आनंदयात्री

आनंदाच्या शोधात निघालेला
आणि प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारा

– निलेश दिलीपराव झाल्टे 

माझ्या कविता ज्या तुम्हाला नक्की आवडतील - My Own Poems

फुल

एक फुल था
प्यार से मैने फुलाया था
जल, हवा मिट्टी से
मैने उसे खिलाया था
न जाने कहासे
एक कोई शैतान आया
और इस जहासे
उसने फुलको उठाया
क्या कसूर था
ऊस बिचारे फुल का
या फार फुल को बढाया था
इस मेरे भूल का

मुसाफीर

मुसाफीर हुं मै यारो,
चलना मेरा काम था।
परवाने कई मिलते गये,
मिलना उनका काम था।
प्यार दिया मैने,
जीन्होने मुझे प्यार दिया।
जीन्होने मुझसे व्यवहार किया,
मैने उनसे व्यवहार किया।
अब यहा आ पहुचा,
पता नही कबतक रहू।
रुकना मुझे मुंकीन नही,
मै तो एक मुसाफिर हु।

जागने का वक्त है।

बहोत हो गयी निंदियाराणी।
अब जागने का वक्त है।
दुष्मनोकी खतम हुई मनमानी
अब उनके भागने का वक्ते है।
निष्पाप कई लोगोका
गीर रहा यहा रक्त है।
फिर नई आजादी को
दिल मेरा आसक्त है।
हर जगा है भागा दौडी
हर जगा पे आवेश है।
उठो प्यारे नवं जवानो
खतरेमे अपना प्रदेश है।

चारोळी

तुझी आठवण आली
कि मन जरा खट्टू होत,
तू आहेस इथेच आसपास
अस सांगितल तरी लट्टू होत.

चारोळी ​

मनाच्या गाभाऱ्यात
तुझीच उभी मूर्ती
जगण्याला मिळते प्रेरणा
अन पुढे जाण्याची स्फूर्ती

चारोळी ​

आकाशाला घालायचीय गवसणी
अन वाळक्या झाडाला पालवी आणायचीय,
क्षितीजाच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा
मला उंचच उंच गगनभरारी घ्यायचीय.

साद घालीतो पक्षी

कशासाठी पोटासाठी,
घोटभर पाण्यासाठी.
तुमच्या दारी आला कुणी,
ओळखलत का हो मजला कोणी.
जगभर फिरतो गातो गाणी,
मी अल्लड, मी मनमानी.
कधी गावात तर कधी वनी,
आम्ही असतो राजा राणी.
नभात उडतो कधी सुखाणी,
कधी पहुडतो मांनसावाणी.
शीळ घालतो गातो गाणी,
मी तर पक्षी नाही प्राणी.
घोट भर तुम्ही द्याल पाणी,
आशा ठेऊन आलो मनी.
निलू म्हणे ठेवा ध्यानी,
ऐकू नका नुसतीच गाणी

बाळा मयी होती शाळा.

बाळा मयी होती शाळा
तुहे तर हे स्कुल हे
मी होतो पोट्टया
तू त कसा कुल हे
मया मास्टर भी
जरा खडूस होते
तुयी तर टीचर भी ब्युटीफुल हे
अन मयी होती…
तेव्हा मटक्याचे दही होते
आता कस अमूल हे
तव्हा समद शुद्ध होते
आता समदच डाउटफुल हे
अन मयी…
बाळा लयी लयी शिक
शिकून लयी मोठ्ठा हो
पण कधी विसरू नको रे बाबा
तू एक शेतकऱ्याचे मूल हे
मयी होती …

आयुष्य आपले वाचतांना

कसे वाचतात आयुष्य जगतांना,
कसे वाचतात अंधारात एकमेकांना,
कसे नाचतात मोर बघून जलधारांना 
कसे अनुभवावे या लघु आनंद क्षणांना
येतेच ती वाट वळणाची
आयुष्यात या चालतांना
आयुष्यातच मिळते आठवण
आयुष्य आपले वाचतांना
आलाच आहे तर जगून घे
आयुष्य आपले उगा सरताना
दुःखाचे क्षण तेही पिऊन घे
आयुष्यात सुख शोधताना
असे वाचतात आयुष्य
मनातून मनाने जगताना
असे वाचतात भाव मनातले
अंधारात सोबत चालताना
क्षणातच मिळतो आनंद येथे
जगी दुःखाचे पर्वत असताना
म्हणून नाचतो मोर बहुधा
नभी बघून जलधारांना 
Scroll to Top