श्रीमद्भागवत लिखाना नंतर पुन्हा सप्तशती चंडी पाठ या विषयावर लिहाव अशी इच्छा झाली.. आणि जगदंबा कृपेने लिहिण्यास प्रारंभ केला..!
मनुष्य जीवनात पुरुषार्थाला अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे, पुरुषार्थ चार प्रकारचे असून ती अनुक्रमे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचा विचार केल्यावर लक्षात येते की, यामध्ये सर्वात प्रथम स्थान असलेला धर्म हा पुरुषार्थ अत्यंत महत्त्वाचा वाटतो.
धर्म
धर्म या शब्दाचा अर्थ या ठिकाणी कुठलाही सांप्रदाय,उपासनापद्धती किंवा हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन शीख वगैरे धर्म किंवा रिलिजन या अर्थाने नसून धर्म म्हणजे जीवनाची आचारसंहिता नियम कायदे अनुशासन,वर्तन,आचार-विचार रहन,सहन खान-पान नीती वृत्ती याचे व्यवस्थित काटेकोर पालन करणे म्हणजे धर्म.तशी धर्म या शब्दाची व्यापकता फार मोठी आहे परंतु किमान वरील नियमांचे पालन न झाल्यास धर्माचा पुरुषार्थाला आपण पात्र आहोत असे समजण्यास हरकत नाही..एकदा जर हा धर्म नावाचा पुरुषार्थ प्राप्त झाला तर त्याच्या अनुषंगाने अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ प्राप्त होण्यास कुठलीही बाधा येत नाही.धर्म हा त्यांचा पाया आहे त्यावर उभी राहणारी जीवनाची इमारत मग जीवेतु शरदम् शतात पेक्षाही अधिक काळापर्यंत टिकत राहते. केवळ संकल्पातील धर्म अर्थ काम मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त व्हावा म्हणून कितीही पूजा जप,तप,अनुष्ठान केले तरी याला जर धर्माचे अनुष्ठान नसेल तर ते सर्व निष्फळ होते …! कारण उत्पाद्यन्ते विलयन्ते दारीद्रनाम् मनोरथः म्हणजे दरिद्री माणसाच्या मनात खूप चांगले मनोरथ म्हणजे इच्छा-आकांक्षा निर्माण होतात परंतु धार्मिक कृती शून्यता असल्यामुळे त्या नष्टही होतात..! भाविक भक्त जन हो मी सप्तशती चंडीपाठ यासंबंधी मी अभ्यासलेली अनुभवलेली आणि माझ्या सद्गुरूंनी उपदेश असलेली श्री सप्तशती या
महामंत्राच्या उपासनेची आणि त्यांच्या महात्म्याची माहिती यथा ज्ञानेन सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.अर्थात मला हे मान्य आहे की माझ्यापेक्षाही जाणकार आणि ज्ञानी विद्वान यासंबंधीचे आहेत.. परंतु मी माझ्या पद्धतीने श्री सप्तशती ग्रंथाबद्दल सांगणार आहे..!
तेव्हा भाविकांनो लक्षात असू द्या की उपासने शिवाय अपूर्व अद्भुत असं काहीच निर्माण होत नाही..! त्यामुळे मनोवांछित कामनाही पूर्ण होत नाहीत..!
हा आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीच्या सिद्ध असा सिद्धांत अध्यात्म शास्त्रात रूढ आहे.
त्यानुसार निरनिराळ्या अशा उपासना आपल्या भारत देशात चालत आलेल्या आहेत कोणत्या युगात कोणत्या काळी कोणत्या कार्यासाठी कोणत्या देवतेची उपासना करावी याचे शास्त्र संकेत आहेत तेव्हा यथाशास्त्र यथाविधि त्या देवतेची उपासना केल्यास त्याने फलप्राप्ती झाल्याची अनंत उदाहरणे प्राचीन कालापासून आजपर्यंत देता येतील.. सध्याच्या या विक्राळ कालीकाळात आणि विज्ञान तंत्र ज्ञानाच्या काळात महर्षी व्यासांनी अत्यंत दूरदृष्टीचा विचार करून कलियुगात कालीचंडी विनायको म्हणजेच देवी चंडिका आणि गणेशाची उपासना शीघ्र फलदायी होईल असे म्हटलेले आहे..!
क्रमशः
श्री गुरुमहाराज समर्थ…!
जय जगदंब.
वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव
9422211334