जीवनाच्या आनंदमय प्रवासातील काही सुवर्णक्षण

आनंदाच्या शोधात निघालेला
आणि प्रत्येक गोष्टीत आनंद शोधताना घडलेले असेच माझ्या आयुष्यातील काही सुवर्णक्षण आपल्या सोबत शेयर करायला मला नक्की आवडेल. 

– निलेश दिलीपराव झाल्टे

माझ्या नावा सहित पोस्ट शेर करू शकता…👍

सर्वात पहिला आनंदक्षण

diya, hands, safe
baby, hands, fingers
baby feet, newborn, leg

तो सुवर्ण क्षण 22 नोव्हेंबर 1986

त्याची गोष्टच निराळी

सकाळपासून माझ्या आईची दादा पाटील (डॉ. रंगनाथ भा. महाजन) यांच्या घरी असलेल्या खंडोबा नवरात्रीच्या तयारीत आजीला मदत सुरू होती, बाबा नेहमी प्रमाणे व्यस्त कार्यबहुल्यात पूजे साठी जवळच्या खेड्यावर गेलेले होते. माझे आजोबा कै. श्री सुदामशास्त्री त्यांचे मित्र कै. श्री वामनशास्त्री, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै.श्री मोदीबाबा हे सगळे मांडणा या गावी श्री मारोती महाराज यांच्या गावभंडारा साठी गेलेले होते. आमचे शेजारी श्री किरण सुरडकर यांच्या घरी काल जन्म झालेल्या पुत्रजन्माचा पेढा वाटप करण्यात येत होता सगळे अगदी छान असे वातावरण होते, पुष्य नक्षत्राचा योग होता कार्तिक महिन्याची थंडी होती कृष्ण पक्षातील षष्टि तिथी आणि वार होता शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर, 1986.


माझे आगमन


रात्रीचे 8-9 वाजले असतील आमच्या घरी माझी आई आणि बाबा दोघे घरी होते, बाबा नुकतेच कामावरून घरी आले होते चहा पिऊन गप्पा सुरू होत्या.
मला नेमके याच वेळी तुमच्या सगळ्यात यायच होत आणि मग मी आईच्या पोटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागल्याने आईला दुखायला लागले, बाबांनी डॉक्टर काकाला बोलावून घेतले, अथक प्रयत्नांनी दत्त मंदिर उंडणगाव येथील आमच्या घरी माझे या सुंदर जगात आगमन झाले. झाल्टे घराण्यात आनंदाचे वातावरण सुरू झाले,

 

जन्मताच गमंत घडली

 

 

पण खरा आनंदक्षण तर असा आहे की मी जन्मलो तेव्हा सुद्धा अगदी शांत होतो, लहान बाळ असून सुद्धा माझ्या तोंडून आवाज निघत नव्हता की कसली चुळबुळ मी करत नव्हतो.
डॉक्टरकाकानी मग माझ्या बाबांकडे पाणी मागितलं त्यांनी त्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा माठातील तांब्या भरून पाणी त्यांना आणून दिल (त्यांना वाटलं कदाचित प्यायलं पाणी हवं असेल) डॉक्टर काकांनी मात्र ते तांब्याभर थंड पाणी नुकत्याच जन्मलेला मी – माझ्या अंगावर टाकलं अन तेव्हा कुठे मी रडायला लागलो आणि डॉक्टरसह माझ्या आई-बाबांनी सुटकेचा निश्वास घेतला आणि हसून हसून लोटपोट झाले.

तर असा माझ्या जन्माचा हा आनंद सोहळा माझ्या आई बाबांनी मला आजही सांगितला की मलाच हसू येते आणि त्यांनाही, आपल्यालाही मजा आली माझी जन्म कहाणी ऐकून आता लवकरच पूढील भाग घेऊन येईल…

5 thoughts on “सुवर्णक्षण जीवनातले”

  1. Atul Kulkarni

    थ्री इडियट चित्रपटात असाच एक प्रसंग आहे. All is well म्हणत पृथ्वीतलावर येण्याची तुमची जन्म कहाणी वाचून तो प्रसंग आठवला..!!

    बाकी मस्त लिहले आहे एकदम..!!!!👍👍👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top