Tag: mental health

  • आवाज नेहमी शांत असावा

    आवाज नेहमी शांत असावा

    शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरात वास्तव्य करतो.

    असे भगवान श्री. दत्तगुरु सांगतात.

    “चढलेला मोठा आवाज”… आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढल्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा. घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे. वडील खूप ओरडले म्हणून मुलाने आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृष्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो. शुभ लहरींचे ही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशिर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. २५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो..! त्यामुळे शांत रहा व दत्त महाराजांचा कृपा अशिर्वाद प्राप्त करा श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त

  • नकारात्मक प्रभाव

    नकारात्मक प्रभाव

    असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.
    एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
    पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो?
    आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,
    कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,
    का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?
    का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?

    तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे,
    आणि ते कारण आहे

    आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..

    तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं… जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते. *उदा.* माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं.

    माझं वजन वाढतयं, म्हटलं की वजन अजुन वाढतं,
    माझे केस गळतायत म्हटलं की अजुनच केस गळतात,
    माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,
    कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून अडचणी निर्माण होतात,
    वगैरे वगैरे…

    ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.

    म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.

    फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं. मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली.

    विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन, चेहर्‍यावर स्मितहास्य ठेवुन, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा!..

    1) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
    2) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
    3) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच अहे, आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
    4) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे.
    5) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन, प्रचंड संपत्तीवान आहे.
    6) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असुन, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
    7) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
    8) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळुन जातात.
    9) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे, आणि ती जिंकली आहे.
    10) माझ्या आजुबाजूचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात, आणि मी ही त्यांच्यावर खूप खूप प्रेम करतो.
    11) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहे, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
    12) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो.
    13) मी निरोगी आहे,
    14) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
    15) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.

    याला पॉझीटीव्ह अफैर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल

    तुम्ही हे जर मनापासुन, फील करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचलं, तर तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍या करुन दाखवेल.

    आणि हीच एका दृष्टीने
    “लॉ ऑफ अट्रॅक्शन”
    ची दणदणीत सुरुवात असेल!..

    ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हाला अधिकाधिक शक्तीशाली आणि आनंदी बनवो.
    ➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

  • आयुष्य – Life

    #lifequotes #आयुष्य

  • मनस्वास्थ्य सुधारण्याचा तीन क्लृप्ती

    Toddy we all are in tension of Covid-19 virus and we have only news regarding covid-19 virus

    we have to think over our mental health which is currently getting damaged due to this pandemic situation.

    आजच्या या कोरोंना महामारीच्या काळात टीव्ही वा इतर बातम्यामध्ये सर्वत्र फक्त कोरोंना बद्दल चर्चा सुरू आहे.

    आपण आता आपल्या मानसिक आरोग्या विषयी काळजी घेणे घेणे खूप गरजेचे आहे म्हणून हा विडिओ