पाण्यातच नशा आहे!
औरंगाबादची एक प्रसिद्धी भारताची बिअर राजधानी अशी सुद्धा आहे. किंगफिशर, फाॅस्टर'स, कार्लसबर्ग, हैनेकेन (नावातील चुकभूल माफ करावी), खजुराहो या प्रसिद्ध नाममुद्रांचा (मराठीत ब्रॅंडस्!) संबंध औरंगाबाद शहराशी आहे /होता.
वाळूजच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये या नाममुद्रांच्या ब्रुअरीज आहेत/होत्या. शहरातील ब्रुअरीज 180 दशलक्ष लिटर पेक्षा अधिक बियरचे दरवर्षी उत्पादन करतात. महाराष्ट्राच्या एकूण ब्रुईंग क्षमतेच्या 70 टक्के क्षमता ही औरंगाबादच्या ब्रुअरीजमध्ये आहे. या ब्रुअरीजना दररोज जवळपास ३५ दशलक्ष लिटर पाणी लागते. औरंगाबाद शहरात सोळा मोठ्या ब्रुअरीज आणि डिस्टीलरीज आहेत.
एकीकडे औरंगाबादकरांना प्यायला पाणी नाही आणि इकडे मद्य उत्पादक औरंगाबादकडे धावतात याचे कारण हे आहे की जायकवाडी धरणातून त्यांना सिलिका विरहित पाणी मिळते. त्यामुळे बिअरला खास चव प्राप्त होते.
महाराष्ट्रात मुंबई-पुणे-नाशिक आणि नागपूर ही चार मद्याचा वापर करणारी मोठी शहरे आहेत आणि त्यांना लागणारा बराचसा पुरवठा औरंगाबाद मधून होतो. अनेक मद्य उत्पादक कंपन्यांमध्ये नामवंत पुढाऱ्यांचे जवळचे नातेवाईक संचालक आहेत असेही वाचनात आले होते.
डिस्टिलरीज मध्ये ज्वारी, गहू, बाजरी, मका, बटाटा, बार्ली इ.चाही वापर केला जातो. काही लोक हलत डुलत जातांना दिसले तर त्यांना दोष देऊ नका, ते सिलिका मुक्त पाणी पिऊन चाललेले असतील! . . -
मूळ लेखक : रवींद्र धोंगडे
PC- Google.