औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती

🌹ऐतिहासिक औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती जपून ठेवा नंतर माहिती मिळता मिळत नाही हे लक्षात ठेवा 🌹

शहराची एकुण ९ नावे –
पैठणच्या सातवाहन, चालुक्य, विक्रमादित्याच्या काळात राजतडाग या महाकाय तलावाच्या काठावर वसलेले अश्मकपद, अश्शकपद या नावाने ओळखले जाणारे हे गाव यादवांच्या ताब्यात गेले तेव्हा कटक, कटकी या नावाने ओळखले जाऊ लागले. कटक म्हणजे गड. पूर्वी देवगिरी गडाच्या आधाराने पसरलेली यादवांची राजधानी छावणी भागापर्यंत होती आणि ती कटकी म्हणून ओळखली जात होती. मलिक अंबर आला तेव्हा त्याच्या उच्चारानुसार ती खडकी झाली. तो जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत मोघलांना दक्षिणेत पाय रोवताच आलेले नव्हते. एकदा मोघल फौजांनी हे शहर एवढे बेचिराख केले की ते तीन दिवस जळतच होते. आता पुन्हा हे शहर वसणार नाही अशा खात्रीने जहांगिरनामात करकी तीन दिवस जळत राहिल्याचा उल्लेख केलेला आहे. खडकीचा उल्लेख करकी असा केला कारण मोघलांच्या उच्चारात ख आणि ड उच्चारासाठी अक्षरच नाही. त्याऐवजी क आणि र वापरले जात. त्यानंतरही मलिक अंबरने पुन्हा हे खडकी शहर उभे केले. पण मलिक अंबर मरण पावल्यानंतर त्याच्या मुलाने फतेखानाने शहराचे नाव फतेहाबाद ठेवले. मलिक अंबर १६२४ साली मरण पावला. त्यानंतर औरंगजेबाने फतेखानाचा पराभव करीत खडकी जिंकले तेव्हा पहिल्यांदा शहाजहान याने औरंगजेबाला पत्र लिहिले. त्यात त्याने पहिल्यांदा या शहराचा उल्लेख औरंगजेबाने जिंकले या अर्थाने औरंगाबाद असा केलेला आहे असा संदर्भ यदुनाथ सरकार यांच्या ‘हिस्ट्री ऑफ औरंगाबाद’ या पुस्तकात आहे. प्रत्यक्ष औरंगजेब मात्र या शहराचा उल्लेख खुजिस्ता बुनियाद (श्रेष्ठतेचा पाया) असा करायचा. आज या शहराला लोकभावनेनुसार संभाजीनगर असे म्हटले जाते. अश्मकपद ते संभाजीनगर अशी या शहराची गेल्या हजार वर्षात तब्बल ९ वेळा नामांतरे झालेली आहेत.

चार मकबरे : बीबी का मकबरा, रोजा पीर इस्माईल मकबरा, काला मकबरा, विद्यापीठ, कासीम बर्री मकबरा.

पानचक्की : बाबाशहा मुसाफीर यांनी बांधलेले गुरुकुल.

लेणी : एकूण ३ टप्प्यात १२ लेण्या आहेत.

शहरात ४ किल्ले : मूळ शहर हे भुईकोट किल्लाच होते. त्याला १३ दरवाजे आहेत. किले अर्क, किले बायजीपुरा, किले बेगमपुरा.

शहरातील महल : गुलशन महल, नौखंडा पॅलेस, सब्ज महल, किलेअर्कमधील मर्दाना आणि जनाना महल, रोशन आरा महल (हर्सुल), दमडी महल, बायजीमहल, सोनेरी महल.

हवेल्या : चिमणाराजाची, राजा जयसिंगाची (छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेली), कुक्कुलाल हवेली.

देवड्या : रामदास देवडी, दिवाण देवडी, लाल देवडी, बख्तावरमल देवडी, मन्सूर यारजंग देवडी, महाराजा किसनप्रसाद देवडी,

चार सराय (धर्मशाळा) : जुनाखान सराय (जुनाबाजार), हर्सूल सराय (हर्सूल जेल), सराय महेबुबजान (फाजलपुरा), जोहराजान सराय (रंगारगल्ली)

वाडे : काजीवाडा, काचीवाडा, भोई वाडा, कुंभारवाडा, हमाल वाडा, नाईकवाडा, कवटीचा वाडा, माळीवाडा, कसाब वाडा, मोची वाडा,

वाडी : वैतागवाडी, शहानूरवाडी, गोकुळवाडी, नक्षत्रवाडी, जाधव वाडी, नागेश्वर वाडी,

५२ पुरे : कुतुबपुरा, रणमस्तपुरा, गोधडीपुरा, उस्मानपुरा, औरंगपुरा, बायजीपुरा, हत्तीसिंगपुरा, खारिकपुरा, पेन्शनपुरा, जयसिंगपुरा, बेगमपुरा, मालजीपुरा, कोतवालपुरा, कर्णपुरा, रोशनपुरा, कबाडीपुरा, जसवंतपुरा, नवाबपुरा, बहादुरपुरा, रशिदपुरा, गवळीपुरा, ढोरपुरा, मंजूरपुरा, फत्तेसिंगपुरा, महमुदपुरा, मुघलपुरा, फाजलपुरा, मोमीनपुरा, भावसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, रंभापुरा, खोकडपुरा, रेंगटीपुरा, भीमपुरा, शांतीपुरा, चेलीपुरा, रोहिदासपुरा, केशरसिंगपुरा, रसुलपुरा, कासमपुरा, पद्मपुरा, परसोजीपुरा, खेलोजीपुरा, वि’ोजीपुरा, किराडपुरा, सुलतानपुरा, कैकाडीपुरा, साखनपुरा, चौसरपुरा, शुभकर्णपुरा, लोधीपुरा (राजू मोतीराम पवार यांच्या खासगी संग्रहातून ही ५२ पुऱ्यांची नावे घेतली आहेत. प्रत्यक्षात आणखी नावे उपलब्ध आहेत)

दरवाजे : भडकल, छोटा भडकल, खिजर (हाथी किंवा खुस्त्रो), खुनी (इक्बाल), खास (जालना), दिल्ली, काळा, नौबत (किलेअर्क), कटकट (इस्लाम), रोशन, जफर, पैठण, बारापुल्ला, मक्का (मकाई), कुंभारवाडा, महेमुद, रंगीन, मर्दाना (माबुल दाखला), चौगान, रंगीन, नूर (बुलंद), बेगम, खिडकी, चावल, लाल, मुघल, दगड, खिडकी, शहापुर, मीर आदिलअली, सलाम, मोहरमबारी, शाह, दारूदुकानदरवाजा, तलाबेकलाम, मादा, खादगार, इस्माईल, दौलत, दालमंडी, किला बेगमपुरा, किला बायजीपुरा,

नहर : नहर ए अंबरी, नहर ए पळशी, नहर ए नसरुल्ला, नहर ए पानचक्की, नहर ए किराडपुरा, नहर ए गारखेडा, नहर ए कोटला, नहर ए बेगमपुरा (थत्ते नहर), नहर ए शाहअली, नहर ए चौसर, नहर ए शहानूर, नहर ए छावणी

सहा चबुतरे : हाथी चबुतरा किलेअर्वâ, चांदणी चबुतरा हिलाल कॉलनी, काला चबुतरा क्रांती चौक, घोडेस्वारांचा चबुतरा आमखास मैदान, सिद्धिअली चबुतरा, हरदौल चबुतरा, चोट्टा चबुतरा.

शहरातील उद्याने : (महम्मदी) हिमायत बाग, रोशनआरा बाग, अब्देअली बाग, लाला मन्साराम बाग, बाग शेर जंग, चौसर बाग, शतरंज बाग, आसेफ बाग, बसंत बाग, अंगुरी बाग, बरखी बेगम बाग, बाग ए संपत, खाला अम्मा का बाग, हरकारे का बाग, रहिम बाग, मोहम्मद मानखा बाग, अफलातून बाग, शिकार बाग, बागे जैबुन्निसा, रोजा बाग, राजा जयसिंग बाग, बेगम बाग, आजम बाग, अहेमद बाग, हिमायत बाग, सुपारी बाग, सिताफली बाग, अमरुद बाग, आटोळा बाग, जोहरी बाग.
कार्यालये : अमीन कचेरी, सुभेदारी,

टॉवर किंवा घड्याळे : शहागंज आणि गुलमंडी

टेकड्या : जोबन टेकडी, हनुमान टेकडी, गोगापीर टेकडी, चमार टेकडी. मजनुहिल टेकडी

चार गंज : शहागंज, सुलतान गंज, राम गंज, आजम गंज.

बाजार : जुना बाजार, केळी बाजार, राजा बाजार, शहा बाजार, मुलमची बाजार, शाह बाजार, चुडी बाजार, कासारी बाजार

मंडी : गुलमंडी, घासमंडी, सब्जीमंडी, लालमंडी, लक्कडमंडी

कारंजे : मोती कारंजा, लोटा कारंजा,

छत्र्या : छावणीतील छत्री, हर्सूलमधील छत्री, राजा जयसिंग छत्री

चावड्या : किराणा चावडी, लक्ष्मण चावडी, जयसिंग चावडी, नाई की चावडी.

तकीये : बडा, छोटा

पुराणवस्तुसंग्रहालये : सोनेरी महल, मातोश्री पुरवार, छत्रपती शिवाजी पुराणवस्तू, विद्यापीठातील, बीबी का मकबऱ्यातील, पानचक्कीतील, देवगिरी किल्ल्यातील. (वैयक्तिक संग्रह : बाळासाहेब पाटील, पैठण, हिरुभाऊ जगताप, अब्दुल हई)
(संग्रहित माहिती)

1 thought on “औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती”

  1. औरंगाबाद जिल्ह्याची सामाजिक आर्थिक रचना कशी आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top