अधिक मास संबंधी माहिती
🌹श्री गुरुमहाराज समर्थ🌹🌹अधिक मास🌹 अधिक मास संबंधी संकलित माहिती देत आहे. यासंबंधी पौराणिक कथा आहे .एकदा श्रीविष्णु याना नारदमुनी म्हणाले, दरवर्षी फक्त बाराच महिने असतात. मग दर तीन वर्षांनी हा तेरावा महिना कसा येतो ? ते मला कृपा करून समजावून द्या. तेव्हा नारायण म्हणाले, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या प्रमाणांवर अवलंबून असते. …