काय बदलले आहे ? असे विचारल्यावर नेहमी ऐकिवात येते की, जग बदलत आहे”, पण जरा विचार करा, नेमके काय बदलले आहे जगात…!!! कोणी काय सोडले?
आजपर्यंत मिरचीने तिखटपणा नाही सोडला.., तर आंब्याने गोडपणा नाही सोडला…!!!
वृक्षांच्या पानांनी हिरवेपणा नाही सोडला…., तर वृक्षांनी सावली देणे नाही सोडले…!!!
सूर्याने तळपणे नाही सोडले.., तर चंद्राने शीतलता नाही सोडली…!!!
फुलाने सुगंध नाही सोडला.., तर वा-याने वाहणे नाही सोडले…!!!
नदीने आपला मार्ग नाही बदलला.., तर सागराने आपली मर्यादा नाही सोडली…!!!
पक्षांनी विहार करणे नाही सोडले.., निसर्गाने कोमलता नाही सोडली.., ईश्वराने दयाळूपणा नाही सोडला…!!!
मग नेमके बदलले आहे ते काय?, बदलला आहे तो फक्त माणूस.., माणसाने माणूसकी सोडली…!!!
स्रुष्टी त्रेतायुगात अशीच होती. सत्त्ययुगात पण अशीच होती. द्वापार युगातही अशीच होती. आणि आता कलीयुगातही तशीच आहे…!!!
बदलला आहे फक्त केवळ माणूस आणि त्याचे विचार, पण तो मात्र साऱ्या जगाला तो दोष देत असतो…!!!
माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा…!!!
आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की, आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ शकत नाही…!!!
तसेच जग बदललेय म्हणून जगरहाटीला दोष देऊ नका, समाधानी रहा सर्वांचे आभार माना…!!!
आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!
Kup chan great