तर शक्ती तत्वाचं निरूपण करताना निरुपणकार म्हणतात
यत्रास्ती भोगाः नही तत्र मोक्ष! यत्रासस्ती मोक्ष नहीतत्र भोगा !
अर्थात भोग आणि मोक्ष म्हणजेच श्रेय आणि प्रेय दोन्हीही बरोबरीनेच प्राप्त करावेत. आणि ते आम्हाला देवीच्या शक्तीच्या उपासनेतून प्राप्त होतात. त्यासाठी मग त्या देवीची विधिवत उपासना केली गेली पाहिजे. कारण विधीवत प्रत्येक वस्तू ग्राह्य आणि विधी विहीण म्हणजे प्रत्येक वस्तू त्याज्य आहे. म्हणून जशी परिस्थिती असेल त्यानुसार स्वतःमध्ये योग्य ते परिवर्तन करून घ्यावे, यालाच कार्यकुशलता म्हणतात. योग कर्मसु कौशल्यम् शक्ती देवीची व्याख्या करताना असे म्हटले आहे की
एकेव शक्ती परमेश्वरस्य विविधा वदान्ति व्यवहार काले भोगेभवानी पुरुषेशु लक्ष्मी: कोपे तु दुर्गा प्रलये तु काली
अर्थात परमेश्वराची शक्ती सर्वत्र एकच एक आहे, मात्र व्यवहारात कालानुसार तिला विविध नावांनी संबोधले जाते. ऐश्वर्य आणि भोग शक्तीच्या आधीन राहून प्राप्त होतात. परंतु तिचा जर कोप झाला तर ती दुर्गा रूप धारण करते. आणि त्यावेळी मनुष्य जर सावरला नाही,भानावर आला नाही तर प्रलये तु काली म्हणजे काली रूपात ती प्रलय करून टाकते, सर्वनाश करते. या आदी शक्तीचा उद्भव आणि विकास कसा झाला.
त्यांची कथा अशी सांगितली जाते आपल्या भारतात सगुण उपासनेचे पाच संप्रदाय आहेत ते असे
(१) शैव
(२) वैष्णव
(३) गाणपत्य
(४) स्वैर आणि
(५)शाक्त ..
शाक्त संप्रदायानुसार आदिशक्तीने पहिले सगुणरूप धारण केले ते श्री महालक्ष्मीचे दुर्गाशक्तीरुप..! सप्तशती मध्ये प्राधानिक रहस्यात याचा उल्लेख आलेला आहे. अगोदर ही आदिशक्ती त्रिगुणमयी परमेश्वरी महालक्ष्मी आदीम् आहे. सनातन आहे दृश्य अदृश्य रुपाने ती सर्वत्र व्याप्त आहे. सप्तशतीत वर्णन अस आहे
सर्वस्याद्या महालक्ष्मी स्त्रिगुणापरमेश्वरी! लक्ष्या लक्ष स्वरूपासा व्याप्त कृत्स्नं व्यवस्थित!
अशी ही महालक्ष्मी आपल्या तामसी आणि उग्र स्वरूपातून अत्यंत सुंदर रुपात अवतरली. पुढे असं म्हटलं की
सा प्रोवाच महालक्ष्मी तामसी प्रमदोत्तम!
दादामि तव नामानि यानी कर्मानी तानिते!
ती प्रकट झाल्यावर त्या आदिमायेची नावे अशी आहेत महामाया महाकाली महामारी जी आज कोरणा रूपाने सर्वत्र व्याप्त झालेली आहे..!
क्रमशः
श्री गुरुमहाराज समर्थ…!
जय जगदंब
वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव
9422211334