भारीत रक्षा – अष्टमी पासून ते अमावस्या पर्यंत रोज सायंकाळी हातात यज्ञाची विभूती व पिवळ्या मोहरी हातात घेऊन त्यावर कालभैरवाष्टक ११ वेळा, वल्गा सुक्त – १ किंवा ११ वेळा, श्री स्वामी समर्थ मंत्र १ माळ म्हणावे. भारीत रक्षा घराच्या चौफेर टाकावी यामुळे घराचे वर्षभर संरक्षण होते.
🌺 कमळगठ्ठा मणींची सेवा- अष्टमी पासून ते अमावस्या पर्यंत या ८ दिवसात कमळगट्टाचे दररोज २ मणी हातात घेऊन
षोडशी मंत्र-१६ वेळा, श्री स्वामी समर्थ मंत्र-१ माळ, कमलात्मक मंत्र-१ माळ
हि सर्व सेवा करावी व ते मणी एका डबीत बाजूला ठेवावेत. अशी १६ मण्यांची रोज दोन याप्रमाणे ८ दिवसात सेवा पुर्ण करावी.
🌺 यज्ञहवन –
शेवटी अमावस्येच्या दिवशी नेहमीप्रमाणे दोन मणींची सेवा झाल्यानंतर घरात एखाद्या लोखंडी पाटिवर यज्ञकुंड पेटवावे. त्यात अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र ११ वेळा, गायत्री मंत्र २४ वेळा, नवार्णव मंत्र १६ वेळा या सर्व मंत्रानी गायीच्या तुपाने “स्वाहा” म्हणून स्वाहाकार करावा.
तोपर्यंत डबीतील 16 कमळ गठ्ठयांचे मणी गाईच्या तुपात भिजत ठेवावेत.
वरील मंत्रांच्या स्वाहाकारा नंतर पुन्हा कमलात्मक मंत्र १६ वेळा म्हणून कमळगठ्ठयाचा प्रत्येकी १ मणी अग्नीवर “स्वाहा” म्हणून टाकावा.
या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थिरता मानसिक शांती उन्नती होते.
टीप : माझ्या कडे सदर संच उपलब्ध केल्या जाईल
श्री स्वामी समर्थ