अध्यात्मिक शक्ती ही अदृश्य स्वरूपामध्ये असते ही शक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणत्यातरी दृश्य माध्यमावर श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण अव्यक्त शक्तीला उद्देशून आपण प्रार्थना केली पूजा, अर्चना, जप जाप्य, होम-हवन आदि कार्य केले तर लगेच ती शक्ती प्रसन्न होईल किंवा असं सामान्य भक्ताबाबत, साधका बाबत होऊ शकत नाही. कारण अव्यक्त शक्तीच्या अवतारावर तिच्या प्रकट होण्याबाबत किंचितसा किंतु वा अविश्वास सुद्धा ती शक्तीच ग्रहण होऊ देत नाही…!
विज्ञानाच्या प्रयोगाचेही असेच असते त्यात जराही न्यूनता किंवा चूक झाली तर परिणाम निष्कर्षाप्रत येत नाहीत.. म्हणजेच अध्यात्म आणि विज्ञान प्रयोगात चूक न होणे, म्हणजेच बिनचूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा प्रयोग संपुर्ण विश्वास,संपूर्ण समर्थन,संपूर्ण समर्पण,निःसंशयताः, सातत्य, संयम,सबुरी इत्यादी गुणवत्तांवर आधारलेल्या असतात,तेव्हाच ते निर्गुण तत्व सगुण रुपात साकारते.
त्यासाठी अहंकार रहित समर्पणाची आवश्यकता असते. म्हणजेच अस्तित्व शून्य झाल्यावर ती दैवी शक्ती प्रकटते,निर्माण होते आणि सर्वत्र व्यापून टाकते. म्हणजेच तो प्रयोग यशस्वी व सफल होतो हीच त्या शक्तीची कृपा प्रसन्नता होय..!
क्रमशः
श्री गुरुमहाराज समर्थ…!
जय जगदंब
वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव
942221133