Category: सप्तशती चंडी पाठ – With Meaning

लेखक :
वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव
9422211334

श्रीमद्भागवत लिखाना नंतर पुन्हा सप्तशती चंडी पाठ या विषयावर लिहाव अशी इच्छा झाली.. आणि जगदंबा कृपेने लिहिण्यास प्रारंभ केला..!

  • सप्तशती भाग ९

    मागे सांगितल्याप्रमाणे  चित्त शुद्ध झाले की साधकाचा पुढचा प्रवास भगवती भावास पूरक आणि प्रेरक ठरतो..!

    नवरात्रीचे सुरुवातीचे तीन दिवस महाकाली, महालक्ष्मी पूजन करावे  सर्व दुर्गुणांचा नाश झाल्यावर सात्विक प्रवृत्ती आपल्यात  निर्माण होऊ लागते तिचा विकास आणि संवर्धन मात्र गरजेचे आहे. तसं न झाल्यास जुन्या वाईट वृत्तींचा प्रभाव अजूनही आहे, किंवा त्या प्रवृत्ती पुन्हा आपल्यात स्वार होतात.. आक्रमण करतात  त्यामुळे महालक्ष्मी पूजन बाधित होऊन  योग्य व अपेक्षित फलप्राप्ती होत नाही..!

    त्यासाठी साधकाने अत्यंत सावधपणे सद्गुणांची वृद्धी करावी तेव्हा ती महालक्ष्मी आपल्या भक्ताला दैवी संपदा द्रव्य, धन, जय, यश  हे सर्व अक्षयपणे प्रदान करते..!  जीवनातल्या कुठल्याही चांगल्या कामासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. साधकात जेव्हा सात्विक गुणांची वृद्धी होते तेव्हा ज्ञान प्राप्त करण्यासाठी तो योग्य झालेला असतो, आणि मग या स्थितीत ब्रह्मज्ञान स्वरूपिणी श्री महासरस्वतीचे पूजन सुरू होतं, हे पूजन साधना नादब्रह्मकथा आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रशस्त आहे.

    म्हणून शेवटचे तीन दिवस नवरात्रीचे श्रीमहासरस्वती चे पूजन करावे असं सांगितलेलं आहे.नवरात्र हा कुलधर्म कुलाचार आहे.. ज्यांची कुलदेवता देवी आहे त्या काळात ती पिढ्यानपिढ्या पुजली जाते..! त्यांनी आवर्जून हा कुळाचार केलाच पाहिजे..! कारण कुळ  वंशपरंपरेने त्या कुळातल्या अनेक पिढ्या  कुळाच्या मूळ देवतेची आज पर्यंत त्या देवतेची पूजा केली जाते.. ती देवता म्हणजेच कुलदेवता जिच्या कृपाशीर्वादाने  आपला वंश सातत्य टिकवून सुखी व समृद्ध जीवन जगत असतो आणि मग त्यासाठी परंपरेने त्या कुलात त्या देवतेची पूजा, अर्चा, व्रतवैकल्य, सण-उत्सव पार पाडली जातात…!

    त्यालाच कुलाचार कुलधर्म असे म्हणतात..!

    प्रारंभी मी धर्म शब्दाचे निरूपण केले आहे चार पुरुषार्थत धर्म प्रथम आहे महर्षी व्यासांनी कलियुगात गणेश आणि देवी उपासनेला या करतात महत्त्व दिलेले आहे..! धर्म प्राप्त झाला म्हणजे अर्थ काम व मोक्ष आपोआप प्राप्त होतीलच..! म्हणून धर्म म्हणजे कर्तव्य.. ते नित्य आणि नैमित्तिक असावे, म्हणून ते बंधनकारक असते..! ज्यांची कुलदेवता देवी नाही तरीही ते नवरात्री परंपरेपासून पाळतात..! किंवा ज्यांची देवी ही इष्ट देवता आहे त्यांनीही जगदंबेच्या प्रसन्नतेसाठी नवरात्र उपासना जरूर करावी..!

    मात्र आपल्या कुलदेवतेची उपासना सोडू नये..! कारण कुलदेवतेचा कोप कुळाचा नाश करणारा असतो, त्यामुळे विघ्ने, संकट, दैन्य, दुःख, दारिद्र्य, अपयश, संतती न होणे, घातपात, अपघात, अकालीमृत्यू, रोग आदी प्रकार इत्यादी घटना घडतात ..म्हणून सावधान असावे..!

    अध्यात्मात एक गोष्ट ध्यानात घेतली जाते ती म्हणजे मनुष्याची सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन तत्त्वांना आता विज्ञानानेही सिद्ध केले आहे जर विचार,चिंतन, नाकारात्मक असेल तर त्याचा परिणाम त्या मनुष्यावर तर होतोच परंतु त्याची स्पंदने लाटा जेव्हा घरातील इतर सदस्यांवर स्वार होतात त्यांचे कर्म ही तो बाधित करतो..! परिणामी  वाईट शक्तीचा ऊर्जेचा प्रभाव सर्वांवर होऊन वातावरणावर देखील होतो..! त्यासाठी आम्ही नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरलेले असलो तर चांगले..!

    क्रमशः

    श्री गुरुमहाराज समर्थ…!

    जय जगदंब

    वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव

    942221133

  • सप्तशती भाग ८

    मागे सांगितल्याप्रमाणे कलियुगात देवी आणि गणपतीची उपासना शीघ्र फलदायी होईल असं महर्षी व्यासांनी नमूद करून ठेवलाय. या विधानांचा विचार केल्यावर असं लक्षात येतं की च़ंडी म्हणजे शक्ती आणि गणपती म्हणजे बुद्धी.. शक्ती आणि बुद्धी ची ही उपासना हे आजच्या आधुनिक काळात अगदीच शब्दशः अर्थ  घेता शक्ती आणि बुद्धीसाठी सतत प्रयत्नशील कार्यमग्न राहून त्याद्वारे शारीरिक, मानसिक बौद्धिक, अध्यात्मिक, स्वास्थ्यपूर्ण श्रमजीवी अशी शक्ती आत्मसात केली गेली तर आपले हे जीवन सर्वार्थाने चतुर्विध पुरुषार्थ सहज पणे प्राप्त करू शकते.

    त्यासाठी हेच आपले श्रेयस आणि प्रेयस असणे आवश्यक आहे, असं मला वाटते. तत्वाचा निरूपण करताना निरुपणकार म्हणजेच महर्षी व्यास असं म्हणतात  देवीची विधिवत नवरात्र पूजा जशी आपल्या घराण्याची कुलपरंपरा असेल त्यानुसार  नित्यनैमित्तिक अर्चना उपासना भक्ती पूजा केली पाहिजे..

    उगीच रूढीग्रस्तता  ठेवून शास्त्राचा अव्हेर करणे योग्य ठरत नाही..! देवीच्या नवरात्रात नऊ हा अंक महत्त्वाचा दिसून येतो जसे की नवचंडी, नवदुर्गा, नऊ कन्या, नवरात्री, नवार्ण मंत्र, नवरत्न, माला नवनीत इथेच हवं. नवविधा भक्तीच प्रत्येक अस्तित्व आणि महत्त्व या नवरात्रीत आहे. शास्त्र असे म्हणते की या नवरात्रीत या जगदंबेच्या त्रिगुणात्मक म्हणजे तीन गुण तत्त्वांची तीन दिवस पूजा-अर्चा उपासना करावी म्हणजे मला असं वाटतं की सत्व, रज आणि तम या गुणांनी आपला देह बनलेला आहे.

    हे त्रिगुण सर्व व्यापकच आहे तेव्हा  गुणाच वर्चस्व कमी होऊन आपलं जीवन सुंदर व सुखकर होईल त्यासाठी पहिल्या तीन दिवसात महाकाली म्हणजे दुर्गेची पूजा करावी. त्यातील आपले दोष दुर्गुण आळस नष्ट करण्याची प्रार्थना करावी. तेव्हाही दुर्गा आपल्यातील असुरी प्रवृत्ती असुर गुणांची संग्राम करून त्यांना नष्ट करेल. त्यामुळेच आपले कुसंस्कार आसुरीवृत्ती दुर्वासना यांचा ती नाश करेल. ही साधकाची प्रथम अवस्था असेल. कारण दुर्बुद्धी नष्ट झाली चित्त शुद्ध झाले मळ दूर झाला की साधकाचा पुढचा प्रवास भगवती भावास पूरक आणि प्रेरक ठरतो..!

    क्रमशः

    श्री गुरुमहाराज समर्थ…!

    जय जगदंब

    वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव

    942221133

  • सप्तशती भाग ७

    अध्यात्मिक शक्ती ही अदृश्य स्वरूपामध्ये असते ही शक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणत्यातरी दृश्य माध्यमावर श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण अव्यक्त शक्तीला उद्देशून आपण प्रार्थना केली पूजा, अर्चना, जप जाप्य, होम-हवन आदि कार्य केले तर लगेच ती शक्ती प्रसन्न होईल किंवा असं सामान्य भक्ताबाबत, साधका बाबत होऊ शकत नाही. कारण अव्यक्त शक्तीच्या अवतारावर तिच्या प्रकट होण्याबाबत किंचितसा किंतु वा अविश्वास सुद्धा ती शक्तीच ग्रहण होऊ देत नाही…!

    विज्ञानाच्या प्रयोगाचेही असेच असते त्यात जराही न्यूनता किंवा चूक झाली तर  परिणाम निष्कर्षाप्रत येत नाहीत.. म्हणजेच अध्यात्म आणि विज्ञान प्रयोगात चूक न होणे, म्हणजेच बिनचूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा प्रयोग संपुर्ण विश्वास,संपूर्ण समर्थन,संपूर्ण समर्पण,निःसंशयताः, सातत्य, संयम,सबुरी इत्यादी गुणवत्तांवर आधारलेल्या असतात,तेव्हाच ते निर्गुण तत्व सगुण रुपात साकारते.

    त्यासाठी अहंकार रहित समर्पणाची आवश्यकता असते. म्हणजेच अस्तित्व शून्य झाल्यावर ती दैवी शक्ती प्रकटते,निर्माण होते आणि सर्वत्र व्यापून टाकते. म्हणजेच तो प्रयोग यशस्वी व सफल होतो हीच त्या शक्तीची कृपा प्रसन्नता होय..!

    क्रमशः

    श्री गुरुमहाराज समर्थ…!

    जय जगदंब

    वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव

    942221133

  • सप्तशती भाग ६

    महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा। निद्रा तृष्णा चैकवीरा कालरात्रिर्दुरत्यया॥

    म्हणजेच भूक-तहान झोप या रूपातही तीच आहे एकविरा म्हणजे शौर्य कालरात्री म्हणजे महाकालाच्या रूपात जगाच्या प्रारंभी जेव्हा काहीही नव्हते तेव्हा विश्वनिर्मिती करण्याच्या इच्छेने जी शक्ती सर्वात आगोदर प्रकट झाली ती महालक्ष्मीच्या रुपात. सप्तशतीतील  मूर्ती रहस्यात सुंदर वर्णन आलेले आहे  याच महालक्ष्मीने तमोगुणातून महाकालीला प्रकट केलेले आणि सत्वगुणातून महासरस्वती अवतरली आणि नंतर या दोघींनी स्वतःच्या गुणांनी युक्त अशा स्त्रीपुरुषांच्या जोड्या निर्माण केल्या. त्यानुसार ब्रम्हा सरस्वती विष्णू लक्ष्मी शंकर पार्वती आणि त्यांचे कार्यही त्यांना नेमून दिले. या अनुसार सृजन म्हणजे निर्मिती ब्रह्मा-सरस्वती कडे, पालन-पोषण विष्णू लक्ष्मीकडे आणि संहार करण्याचे च कार्य शिवपार्वती कडे दिले. आपली समज अशी आहे की फक्त ब्रह्मा विष्णू महेश हे सृष्टीचक्र चालवतात तर तसे नसून सरस्वती लक्ष्मी गौरी या शक्ती रुपी देवतांच्या शिवाय सृष्टिचक्र चालू शकत नाही. आणि आजही स्त्री पुरुषाची ही जोडी कायम आहे. याचे मूळ ती आदिशक्तीची आहे ती गुणात प्रगटत असते म्हणून तिला श्री मूळपीठ  म्हणतात..! अशा या त्रिगुणात्मक त्र्यंबकेश्वरी ला शिवा सारख्याच  तृतीय नेत्र तिसरा डोळा आहे..!

    आपण श्री सप्तशती ग्रंथाची ओळख करून घेत आहोत परंतु या अगोदर या जगदंबेची ज्ञात असं महात्म्य आपण जाणून घेत आहोत ऋग्वेदातील एका देवी सुक्तातही आदिशक्ती देवी म्हणते

    अहमेव वातईष्ट प्रवाम्या रभमनिभुवनानी विश्वा  परो दिवा पर एना पृथ्विव्यै तावती महिना संबभुवः 

    म्हणजे शक्तीदेवी म्हणते मी अत्यंत कार्यकारण भावनेने या सृष्टीची विश्वाची आणि निसर्गाचीही रचना निर्मिती आरंभलेली आहे. हे कार्य मी कुणाच्याही प्रेरणेने शिवाय करते. मी आपोआप वायु प्रमाणे एका वेळी एका किंवा अनेक ठिकाणी चालू शकते, वाहू शकते स्वतःच्या इच्छेने मी सतत कार्यमग्न असते. कार्यप्रवण असते मी पृथ्वी आणि आकाश या पेक्षा वेगळी असून माझ्याच शक्ती प्रेरणेने व सहज प्रवृत्तीमुळे मी भक्त प्रिय झालेली आहे. तर सप्तशतीतील अकराव्या अध्यायात या शक्ती देवी ची स्तुती करताना देव म्हणतात …

    सृष्टी स्थिती विनाशानाम्, शक्तीभुते सनातनी!

    गुणाश्रये गुणमये नारायणि नमोस्तुते 

    अर्थात हे देवी तू या सृष्टीचे पालन आणि विनाश करणारी सनातन अशी शक्ती असून तू अतिप्राचीन आदिम आहेस. तुझ्या कृपाशीर्वादाने आम्हाला गुणसंपन्नता प्राप्त होते. तू सकल गुणांची निधी संपत्ती आहेस म्हणून हे नारायणी आम्ही तुला शरण आलो असून तुला आमचे वंदन असो. अशा या सृजन रुपी आदिशक्तीच्या नवरात्री संबंधात त्याची प्राचीनता कालानुरूप आधुनिकतेची माहिती आपण जाणून घेऊयात..! त्यासाठी प्राचीन काळातील दोन श्लोकातून आपण या जगदंबेची मातृ वत्सलता जाणून घेत आहोत

    वात्सल्य करुणा हे या जगदंबेचे स्थाई भाव आहेत ज्यांच्या हृदय हे विराजमान होतात तो त्या मातेचा त्यांना कृपाप्रसाद किंवा देणगीच असते…अंबा म्हणजे माता आणि जगदंबा म्हणजे सर्व जगाची माता. अशी ही माता जेव्हा आपणास जन्म देते तेव्हा ते अपत्य शक्तिवान असावे व्हावे असं तिचा हेतू उद्देश असतो. आणि म्हणूनच नाना परीने ती माता,त्याला शक्तिसंपन्न करीत असते परंतु आज आम्ही जे भौतिक सुख उपभोगत आहोत त्यातून शक्तीच्या ऱ्हासच होत आहे ..! महर्षी व्यासांना त्याची चांगलीच कल्पना होती म्हणून मानव कल्याणासाठी त्यांनी आपल्या सर्व पुराणातून वेदातून प्रकटलेल्या शक्ती देवतेची उपासना म्हणजेच नवरात्रोत्सव आपणासाठी सांगितलेला दिसून येतो.. ही देवी जशी जन्मदात्री आहे तशीच ती विनाशकारी ही आहेच.. काळाला आपण टाळू शकत नाही काळ म्हणजे मृत्यू या मृत्यूपासून आपण स्वतःला वाचवू  शकत नाही..! हे अंतीम सत्य आहे व जरी असले तरीही अशी ही काळ रात्री महा रात्री महामारी कारोनाच्या रूपाने आज अवतरली आहे ..प्रकटलेली आहे. याचा गांभीर्याने विचार होणे आता आवश्यकच आहे. आणि म्हणून कधी नव्हते ती आज तिची अध्यात्मिक आणि वैज्ञानिक साधनांनी उपासना करण्याची गरज सर्वांनाच निर्माण झालेली आहे..!

    कारण आपण नेहमी ईश्वरी शक्तीच्या म्हणजेत निसर्गाच्या विरुद्ध वागत असतो आणि त्यामुळेच त्या शक्तीचा कोप आपल्यावर होतो आजची ही कोरूना नामक परिस्थिती ही त्याचाच दृश्य परिणाम आहे..!

    क्रमशः

    श्री गुरुमहाराज समर्थ…!

    जय जगदंब

    वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव

    942221133

  • सप्तशती भाग ५

    तर शक्ती तत्वाचं निरूपण करताना निरुपणकार म्हणतात

    यत्रास्ती भोगाः नही तत्र मोक्ष! यत्रासस्ती मोक्ष नहीतत्र भोगा ! 

    अर्थात भोग आणि मोक्ष म्हणजेच श्रेय आणि प्रेय दोन्हीही बरोबरीनेच प्राप्त करावेत. आणि ते आम्हाला देवीच्या शक्तीच्या उपासनेतून प्राप्त होतात. त्यासाठी मग त्या देवीची विधिवत उपासना केली गेली पाहिजे. कारण विधीवत प्रत्येक वस्तू ग्राह्य आणि विधी विहीण म्हणजे प्रत्येक वस्तू त्याज्य आहे. म्हणून जशी परिस्थिती असेल त्यानुसार स्वतःमध्ये योग्य ते परिवर्तन करून घ्यावे, यालाच कार्यकुशलता म्हणतात. योग कर्मसु कौशल्यम् शक्ती देवीची व्याख्या करताना असे म्हटले आहे की

    एकेव शक्ती परमेश्वरस्य विविधा वदान्ति  व्यवहार काले भोगेभवानी पुरुषेशु लक्ष्मी: कोपे तु दुर्गा प्रलये तु काली

     अर्थात परमेश्वराची शक्ती सर्वत्र एकच एक आहे, मात्र व्यवहारात कालानुसार तिला विविध नावांनी संबोधले जाते. ऐश्वर्य आणि भोग शक्तीच्या आधीन राहून प्राप्त होतात. परंतु तिचा जर कोप झाला तर ती दुर्गा रूप धारण करते. आणि त्यावेळी मनुष्य जर सावरला नाही,भानावर आला नाही तर प्रलये तु काली म्हणजे काली रूपात ती प्रलय करून टाकते, सर्वनाश करते. या आदी शक्तीचा उद्भव आणि विकास कसा झाला.

    त्यांची कथा अशी सांगितली जाते आपल्या भारतात सगुण उपासनेचे पाच संप्रदाय आहेत ते असे

    (१) शैव

    (२) वैष्णव

    (३) गाणपत्य

    (४) स्वैर आणि

    (५)शाक्त ..

    शाक्त संप्रदायानुसार आदिशक्तीने पहिले सगुणरूप धारण केले ते श्री महालक्ष्मीचे दुर्गाशक्तीरुप..! सप्तशती मध्ये प्राधानिक रहस्यात याचा उल्लेख आलेला आहे. अगोदर ही आदिशक्ती त्रिगुणमयी परमेश्वरी महालक्ष्मी आदीम् आहे. सनातन आहे दृश्य अदृश्य रुपाने ती सर्वत्र व्याप्त आहे. सप्तशतीत वर्णन अस आहे 

    सर्वस्याद्या महालक्ष्मी स्त्रिगुणापरमेश्वरी! लक्ष्या लक्ष स्वरूपासा व्याप्त कृत्स्नं व्यवस्थित!

    अशी ही महालक्ष्मी आपल्या तामसी आणि उग्र स्वरूपातून अत्यंत सुंदर रुपात अवतरली. पुढे असं म्हटलं की

    सा प्रोवाच महालक्ष्मी तामसी प्रमदोत्तम!

    दादामि तव नामानि यानी कर्मानी तानिते!

    ती प्रकट झाल्यावर त्या आदिमायेची नावे अशी आहेत महामाया महाकाली महामारी जी आज कोरणा रूपाने सर्वत्र व्याप्त झालेली आहे..!

    क्रमशः

    श्री गुरुमहाराज समर्थ…!

    जय जगदंब

    वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव

    9422211334

  • सप्तशती भाग ४

    वात्सल्य रूप

    काल आपण वात्सल्यरूप, मायेचे रूप बघितलं परंतु जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आम्ही बापरे असं म्हणतो. समोर जर मोठा साप दिसला किंवा भीतीदायक भयंकर दृश्य दिसलं तर मुखातून बाहेर येणारे शब्द असतात अरे बापरे म्हणजे भयं नाशासाठी वडील (शिव) तर दुःख वेदना आणि प्रेमासाठी आई (शक्ती) ते हे माता पिता आहे असं मला वाटते..! आपल्या जीवनात पिता माता ही जास्त जवळची असते असे वाटतं…!  “नमः तू पर दैवतं..!” आपल्या जीवनात जेव्हढ्या  भौतीक सुविधा आपणास प्राप्त झालेल्या आहेत, त्या सर्व सोयीसुविधांमुळे मनुष्याच्या शक्तीचा ऱ्हास होत चालला आहे ..!सर्व काम आम्ही आता यंत्राद्वारे करू लागल्यामुळे घरापासून बाजार,दुकानापर्यंतही आम्ही वेळ असल्यावरही पायी चालत जात नाही. तेव्हा ही शक्ती आज आम्ही घालून बसलोय हा शक्तीचा ऱ्हास नव्हे काय..? मग डॉक्टर सांगतात तुम्हाला चालने फिरणे आवश्यक आहे तेव्हा कुठे मग आम्ही मृत्यू भयापोटी मॉर्निंग वॉक सुरू करतो..!

    असो देवी पुराण देवी भागवत हे शक्ती पुराणाचा आहे. कारण ती स्वयम् आदिशक्तीच आहे श्री व्यासांनी हे शक्ती पुराण स्वतः कथन केलेले आहे..! ज्यात श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या आद्य शक्तींच्या अनेक विविध रूपांपैकी अत्यंत प्रमुख अशी तीन रूपे आहेत..! आणि मग त्या रूपांच्या आराधनेसाठी वर्षातून चार प्रकारच्या नवरात्रीचे आयोजन केलेले आहे.हे चार नवरात्र अनुक्रमे चैत्र आषाढ आश्विन आणि पौष महिन्यात असतात व ते सर्वच साजरे केले जातात..! त्यातही चैत्र आणि अश्विन महीण्यातील नवरात्रीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यासांनी कलियुगात गणपती आणि देवीची अर्चना शीघ्र फलदायी सांगितलेली आहे.आपल्या पुजाघरात पंच देवतांची पूजा महत्त्वाची मानलेली आहे या पंचदेवता शिवविष्णू तथा शक्तों सूर्योमती नराधीपः

    या भेद बुद्धी योगाः सम्यक् योग तमो मतः

     (संदर्भ गणेश पुराण)  असं गणेश पुराणात आहे .तर शब्द कल्पद्रुम ग्रंथात म्हंटले की आदित्यं  गणनाथंच ! देवी रुद्रक्ष केशवंम्! पंचदेवता भी युक्तं! सर्व कामस सं पुज्यते!!

    म्हणून देवी गणपती शिव विष्णू आणि सूर्य या पाच देवतां चे पंचायतन पूजन व्हावे ..!

    क्रमशः

    श्री गुरुमहाराज समर्थ…!

    जय जगदंब

    वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव

    9422211334

  • सप्तशती भाग 3

    तर कालच्या पोस्टमध्ये आपण बघितले कि तेज खूप महत्त्वाचे आहे ते टिकवण्यासाठी तप हा शब्द मला खूप महत्त्वाचा वाटतो. या तप शब्दाला जर उलटे केले तर त्याचा पत हा शब्द तयार होतो आणि पत म्हणजे आपले सामर्थ्य आपली पत जर समाजात, घरात, इष्टमित्रात, नातेवाईकात, शत्रुत्सुद्धा ठेवायची असेल तर तपा सारखे दुसरे साधन नाही..!

    आधुनिक तप

    पूर्वी राक्षस सुद्धा तप करून देवाकडून इच्छित वरदान प्राप्त करून घेत असत आता हे तप म्हणजे सर्वसंगपरित्याग करून पोथ्या पुराणात जसे तपाचे वर्णन आलेले आहे अगदी तसेच नव्हे..! तर किमान आपल्या दैनंदिन जीवनात आपले आचार-विचार आहार-विहार व्यवहार, धर्म वर्तन, यथाशक्ती परिश्रम, सत्य, अहिंसा सहानुभूती सर्वाप्रती प्रेमभाव, दया, क्षमा, शांती प्रवृत्ती, निवृत्ती, त्याग, दान वगैरेंचे पथ्य जरि पाळले तरी ति तपच  आहे. ती एक प्रकारे शक्ती उपासनाच आहे फक्त ही उपासना तात्कालिक सीजनल म्हणजे सण उत्सवापूर्ति मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन जीवनाची अविभाज्य घटक झाली पाहिजे. यासाठीच समर्थ म्हणतात उपासनेला दृढ चालवावे शक्तीची उपासना एका दिवसापुरती वा आठवड्यापूर्ती वा महिन्यापुरती नसावी.

    असं म्हणतात कि तेजस्विता प्राप्तीसाठी जेव्हा लौकिकप्रयास कामी येत नाही अडचणी येतात.. त्या वेळी मग आम्हाला एकच उपाय शिल्लक राहतो, तो म्हणजे परात्पर जगदंबा देवीची आराधना मनुष्य जीवनात समृद्धी,ऐश्वर्य,संपन्नता आणि भक्ती मुक्तीची मागणी भगवंताजवळ करावी कारण वेद वांगमया पासून सर्व प्रकारच्या पुराणात,भागवतात सुद्धा या निसर्ग शक्ती जवळ त्या शक्तीच्या वर्णनातून त्यांच्या स्तुति नंतर हीच मागणी आलेली आहे ..!कारण देव शब्दाच्या अर्थात दाता देणारच.. फक्त त्यासाठी साधन सुचिता, कष्ट, प्रयत्न, सातत्य, संयम आणि सहनशीलता आवश्यक आहे. आणि तेच आमच्या हातून घडत नाही. सध्या तर अशी परिस्थिती आहे की आम्ही सन उत्सवातील परंपराही नीट पार पाडत नाही..! आणि म्हणून अपेक्षित फलप्राप्ती होत नाही ..!

    वात्सल्य रूप

    आद्य शक्ती जगदंबा आणि इतर देवतेच्या आराधनेत अंतर आहे तसं पाहिलं तर भोग आणि मोक्ष सर्वच देवता देतात मग अंतर काय आहे..? देवी भागवतात असं वर्णन आलेलं आहे … परमात्मा हा न स्त्रि आहे ना पुरुष तर ती केवळ एकमेव अद्वितीय शक्ती आहे.ही शक्ती मुळात निर्गुण-निराकार असली तरी वेळोवेळी प्रसंगानुरूप ती सगुण साकारात प्रकटत असते..! ज्या रुपात या शक्तीला आवाहन कराल बोलवाल त्या रुपात ती भक्तासाठी धावून येते..! परंतु मातृ स्वरूपात या शक्तीला बोलावणे आणि पुरुष स्वरूपात बोलावणे यात अंतर आहे..! ते कसे..? तर माता-पिता सर्वांनाच असतात आपण जेव्हा दुखी असतो किंवा काही वेदना होऊ लागल्या तर आगोदर आठवण होते ती आईची ..समजा काटा टोचला तर तोंडातून आपसूकच आई निघते तेव्हा ते असते वात्सल्य रूप मायेचे रूप ..!

    क्रमशः

    श्री गुरुमहाराज समर्थ…!

    जय जगदंब

    वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव

    9422211334

  • सप्तशती भाग2

    महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आदिशक्ती महामाया जगन्माता असूनही, आदिशक्तीच विश्वाच्या उत्पत्ती स्थिती व नाशाला कारण आहे. तिचे स्वरूप, सामर्थ्य, पराक्रम आणि भक्त वत्सलता स्पष्ट करणारी अनेक कथानके आहेत जी आपल्या वेदशास्त्र पुराण  ग्रंथात आलेली आहेत त्या आधी शक्ती चरित्राचे पाठ, श्रवण, कीर्तन, पूजन, जपानुष्ठान, अर्चन, अनुष्ठान चंडिला प्रसन्न करणारे आहे, असे भगवतीने स्वतः स्पष्ट केले आहे.

    आदिशक्ती जगदंबा महामायेचे हे अपूर्व चरित्र जसं उपनिषदात आणि पुराणातून प्रकटलेल आहे तसेच ते सप्तशती ग्रंथातूनही स्पष्ट झालेले आहे. श्रीमार्कंडेय ऋषींनी जे मार्कंडेयपुराण लिहिलं त्यात हे देवी महात्म्य आलेल असून मार्कंडेय पुराणात श्री सप्तशती ग्रंथाचा आधार आहे..! सप्त म्हणजे सात आणि शती म्हणजे शंभर म्हणजेच सातशे श्लोकांनी युक्त असा ग्रंथ म्हणजेच सप्तशती या सप्तशती महामंत्राचा उपासनेने असंख्याची अनेक वैयक्तिक सामाजीक आणि राष्ट्रीय कार्य सुद्धा सिद्धी ला गेलेली आहेत.

    त्याचे प्रत्यंतर भारतात अनेक शक्ती उपासकांना प्रत्यक्षपणे दिसून आलेले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की भोग विकार  साधकाला वारंवार साधनेपासून परावृत्त किंवा पदच्युत करण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. म्हणून साधकाने प्राणशक्ती किंवा ज्ञान शक्तीला शरण गेलं पाहिजे ही प्राणशक्ती वा ज्ञानशक्ती म्हणजेच श्रीभगवती आदिशक्ती आदिमाया राजराजेश्वरी परांबा जगदंबा आई अंबाबाई ..!

    श्री सप्तशती म्हणजेच शक्ती पुराण आहे असं मला वाटतं ..! समस्त चराचर विश्‍वात शक्‍ती म्हणजे चैतन्य व्यापून राहिलेली आहेच तीच्या शिवाय कुठलेही कार्य केवळ असंभव आहे. अगदी बोलण्यासाठी सुद्धा वाचाशक्ती असावी लागते प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ही शक्ती कार्यरत असते म्हणून …

    या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!

    धर्मशास्त्रात अध्यात्मात जेवढ्या देवी-देवता आहेत त्या सर्व या आदि शक्तीच्याच आधीन आहेत असं म्हटल्या जातं कारण त्या आदि शक्तीनेच सर्वांची निर्मिती केलेली आहे आणि म्हणूनच या विराट शक्ती शिवाय त्या सर्व देवी-देवतांचे व सर्वसामान्य जीवांची प्राणिमात्रांची निर्मिती केलेली आहे आणि म्हणून या विराट शक्ती शिवाय या सर्व देवी देवतांचे  अस्तित्व शून्य आहे..! अर्थात याकामी शक्तीला शिवाच सहकार्य लाभलेला आहे म्हणूनच ती शिवशक्ती स्वरूपिणी म्हणजेच अर्धनारीनटेश्वर आहे. त्यामुळे प्रत्येक पुरुषात स्त्रीत्व आणि प्रत्येक स्त्रि मध्ये पुरुषत्वअथवा  गुण वैशिष्ट्य असतात यावर आपण थोडासा विचार करु या..

    मुख्य देवतांच बघा लक्ष्मीसह नारायण, शिवा सहित पार्वती, रिद्धी सिद्धी सहित महागणपती, सीतेसह श्रीराम, रुक्मिणी सहित श्रीकृष्ण, मल्हारी मार्तंडा सहीत म्हाळसा, बानू अशीही चराचराला व्यापून असलेली शक्ती पत्नीसह पती रूपाने प्रत्येकाच्या ठाई स्थित आहे.

    दैनंदिन जीवनाच्या रहाटगाडग्यात या प्रत्यक्ष शक्तीचा उपयोग व अनुभव आपण घेतच असतो आणि म्हणून शक्ती सहीत तत्त्वांची आराधना पूजा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या संकटाचा प्रतिकार करण्याची शक्ती बल जर आपल्यात असेल तर तेच आपले स्वास्थ्य व आरोग्य असते. अनेक प्रकारे या शक्तीचा अनुभव आपण घेत असतो उदाहरणार्थ शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती, बौद्धिक शक्ती, धनशक्ती, राज्यशक्ती, धर्मशक्ती, गुंडाशक्ती, साधू सज्जनांची शक्ती, श्रवण, गंध, वाणी, रुप, गुण यांची शक्ती वगैरे वगैरे या सर्व शक्ती मध्ये तेजतत्त्व विद्यमान असत. ज्याला कांती ही म्हणतात. म्हणून जी अनेक तत्त्व आणि तेज आहेत त्यात सप्तशती ग्रंथात नमन केलेले आहे.

    या देवी सर्वभूतेषु कांती रुपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!

    म्हणून ज्यावेळी आणि जेव्हा हे तेज निघून जातं त्यावेळी ती शक्ती निस्तेज होऊन निकामी होते त्यासाठी हे तेज  टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची आवश्यकता असते..!

    क्रमशः

    श्री गुरुमहाराज समर्थ…!

    जय जगदंब

    वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव

    9422211334

  • सप्तशती भाग१

       

    श्रीमद्भागवत लिखाना नंतर पुन्हा सप्तशती चंडी पाठ या विषयावर लिहाव अशी इच्छा झाली.. आणि जगदंबा कृपेने लिहिण्यास प्रारंभ केला..!
    मनुष्य जीवनात पुरुषार्थाला अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे, पुरुषार्थ चार प्रकारचे असून ती अनुक्रमे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचा विचार केल्यावर लक्षात येते की, यामध्ये सर्वात प्रथम स्थान असलेला धर्म हा पुरुषार्थ अत्यंत महत्त्वाचा वाटतो.

    धर्म

    धर्म या शब्दाचा अर्थ या ठिकाणी कुठलाही सांप्रदाय,उपासनापद्धती किंवा हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन शीख वगैरे धर्म किंवा रिलिजन या अर्थाने नसून धर्म म्हणजे जीवनाची आचारसंहिता नियम कायदे अनुशासन,वर्तन,आचार-विचार रहन,सहन खान-पान नीती वृत्ती याचे व्यवस्थित काटेकोर पालन करणे म्हणजे धर्म.तशी धर्म या शब्दाची व्यापकता फार मोठी आहे परंतु किमान वरील नियमांचे पालन न झाल्यास धर्माचा पुरुषार्थाला आपण पात्र आहोत असे समजण्यास हरकत नाही..एकदा जर हा धर्म नावाचा पुरुषार्थ प्राप्त झाला तर त्याच्या अनुषंगाने अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ प्राप्त होण्यास कुठलीही बाधा येत नाही.धर्म हा त्यांचा पाया आहे त्यावर उभी राहणारी जीवनाची इमारत मग जीवेतु शरदम् शतात पेक्षाही अधिक काळापर्यंत टिकत राहते. केवळ संकल्पातील धर्म अर्थ काम मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त व्हावा म्हणून कितीही पूजा जप,तप,अनुष्ठान केले तरी याला जर धर्माचे अनुष्ठान नसेल तर ते सर्व निष्फळ होते …! कारण उत्पाद्यन्ते विलयन्ते दारीद्रनाम् मनोरथः म्हणजे दरिद्री माणसाच्या मनात खूप चांगले मनोरथ म्हणजे इच्छा-आकांक्षा निर्माण होतात परंतु धार्मिक कृती शून्यता असल्यामुळे त्या नष्टही होतात..! भाविक भक्त जन हो मी सप्तशती चंडीपाठ यासंबंधी मी अभ्यासलेली अनुभवलेली आणि माझ्या सद्गुरूंनी उपदेश असलेली श्री सप्तशती या
    महामंत्राच्या उपासनेची आणि त्यांच्या महात्म्याची माहिती यथा ज्ञानेन सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.अर्थात मला हे मान्य आहे की माझ्यापेक्षाही जाणकार आणि ज्ञानी विद्वान यासंबंधीचे आहेत.. परंतु मी माझ्या पद्धतीने श्री सप्तशती ग्रंथाबद्दल सांगणार आहे..!
    तेव्हा भाविकांनो लक्षात असू द्या की उपासने शिवाय अपूर्व अद्भुत असं काहीच निर्माण होत नाही..! त्यामुळे मनोवांछित कामनाही पूर्ण होत नाहीत..!
    हा आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीच्या सिद्ध असा सिद्धांत अध्यात्म शास्त्रात रूढ आहे.
    त्यानुसार निरनिराळ्या अशा उपासना आपल्या भारत देशात चालत आलेल्या आहेत कोणत्या युगात कोणत्या काळी कोणत्या कार्यासाठी कोणत्या देवतेची उपासना करावी याचे शास्त्र संकेत आहेत तेव्हा यथाशास्त्र यथाविधि त्या देवतेची उपासना केल्यास त्याने फलप्राप्ती झाल्याची अनंत उदाहरणे प्राचीन कालापासून आजपर्यंत देता येतील.. सध्याच्या या विक्राळ कालीकाळात आणि विज्ञान तंत्र ज्ञानाच्या काळात महर्षी व्यासांनी अत्यंत दूरदृष्टीचा विचार करून कलियुगात कालीचंडी विनायको म्हणजेच देवी चंडिका आणि गणेशाची उपासना शीघ्र फलदायी होईल असे म्हटलेले आहे..!
    क्रमशः
    श्री गुरुमहाराज समर्थ…!
    जय जगदंब.

    वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव
    9422211334