खर हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण येतोय दीपावली, ज्याला आपण मराठी मधे दिवाळी म्हणतो ।
परंतु 30% लोकांनाच माहित आहे की दिवाळी हा सण का साजरा केला जातो . बाकी 70% तर फक्त लहानपणापासून असे समजतात की फक्त दिवे लावणे , फराळ , आणि फटाके फोड़णे ,लक्ष्मी पूजन करणे, बस हीच आहे दिवाळी असो काही हरकत नाही ।
आज मी तुम्हाला या पोस्ट मधे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की दिवाळी का साजरी केली जाते आणि दिवाळीला प्रभु श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा का केली जाते.
नीट वाचा 👍
दिवाळी हा हिंदुंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी भगवान श्री राम, बंधू श्री लक्ष्मण आणि माँ सीता यांच्या सोबत 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर आयोध्येत परत आले होते.
आयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभु श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि आयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत तेव्हा पूर्ण आयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी आयोध्या सजवली होती.
जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत केला त्याच्या बरोबर 21 दिवसांनी श्रीराम हे आयोध्येमध्ये पोहोचले होते तेव्हा पासून दिवाळी हा सण साजरा केला जातो ।
म्हणजे लाखो वर्षापासूनची ही परम्परा अजूनसुद्धा हिन्दू बांधव साजरी करतात.
दिवाळी 5 दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे ।
चला तुम्हाला या 5 दिवसाचं महत्त्व सांगतो 👍
1:- पहिला दिवस आहे धनत्रयोदशी. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत समुद्रमंथन केलं होतं तेव्हा समुद्रामधून 14 रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या कॅलेंडरनुसार पितृपक्षाच्या 13 दिवसानंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रामधून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले.
भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली.
त्या दिवसापासून या दिवसाला धनतेरस , धनत्रयोदशी असे नाव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो.
2:- दिवाळी चा दूसरा दिवस आहे नरकचतुर्दशी👍
एके काळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता , त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फ़क्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो.
पुढच्या जन्मात भूमि देवी ने सत्यभामा च्या रुपात अवतार घेतला , सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झाले. त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला.
तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरक चतुर्दशी या नावाने ओळखलं जातं.
3:- दिवाळीचा तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजा 👍
देव आणि असुर हे जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माँ लक्ष्मी प्रकट झाली होती ।
तेव्हा पासुन त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश , सुख ,आणि संपत्तीसाठी माँ लक्ष्मी यांची पूजा होते।
दिवाळीच्या दिवशी माँ लक्ष्मी यांच्या सोबत श्री गणेश यांची सुद्धा पूजा होते ।
पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माँ पार्वती चे 2 पुत्र होते ।
लक्ष्मीने पार्वती जवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही. मग गणपतीची काळजी ती कशी घेईल. याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईन तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईन.
म्हणून तेव्हापासून
जिथे लक्ष्मीची पूजा होते तिथे गणपतीची सुद्धा पूजा होते ।
खर तर दिवाळीच्या दिवशी श्री राम आयोध्येमध्ये आले होते परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा होते ।
पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णु हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णु चा अवतारच आहे ।
त्यामुळे भगवान श्रीराम यांची पूजा केली जात नाही
4:-मित्रानो अश्विन अमवस्ये ला लक्ष्मी पूजन झलयस नंतर बलि प्रतिपदा हा दिवस दीवाली पाडवा म्हणून साजरा होतो ।
साडे तिन मुहूर्तान पाईकी एक हा दिवस आतिशय शुभ मानला जातो ।
अक्षय तृतीय , गुढी पाडवा , विजय दशमी हे पूर्ण मुहूर्त असून ,दिवाळी पाडवा हे अर्ध मुहूर्त आहे या दिवशी सोन खरदी , सुवासिनी कढुन पति ला ओवाळ ले जाते ।
असे खुप काही महत्त्व आहेत
व्यापारी लोकांचे नवीन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते
हिशोबाच्या नवीन वह्या ज्याला खतावणी म्हणतात त्यांचे पूजन करून नवीन सुरुवात केली जाते
कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो
5:- दिवाळीचा चौथा दिवस आहे गोवर्धन पूजा 👍
रामायणानुसार जेव्हा श्री राम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा सगळे वानर हे आपल्या आपल्या शक्तिनुसार दगड जमा करत होते तेव्हा हनुमानजीनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता ।
परंतु ते यायच्या आधीच सेतूचं काम झाल होतं.
सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं.
श्रीराम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील ।
आणि हनुमानाला सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेऊन ये.
पुढच्या जन्मात जेव्हा भगवानांनी कृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातल्या लोकांना गोवर्धनाची पूजा करण्यास सांगितली.
याला नाराज होऊन इंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केलं. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला.
तेव्हापासून गोवर्धन पूजा केली जाते ।
6:- पाचवा दिवस आहे भाऊबीज 👍
या दिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले ।
त्यांच्या बहिणी कडून झालेला आदरसत्कार पाहून ते खुप प्रसन्न झाले ।
तेव्हा यमराजाने हे वरदान दिलं की या दिवशी जो भाऊ तिच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ति मिळेल आणि मोक्ष मिळेल तेव्हापासुन हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.
त्या दिवशी सगळ्या बहिणी त्याच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात
तर मित्रानो हे 6 दिवास दिवळीचे अपल्या साठी खुप महत्वाचे आहे ।
अपन कट्टर हिन्दू आहेत अपल्या ला या गोष्टी 100% माहिती असायला हवी ।
भविष्यात सेक्युलर अथवा गैर हिंदुनि ” दिवाळी का साजरी केलि जाते विचारल्यास तुम्हाला या गोष्टी तोंड पाठ पाहीजे ।