Updated Women

अपडेटेड स्त्री-शक्ती

ऐतिहासिक संदर्भ

 

 

तपासून पाहिले असता असे लक्षात येते कि आपल्या भारतात स्त्री-शक्तीने अगाध असे कार्य करून आपल्या राष्ट्राचे नाव उज्वल केले आहे. आपली स्त्री-शक्ती हि प्रत्येक क्षेत्रात नेहमी आघाडी वर राहिली आहे यात शंका नाही. अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाबाई,  झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू,  इंदिरा गांधी, किरण बेदी, कल्पना चावला अशा अनेक महिला ज्यांनी आपले नाव सुवर्णाक्षरात नोंदवले आहे ते आपल्या कर्तुत्वानेच. आजच्या एकविसाव्या शतकात आयुष्य हे धावपळीचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धेचे होऊन बसले आहे. या सर्व धावपळीत स्त्री-शक्तीला सर्वात जास्त महत्वाची भूमिका निभवावी लागते आणि हे करताना तिची भाम्बेरी उडल्याशिवाय मात्र राहत नाही. आजही अनेक स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून काम करतात आणि तेही प्रत्येक क्षेत्रात यात अभिमान आहे.

 

 

माता पालकांची गरज

 

 

आज अनेक स्त्रिया – मुली आधुनिक उपकरणांचा वापर आपल्या कामाच्या ठिकाणी करत आहे परंतु त्यातील कित्येक वैशिष्ट्ये तिला माहित नसतात आणि थोडक्यात माहिती असलेल्या सुविधांचाच फक्त ती वापर करतांना दिसते, त्यात आज अनेक महिलांचे शिक्षण हे  मराठी माध्यमातून झालेले आहे आणि त्यांच्या मुलांना मात्र जगाच्या सोबत राहण्यासाठी इंग्रजी माध्यामतून शिकणे क्रमप्राप्त झालेले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना इंग्रजी त्यातल्या त्यात सी. बी. एस. ई. किंवा आय. सी. एस. ई. अभ्यासक्रम निवडून त्या प्रकारच्या शाळेत प्रवेश देण्याचा आग्रह असतो.आपली आजची स्त्री शक्ती हि विशेषतः मराठी माध्यमातून शिक्षित असल्याने किंवा काही महिलांचे शिक्षण अगदीच कमी असल्याने त्यांना आपल्या मुलांचा इंग्रजी माध्यमाचा अभ्यास घेताना अनेक इंग्रजी शब्द वापरणे तसेच त्यांची उजळणी घेताना अनेक अडचणी येतात शिवाय अनेक छोटे प्रकल्प/उपक्रम त्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे करायला सांगितल्या जाते आणि ती सर्व माहिती संगणकाच्या माध्यमातून प्रिंट स्वरुपात किंवा लिहून शाळेत अहवाल सादरीकरण करायचे असते,

Updated Women

Updated स्त्री - महिला
Women Power

Computer Literate

हे सर्व उपक्रम एका क्लिक सरशी सहज उपलब्ध  होऊ शकतात परंतु मुळात इंग्रजी भाषेविषयी अनामिक भीती, मराठी माध्यमातून प्राथमिक किंवा पूर्ण शिक्षण, संगणक वापरणे-हाताळणे याची माहिती नसणे अशा अनेक गोष्टी आज अनेक स्त्रियांना माहिती नसल्याने या अडचणीमध्ये आणखी वाढ होते आणि आजची महिला हि बावरून जाते.इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्या तिच्या पाल्याने तिला काही प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर तिला उद्या देता येईल का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शिवाय आपला पाल्य इंग्रजीत अभ्यास करतोय, त्यासंदर्भात तो संगणकावर काम करतोय,  इंग्रजीतील परंतु अभ्यासाची.कामाची पुस्तके वाचतोय किंवा संबंधित इंग्रजी गाणी ऐकतोय, व्हिडीओ पाहतोय हे तरी त्या माउलीला कळायला हवंय ना, नाहीतर मुलगा/मुलगी गैर मार्गाला लागून बिघडत राहतील आणि त्याची आई आपले पाल्य इंग्रजी शिकतंय म्हणून कौतुक करत राहील.

इंग्रजी माध्यमात शिकताना त्याला पाश्चिमात्य संकृती, इंग्रजी शब्दार्थ पाठ लगेच होतात परंतु तो आपल्या मातृ भाषेपासून दूर निघून जातोय आणि त्याला आपल्या संस्कृतीसुद्धा कालबाह्य झालेल्या वाटायला लागल्या आहे. इथे सुद्धा परत खापर फोडल्या जाते ते आपल्या स्त्री-शक्ती च्या डोक्यावर.

 

 

आजच्या या एकविसाव्या शतकात या स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर या स्त्री-शक्ती ला अपडेटेड स्त्री शक्ती होण्याशीवाय पर्याय नाही. एक महिला शिकली तर ती अवघ्या जगाला शिकवू शकते म्हणून गरज आहे.

 

 

महिलेनी अपडेट होण्याची महिलांना अपडेट होण्यासाठी आज अनेक छोटे छोटे उपकरण आणि सुविधा उपलब्ध आहे जसे कि· Google translate ज्याच्या वापरामुळे इंग्रजी भाषेतून मराठी किंवा इतर भाषेत  आपल्याला भाषांतर करणे अगदी सोपे जाते·  Google Input मुळे मराठी टायपिंग सुद्धा अगदी सोपे झाले आहे· क्लिक इंग्लिश मुळे आपल्याला इंग्लिश शिकायला सोपे झाले आहे·        २१ व्या शतकात लागणारे टायपिंग, digital स्कील, स्टडी स्कील इत्यादी करणे सोपे झाले आहे.तेव्हा महिलांनी या सर्व गोष्ठी लवकर आत्मसात करणे गरजेचे असून त्याकडे वाटचाल करायला हवी.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top