आनंदी मन

उगवत्या सुर्योदयाने मन आनंदी होते, सुर्योदयाच्या प्रकाशात ते नवी वाट शोधु पाहते.विस्कटलेल्या वाटेतुनच नवी वाट गवसते.
होय अगदी हाच अनुभव आम्ही अनुभवला आहे. शिवना गावात एक छोटसं आमचं कुटुंब. नेमकेच एका खुप मोठ्या आजारातून माझे मिस्टर सुखरूप बाहेर पडले, कुटुंबाचा सर्व भार त्याच्यावरच, तेव्हा पण दवाखान्यात असतांनाच आम्हा दोघांनाही हे जगण म्हणजे खूप मोठे आव्हान वाटु लागले.घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दवाखान्याचा खर्च पाहून मन घाबरून गेले होते, तब्येत तर सुधारित होती पण मनात वेगळी भिती भरत होती, दवाखान्याच्या खर्चाने प्रचंड दडपण आले होते, सोबत सासरच्या कुणाचीही कसलीच साथ नव्हती, दवाखान्यात भरती झाल्यापासून पंधरा विस दिवस झाले ,दवाखान्यात आलो तेव्हा एक रुपया ही जवळ नाही अशी आमची परिस्थिती होती, पण अचानक तब्येत बिघडल्यामुळे ताबडतोब जावे लागले. तिथ गेल्या गेल्या माझा भाऊ आलेलाच होता, निघतांना तसा त्याला आधी फोन केला होता, त्यामुळे सर्व जबाबदारी त्यानेच सांभाळली, म्हणता म्हणता पंधरा ते विस दिवस दवाखान्यात गेले, चार ऑपरेशन होऊन गेली, दोन ते अडीच लाख रुपये खर्च ही झाला ,आमच्या जवळ तर एक रुपया ही नव्हता, भावाची परीस्थिती पण हालाखीचीच,पण करणारे दुसरे कुणी नव्हते म्हणून त्याला सर्व मेनेज करावे लागले, सूरवातीला त्याने पंन्नास हजार रुपये त्यांच्या साहेबांकडुण ऊसणे घेतले, दवाखान्याचे काम म्हणताच त्यांनी एका शब्दात पैसे दिले, नंतर हळूहळू बिल वाढत गेले तेव्हा परत दोन लाख रुपये इकडून तिकडून ऊसणे आणले,तेव्हा आमच्या नात्यातल्या गौरी वहिनी व् भावजी दवाखान्यात यांना भेटायला आले, बोलतानाच वहिनींनी माझ्या मनातली काळजी ओळखली,व त्यानी मला बाजूला बोलवुन सर्व विचारले. त्यांना आमची सर्व परीस्थिती समजली, तेव्हा त्यांनी मला BHL बद्दल माहिती सांगितली,व लगेच डॉ. अनिल कौसडीकर काकांना संपर्क करण्यास सांगितले,तेव्हा मी काकांना आमची सर्व सत्य परिस्थिती सांगितली,हे सर्व कळताच काकांनी आम्हाला BHLच्या माध्यमातून पन्नास हजाराची मदत मिळवून दिली. व आम्हाला हिम्मत ही दिली.
त्यानंतर दवाखान्यातुन सुट्टी मिळाल्यानंतर यांची तब्येतीचीही काकांनी वेळोवेळी फोन करून माहिती घेतली, तेव्हा नेमकेच आम्ही दवाखान्यातुन घरी आलो काही दिवसांनी सगळीकडे लॉकडाउन लागले होते, अश्या वेळी घरखर्च भागवनेही कठीण झाले होते, मात्र म्हणतात ना परमेश्वराला सर्वांची काळजी आहे, तो आपल्याला तरी कसा उपाशी ठेवीन, आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी म्हटलेलं आहे….
अनन्याश्चिन्तयंतो मां ये जना्ः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम।
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी ऊभा आहे।।।।
हे महाराजांचे याक्य पदोपदी प्रचिती देत राहाते,.
सगळी कडे सर्व काही बंद असतांना काही काम नसतांना घर कसे चालणार, हा मोठा प्रश्न होता,त्याचवेळी आम्हालाBHLच्या माध्यमातून कौसडीकर काकांनी व पुर्ण ग्रुपने तीन ते चार महीने घर खर्च भागेल ऐवढी मदत केली.त्यानंतर हळूहळू यांची तब्येत सुधारु लागली, काही काम करावे अस मन म्हणत होते, पण कुठेच काम मिळत नव्हते, यावेळी मनात एक ऊमेद जागी होती, काही तरी नवीन करण्याची ,मग ठरवले की आपल्या गावात लाल मिरची खुप प्रसिद्ध आहे, आपण लाल मिरची पावडर करून विकु शकतो, मग सुरुवात म्हणून दहा किलो मिरची आणली, ती स्वच्छ निवडली,देठ काढून, वाळवून दळून आणली व अश्या पध्दतीने घरगूती लाल तिखट तयार केले, पण हे विकायचे कसे, तेव्हा परत काकांचे मार्गदर्शन घेतले तेव्हा आपल्या BHLग्रुप वर याबद्दल माहिती दिली, व प्रोत्साहन म्हणून ग्रुपमध्ये सर्वांनी आमच्या कडून मिरची पावडर खरेदी केले, एकाच वेळी दहा किलो तिखट विकल्या गेले, व विशेष म्हणजे सगळ्यांना आपली क्वालिटी आवडली व परत पंधरा ते विस किलो तिखटाची औडर ही मिळाली, यावेळी खुप आनंद झाला पण एक प्रश्न ही पडला होता, पहिले दहा किलो आपण ऊधारीवर आणले होते, व औरंगाबाद ला गावाकडुण जाण्यायेण्यातच पाचशे रुपये लागले होते, पुढच्या औडर मध्ये गुंतवणूक करण्यात कसलाच सपोर्ट नव्हता, पण हीच सुरुवात आहे व आपली जिद्द ठाम आहे हे मणात पक्के केले. यावेळी तिखटाची औडर आलेली होती पण परत मिरची आणायला जवळ भागभांडवल नव्हते, मग काय करावं, तेव्हा घरातील कुलदेवतेच्या पोतीमधे एक ग्राम सोण्याचे मणी केलेले होते, एक मन म्हणे ते घ्यावे, पण दुसरे मन ते नाकारत होते, मनाच्या ह्या चलबिचल स्थितीत काही सुचत नव्हते, समोर सुरुवात व नवीन मार्ग दिसत होता, पण सर्व पैशाच्या अभावी अडलेले होते., याचवेळी आमच्या गुरुआईंना आम्ही आमच्या मनाची व आमची परीस्थिती सांगितली,तेव्हा त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने आम्हाला मार्ग सांगीतला,त्या म्हणाल्या अग ती रेणुका माता आपली आई आहे, असं समज की तिनं आपल्याला सध्याचे हे पैसे. ऊसणे दिले, व तुला फायदा झाल्यावर तु परत तिचे एक ग्राम मणी करून दे,मनात कसलीच शंका आणु नको. तेव्हा ते मणी मोडुन साडेचार हजार रुपयांत हा बिजनेस चालू केला. व रेणुका मातेच्या आशिर्वादाने तो यशस्वी झाला. आमच्या मालाची क्वालिटी लोकांना आवडु लागली व प्रत्येक वेळी नवीन औडर ही मिळु लागल्या, आणि या सर्व परिस्थितीत आपण आपल्या कामातला खरेपणा टिकवून ठेवायचा,कारण स्पर्धेच्या आजच्या युगात प्रोफीट कमवायच्या मानसिकतेत माणूस माणुसकी विसरून जातो, परिणामी तो पैसा तर कमावतो पण तोच पैसा एक न एक दिवस तो पाण्यासारखा गमवावा लागतो. वज्या मुला बाळांसाठी ही तो कमवत असतो तेही त्याचे शारीरिक, मानसिक ईत्यादी दुःख वाटुन घेऊ शकत नाही.
असो…तर असा हा आमचा छोटासा अनुभव, ज्यात प्रत्यक्ष परमेश्वर सुरवातीला वेळ पडताच कुणाच्या न कुणाच्या रुपात धावुन आला.रक्ताच्या नात्याने भाऊ खंबीर पणे पाठीशी ऊभा राहीला, स्वतः ची परिस्थिती बिकट असुनही अडीच लाख रूपयांचे कर्ज फक्त आणि फक्त कर्तव्य म्हणून करून ठेवले, त्यातल्या त्यात कसलीही ओळखपाळख नसतानाही डॉ. अनिल कौसडीकर काकांचा BHLग्रुप एक अखंड सैन्य म्हणून आमच्या पाठीशी ऊभा राहिला, जेव्हा पण मन घाबरले, डगमगले तेव्हा हिम्मत दिली, आणि इतकचं नव्हे तर आयुष्यात या प्रवासात फक्त पुढे चाल हाच संदेशBHLग्रुप व काकांनी दिला. एवढ्या मोठ्या शहरात गावाकडुण एखादी वस्तू नेउन ती वीकने ही सोपी गोष्ट नाही, आज अनोळखी व्यक्ती ला कुणीच समजून घेऊ शकत नाही, पण BHLग्रुपमुळेच आम्ही हे व्यवसायाचं धाडस करु शकलो व या सर्वांच्या सहकार्यानेच यश संपादन शक्य झाले. यश मिळतेच फक्त नियत साफ,व परमेश्वरावर द्रुढ विश्वास असल्यास प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या मदतीला धाऊन येतो व आपल्याला नवा मार्ग दाखवतो.
सौ.कादंबरी कमलाकरराव कादी. मु. पो.शिवना.ता.सिल्लोड. जि.औरंगाबाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top