23 जुलै 1856 साली रत्नागिरी शहरात जन्मलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक जहालमतवादी स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि पक्के पत्रकार आणि अभ्यासू लेखक होते.
त्यांना लोकांनी लोकमान्य ही उपाधी दिली आहे ती त्यांच्या प्रेमापोटी आणि विश्वासापोटी.
लोकमान्य हे शाळकरी जीवनापासून परखड विचारांचे आणि स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात, “मी शेंगा खाल्या नाही मी टरफले उचलणार नाही” जे त्यांचे शाळेतले वाक्य खूपच प्रसिद्ध आहे ते त्याचच उदाहरण होय.
एका मध्यमवयीन कुटुंबातील लोकमान्य यांचे मूळ गाव तसे दापोली तालुक्यातील चिखलगाव, परंतु वडिलांना कामामुळे रत्नागिरीस यावे लागले आणि म्हणून सर्व लोकमान्य टिळकांना रत्नागिरीचे म्हणून ओळखतात.
शैक्षणिक वाटचाल
लोकमान्य टिळक आणि आगरकर यांची घनिष्ठ मैत्री होती त्यांनी विष्णु शास्त्री चिपळूणकरांना सोबत घेऊन त्याकाळी म्हणजे 1880 साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कुलची स्थापना केली, पुढे 1884 केळकर, दांडेकर, भांडारकर आदी मंडळींना एकत्र आणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुहुर्तमेढ रोवून त्या अंतर्गत 1885 साली आज पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.
असे हे थोर टिळक स्वतः गणित व संस्कृत हे विषय आवडीने आई उत्तम शिकवित असत.
टिळक व आगरकर यांनी मिळून केसरी व मराठा हे दोन नियतकालिके सुरू केली.
केसरी मराठीत आणि मराठा हे इंग्रजीत छापल्या जात होते.
टिळकांचे अग्रलेख हा केसरीचा खरा आत्मा होता, पुण्यात प्लेगच्या साथीच्या वेळी फवारणी वरून ब्रिटिश सरकारने फवारणीच्या नावांखाली घरातील सामान बाहेर फेकून नासधूस केली तेव्हा “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय” असा निखारा पेटवणारा अग्रलेख टिळकांनी लिहिला जो आजही सर्वांच्या लक्ष्यात आहे.
नंतर काही कारणाने आगरकर आणि टिळकांचे काही मुद्यांवर वाद झाले.
टिळकांनी लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लोकांनी एकत्र येण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली जी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खूप प्रभावशाली ठरली.
या लढ्यात त्यांना ब्रिटिशांनी 6 वर्षे मंडालेच्या तुरुंगात कारावास दिला ते येरवाड्यात सुद्धा कारावासात होते.
टिळकांनी लेखक म्हणून गीता रहस्य, ओरायन सारखे छान ग्रंथब सुद्धा लिहिले.
प्लेगच्या साथीत त्यांनी आपला पुत्र, चुलतभाउ आणि भाच्याला गमावले होते.
असे हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 1920 साली 1 ऑगस्ट रोजी या जगाचा निरोप घेऊन इहलोकी गेले त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना ही शब्दरूपी आदरांजली…