माहिती लाडक्या गणेशाची
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरूमे देवं, सर्व कार्यशू सर्वदा
गणेशाचे स्मरण केले की सर्व दू:ख दूर होतात कारण गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे.
विद्या, शिक्षण आणि पर्यायाने लहान मुलांची जास्त आवडीची देवता म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा!!!
का वाहतात गणपतीला दूर्वा – Why Lord Ganesha Loves “Durva”
गणपतीला दुर्वांची जुडी अतिशय प्रिय आहे दूर्वा वाहिली की गणपती लवकर प्रसन्न होतो.
गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत. एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते.
गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी, की ऋषी मुनी आणि देवता यांना महाभयानक अशा अनलासूर नावाच्या (अनल अर्थात अग्नी) राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. मग देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले, ज्यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ऋषि मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. या मुळे अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
Scientific Reason to use Durva and its benefit for Health
दुर्वा ही एक औषधी वनस्पती सुद्धा आहे बर कारण पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे.
मानसिक शांतीसाठीही दुर्वा खूपच लाभकारक आहे. कर्करोगाच्या अर्थात कॅन्सर रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.
Some Imp Fact regarding Bappa
गणपती बाप्पा यांना शेंदूर सुद्धा लावला जातो तसेच त्याला जास्वंदीचे फूल सुद्धा अतिशय प्रिय आहे.
उंदीरमामाची स्वारी आणि मोदक गणेशाला किती आवडतात ही तुम्हाला वेगळे सांगणे नको.
गणेशाचा श्लोक आपण वर वाचलाच आहे तो नेहमी म्हणायला हवा.
That’s why We pray for Lod Ganesh First
आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाप्पा एकमेव अशी देवता आहे ज्याला नाद भाषा म्हणजे. आपण बोलतो ती भाषा कळते म्हणून कोणत्याही देवतेच्या सेवे आधी गणेशाला वंदन करावे. आणि त्याला प्रार्थना करावी की बाप्पा आमचे म्हणणे आमच्या इष्ट देवते पर्यन्त पोहोचव आणि तुझी कृपा आमच्यावर अखंड राहुदे…