सप्तशती भाग ४

वात्सल्य रूप

काल आपण वात्सल्यरूप, मायेचे रूप बघितलं परंतु जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आम्ही बापरे असं म्हणतो. समोर जर मोठा साप दिसला किंवा भीतीदायक भयंकर दृश्य दिसलं तर मुखातून बाहेर येणारे शब्द असतात अरे बापरे म्हणजे भयं नाशासाठी वडील (शिव) तर दुःख वेदना आणि प्रेमासाठी आई (शक्ती) ते हे माता पिता आहे असं मला वाटते..! आपल्या जीवनात पिता माता ही जास्त जवळची असते असे वाटतं…!  “नमः तू पर दैवतं..!” आपल्या जीवनात जेव्हढ्या  भौतीक सुविधा आपणास प्राप्त झालेल्या आहेत, त्या सर्व सोयीसुविधांमुळे मनुष्याच्या शक्तीचा ऱ्हास होत चालला आहे ..!सर्व काम आम्ही आता यंत्राद्वारे करू लागल्यामुळे घरापासून बाजार,दुकानापर्यंतही आम्ही वेळ असल्यावरही पायी चालत जात नाही. तेव्हा ही शक्ती आज आम्ही घालून बसलोय हा शक्तीचा ऱ्हास नव्हे काय..? मग डॉक्टर सांगतात तुम्हाला चालने फिरणे आवश्यक आहे तेव्हा कुठे मग आम्ही मृत्यू भयापोटी मॉर्निंग वॉक सुरू करतो..!

असो देवी पुराण देवी भागवत हे शक्ती पुराणाचा आहे. कारण ती स्वयम् आदिशक्तीच आहे श्री व्यासांनी हे शक्ती पुराण स्वतः कथन केलेले आहे..! ज्यात श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या आद्य शक्तींच्या अनेक विविध रूपांपैकी अत्यंत प्रमुख अशी तीन रूपे आहेत..! आणि मग त्या रूपांच्या आराधनेसाठी वर्षातून चार प्रकारच्या नवरात्रीचे आयोजन केलेले आहे.हे चार नवरात्र अनुक्रमे चैत्र आषाढ आश्विन आणि पौष महिन्यात असतात व ते सर्वच साजरे केले जातात..! त्यातही चैत्र आणि अश्विन महीण्यातील नवरात्रीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यासांनी कलियुगात गणपती आणि देवीची अर्चना शीघ्र फलदायी सांगितलेली आहे.आपल्या पुजाघरात पंच देवतांची पूजा महत्त्वाची मानलेली आहे या पंचदेवता शिवविष्णू तथा शक्तों सूर्योमती नराधीपः

या भेद बुद्धी योगाः सम्यक् योग तमो मतः

 (संदर्भ गणेश पुराण)  असं गणेश पुराणात आहे .तर शब्द कल्पद्रुम ग्रंथात म्हंटले की आदित्यं  गणनाथंच ! देवी रुद्रक्ष केशवंम्! पंचदेवता भी युक्तं! सर्व कामस सं पुज्यते!!

म्हणून देवी गणपती शिव विष्णू आणि सूर्य या पाच देवतां चे पंचायतन पूजन व्हावे ..!

क्रमशः

श्री गुरुमहाराज समर्थ…!

जय जगदंब

वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव

9422211334

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top