मागे सांगितल्याप्रमाणे कलियुगात देवी आणि गणपतीची उपासना शीघ्र फलदायी होईल असं महर्षी व्यासांनी नमूद करून ठेवलाय. या विधानांचा विचार केल्यावर असं लक्षात येतं की च़ंडी म्हणजे शक्ती आणि गणपती म्हणजे बुद्धी.. शक्ती आणि बुद्धी ची ही उपासना हे आजच्या आधुनिक काळात अगदीच शब्दशः अर्थ घेता शक्ती आणि बुद्धीसाठी सतत प्रयत्नशील कार्यमग्न राहून त्याद्वारे शारीरिक, मानसिक बौद्धिक, अध्यात्मिक, स्वास्थ्यपूर्ण श्रमजीवी अशी शक्ती आत्मसात केली गेली तर आपले हे जीवन सर्वार्थाने चतुर्विध पुरुषार्थ सहज पणे प्राप्त करू शकते.
त्यासाठी हेच आपले श्रेयस आणि प्रेयस असणे आवश्यक आहे, असं मला वाटते. तत्वाचा निरूपण करताना निरुपणकार म्हणजेच महर्षी व्यास असं म्हणतात देवीची विधिवत नवरात्र पूजा जशी आपल्या घराण्याची कुलपरंपरा असेल त्यानुसार नित्यनैमित्तिक अर्चना उपासना भक्ती पूजा केली पाहिजे..
उगीच रूढीग्रस्तता ठेवून शास्त्राचा अव्हेर करणे योग्य ठरत नाही..! देवीच्या नवरात्रात नऊ हा अंक महत्त्वाचा दिसून येतो जसे की नवचंडी, नवदुर्गा, नऊ कन्या, नवरात्री, नवार्ण मंत्र, नवरत्न, माला नवनीत इथेच हवं. नवविधा भक्तीच प्रत्येक अस्तित्व आणि महत्त्व या नवरात्रीत आहे. शास्त्र असे म्हणते की या नवरात्रीत या जगदंबेच्या त्रिगुणात्मक म्हणजे तीन गुण तत्त्वांची तीन दिवस पूजा-अर्चा उपासना करावी म्हणजे मला असं वाटतं की सत्व, रज आणि तम या गुणांनी आपला देह बनलेला आहे.
हे त्रिगुण सर्व व्यापकच आहे तेव्हा गुणाच वर्चस्व कमी होऊन आपलं जीवन सुंदर व सुखकर होईल त्यासाठी पहिल्या तीन दिवसात महाकाली म्हणजे दुर्गेची पूजा करावी. त्यातील आपले दोष दुर्गुण आळस नष्ट करण्याची प्रार्थना करावी. तेव्हाही दुर्गा आपल्यातील असुरी प्रवृत्ती असुर गुणांची संग्राम करून त्यांना नष्ट करेल. त्यामुळेच आपले कुसंस्कार आसुरीवृत्ती दुर्वासना यांचा ती नाश करेल. ही साधकाची प्रथम अवस्था असेल. कारण दुर्बुद्धी नष्ट झाली चित्त शुद्ध झाले मळ दूर झाला की साधकाचा पुढचा प्रवास भगवती भावास पूरक आणि प्रेरक ठरतो..!
क्रमशः
श्री गुरुमहाराज समर्थ…!
जय जगदंब
वेदमूर्ती भागवताचार्य प्राध्यापक श्रीअशोक झाल्टेशास्त्री उंडणगाव
942221133