1) दिन शुद्धी पाहून पारायणास प्रारंभ करावा . 2) पोथीला कापडाचे आसन मांडावे . 3) आसन शक्य झाल्यास लोकरीचे, दर्भासन, कांबळ (घोंगडी) असावे . 4) आसन व वस्त्र स्वच्छ असावे 5) पोथी जवळ नागावेलीच्या जोड पानांवर सुपारी सव्वा रुपया व जवळ नारळ ठरवावे. . 6) आदल्या दिवशी चार कुत्रे व एक गाय यांना पोळ्या टाकाव्या. 7) पारायण काळात कडधान्ये खावू नये. . 8) पारायण काळात ब्रम्हचर्य पालन करावे. . 9) पारायण काळात काळ्या वस्तु चामड्याच्या वस्तु वापरू नये. . 10) पारायण काळात परान्न घेऊ नये. . 11) पारायणात वाचन चालू आहे तो पर्यंत दिवा अगरबत्ती ठेवत ठेवावी.एका ताम्ब्याच्या ग्लासात पाणी भरून तो समोर पाटावर ठेवून पारायण संपल्यावर तीर्थ म्हणून घ्यावे. . 12) पारायण काळात कुठल्याही संस्काराचे (विवाह, सुतक,वृद्धी, नामकरन) अन्न घेऊ नये. 13) पारायण काळात मौन राहून जास्तीत जास्त परमेश्वर चिंतन करावे. . 14) अध्याय संपल्याशिवाय आसनावरून उठू नये. . 15) रात्री जमिनीवर लोकरीचे वस्त्र, घोंगाडीवर अशावर झोपावे. 16) पारायण वेळेत स्त्रियांनी अंबाडा बांधू नये केस मोकळे सोडावे. 17) स्त्रियांनी पातळाला किंवा साडीला गाठ मारू नये. हातात बांगाड्या घालाव्या केस कापू नये. 18) मासिक पाळीचा अडथळा आल्यावर वाचन दुसऱ्या कडून करून घेणे. . 19) दररोज ग्रंथाची पुजा करून नमस्कार करावा नंतर वाचनास सुरुवात करावी.