नवरात्र : काय करावे – काय नाही

नवरात्र मध्ये नऊ दिवस देवीची उपासना करावी नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्याचे धर्मशास्त्रात कुठेही नमूद नाही आणि तो मार्केटिंक कंपन्यांनी आणलेला बीभत्सपणा आहे ते खालीलप्रमाणे…

नवरात्र आणि देवीची उपासना

१) ४ वेद ४ उपवेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे आणि उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती आणि दुर्गा उपासनेचे ग्रंथ, असे जवळपास ६० स्मृतिग्रंथ यांत कुठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करा, असे दिलेले नाही. धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करा (स्वच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम) असे दिले आहे. तुमच्यापाशी जे अलंकार असतील ते घाला. मॅचिंग हवेच असे नाही. मार्केटिंग कंपन्यांनी विविध कल्पना वापरून हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केला आहे. त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बीभत्सपणा आला आहे.

आता याची पुढची आवृत्ती म्हणजे ‘नवरात्रीत ९ रंगांच्या साड्या किंवा ड्रेस घाला’, अशी विज्ञापने झळकू लागली आहेत.

नवरात्र यांचा लाभ उठवत ड्रेस विक्रेते अन् व्यावसायिक यांनी गल्ला भरण्यासाठी ९ रंगांच्या ड्रेस ची संकल्पना विज्ञापनांमधून मांडली आहे. ९ रंगांच्या साड्या किंवा ड्रेस घालणे उपासनेच्या दृष्टीने निरर्थक आहे.

२) इव्हेंट मँनेजमेंट कंपन्यांची लुडबूड!

प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे. महाराष्ट्रात घटस्थापना ही प्रधान असते. त्याचसमवेत अखंड नंदादीप, काही जणांकडे त्रिकाळ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी कुमारिका पूजन आणि भोजन, तसेच माळा बांधणे, अशा पद्धतीने नवरात्र होते. ललिता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होमहवन, सरस्वती आवाहन-पूजन, असेही धार्मिक विधी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत असतात. कर्नाटकात दसरा मोठा असतो, कच्छ, सौराष्ट्र, गुजरात या प्रांतात देवीच्या प्रतिमेचे पूजन करून रात्री जागरण, गरबा, तसेच होमहवन वगैरे पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. बंगालमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. इव्हेंट मँनेजमेंट कंपन्या यात बरीच गडबड करतात, सरमिसळ करतात आणि नवीनच पद्धती निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो, शास्त्रीय आधार नसतो आणि त्यात देवीची उपासना हा सर्वांत मुख्य भागच नसतो.

३) नवरात्र हा मातृशक्तीचा उत्सव आहे, हे न कळल्यास पुढील पिढीचे धर्मांतर होईल!

प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट्य असते, परंपरा असतात. त्या जपल्याच पाहिजेत अन्यथा काही वर्षांनी आपली मुले, नातवंडे नवरात्र याचा अर्थ डिजे लावून गरबा, दांडिया खेळणे एवढाच घेतील. नवरात्र हा मातृशक्तीचा उत्सव आहे, हे त्यांना कळणारच नाही. मी हिंदु आहे, माझे आचार-विचार, संस्कृती, माझ्या धार्मिक परंपरा याचा त्यांना एकदा विसर पडला की, गळ्यात क्रॉस घाला किंवा सुंता करा, काहीच फरक पडणार नाही. नेमकी हीच नस या इव्हेंट आणि मार्केटिंग आस्थापनांनी जाणली आहे. यात काही झाले, तरी लाभ परधर्मीयांचाच आहे.

एखादी गरीब भगिनी हे सध्याचे हाय फाय नवरात्र जमणार नाही म्हणून ती देवीपूजन करणार नाही, म्हणजे हळूहळू ती नास्तिक होईल. श्रीमंती आणि धर्मशिक्षणाचा अभाव अन् मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या डिजे आणि गरबा-दांडियाला नवरात्र समजतील, कारण त्यांना नवरात्र म्हणजे देवीची उपासना हे ठाऊकच नसणार. यांचेही धर्मांतर करणे सोपे जाईल. थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल आणि याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदु समाजच कारणीभूत आहे.

४) डे संस्कृती लादणार्‍या कंपन्या (आस्थापने) आणि त्यांच्या आहारी गेलेली तरुण पिढी!

काही वर्षांपूर्वी डे संस्कृती भारतात नव्हती. जेव्हा गिफ्ट वस्तूंच्या कंपन्या आणि ग्रिटिंग कार्ड (शुभेच्छापत्रे) करणार्‍या कंपन्या आपल्या देशात आल्या, तेव्हापासून हे डेचे खूळ डोक्यात शिरले. या दिवसांत कोट्यवधींची उलाढाल या कंपन्या करत आहेत. आज अशी अवस्था आहे की, मुलांना श्रीगणेश चतुर्थी, गोकुळाष्टमी कधी आहे, हे सांगावे लागते, तर डे मात्र ते लक्षात ठेवतात. गोकुळाष्टमी ही राजकीय पुढारी मंडळींच्या कृपेने अशीच डिजेमय आणि मद्यमय झाली. किमान आईचा नवरात्र उत्सव (नवरात्रोत्सव) असा होता कामा नये, असे वाटते.

५) नवरात्र काळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांतील देवीची उपासना करावी!

चंड-मुंड, शुंभ-निशुंभ, रक्तबीज वगैरे राक्षसांना मारून त्यांचा उत्पात शमन करून जगदंबेने जी विश्रांती घेतली तो काळ म्हणजे हा नवरात्र आहे. या युद्धाचा शीण घालवण्याकरता देवीने नृत्य केले, असा उल्लेख पुराणात आहे. (आपण युद्ध करतच नाही केवळ नाचतो.) या काळात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांतील देवीची सेवा करणे, आपल्या परंपरेनुसार नंदादीप, माळ बांधणे वगैरे आचार करावेत. मुलांकडून सरस्वतीदेवीची उपासना ही विद्या आणि बुद्धी यांकरिता करून घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरिता महालक्ष्मीची उपासना करावी आणि शत्रूसंहार सामर्थ्यप्राप्तीकरिता महाकालीची उपासना करावी.

६) नट्यांसारखे नाचण्यापेक्षा तरुण मुलींनी पराक्रमी होण्यासाठी प्रयत्न करावेत!

मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिळवून उत्तम मार्गाने धन जोडणे आणि छेडछाड करणार्‍या गुंडांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे, याकरिता नवरात्र मध्ये देवीचे माहात्म्य अन् पराक्रम वाचावेत ही आज काळाची आवश्यकता आहे. नट्यांसारखे नाचण्यापेक्षा महाकालीसारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तुरची चेन्नमा, जिजाबाईं यांच्यासारखा पराक्रम दाखवण्याची ही वेळ आहे आणि आवश्यकताही त्याचीच आहे. नाचणारे खूप झाले आहेत; पण पराक्रमी मात्र अल्प होत आहेत.

७) मुलामुलींना धोक्यांची जाणीव करून देणे हे कर्तव्य!

या दांडिया आणि नवरात्र व गरब्याच्या काळात संततीनियमन साधनांची विक्री दुप्पट होते आणि नंतर शालेय अन् महाविद्यालयीन तरूणींच्या गर्भपाताचे प्रमाणही वाढत आहे. लव्ह जिहाद याच काळात फोफावतो आहे. तेव्हा आपल्या मुलामुलींना या धोक्यांची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य आहे. तेव्हा या मार्केटिंग आणि इव्हेंट फंड्यांना बळी न पडता सात्त्विकरित्या, आनंदाने, आपल्या परिस्थितीनुरूप जगदंबेची सेवा करा आणि देवीची कृपा संपादन करा, ही विनंती.

यापुढे शुभेच्छा देताना तरी सर्व हिंदूनी असे म्हणा, नवरात्र दस-याच्या, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
हिंदू धर्मियांनी आपल्या परंपरा आणि आपल्या देवीची उपासना करणे हे परम कर्तव्य आहे🙏
संस्कृती जतन करणे आवश्यक आहे नाहीतर संस्कृतीचा नाश होईल🙏

🙏🚩 जय हिंदुराष्ट्र🚩🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top