मागे सांगितल्याप्रमाणे चित्त शुद्ध झाले की साधकाचा पुढचा प्रवास भगवती भावास पूरक आणि प्रेरक ठरतो..!
नवरात्रीचे सुरुवातीचे तीन दिवस महाकाली, महालक्ष्मी पूजन करावे सर्व दुर्गुणांचा नाश झाल्यावर सात्विक प्रवृत्ती आपल्यात निर्माण होऊ लागते तिचा विकास आणि संवर्धन मात्र गरजेचे आहे. तसं न झाल्यास जुन्या वाईट वृत्तींचा प्रभाव अजूनही आहे, किंवा त्या प्रवृत्ती पुन्हा आपल्यात स्वार होतात.. आक्रमण करतात त्यामुळे महालक्ष्मी पूजन बाधित होऊन योग्य व अपेक्षित फलप्राप्ती होत नाही..!
त्यासाठी साधकाने अत्यंत सावधपणे सद्गुणांची वृद्धी करावी तेव्हा ती महालक्ष्मी आपल्या भक्ताला दैवी संपदा द्रव्य, धन, जय, यश हे सर्व अक्षयपणे प्रदान करते..! जीवनातल्या कुठल्याही चांगल्या कामासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. साधकात जेव्हा सात्विक गुणांची वृद्धी होते तेव्हा ज्ञान प्राप्त करण्यासाठी तो योग्य झालेला असतो, आणि मग या स्थितीत ब्रह्मज्ञान स्वरूपिणी श्री महासरस्वतीचे पूजन सुरू होतं, हे पूजन साधना नादब्रह्मकथा आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रशस्त आहे.
म्हणून शेवटचे तीन दिवस नवरात्रीचे श्रीमहासरस्वती चे पूजन करावे असं सांगितलेलं आहे.नवरात्र हा कुलधर्म कुलाचार आहे.. ज्यांची कुलदेवता देवी आहे त्या काळात ती पिढ्यानपिढ्या पुजली जाते..! त्यांनी आवर्जून हा कुळाचार केलाच पाहिजे..! कारण कुळ वंशपरंपरेने त्या कुळातल्या अनेक पिढ्या कुळाच्या मूळ देवतेची आज पर्यंत त्या देवतेची पूजा केली जाते.. ती देवता म्हणजेच कुलदेवता जिच्या कृपाशीर्वादाने आपला वंश सातत्य टिकवून सुखी व समृद्ध जीवन जगत असतो आणि मग त्यासाठी परंपरेने त्या कुलात त्या देवतेची पूजा, अर्चा, व्रतवैकल्य, सण-उत्सव पार पाडली जातात…!
त्यालाच कुलाचार कुलधर्म असे म्हणतात..!
प्रारंभी मी धर्म शब्दाचे निरूपण केले आहे चार पुरुषार्थत धर्म प्रथम आहे महर्षी व्यासांनी कलियुगात गणेश आणि देवी उपासनेला या करतात महत्त्व दिलेले आहे..! धर्म प्राप्त झाला म्हणजे अर्थ काम व मोक्ष आपोआप प्राप्त होतीलच..! म्हणून धर्म म्हणजे कर्तव्य.. ते नित्य आणि नैमित्तिक असावे, म्हणून ते बंधनकारक असते..! ज्यांची कुलदेवता देवी नाही तरीही ते नवरात्री परंपरेपासून पाळतात..! किंवा ज्यांची देवी ही इष्ट देवता आहे त्यांनीही जगदंबेच्या प्रसन्नतेसाठी नवरात्र उपासना जरूर करावी..!
मात्र आपल्या कुलदेवतेची उपासना सोडू नये..! कारण कुलदेवतेचा कोप कुळाचा नाश करणारा असतो, त्यामुळे विघ्ने, संकट, दैन्य, दुःख, दारिद्र्य, अपयश, संतती न होणे, घातपात, अपघात, अकालीमृत्यू, रोग आदी प्रकार इत्यादी घटना घडतात ..म्हणून सावधान असावे..!
अध्यात्मात एक गोष्ट ध्यानात घेतली जाते ती म्हणजे मनुष्याची सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन तत्त्वांना आता विज्ञानानेही सिद्ध केले आहे जर विचार,चिंतन, नाकारात्मक असेल तर त्याचा परिणाम त्या मनुष्यावर तर होतोच परंतु त्याची स्पंदने लाटा जेव्हा घरातील इतर सदस्यांवर स्वार होतात त्यांचे कर्म ही तो बाधित करतो..! परिणामी वाईट शक्तीचा ऊर्जेचा प्रभाव सर्वांवर होऊन वातावरणावर देखील होतो..! त्यासाठी आम्ही नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरलेले असलो तर चांगले..!
क्रमशः
श्री गुरुमहाराज समर्थ…!
जय जगदंब
वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव
942221133