Gurucharitra In English

             *जागतिक किर्तीचे*
            *गुरु चरित्रवाले बाबा*
             *मानवेंद्र बिरुळकर*

अरे!
तू कधी गुरु चरित्राचे पारायण केले आहेस का ?
“नाही”
का रे ?
असा प्रश्न का विचारला?

अरे! गुरु चरित्र ही महाराष्ट्राची धार्मिक परंपरा.

आज आपल्या देशात असंख्य कुटूंबे गुरु चरित्राचे पारायणे नियमित करीत असतात.

यातून या कुटूंबातील सदस्यांना मनशांती, मानसिक समाधान,वैयक्तिक व कुटूंबातील सदस्यांच्या अडचणींचे निराकरण होणे,संकल्प सिद्धी होणे असे उत्कट अनुभव भक्तांना येत असतात.

आपल्या हिंदू संस्कृतीमधे गुरु चरित्राच्या पारायणाला खूप महत्त्व आहे….

हो,
मी पण माझ्या अनेक मित्रांकडून
या गुरु चरित्राचा महिमा ऐकला आहे…..

मित्रांनो,
आज हा विषय निघायचे कारणही तसेच होते.
कोरोना काळात माझी नगर वरील लेख मालिका सुरु झाली.
त्यातून अनेक जुने मित्र जोडले गेले.

त्यातलाच एक माझा अगदी जवळचा मित्र
मानवेंन्द्र गजानन बिरुळकर.
वय वर्ष ६६
१९७४ चा बॕचमेट
अए सोसायटी हायस्कूल.

वडिल रेल्वेत नोकरीला होते.
ते संस्कृत भाषेचे व गुरु चरित्राचे गाढे अभ्यासक होते.
त्या काळात हे कुटुंब नगरमधील सातभाई गल्लीत रहात होते.

अकरावी नंतर शिक्षण व नोकरी निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आणि साधारण अठ्ठेचाळीस वर्षाने हा शाळेतील जुना मित्र परत फोनवर जोडला गेला.

माझे नगर वरील विविध लेख वाचून मानवेंद्र नियमितपणे मला फोन करु लागला.
विविध विषयावर आमच्या गप्पा होऊ लागल्या.

आम्ही सर्व मित्र मानवेंद्रला मानव म्हणून ओळखतो.

विशेष म्हणजे मानव हा मुकेशचा चाहता.

मुकेशची अनेक अविट गोडीची गाणी तो रेकाॕर्ड करुन मला ऐकण्यासाठी पाठवू लागला

आमच्या दोघांच्या गाण्याच्या छंदामुळे १९७४ मधील आमची ही जुनी दोस्ती परत बहरत गेली.

मानवेंद्र हा काॕलेज शिक्षणानंतर बँकर झाला. मानवने आपली करिअर बँक आॕफ महाराष्ट्रमधे डेव्हलप केली आणि सन्मानाने व्हिआरएस घेतली.

ही झाली सर्वसामान्य मानवची कथा.

असे अनेक मानव आपल्या समाजात आहेत.

परंतु….आमचा हा मानवेंद्र सर्वांपेक्षा खूssप वेगळा आहे

वयाच्या विसाव्या वर्षापासूनच मानव गुरु चरित्राच्या प्रेमात पडला

आज पर्यंत त्याने गुरु चरित्राची असंख्य पारायणे केली आहेत.

आमचा हा मानव सुरूवातीपासूनच धार्मिक, आध्यात्मिक बाबींकडे झुकलेला.

गुरु चरित्रावर त्यांची अपार श्रद्धा!

एका शुभदिनी मानवेंद्रला गुरुंची आज्ञा झाली आणि मानवचे झपाटलेले आयुष्य सुरु झाले.

गरुचें अधिष्ठान मानवच्या कुटूंबात अतिशय भक्कम आहे
त्यामुळे गुरु चरित्र व त्या संबंधातील बाबींकडे मानव अतिशय श्रद्धेने बघत असे….

आमचा मानव गुरुचरित्राचे पारायण कडक नियम पाळून सात दिवसाचे पारायण दत्त जयंतीच्या दिवशी पूर्ण करीत असे…

मानव बरोबर फोनवर बोलत असताना,
तो माझ्याशी या गुरु चरित्राबाबत अगदी भरभरुन बोलत होता….हे सर्व ऐकत असताना मी सुद्धा भारावून जात असे.

मानव सांगत होता,

या गुरु चरित्रामुळे माझे आयुष्य बदलून गेले.
अडचणीच्या काळात या गुरु चरित्राच्या पारायणामुळे माझ्या आयुष्यातील संकटे दूर तर झालीच परंतु मला जीवनात जगण्यासाठी आत्मविश्वास मिळाला.

सकारात्मक दृष्टिकोन मिळाला.

आयुष्यात एक टप्पा असा आला की हे गुरु चरित्र म्हणजे आपले आयुष्य आहे याची जाणीव मानवला होऊ लागली

भविष्यकाळात या गुरु चरित्राला वाहून घ्यायचे असे मनोमन त्याने ठरवले होते.

  *अपना भी भला सबके भले में है!*

या युक्तीनुसार मानवची वाटचाल सुरू झाली.

गुरु चरित्राच्या सेवेसाठी मानवने बँकेतून व्हिआरएस घेण्याचा निर्णय घेतला

मानव म्हणजे साधी रहाणी उच्च विचार सरणी.

मानव म्हणजे निरोगी आयुष्याचे प्रतिक.

कुठलीही औषधे न घेता आरोग्यदायी जीवन जगणारा असा हा आमचा मित्र!

एक मराठी माध्यमातून शिकणारा मुलगा काय करु शकतो यांचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे मानवेंद्र बिरुळकर उर्फ मानव

अहो! या माणसाने गुरु चरित्राचे चक्क इंग्रजी भाषेमधे भाषांतर केले आहे

एस! गुरु चरित्राचे इंग्रजीमधे ट्रान्सलेशन!

हे ऐकून आश्चर्य वाटले ना !
धक्का बसला ना?
माझेही असेच झाले.

हे सर्व ऐकल्यावर आज मी जगाला आनंदाने सांगेन की,मानवेंद्र या माझ्या मित्राने गुरु चरित्राचे इंग्रजी भाषेमधे भाषांतर केले आहे

जगात अशा पद्धतीने इंग्रजीमधे गुरु चरित्राचे भाषांतर कोणीही केलेले नाही हे मानव अभिमानाने सांगतो

गुरु चरित्र म्हणजे
जवळ पास साडेपाच हजार श्लोक
त्रेपन्न आध्याय.
गुरु चरित्र म्हणजे पाचवा वेद.

गुरु चरित्र हे नाव ऐकून भक्त उत्साही होतात.

अशा या अतिशय महत्त्वाच्याआध्यात्मिक ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर मानवने मागील तीन वर्षात पूर्ण केले आहे

हे शिवधनुष्य मानवने अतिशय कष्टाने पेलले आहे.

मानव सांगत होता,

ब-याच मान्यवरांनी असे भाषांतर करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही
परंतु गुरु कृपेमुळे माझ्या हातून हे कार्य पूर्णत्वास गेले

अरे,हे सर्व घडले कसे!

एका भल्या पहाटे मानवला गुरुचीं आज्ञा झाली व या कामासाठी मानव झपाटल्या सारखा कामाला लागला.

मानव,हा उपक्रम तू सिद्धीस कसा नेला हे जरा सविस्तर सांग ना!

एखाद्या समस्येवर मात करण्यासाठी जेव्हा मानवी प्रयत्न संपतात त्या ठिकाणी गुरु चरित्रातून मार्ग सापडतो अशी मानवची श्रद्धा आहे.

जगात सर्वच लोकांना काहीना काही दुःखे असतात त्यावर मात करण्यासाठी गुरु चरित्राचे पारायण हा उपाय आहे असे मानवच्या गुरुचें ठाम मत आहे

गुरुचरित्र जगात पोहचले पाहिजे
दुःखी लोकांना मार्ग सापडला पाहिजे

या साठी मराठीतील गुरु चरित्र इंग्रजी भाषेत गेले पाहिजे हा गुरुंचा आदेश डोळ्यासमोर ठेऊन मानवने भाषांतरास सुरूवात केली

सकाळ पासून संध्याकाळ पर्यत एकच ध्यास भाषांतर.

गुरु चरित्रामधील प्रत्येक शब्दांचे परदेशातील लोकांना समजेल अशा भाषेत भाषांतर!

सुदैवाने मानवला लहानपणापासून इंग्रजी भाषेची निसर्गदत्त देणगी आहे… शाळेत व जिल्ह्यात तो इंग्रजी विषयात कायम पहिला येत असे.
या अंगभूत इंग्रजी ज्ञानाचा 9फायदा मला हे भाषांतर करताना झाला.

मानव अभिमानाने सांगतो,

माझ्या पत्नीने माझ्याकडे कधी कुठल्या गोष्टींचा आग्रह धरला नाही परंतु ती नेहमी सांगायची तुमचे उर्वरित आयुष्य तुम्ही आता गुरु सेवेला दिले पाहिजे हिच माझी इच्छाआहे

त्यातून हे महान कार्य मानव करु शकला.

तुला सांगतो.

मी रोज जमेल तसे श्लोकाचे भाषांतर करायचो
त्यासाठी इंग्रजीमधे काही नवीन शब्द,वाक्ये तयार केली जायची
त्याची जोडणी मी गुरु चरित्राच्या भाषांतरामधे व्यवस्थित करीत असे

आमच्या गुरुस्थानी आसलेल्या स्वामींनी काही नवीन इंग्रजी शब्द या भाषांतरामधे सुचवून मानवला साक्षात्कार दिला आहे…..

एक अध्याय भाषांतर करुन पूर्ण झाला की मी तो मी एका मोठ्या वहीमधे लिहून काढीत असे.

नंतर माझा मुलगा अमेय,पत्नी ज्योती व मुलगी चिन्मयी असे सर्व जण आम्ही एकत्र बसून तो भाषांतरीत ड्राफ्ट व्यवस्थित तपासायचो.

ही प्रोसेस पूर्ण झाली की अमेय लगेच हा इंग्रजी अध्याय काॕम्प्युटरवर घेत असे, ..असे प्रत्येक आध्यायाचे आमचे काम तीन वर्ष चालले होते
आमचे सर्व घर गुरु चरित्रमय झाले होते.

  • आमचा मानव तर या कामात चोवीस तास रात्रंदिवस व्यस्त असे*.

मानव पुढे सांगत होता,

गुरु चरित्राचे आध्याय एक सारखे नाहीत काही लहान तर काही मोठे आहेत
त्यामुळे भाषांतर करण्यासाठी खूप वेळ लागत असे.
त्याच बरोबर परदेशी लोकांसाठी सुलभ व समजणारी वाक्ये व शब्द शोधणे हे एक मोठे आव्हान आमच्या समोर होते.

या इंग्रजी भाषांतराची आम्ही चारशे पाने लिहून काढली आहेत

शेवटचे त्रेपन्न दिवस मानवचा मुक्काम त्रिंबकेश्वरच्या गुरु पिठामधे होता.

त्या काळात मानवला हाय बीपीचा त्रास होता या ही परिस्थितीत त्याने भाषांतराचे लिखाण चालू ठेवले होते
या काळात मानव व त्याच्या मुलाने रोज सोळा सोळा तास काम केले होते
.
शेवटी या त्रिंबकेश्वरच्या गुरु पिठामधे या दोघांनी भाषांतरीत इंग्रजी गुरु चरित्राला फायनल टच दिला आहे..
हे कार्य सिद्धीस नेले
दत्त गुरुंनी माझ्याकडून हे कार्य करवून घेतले.

       *दत्त गुरु महाराज की जय!*

भाषांतर झाल्यावर मानवने हे इंग्रजी हस्त लिखित गुरु चरित्राची प्रत स्वामी समर्थ दिडोंरी प्रणित,गुरु आण्णासाहेब मोरे यांना समर्पित केली आहे.

मानवचे मोठे पण म्हणजे भाषांतरकार म्हणून मानवने आपले नाव कुठेही येऊ दिलेले नाही

ही गुरुंची सेवा आहे असे तो मानतो.
.
या मठामार्फत या इंग्रजी गुरु चरित्राच्या अनेक प्रती काढण्यात आल्या.

आज जगातील आठरा देशांमधे हे इंग्रजी गुरु चरित्र गेले आहे

तसेच ज्या भागात मराठी समजत नाही तिथे इंग्रजी गुरु चरित्र वापरले जाते

कॕनडा,अमेरिका,न्युझीलंड,आॕस्ट्रेलिया,साऊथ आफ्रिका,या देशात गुरु चरित्राची पारायणे होतात

विशेष म्हणजे दुबई, मलेशिया, इंडोनेशिया, युएई,या मुस्लीम देशातही गुरु चरित्र मनापासून वाचले जाते त्यामुळे या विदेशी भक्तांनी गुरु चरित्राची अनुभूती घेतली आहे

असे मानव अभिमानाने सांगतो

या कामासाठी देश विदेशातील अनेक विद्वान मंडळींनी मानवचे कौतुक केले आहे या कार्यामुळे मानवने देश विदेशात अनेक मित्र जोडले आहेत..

विश्वास,

माझ्या या कार्यात माझी पत्नी सौ.ज्योती, मुलगा अमेय,मुलगी चिन्मयी यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले आहे.
त्यांच्या शिवाय हे कार्य पूर्ण झाले नसते त्यांचे उपकार मी कधीच विसरु शकणार नाही.

हे सर्व ऐकल्यावर मी निशब्द झालो.
काय बोलावे हे मला सुचत नव्हते.

खरं सांगतो,
मानवचा हा लेख लिहीत असताना मी सुद्धा झपाटून गेलो होतो त्यांचा प्रत्येक शब्द मला व्यवस्थित आठवत होता व मी लिहीत होतो

जगाचे कल्याण व्हावे यासाठी प्रयत्न करणारा, मानव माझा मित्र आहे यांचा मला अभिमान आहे

      *Well done  Manwendra!*

मित्रा,
जगाच्या कल्याणासाठी
तुझे हे कार्य खूप महान आहे.

      *तुझ्या या महान कार्यासाठी*
         *सर्व नगरकरांच्या वतीने*  

तुझे व तुझ्या परिवाराचे हार्दिक अभिनंदन!

 *मानवेंद्र तुझ्या या जागतिक किर्तीच्या*
     *कार्यासाठी तुला त्रिवार वंदन!*

                *गुरुदेव दत्त!*
      *दत्तगुरु महाराज की जय!*

मानवेंद्र बिरुळकर
+918956905509

धन्यवाद !

विश्वास सोहोनी
9850995652

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top