साला मी अडाणी होतो

साला मी अडाणी होतो
तेच बर होत… ☺️

साला मी अडाणी होतो तेच बर होत…
साधा सर्दी खोकला झाला की
आलं, तुळस काढा घ्यायचो,
पोट दुखल की ओवा चावत जायचो
ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो
ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट,
ना हॉस्पिटल च्या एडमिशन मध्ये अडकत होतो…
निरोगी आयुष्य जगत होतो..
साला मी अडाणी होतो
तेच बर होत… ☺️

राम राम ला राम राम,
सलाम वालेकुम ला, वाले कुम अस सलाम
आणि जय भीम ला जय भीम नेच प्रेमाने उत्तर देत होतो
ना धर्म कळत होता
ना जात कळत होती
माणूस म्हणून जगत होतो…
साला मी अडाणी होतो
तेच बर होत… ☺️

सकाळी न्याहारीला दूध भाकरी, दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो,
हेल्थी ब्रेकफास्ट चा मेनू
लंच चा चोचलेपणा आणि
डिनर च्या सोफेस्टिकेटेड उपासमारी पेक्षा दिवस भर भरपेट चरत होतो…
साला मी अडाणी होतो
तेच बर होत… ☺️

शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो
रामायणात रंगून जात होतो, चित्रहार सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो,
ना वेबसिरीज ची आतुरता,
ना सासबहु चा लफडा ,
ना बातम्यांचा फालतू ताण सहन करत होतो…
खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो…
साला मी अडाणी होतो
तेच बर होत… ☺️

सण असो की जत्रा सुट्टी मिळेल तेव्हा वेळ मस्त कुटुंबासोबत घालवत होतो,
चार मित्रांमध्ये मिसळत होतो, लोकांमधी उठत बसत होतो…
ना टार्गेट ची चिंता होती,
ना प्रमोशमन चे टेन्शन होत,
ना पगार वाढ ची हाव होती,
तणावमुक्त जीवन जगत होतो…
साला मी अडाणी होतो
तेच बर होत… ☺️

गावातले वाद गावात मिटवत होते
झाली भांडण तरी रात्री मंदिरात एकत्र येत होतो,
सकाळी पुन्हा एकत्र फिरत कामाला लागत होतो..
ना पोलीस केस ची भीती,
ना मानहानी चा दावा, ना कोर्टाच्या चकरा मारत होतो.
खरोखर सलोखा जपत होतो.
साला मी अडाणी होतो
तेच बर होत… ☺️

कुटुंबाला प्रेमाने पत्र लिहीत होतो, पत्राची वाट बघत होतो,
पत्राच्या प्रत्येक ओळीत प्रेमाचा ओलावा अनुभवत होतो…
ना मोबाईलवर कोरडी बोलणी,
ना फॉरवर्ड म्यासेज,
ना ऑनलाइन ची निरर्थक चॅटिंग उगाच चा फक्त दिखावा करत नव्हतो
साला मी अडाणी होतो
तेच बर होत… ☺️

मातीच्या घरात रहात होतो, सारवलेल्या अंगणात बागडत होतो,
ऐसपैस अर्धा एकरभर जागेत सुखात सगळे नांदत होतो…
ना एक बिएचके मध्ये कोंबलो होतो,
ना बाल्कनी साठी भांडत होतो , ना मास्टर बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेत होतो…
मस्त मोकळ्या हवेत ढगाखाली मोकळा श्वास घेत होतो…
साला मी अडाणी होतो
तेच बर होत… ☺️

अडाणी असताना सुशिक्षीतात जाऊन त्यांचे आयुष्य जगावे अशी स्वप्न पाहत होतो ,
त्या साठी मेहनत करत होतो,
आणि जेव्हा सुशिक्षित झालो,
त्या भपकेबाजीत घुसू लागलो, ढोंगी ते जग बघू लागलो,
आणि मग परत वाटू लागलं.
साला मी अडाणी होतो
तेच बर होत… ☺️🙏🏻.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top