सप्तशती भाग 3

तर कालच्या पोस्टमध्ये आपण बघितले कि तेज खूप महत्त्वाचे आहे ते टिकवण्यासाठी तप हा शब्द मला खूप महत्त्वाचा वाटतो. या तप शब्दाला जर उलटे केले तर त्याचा पत हा शब्द तयार होतो आणि पत म्हणजे आपले सामर्थ्य आपली पत जर समाजात, घरात, इष्टमित्रात, नातेवाईकात, शत्रुत्सुद्धा ठेवायची असेल तर तपा सारखे दुसरे साधन नाही..!

आधुनिक तप

पूर्वी राक्षस सुद्धा तप करून देवाकडून इच्छित वरदान प्राप्त करून घेत असत आता हे तप म्हणजे सर्वसंगपरित्याग करून पोथ्या पुराणात जसे तपाचे वर्णन आलेले आहे अगदी तसेच नव्हे..! तर किमान आपल्या दैनंदिन जीवनात आपले आचार-विचार आहार-विहार व्यवहार, धर्म वर्तन, यथाशक्ती परिश्रम, सत्य, अहिंसा सहानुभूती सर्वाप्रती प्रेमभाव, दया, क्षमा, शांती प्रवृत्ती, निवृत्ती, त्याग, दान वगैरेंचे पथ्य जरि पाळले तरी ति तपच  आहे. ती एक प्रकारे शक्ती उपासनाच आहे फक्त ही उपासना तात्कालिक सीजनल म्हणजे सण उत्सवापूर्ति मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन जीवनाची अविभाज्य घटक झाली पाहिजे. यासाठीच समर्थ म्हणतात उपासनेला दृढ चालवावे शक्तीची उपासना एका दिवसापुरती वा आठवड्यापूर्ती वा महिन्यापुरती नसावी.

असं म्हणतात कि तेजस्विता प्राप्तीसाठी जेव्हा लौकिकप्रयास कामी येत नाही अडचणी येतात.. त्या वेळी मग आम्हाला एकच उपाय शिल्लक राहतो, तो म्हणजे परात्पर जगदंबा देवीची आराधना मनुष्य जीवनात समृद्धी,ऐश्वर्य,संपन्नता आणि भक्ती मुक्तीची मागणी भगवंताजवळ करावी कारण वेद वांगमया पासून सर्व प्रकारच्या पुराणात,भागवतात सुद्धा या निसर्ग शक्ती जवळ त्या शक्तीच्या वर्णनातून त्यांच्या स्तुति नंतर हीच मागणी आलेली आहे ..!कारण देव शब्दाच्या अर्थात दाता देणारच.. फक्त त्यासाठी साधन सुचिता, कष्ट, प्रयत्न, सातत्य, संयम आणि सहनशीलता आवश्यक आहे. आणि तेच आमच्या हातून घडत नाही. सध्या तर अशी परिस्थिती आहे की आम्ही सन उत्सवातील परंपराही नीट पार पाडत नाही..! आणि म्हणून अपेक्षित फलप्राप्ती होत नाही ..!

वात्सल्य रूप

आद्य शक्ती जगदंबा आणि इतर देवतेच्या आराधनेत अंतर आहे तसं पाहिलं तर भोग आणि मोक्ष सर्वच देवता देतात मग अंतर काय आहे..? देवी भागवतात असं वर्णन आलेलं आहे … परमात्मा हा न स्त्रि आहे ना पुरुष तर ती केवळ एकमेव अद्वितीय शक्ती आहे.ही शक्ती मुळात निर्गुण-निराकार असली तरी वेळोवेळी प्रसंगानुरूप ती सगुण साकारात प्रकटत असते..! ज्या रुपात या शक्तीला आवाहन कराल बोलवाल त्या रुपात ती भक्तासाठी धावून येते..! परंतु मातृ स्वरूपात या शक्तीला बोलावणे आणि पुरुष स्वरूपात बोलावणे यात अंतर आहे..! ते कसे..? तर माता-पिता सर्वांनाच असतात आपण जेव्हा दुखी असतो किंवा काही वेदना होऊ लागल्या तर आगोदर आठवण होते ती आईची ..समजा काटा टोचला तर तोंडातून आपसूकच आई निघते तेव्हा ते असते वात्सल्य रूप मायेचे रूप ..!

क्रमशः

श्री गुरुमहाराज समर्थ…!

जय जगदंब

वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव

9422211334

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top