Benefits and rules for atharvashirsha

Rules of chanting atharvshirsh

अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

अथर्वशीर्ष : थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे.

अथर्वशीर्षाचे तीन प्रमुख भाग

3 main part of Atharvshirsh


१. शांतीमंत्र
सुरुवातीला ॐ भद्रं कर्णेभिः आणि स्वस्तिनः इंद्रा….. हे मंत्र आणि शेवटी सह नाववतु ।…… हे मंत्र

२. ध्यानविधी
ॐ नमस्ते गणपतये येथपासून ते वरदमूर्तये नमः येथपर्यंतचे दहा मंत्र

३. फलश्रुती
एतदथर्वशीर्ष योऽधीते इत्यादी चार मंत्रअथर्वशीर्ष म्हणणे

अथर्वशीर्ष म्हणणे

Rules for Atharvshirsh

हे स्तोत्र म्हणतांना पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे.

१. उच्चार अगदी स्पष्ट असावेत.

२. स्तोत्र अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.

३. स्तोत्रपठण तदर्थभावपूर्वक = तत् + अर्थ + भावपूर्वक, म्हणजे त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्त आणि भगवच्छक्तीयुक्त झाला पाहिजे.

४. जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे स्तोत्र म्हणावयाचे असते तेव्हा वरदमूर्तये नमः । येथपर्यंतच म्हणावे. त्याच्या पुढे जी फलश्रुती आहे ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी. त्याप्रमाणेच शांतीमंत्र प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदा म्हणावा.

५. या स्तोत्राच्या एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.

६. स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे.

७. पाटावर न बसता त्याऐवजी धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.

८. पाठ म्हणून पूर्ण होईपर्यंत मांडी पालटावी लागणार नाही, अशी सोपी साधी मांडी घालावी.

९. दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.

१०. पाठीला बाक येईल, असे न बसता ताठ बसावे.

११. पाठ म्हणण्यापूर्वी आई, वडील आणि आपले गुरु यांना नमस्कार करावा.

१२. पाठाला प्रारंभ करण्यापूर्वी जमल्यास गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल वहावे. पूजा करता न आल्यास निदान गणपतीचे ध्यान एक मिनिटभर करावे, नमस्कार करावा आणि मग पाठास प्रारंभ करावा.

१३. उच्चारात चुका होऊ नयेत म्हणून स्तोत्र बरोबर कसे म्हणावे, ते चांगल्या स्पष्ट आवाजातील audio ऐकून शिकण्याचा प्रयत्न करावा.

१४. स्तोत्र म्हणतांना गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ॐ कडे पाहून म्हणावे, म्हणजे लवकर एकाग्रता होते.अथर्वशीर्ष म्हणण्याचे लाभ

अथर्वशीर्ष म्हणण्याचे लाभ

Benifits of Atharvshirsh

१. स्तोत्रात फलश्रुती दिलेली असते. आत्मज्ञानसंपन्न ऋषीमुनींना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असल्याने आणि फलश्रुतीमागे त्यांचा संकल्प असल्याने, स्तोत्र पठण करणार्‍याला ते फळ फलश्रुतीमुळे मिळते.

२. स्तोत्र पठण करणार्‍याच्या भोवती कवच (संरक्षक आवरण) निर्माण करण्याची शक्ती स्तोत्रात आहे; म्हणून अथर्वशीर्षाच्या पठणाने वाईट शक्तीच्या त्रासापासून रक्षण होते.

शुभं भवतू

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top