कुलाचार व उपासना

हिंदू धर्मातच कुलदेवता पूजन व कुलाचार व उपासना का?

काही लोकांनकडून कधी कधी विचारणा केली जाते की, हिंदू धर्मात नेहमी उपासना पध्दतीबद्दल आणि कुलदैवत-कुलाचाराबद्दल सांगितले जाते, पण जगात असे कितीतरी धर्म पंथ आहेत, ज्यांच्यात कुलदेवताच नाहीत, मग अश्याना कुलदोष, कुलदैवतांचे त्रास का नाही होत..???

ह्यांचं कसं सुरळीत चालतं, ह्यांना का काही असला त्रास होत नाही..??

खरेतर हे प्रश्न चूक नाहीत म्हणून ह्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला, कदाचित हे उत्तर एकांगी ठरेल परिपूर्ण म्हणता येणार नाही पण काही अंशी समर्पक वाटते.

उत्तर: हे सर्व इतर धर्मीय सामुहिक उपासना न चुकता करतात, म्हणून परमेश्वरी तत्व ह्यांना सांभाळून घेते.

आपले हिंदू धर्मीय सामूहिक उपासना करत नाहीत.

उलट जिथे सामूहिक उपासना होत असेल तिथे जायला सर्वात कंटाळा करणारा समाज म्हणजे आपला समाज.

सामूहिक उपासना खरंतर आपल्या वैदिक धर्मातील गुरुकुळातून उत्पन्न झालेली प्रार्थना व्यवस्था आहे.

सामूहिक उपासना ही सर्व धर्मात साप्ताहिक अर्थात आठवड्यातून एकदा अर्थात 7 दिवसांनी केली जाणारी उपासना आहे.

7 दिवसानीच का?? कारण सामूहिक उपासनेची स्पंदन 7 दिवस टिकतात, 8व्या दिवशी ही स्पंदन recharge करणे आवश्यक असते. आपण जेव्हा एकत्रित येऊन उपासना करतो तेव्हा जितके उपस्थिती असेल तितक्या प्रमाणात उपासनेची स्पंदन आपल्याला मिळतात.

समजा एखाद्या मंदिरात रामरक्षा पठण चालू आहे, तिथे 50 जण बसलेले आहेत, एका माणसाच्या रामरक्षा पठणाने 10 ग्राम स्पंदन तयार होत असतील तर तिथे 50 माणसे असल्यामुळे ही स्पंदने 50× 10= 500ग्राम स्पंदने प्रत्येकाला प्राप्त होतील. एका माणसाला 500 ग्राम स्पंदन प्राप्त करायला 50 दिवस रामरक्षा म्हणावी लागेल तर सामुहिक उपासनेत एका वेळी 50 दिवसांची प्राप्ती करता येते. पण ही प्राप्ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला 8 व्या दिवशी एकत्रित येऊन उपासना करणे जरुरीचे आहे, ह्यात जेव्हा नियमितपणा येतो तेव्हा अडचणी आपोआपच सुटताना दिसतात. बंद झालेले मार्ग आपोआपच खुले होताना दिसतात.


जेव्हा एखाद्या भूमीवर सामूहिक उपासना सतत चालू असते तेव्हा त्या भूमीचे दोष नाहिशे होऊन, नैसर्गिक आपत्ती पासून आपोआपच संरक्षण भेटते. समाजाचे..देशाचे सामुहिक प्रारब्ध सौम्य होते. कोरोना काळात सामुहिक उपासना नियमितपणे करणाऱ्या लोकांवर कोरोनाचा प्रादूर्भव तीव्रतेने दिसला नाही. उपासनेमुळे / प्रार्थनेमुळे तुमच्या प्रारब्धात बदल घडतात. सामूहिक उपासनेमुळे साधकांचे वैयक्तिक प्रारब्ध हलके होते. किंवा त्याची तीव्रता कमी होताना दिसते.

ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधवांकडून काय शिकावं?? तर त्यांची सामूहिक उपासनेप्रति असलेली निष्ठा.मुस्लिम शुक्रवारी आणि ख्रिस्ती रविवारी आपल्या धार्मिक स्थळावर आवर्जून जातात

ही तळमळ आपल्या लोकांमध्ये दुर्दैवाने नाहीये. आपल्याकडे आरती ला मंदिरात जेमतेम ची हजेरी!!!

जेव्हा एखादी व्यक्ती उपासना करते तेव्हा त्याला फळ देणं परम तत्वाला बंधनकारक ठरते. मग उपासना कुठल्याही स्वरूपाची असो.
सामुहिक उपासनेत प्रचंड बळ असते. त्यामुळेच भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण होतात.आमचे स्वाध्यायाचे प्रणेते अर्थात पांडुरंग शास्त्री आठवले सांगतात की आठवड्यातला एक तास जरी सामूहिक रित्या देवाला दिला तरी संपूर्ण आठवडा प्रसादरूप होतो

मग प्रश्न पडतो आपल्यात सामूहिक उपासना ही पद्धतच नव्हती का?? सामूहिक उपासना हीच भारतीयांची अख्ख्या विश्वाला देणगी आहे. पण जाती-पाती च्या खुळचट संकल्पनांमुळे सामूहिक उपासना बंद पडली. आपल्या आपल्यातच आपण इतके जुंपलो आहोत की आपल्याला संस्कृतीचाच विसर पडलाय.

कुळाचार आणि कुलदेवतेची उपासना ही सामूहिक पद्धतीनेच केली जायची. अजूनही काही कुटुंबांमध्ये कुलदेवतेच्या वारा च्या दिवशी तळी भंडार, आरती स्तोत्र वाचन इत्यादी केले जाते पण हे प्रमाण अतिशय कमी आहे.

मंदिरात ठराविक वारी जमून सामुहिक उपासना हल्ली काही लोकांनी सुरू केली आहे. ह्या उपासनेला नियमितपणे जावे. तुमचे वैयक्तिक दैवत, उपासना जे काही असेल ते खंडित ना करता !!!
आत्ताच्या भयानक काळात सामूहिक उपासना अतिशय गरजेची आहे. एक अदृश्य संरक्षण कवच प्राप्त सहज होऊन जाते. इतर धर्मीयांकडे तर मंत्र ही नाही, आपल्याकडे तर बीज मंत्र आणि सिद्ध स्तोत्रे आहेत, ते आपल्याला भारी पडतात कारण एकच सामूहिक उपासना, आपल्या स्तोत्रांची मोठ्या प्रमाणात नियमितपणे सामूहिक आवर्तने होऊ लागल्यास धर्म प्रसारात ह्याचे किती मोठे बळ प्राप्त होऊ शकेल ह्याचा ज्याने त्याने विचार करावा!!!

कुलाचार काय असतो

जय श्री राम🚩🚩🚩🚩

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top