राखी पौर्णिमा खुलासा 🌹
पूर्वी रक्षा सूत्र बंधन होते . रक्षा सूत्र बंधन हे राजा लढाईला जाण्यापूर्वी त्याच्या रक्षणासाठी हातात बांधण्याचे एक बंधन होते . रक्षा सूत्र बंधन करण्याचे कर्म हे खूप मोठे आहे . त्यामध्ये मंत्रोपचार करून ते रक्षा सूत्र राजाच्या हातात बांधले जाई . पुढे त्याचा उद्देश बदलला व बहिणीने भावाला बांधायची राखी हे स्वरूप त्याला आले . परंतु आजकाल कोणीही नवीन धर्मशास्त्र तयार करून राखी पौर्णिमा बद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत . ज्यायोगे हिंदू धर्मावर लोकांची श्रद्धा कमी होईल किंवा त्यांनी सण साजरे करू नयेत अशा पद्धतीने प्रत्येक सणापूर्वी असे विचित्र मेसेज प्रसार माध्यमातून पाठवले जातात . आजकाल जी राखी पौर्णिमा साजरी केली जाते तो एक लौकिक विधी आहे . म्हणजे बहिणीने फक्त भावाच्या हाताला दोरा बांधण्याचा एक विधी आहे . त्यामध्ये कुठलेही मंत्र उपचार होत नाहीत किंवा कुठलाही विधी होत नाही . त्यामुळे त्याबद्दलचे भद्रा किंवा इतर कुठली मूहूर्त बघण्याची कोणतीही आवश्यकता नाही . सर्वांनी आपले सण आनंदाने साजरे करावेत असेच धर्मशास्त्र सांगते . पण आजकाल हे व्हाट्सअप आल्यापासून खूप विचित्र मेसेज फॉरवर्ड होत आहेत . हे सांगणारे आहेत ते कोणीही धर्मपंडित नाहीत , ते असेच कुठून तरी गोळा करून आपल्या माथ्यावर ते शास्त्र थोपवत आहेत .
आज काल भद्रा दोष सांगितला जातो , वास्तविक दर वर्षीच राखी पौर्णिमेला भद्रा असतेच मग इतके दिवस आपले पूर्वजांनी कोणतेही बंधने आपल्याला सांगितलेली नाहीत . ते वेडे होते का ?
आपण सर्वसामान्य व्यक्तींनी याचा विचार केला पाहिजे की आपण सण का साजरे करत आहोत , त्यामागचा उद्देश काय आहे . आणि त्यानुसार आपण पूर्णपणे आनंदाने आपले सण साजरे करावेत . दिवसभरात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राखी पौर्णिमा आपण साजरी करू शकतो . त्याबद्दल कुठलेही बंधन नाही आणि धर्मशास्त्रात असे कुठेही उल्लेख नाहीत हे मी माझ्या खात्रीने सांगू शकतो .
जय श्रीराम