म्हातारपण काय आहे? समर्थानी
केलेले सुंदर वर्णन,
समर्थांनी दासबोधात फार सुंदर वर्णन केलं आहे. त्यांनी ऋणानुबंध हा शब्द घातलेला हे आहे. ऋण म्हणजे कर्ज आणि बंध म्हणजे संबध कींवा बांधला गेलेला. तर महाराज याच्यावर सांगायचे की तुमचं देणंघेणं असतं म्हणून तुम्ही एकमेकांच्या संबधात येता आणि जोपर्यंत तुमचं एकमेकाविषयी ऋण फीटत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. आपलं एकमेका विषयी काहीतरी देणंघेणं असल्या मुळे एकमेकांना मदत करुन ऋण फेडता.
म्हातारपण फार चमत्कारिक आहे. तुम्ही काहीतरी अध्यात्म करीत असाल तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. परंतु तेच जर आपण व्यवहारातच जर राहीला तर अवघड आहे. नामस्मरण कींवा काही साधन जर तुम्ही तारुण्या पासूनच करत असाल तर पुढे तुम्हाला त्याची सवय लागते आणि मनाला एक वळण लागतं मग पुढे सुखदुःखात त्याला नामाचीच/त्या साधनाचीच आठवण राहील.
म्हातारपण सहन करणं फार कठीण आहे. शरीरातील जीवन शक्ती कमी होते. बसलेले उठवत नाही. उठलेले झोपवत नाही. अंगातली कर्मशक्ती क्षीण होते. बरोबरचे लोक मरण पावतात. तेव्हा माणूस विचलित होतो.
म्हातारपणी जर तुम्हाला साधनेची काही सवय नसेल तर फार अवघड आहे. कारण जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळते की नामसाधनाची आवड असेल तर मन लगेच नियंत्रणात येतं. तेच जर काही साधन नसेल मनावर अंकुश येणं फारच कठीण आहे.
म्हणून भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणायचे एखादी कपड्याची फॅक्टरी आहे आणि त्यात कपड्याला कलर लावायला एक माणूस पूर्वी असायचा. त्याला डायिंग मास्टर म्हणतात.
त्याने एकदा कपडा रंगवला की संपलं. परत तो कपड्याचा रंग बदलता येत नाही.
तसे माणसचे वय एकदा पंन्नास पंच्चावन्न च्या पुढे गेलं की संपलं. या वयाच्या पुढे त्याला समजून पण सुधारणा करता येत नाही. आणि म्हणून लहानपणा पासूनच कींवा तारुण्यात च साधनेची आवड पाहीजे नाहीतर कठीण आहे. माझ्या मते तारुण्याचे कींवा समजायला लागलेल्या वया पासूनच्या कर्माचं रीझलटंन्ट म्हणजे म्हातरपण आहे.
कारण जर तुम्ही नीट वागला, चांगल्या कामाची सवय कींवा साधनेचा व्यासंग जर असेल तरच शेवटी जीवन व्यवस्थित जातं. जास्त कष्ट पडत नाहीत. म्हणून जीवनात शिस्त, चांगुलपणा, साधनेची आवड, परिश्रम करण्याची वृत्ती आणि तत्परता हे गुण कामी येतात. आपण म्हणतो म्हातारपणी पैसा असल्यावर कींवा समाजात मान असल्यावर घाबरण्याचे कारण नाही पण खरं तसं नाहीये.
याचं उत्तम उदा. पुढे देत आहे. एकदा लोकमान्य पुण्याला बंडगार्डन मध्ये फीरायला गेले होते. तेथे डॉ.भांडारकर पण आले होते. सकाळची वेळ होती. दोघांची एकमेकां कडे दृष्टादृष्ट झाली. लोकमान्यांना ते पुर्वी शिकवायला होते. लोकमान्य त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाया पडले. तेव्हा भांडारकरांनी त्यांना लगेच ओळखलं नाही. कोण रे तू असे त्यांनी विचारल्यावर मी बाळ गंगाधर टिळक असं टिळक म्हणाले. तेव्हा भांडारकर म्हणला अरे तु अत्ताच थकलास. लोकमान्य त्यावेळी ५९-६० वर्षाचे होते. ते शांत उभे राहिले. व म्हणाले आपण भाग्यवान अहात. की आपल्याला येवढं जीवन मिळालं.
तेव्हा भांडारकर म्हणाले की तु चुकतोयेस. अरे म्हातारपण सुखाचं नाही. शाररीक दुःख, मानसिक दुःख व आपल्या पोरबाळांची दुःख पण सहन करावी लागतात. आणि म्हणून महाराज नेहमी म्हणायचे की आपल्या समजत्या वयातच आपलं ध्येय ठरलेलं असावं. म्हणजे मग त्या ध्येयाच्या दृष्टीने पावलं टाकली जातात.
मग त्यामुळे माणूस सुखदुःखात पण दुःखीकष्टी होत नाही. म्हणूनच खरंतर आपणच आपले चांगले मित्र वा शत्रू आहोत. उगीच मुलाबाळांसह बायको कींवा नातेवाईकांवर आवलंबून राहणे उपयोगाचे नाही. माझा गुरु हेच माझं धेय्य असावं व त्यांनी सांगितलेले साधन हा मार्ग.
मग काय सर्व अलबेल होईल यात शंकाच नाही. भगवदगीतेत भगवंतांनी तेच सांगितलेले आहे की सतत चांगले कर्म करत रहा कींवा, तुमच्या कर्मात मला घाला म्हणजे नामात रहा म्हणजे तो खरा कर्मयोगी होय. आता निवृत्त झाल्यावर चांगले कर्म म्हणजे काय असणार तर साधन आणि जमेल तशी लोकसेवा कींवा समाज जागृती. ती कशी करायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावा नुसार ठरवावे.
निंबाळ सांप्रदायाचे हे गुरुदेव रानडे होते ना, त्यांना एकाने विचारले की तुम्ही नुसते नाम घेत बसता त्यापेक्षा समाजकार्य का करीत नाही. तेव्हा ते म्हणाले की मी येवढे एका खोलीत बंदिस्त राहून जे नाम करतोय त्यामुळे माझ्या आसपास एक चांगले आवरण तयार होते व त्यामुळे लोकांच बर होत असणारच. या माझ्या साधनेने कुठे वा कुठे तरी फायदा होत असणारच. तो कुणाला व कुठे हे मात्र मी सांगू शकत नाही. पण समाजाचं भलं होत असलंच पाहीजे. _कारण माऊलीने म्हणल्या प्रमाणे_ _खळांची व्यंकटी सांडो, "सत्कर्मे रती वाढो"_ असं म्हणलं आहे.
विचार करा माऊली म्हणतात की माझ्या प्रार्थनेनं जगातलं दुःख कमी होऊ देत हे खरं मागणं आहे. आणि म्हातारा जर साधनी असेल तर जिंकलं असं म्हणायला हरकत नाही.
ज्याचा अंतकाळ नामात झाला त्याने जिंकलं. असं महाराज म्हणायचे. एक विनम्र चिंतन.
संदर्भ – प. पू. बेलसरे निरुपणे आणि ग्रंथभांडार. ! श्री राम समर्थ !